Maharashtra

Sangli

CC/14/152

SHRI FAKRUDDIN KAMARUDDIN SANADI - Complainant(s)

Versus

BHARAT SANCHAR NIGAM LIMITED THROUGH GENERAL MANAGER (TELECOM) - Opp.Party(s)

ADV. B.S. KHILARE

16 Jun 2015

ORDER

                                         नि.25

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या - सौ वर्षा नं. शिंदे

मा.सदस्‍या - सौ मनिषा कुलकर्णी 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 152/2014

तक्रार नोंद तारीख   : 18/06/2014

तक्रार दाखल तारीख  :  31/07/2014

निकाल तारीख          :  16/06/2015

 

श्री फकरुद्दीन कमरुद्दीन सनदी

रा.कराड रोड, एम.एस.इ.बी. सब-स्‍टेशनसमोर,

विटा, ता.खानापूर जि.सांगली                                ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

भारत संचार निगम लिमिटेड, सांगली दूरसंचार,

तर्फे जनरल मॅनेजर, टेलिकॉम, सातारा                               ........ सामनेवाला                              

 

तक्रारदार  तर्फे : अॅड श्री बी.एस.खिलारे

सामनेवाला तर्फे : अॅड श्री यू.जे.चिप्रे

 

- नि का ल प त्र -

व्‍दारा : मा. सदस्‍या : सौ वर्षा नं. शिंदे  

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार सामनेवाला कंपनीने त्‍यांचे दूरध्‍वनी कनेक्‍शन बेकायदेशीरपणे बंद करुन दूषित सेवा दिलेने दाखल केली आहे.  प्रस्‍तुतची तक्रार स्‍वीकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झाला.  सामनेवाला वकीलांमार्फत हजर.  सामनेवाला यांनी नि.12 वर लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. 

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात हकीकत अशी -

 

            तक्रारदार हे मेकॅनिकलचा व्‍यवसाय कर‍तात.  सामनेवाला कंपनी ही दूरध्‍वनी सुविधा पुरविणेचे काम करते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून दूरध्‍वनी कनेक्‍शन घेतला असून त्‍याचा कस्‍टमर आय.डी.नं.1014529707 असा असून तक्रारदार यांचा फोन नं. 02347-275198 असा आहे.  तक्रारदार यांचे भाऊ नामे शमशुद्दीन हे वकील व्‍यवसाय करीत असून सदरचा फोन वर नमूद पत्‍तेवर असणारे वकील ऑफिसमध्‍ये असून सदर फोनचा वापर सदर व्‍यवसायाकरिता करीत असून सदर फोनवरुन पक्षकारांचे बरोबर संपर्क साधला जातो.  तक्रारदार यांनी सदरचे दूरध्‍वनीचे बिल वेळोवेळी मुदतीत भरले आहे.  तक्रारदार यांनी दि.4/5/13 रोजीचे बिल रक्‍कम रु.473/- दि.24/5/13 रोजी सामनेवाला कंपनीमध्‍ये जमा केले आहेत.  दि.4/6/13 रोजीचे रक्‍कम रु.154/- चे बिल तक्रारदार यांनी वेळेत जमा केले असताना देखील सामनेवालांनी दि.4/7/13 रोजीचे बिलामध्‍ये मागील महिन्‍याचे बिल वेळेत जमा केले असताना देखील रक्‍कम रु.153.77 दि.4/7/13 चे बिलामध्‍ये तक्रारदारांकडून येणे बाकी आहे असे खोटे भासवून मागील येणेबाकी व चालू बाकी असे एकूण रक्‍कम रु.299/- चे बिल तक्रारदार यांना दिले.  तक्रारदार यांनी याबाबत तक्रार केली असता संबंधीत अधिकारी यांनी मागील रक्‍कम जमा आहे असे सांगून चालू बिल तक्रारदार यांना जमा करणेस सांगितले.  त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे बिल सामनेवाला कंपनीमध्‍ये जमा केले आहे.  तदनंतर सामनेवाला यांनी पुन्‍हा दि.5/8/13 रोजी बेकायदेशीरपणे मागील बिल जमा केले असताना देखील वाढवून ज्‍यादा रकमेचे बिल अर्जदार यांना दिले.  तसेच त्‍यानंतर दि.5/9/13, 5/10/13, 5/11/13, 5/12/13, 6/1/14, 4/2/14 रोजीचे प्रत्‍येक बिलामध्‍ये मागील बिले जमा केली असताना देखील जाणूनबुजून मागील पुढील बिलांमध्‍ये मिसळून ज्‍यादा रकमेचे बिल अर्जदार यांना देवून अर्जदार देय लागत नसलेली रक्‍कम सामनेवाला हे अर्जदार यांचेकडून मागणी करीत आहेत.  तसेच यापूर्वी दि.5/12/13 रोजीचे बिलामध्‍ये अर्जदार हे केवळ रक्‍कम रु.297/- देय असताना रक्‍कम रु.1,245/- चे बिल सामनेवाला यांनी अर्जदार यांना दिले होते. त्‍यावेळी तक्रारदार यांनी जाबदार यांचे ऑफिसमध्‍ये जावून सर्व पावत्‍या दाखवून बिले भरलेची पावती पाहून बिल रक्‍कम रु.1,245/- ऐवजी रक्‍कम रु.297/- भरावे असे सही-शिक्‍क्‍यानिशी बिलवर लिहून दिले आहे.  तदनंतर दि.6/1/14 रोजीचे बिलामध्‍ये देखील थकबाकी व सध्‍याचे चर्जेस अशी रक्‍कम रु.850/- ची बाकी सामनेवाला कंपनीने करुन बिल अदा केले होते.  सदर बाबत अर्जदार यांनी तक्रार केली असता तुमची थकबाकी नाही, तुम्‍ही रक्‍कम रु.145/- भरा असे म्‍हणून लाल शाईने रक्‍कम रु.850/- यास काट मारुन रु.145/- हा आकडा टाकून वास्‍तविक बिल रु.135/- असताना रक्‍कम रु.145/- बेकायदेशीररित्‍या भरुन घेतलेले आहे.

 

      दि.4/2/14 रोजीचे बिलामध्‍ये देखील तीच पुनरावृत्‍ती सामनेवाला यांनी करुन एकूण थकबाकी व चालू रक्‍कम रु.872/- अशा रकमेचे बिल पाठविले. परंतु करंट चार्जेसची रक्‍कम रु.157/- तक्रारदार यांनी भरली आहे.  मार्च 2014 मध्‍ये सामनेवाला यांनी रक्‍कम रु.860/- चे बिल पाठविले व तक्रारदारांचा दूरध्‍वनी बंद केला.  तक्रारदार यांनी त्‍याबाबत विचारणा केली असता सामनेवाला यांनी सदर थ‍कबाकीची रक्‍कम तुम्‍ही जमा केली असली तरी देखील आम्‍ही ती कमी करु शकत नाही कारण बिले ही पुण्‍यावरुन येतात. त्‍यामुळे तुम्‍ही संपूर्ण बिल भरा, अन्‍यथा आम्‍ही फोन चालू करणार नाही असे सांगितले.  तक्रारदार यांनी दि.1/4/14 रोजी सामनेवाला यांचेकडे लेखी तक्रार करुन दूरध्‍वनी पूर्ववत करणेस सांगितले तथापि सामनेवालांनी सेवा पूर्ववत केली नाही.  अशा प्रकारे सामनेवाला यांनी दूषित सेवा देवून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.  तक्रारदार हे  हिशोबाअंती जी काही कायदेशीर रक्‍कम सामनेवाला यांना देय लागत असतील तर सदर रक्‍कम देणेस तक्रारदार सदैव तयार आहेत.  सबब, तक्रारदार यांचे दूरध्‍वनी कनेक्‍शन पूर्ववत करुन मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- सामनेवालांकडून मिळावेत, अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.   

 

3.    तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ठयर्थ नि.2 ला शपथपत्र व नि.4 चे फेरीस्‍तप्रमाणे एकूण 20 कागदपत्रे दाखल केली आहेत.  यामध्‍ये तक्रारदारांना वेळोवेळी आलेली फोन बिले व ती भरलेच्‍या पावत्‍या, तक्रारदारांनी सामनेवालांना दिलेली लेखी तक्रार यांचा समावेश आहे.  

 

4.    सामनेवाला यांनी नि.12 वर सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरिज परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडून फोन सेवा घेतली होती.  त्‍याचा दूरध्‍वनी/फोन कनेक्‍शन क्र. 02347-275198 व आय.डी.क्र. 1014529707 असा आहे. मात्र त्‍यांनी संपूर्ण बिलाची रक्‍कम जमा न केलेने त्‍यांची सेवा खंडीत करणेत आली आहे त्‍यामुळे ते ग्राहक नाहीत.  त्‍यांचे बंधू हे फोनचा वापर व्‍यवसायासाठी करीत असल्‍याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होवू शकत नाहीत.  तक्रारदार यांनी घरात फोन घेतला असून तो ऑफिससाठी नाही.  तक्रारदार यांनी ज्‍या त्‍या वेळी बिलाची रक्‍कम जमा केली नाही.  तक्रारदार यांनी दि.4/5/13 रोजी पाठविलेले बिल दि.27/5/13 रोजी अगर पूर्वी भरणेचे होते.  सदरचे बिल तक्रारदार यांनी दि.24/5/13 रोजी जमा केलेले आहे.  मात्र दि.4/6/13 रोजीचे बिल रु.154/- दि.23/6/14 रोजी अगर पूर्वी भरावयाचे असताना देखील ती रक्‍कम मुदतीत जमा केली नाही.  त्‍यानंतर तक्रारदारांना जी जी बिले पाठविण्‍यात आली, त्‍या त्‍या बिलातून थकबाकीची रक्‍कम वजा करुन करंट बिलाची रक्‍कम तक्रारदारांनी जाबदारांकडे अदा केली आहे.  सामनेवाला कंपनीतर्फे दि.5/10/13 रोजीचे बिल पाठवून मागील बिल रु.347/- त्‍यापैकी दि.1/10/13 रोजी भरलेली रक्‍कम रु.193/- वजा जाता उर्वरीत बिल रु.155/- व करंट बिल रु.360/- अशी एकूण रक्‍कम रु.525/- दि.28/10/13 पर्यंत जमा करणेसाठी कळविले तेही बिल तक्रारदार यांनी मुदतीत जमा केले नाही मात्र ती रक्‍कम दि.1/11/13 रोजी जमा केली.  अशा प्रकारे तक्रारदार यांनी ज्‍या त्‍या वेळी बिलाची रक्‍कम जमा केली नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  अशा प्रकारे थकबाकी वाढत जावून मार्च 2014 मध्‍ये रक्‍कम रु.860/- येणे रकमेच्‍या बिलापोटी कनेक्‍शन बंद करण्‍यात आले.  मा.सर्वोच्‍च न्‍यायालय व मा.उच्‍च न्‍यायालय यांनी वेळोवेळी निकाल दिले असून टेलिफोन खात्‍याविरुध्‍द बिलासंबंधीची तक्रार ग्राहक न्‍यायालयात चालू शकत नाही असे स्‍पष्‍ट केले आहे.  सबब, तक्रारदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी मागणी सामनेवालांनी केली आहे. 

 

5.    सामनेवाला यांनी त्‍यांचे म्‍हणणे शपथपत्रावर दाखल केले असून सोबत नि.12/अ अन्‍वये तक्रारदारांना देण्‍यात आलेल्‍या बिलांचा सविस्‍तर तपशील देणारा तक्‍ता दाखल केला आहे व तो सदर म्‍हणण्‍याचा एक भाग आहे. 

 

6.    तक्रारदारांनी नि.13 ला सरतपासाचे शपथपत्र दाखल केले असून नि.14 ला पुरावा संपलेची पुरसीस दाखल केली आहे. जाबदार यांनी नि.15 चे पुरसीस अन्‍वये पुरावा संपविला असून त्‍यासोबत त्‍यांनी वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केले आहेत. तसेच जाबदारांनी नि.18 सोबत तक्रारदारांनी जाबदार यांना दिलेला चेक व तो न वटता परत आल्‍याबाबतचे पत्र दाखल केले आहे.  तक्रारदारांनी नि.22 सोबत त्‍यांचे बँक ऑफ इंडिया या बँकेतील खात्‍याचे पासबुक मूळ प्रत दाखल केली आहे.  नि.25 ला तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद दाखल आहे.

 

7.    तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद, जाबदारांचे म्‍हणणे, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद व दाखल पूर्वाधार यांचा विचार करता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षाकरिता उपस्थित होतात.

 

      मुद्दे                                                            उत्‍तरे

 

1.  प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र आहे का ?                              होय.

 

2.  तक्रारदार हा ग्राहक आहे का ?                                      होय.

 

3.  सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय  ?                              होय, अंशतः

 

4. तक्रारदाराने केलेल्‍या मागण्‍या मंजूर होण्‍यास पात्र आहेत काय ?           होय, अंशतः

           

5. अंतिम आदेश                                               शेवटी दिलेप्रमाणे.

 

कारणे

मुद्दा क्र.1

 

8.    सामनेवाला यांनी नि.12 वर दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेमधील कलम 5 मध्‍ये, मा.सर्वोच्‍च न्‍यायालय व उच्‍च न्‍यायालय यांनी वेळोवेळी निकाल दिले असून टेलिफोन खात्‍याविरुध्‍द बिलासंबंधीची तक्रार ग्राहक न्‍यायालयात चालू शकत नाही असे स्‍पष्‍ट केले आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मंचास चालणेस पात्र नाही असा आक्षेप घेतला आहे. 

सदर आक्षेपाचा विचार करता, प्रस्‍तुत प्रकरणाचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराची मुख्‍य तक्रार ही प्रथमतः वाढीव बिलाची आकारणी करणे व तक्रारीनंतर ती कमी करणे व सदर घटना वारंवार घडल्‍याने बिलाबाबत संभ्रम निर्माण होणे व अशा पध्‍दतीने बेकायदेशीररित्‍या चुकीच्‍या थकबाकीपोटी त्‍याचे टेलिफोन कनेक्शन खंडीत केले आहे अशी आहे.  तसेच Letter No. J-24/11/2014-CPU, dt. 7/3/14 from Director (CPU), Govt. of India, Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution (Dept. of Consumer Affairs), New Delhi @ Letter No.2-17/2013-Policy-I, dt. 24th January 2014 from Joint Secretary, Govt. of India, Ministry of Communications & IT (Dept. of Telecommunications), New Delhi @ its annexures नुसार Jurisdiction of Dist. Fora to adjudicate dispute between individual telecom consumers and telecom service providers reference from Dept. of Telecommunication, Govt. of India …… Dist.Fora are competent to entertain consumer disputes involving telecom service providers and consumers असे स्‍पष्‍ट निर्देश दिलेले आहेत त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र या मंचास आहे.  सबब, सदर तक्रार मंचासमोर चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.  

 

 

 

मुद्दा क्र.2

9.    सामनेवाला यांनी तक्रारदाराने घेतलेले टेलिफोन कनेक्‍शन हे निवासी कारणासाठी घेतले असून त्‍याचा प्रत्‍यक्षात वापर मात्र कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो.  सदरचे कनेक्‍शन जरी तक्रारदाराचे नावे असले तरी त्‍याचा वापर तक्रारदाराचे व्‍यवसायाने वकील असलेले भाऊ शमशुद्दीन हे करत असतात व या फोनवरुनच ते त्‍यांच्‍या अशीलांशी संपर्क साधत असतात.  हे तक्रारदाराचेच कथन असल्‍याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाही असा आक्षेप घेतलेला आहे.  थोडक्‍यात, सामनेवाला यांनी व्‍यवसायाकरिता सदर टेलिफोनचा वापर होत असल्‍याने तक्रारदार ग्राहक नाहीत असा आक्षेप घेतलेला आहे.

 

10.   सदर आक्षेपाचा विचार करता, तक्रारदाराचे नावे सामनेवाला याने टेलिफोन कनेक्‍शन दिलेले असून त्‍याचा कस्‍टमर आय.डी. नं.1014529707 तर फोन नं.02347275198 असल्‍याचे मान्‍य व कबूल केलेले आहे.  तक्रारदाराने घेतलेला टेलिफोन हा त्‍याच्‍या कुटुंबातील कोणीही व्‍यक्‍ती वापरु शकतो.  तक्रारदाराचा भाऊ हा त्‍याच्‍या कुटुंबातीलच एक असल्‍याने अशा वापरासाठी निर्बंध घालता येत नाही.  सदर टेलिफोनचा तो उपभोगदार आहे व तक्रारदाराच्‍या कुटुंबाचा एक घटक आहे तसेच वकीली व्‍यवसाय हा वाणीज्‍य हेतूने प्रेरीत नसून तो एक नोबेल प्रोफेशन आहे.  त्‍यामुळे सामनेवालांच्‍या सदर आक्षेपामध्‍ये कोणताही अर्थ नाही.  सबब, तक्रारदार हा ग्राहक आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

मुद्दा क्र.3

 

11.   तक्रारदाराने, सामनेवाला यांनी त्‍यांचे टेलिफोन कनेक्‍शन बिले पूर्ण भरली असताना बेकायदेशीररित्‍या बंद केल्‍याने सेवात्रुटी केली आहे, असे तक्रारीकथन केले आहे व त्‍या अनुषंगाने नि.4 फेरिस्‍त अन्‍वये टेलिफोनची बिले व भरणा पावत्‍या दाखल केल्‍या आहेत.  सदर बिले व पावत्‍या सामनेवाला यांनी नाकारलेल्‍या नाहीत.  याउलट सामनेवाला यांनी तक्रारदारांनी बिलापोटी असणारी थकबाकी भरली नसल्‍यामुळे टेलिफोन कनेक्‍शन खंडीत केले आहे. ही कायदेशीर कृती असून कोणतीही सेवात्रुटी नाही असे म्‍हणणे दाखल केलेले आहे व म्‍हणण्‍यासोबत नि.12ए ला परिशिष्‍ट दाखल करुन त्‍यामध्‍ये थक रकमांचा सविस्‍तर तपशील दिला असून तो सदर म्‍हणण्‍याचा भाग असल्‍याचे नमूद केले आहे.  सदरचा तपशील स्‍वतंत्र परिशिष्‍ट अ द्वारे सदर मुद्दयाच्‍या स्‍पष्‍टीकरणात विचारात घेण्‍यात येते.  तसेच तक्रारदाराने दाखल केलेले नि.4 फेरिस्‍त अन्‍वयेची टेलिफोन बिले व भरणा रकमा इ. च्‍या सविस्‍तर तपशीलाचे स्‍वतंत्र परिशिष्‍ट ब तयार केले असून ते सदर मुद्दयाच्‍या स्‍पष्‍टीकरणात विचारात घेण्‍यात येते. 

 

12.   तक्रारदाराने नि.4 फेरिस्‍त अन्‍वये टेलिफोनची काही मूळ बिले व भरणा केलेल्‍या पावत्‍या हजर केलेल्‍या आहेत.  नि.4/5 वरील दाखल असणारे दि.4/7/13 चे बिल रु.299/- चे असून तो भरण्‍याचा कालावधी दि.26/7/13 आहे.  सदर रकमेस गोल केलेले असून पेनाने रु.150/- ची नोंद केलेली आहे व त्‍याप्रमाणे तक्रारदाराने रु.150/- बिलाचा भरणा दि.15/7/13 रोजी केल्‍याची पावती नि.4/4 वर दाखल आहे.  त्‍याचप्रमाणे नि.4/7 वरती दि.5/8/13 चे बिल रु.294/- असून सदर रकमेवर गोल करुन ते रु.150/- केलेले आहे व सदर रक्‍कम भरणा केल्‍याची पावती नि.4/6 वर दाखल असून ती दि.20/8/13 ला भरल्‍याचे दिसते.  तदनंतर नि.4/9 वर दि.5/9/13 चे बिल असून ते रक्‍कम रु.347/- ला गोल करुन रु.193/- असे लिहिलेले आहे व सदर रक्‍कम भरल्‍याची पावती नि.4/8 वर असून ती दि.1/10/13 रोजी भरल्‍याचे दिसते.  नि.4/14 वरील दि.5/12/13 चे बिल रु.1,245/- असून त्‍यामधून रु.948/- ची वजावट करुन रु.297/- चे बिल दिलेले आहे.  कारण त्‍यापूर्वी भरलेली बिलांची भरणा पावती नि.4/12, नि.4/10 अनुक्रमे रु.540/- व रु.525/- भरणा केलेला आहे. त्‍याचे बिल नि.4/11 ला आहे. नि.4/13 अन्‍वये दि.5/11/13 चे बिलामध्‍ये चालू बिल हे रु.540.23 चे आहे.  सदर रक्‍कम दि.21/12/13 रोजी भरल्‍याची पावती नि.4/12 वर दाखल आहे.  त्‍यामुळे त्‍याचा विचार करुन पेनानेच वर नमूद केल्‍याप्रमाणे लिखाण करुन रु.297/- भरणेबाबत नमूद केले आहे.  नि.4/16 वर दाखल दि.6/1/14 चे बिलानुसार रक्‍कम रु.850/- ला गोल करुन रु.145/- चे बिल दिलेले दिसते व सदर रक्‍कम दि.30/1/14 रोजी भरणा केलेची पावती नि.4/15 ला दाखल आहे.  तसेच दि.1/3/14 रोजी रक्‍कम रु.157/- भरल्‍याची पावती नि.4/17 वर आहे.  नि.4/18 वर दि.4/2/14 बिलाअन्‍वये रु.872/- चे बिल असून चालू बिल रु.157/- चे आहे व ते चालू बिल भरल्‍याची पावती नि.4/17 वर दाखल आहे.  नि.4/19 अन्‍वये दि.4/3/14 चे एकूण बिल रु.860/- असून चालू बिल रु.134/- आहे.  ते भरल्‍याचे दिसून येत नाही.  त्‍याचप्रमाणे वर नमूद फरकाचे रु.297/- चे बिलही भरल्‍याचा पुरावा नाही.  

 

13.   परिशिष्‍ट अ व ब मधील माहिती तंतोतंत जुळते.  सामनेवाला यांनी दिलेले परिशिष्‍ट अ च्‍या तपशीलाप्रमाणे दि.28/2/14 अखेर रु.860/- देय दिसतात.  याचा विचार करता तक्रारदाराने नि.4/3 अन्‍वयेचे रक्‍कम रु.154/- चे बिल अदा केलेले नाही व तो थक नि.4/5 वरील बिलामध्‍ये आलेला आहे व सदर थक अधिक चालू बिल रु.134.83 पैसे एकूण होणारे रु.299/- पैकी केवळ रु.150/- अदा केलेले आहेत.  त्‍यामुळे रु.149/- देय आहेत.  मात्र नि.4/5 वरील बिलावरती रु.299/- ला गोल करुन रु.150/- पेनाने लिहिलेले असून त्‍याखाली कोणत्‍याही अॅथॉरिटीची सही व शिक्‍का नसून सदर दुरुस्‍ती प्रमाणीत केलेली नाही.  सबब, फक्‍त रु.149/- देय आहेत.  नि.4/7 वरील बिलाचे अवलोकन केले असता मागील थक रु.298.60 वजा रु.150/- जाता रु.149 व चालूचे रु.134.83 व अॅडजेस्‍टमेंटचे रु.10/- अशी एकूण 293.43 पैसे राऊंड फिगर रु.294/- चे बिल असून त्‍यास लाल पेनने गोल केले असून वरती रु.150/- लिहिलेले आहे व ते सुध्‍दा खाडाखोडीचे आहे.  त्‍यामुळे सदर दुरुस्‍ती ही प्रमाणीत केलेली नाही व सदर बिलापोटी केवळ रु.150/- अदा केलेले आहेत.  त्‍यामुळे सदर तारखेस रु.144/- थक आहेत.  त्‍याच पध्‍दतीने नि.4/9 वरती मागील थक रु.293.43 वजा भरणा रक्‍कम रु.150/- = र.143.43 अधिक अॅडजेस्‍टमेंटचे रु.10/- व चालू चार्ज रु.193.48 असे रु.346.91 राऊंड फिगर 347/- चे बिल असून सदर रकमेस लाल पेनने गोल करुन त्‍यावरती रु.193/- लिहिलेले आहे.  सदरची दुरुस्‍ती सुध्‍दा प्रमाणीत नाही व सदर बिलापोटी रु.193/- भरणा केली असून उर्वरीत रु.155/- देय आहेत.  नि.4/11 वरील बिलामध्‍ये मागील थक रु.346.91 वजा भरणा रक्‍कम रु.193/- शिल्‍लक रक्‍कम रु.153.91 अधिक अॅडजेस्‍टमेंटचे रु.10/- व चालू बिल रु.360.68 असे एकूण बिल रु.524.59 राऊंड फिगर रु.525/- असून सदर बिलाचा भरणा रोखीमध्‍ये तक्रारदाराने केलेला आहे.  सबब, येथे म्‍हणजेच दि.30/9/13 अखेरील बिले संपूर्णतया थक रकमांसहीत अदा केलेली दिसून येतात. 

 

14.   सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या परिशिष्‍टामध्‍ये अ.क्र.7 वर सदर रु.525/- भरणा केलेल्‍या रकमेमध्‍ये रु.398/- चा चेक दि.3/4/13 ला दिलेला होता व तो बाऊंन्‍स झाल्‍याने त्‍यातून सदर रक्‍कम वजावट केलेली आहे.  मात्र सदर रकमेचा भरणा तक्रारदाराने दि.1/11/13 रोजी केलेला असून त्‍याचा देय दिनांक 5/10/13 होता.  सदर रकमा भरणा केल्‍याची पावती नि.4/10 वर असून त्‍यावर स्‍पष्‍टपणे मोड ऑफ पेमेंट कॅश अशी नोंद आहे.  तर सदर रक्‍कम जर रोखीत भरणा केली असेल तर सदर रकमेतून सामनेवालाने नमूद चेकची रक्‍कम कशी वजावट केली हे कळून येत नाही.  त्‍यामुळे नि.4/13 वरील बिलामध्‍ये सदर थक रु.398/- समाविष्‍ट केलेला आहे.  सदर बिलामध्‍ये चालू बिलाची रक्‍कम रु.540.23 तर मागील थक रु.524.59 वजा 127 जाता उर्वरीत रक्‍कम रु.398/- असा एकूण थक रु.948/- दर्शविलेला आहे व सदर रक्‍कम रु.540/- तक्रारदाराने नि.4/12 अन्‍वये अदा केलेली आहे.  म्‍हणजेच दि.31/10/13 अखेरचा थक  रु.948/- वजा रु.540/- असा रु.408/- राहतो.  नि.4/14 वरील दाखल बिलानुसार मागील थक रु.947.82 अॅडजेस्‍टमेंटचे रु.10/- चालू बिल रु.286.74 असे एकूण रु.1244.56 राऊंड फिगर रु.1245/- दिलेली असून सदर बिलावर निळया पेनाने रु.1245/- वजा 948/- जाता रु.297/- नमूद केलेले असून Please pay the balance 297/-  असून त्‍याखाली उपमंडल अधिकारी, S.D.E. Phones Vita, उपमंडल अधिकारी फोन्‍स विटा 415 311 यांची सही शिक्‍क्‍यानिशी सही असून सदर सहीखाली दि.27/11/14 अशी तारीख नोंद केलेली आहे.  सदर महिन्‍याच्‍या तारखेत खाडाखोड दिसून येते.  आश्‍चर्याची बाब अशी आहे की, सदर बिलाचा दिनांक हा दि.5/12/13 असून त्‍याचा कालावधी दि.1/11/13 ते दि.30/11/13 असा आहे व देय दिनांक 27/12/13 आहे.  कदाचित नजरचुकीने सदर अधिका-याने सही करताना अनावधानाने तारखेत चूक केली असण्‍याची शक्‍यता गृहित धरावी लागेल.  सदरची दुरुस्‍ती ही प्रमाणीत केली असल्‍यामुळे सदर दि.30/11/13 अखेर बिलाच्‍या कालावधीप्रमाणे तक्रारदार हिशेबाअंती केवळ रु.297/- देय होता.  सदर बिल तक्रारदाराने भरलेले नाही कारण बिलाखालील भरणा स्‍लीप ही जशीच्‍या तशी आहे. 

 

15.   नि.4/16 वरील दि.6/1/14 चे बिलामध्‍ये कालावधी दि.1/12/13 ते 21/12/13 देय दिनांक 28/1/14 मध्‍ये नमूद नि.4/14 वरील बिलाअन्‍वये हिशेबाअंती केवळ रु.297/- थक स्‍पष्‍ट झाला असतानाही पुनश्‍चः थक रकमेत रु.297/- न दर्शविता रु.1,244.56 इतक्‍या रकमेची नोंद केलेली आहे.  तसेच चालू बिल रु.134.83, अॅडजेस्‍टमेंटचे रु.10/- व मागील थक रु.297/- गृहित धरता रु.441.83 तक्रारदार देय लागतो. पैकी तक्रारदाराने केवळ रु.145/- नि.4/15 अन्‍वये भरलेले दिसून येतात.  म्‍हणजेच रु.441.83 वजा रु.145 जाता तक्रारदार अद्यापही 296.83 देय लागतो.  सदर बिलावरही रु.850 रकमेस गोल करुन लाल पेनाने वर रु.145/- लिहिलेले आहे. मात्र सदर दुरुस्‍ती प्रमाणीत नाही.  पुन्‍हा नि.4/18 वरील बिलामध्‍ये देय असणारी रु.296.83 व चालूचे रु.157.31 व अॅडजेस्‍टमेंटची रु.10/- अशी एकूण रु.464.14 रक्‍कम देय आहे व पैकी तक्रारदाराने नि.4/17 अन्‍वये रु.157/- भरलेले आहेत.  म्‍हणजे 464.14 मधून रु.157 वजा जाता रु. 307.14 देय आहेत.  त्‍यापुढील नि.4/19 अन्‍वयेचे चालू बिल रु.134.83 भरलेले नसून सदर देय रु.307.14 व रु.134.83 मिळून एकूण 441.97 तक्रारदार देय आहे ही वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदारतर्फे विधिज्ञ श्री खिलारे व सामनेवालांतर्फे विधिज्ञ श्री सुर्यवंशी यांचा दि.21/4/15 रोजी अंशतः युक्तिवाद ऐकला होता.  त्‍यावेळी तक्रारदाराचे विधिज्ञांनी रु.411/- चा थक मान्‍य केला असून त्‍याची न्‍यायीक नोंद या मंचाने घेतली आहे.   

 

16.   तसेच तक्रारदाराच्‍या भावाने दिलेला चेक हा दि.3/4/13 चा असून तो दि.4/4/13 रोजी सामनेवाला यांनी भरला असता नि.22 अन्‍वये दाखल पासबुकामध्‍ये Returned 13 Alteration required या कारणास्‍तव वटला गेलेला नाही हे स्‍पष्‍ट होते.  याचाच अर्थ सदर रक्‍कम नि.4/10 भरणा रक्‍कम रु.525/- मधून केवळ रु.127/- वजावट दाखवून रु.398/- देय दर्शविलेली आहे.  त्‍यास कोणताही आधार नाही कारण सदर पावती ही रोखीची आहे व सामनेवाला यांनी कोणत्‍या आधारे सदर वजावट दर्शविली याचा खुलासा त्‍यांनी केलेला नाही.  सबब, सदर वजावटीस कोणताही अर्थ दिसून येत नाही.  तसेच दि.4/4/13 रोजी नमूद चेकची वजावट ही दि.5/11/13 रोजीच्‍या नि.4/13 वरील बिलानुसारचे भरणा रक्‍कम रु.525/- दि.1/11/13 नुसार तब्‍बल सात महिन्‍यांनी वजावट करुन घेतलेली आहे.  तसेच सामनेवाला यांनी परिशिष्‍ट ब मध्‍ये दाखविलेल्‍या डयू अमाऊंट या प्रत्‍येक पुढील बिलामध्‍ये समाविष्‍ट केल्‍या गेल्‍या असल्‍याने त्‍यांचे स्‍वतंत्र अस्तित्‍व रहात नाही.  या बाबीची दखल सामनेवाला यांनी घ्‍यावी.  तक्रारदारास वेळोवेळी बिलावर दुरुस्‍त्‍या करुन दिलेल्‍या असून नि.4/5, 4/7, 4/9, 4/16 वरील बिलामध्‍ये केलेल्‍या दुरुस्‍त्‍या या मोघमात असून त्‍यावर कोणाच्‍याही दुरुस्‍ती प्रमाणीत केलेबाबत सही शिक्‍का नाही.  ज्‍याअर्थी सदर दुरुस्‍त्या केल्‍या आहेत आणि त्‍याप्रमाणे तक्रारदाराने रकमा भरल्‍या आहेत, त्‍याअर्थी सदरच्‍या दुरुस्‍त्‍या तक्रारदार स्‍वतःहून करणार नाही हे निश्चितच आहे.  सामनेवालांच्‍याच कोणीतरी व्‍यक्‍तीने विनासहीशिक्‍क्‍याच्‍या दुरुस्‍त्या करुन दिलेल्‍या आहेत ही सामनेवालांची सेवेतील अत्‍यंत गंभीर अशी त्रुटी आहे, कारण नि.4/14 वरील दुरुस्‍ती ही प्रमाणीत केलेली असून त्‍या दुरुस्‍तीखाली अधिका-याची सही-शिक्‍का व तारीख आहे.  याचाच अर्थ अशा प्रकारच्‍या दुरुस्‍त्‍या दिल्‍या जातात हे ग्राहय धरावे लागेल व सदर दुरुस्‍तींच्‍या भ्रमात तक्रारदाराने त्‍या दुरुस्‍त्या ग्राहय धरुन रकमा भरलेल्‍या आहेत. तरीही त्‍यापध्‍दतीने त्‍या थक रकमात सदर कारणास्‍तव वजावट दिलेली दिसून येत नाही.  मात्र नि.4/14 वरील दुरुस्‍ती अनुषंगाने पुढील बिलामध्‍ये रक्‍कम रु.297/- या थक रकमेची नोंद न होता पुनश्‍च दुरुस्‍तीपूर्वीचीच रक्‍कम 1,245/- ची थक नोंद केलेली आहे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे.  नि.4/1, 4/6, 4/8, 4/10, 4/12, 4/15, 4/17 वरील भरणा पावत्‍यांवरती पेमेंट मोड कॅश असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे, तर नि.4/4 वरील भरणा पावतीवर असा उल्‍लेख केलेला नाही.  ही सुध्‍दा सामनेवाला यांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे.  तक्रारदाराचे विधिज्ञांनी युक्तिवादाचे वेळेस ज्‍या रकमा भरलेल्‍या नाहीत, त्‍या मान्‍य केलेल्‍या असून तो थक भरणा केलेला नाही असेही त्‍याने कबूल केलेले आहे.  तसेच सामनेवाला अशा वारंवार चुका करीत असल्‍यामुळे त्‍यांनी काढलेला थक हा जास्‍तीचा असून योग्‍य थक भरण्‍यास तक्रारदार तयार आहेत असे प्रतिपादन केले आहे.  याचा विचार करता सामनेवाला याने परिशिष्‍ट अ नुसार एकूण रु.860/- चा थक दाखविलेला आहे.  सदरचा थक हा अवास्‍तव असल्‍याचे तक्रारदाराचे कथन आहे.  आमच्‍या निदर्शनास आलेल्‍या बाबीनुसार वर नमूद स्‍पष्‍टीकरणाप्रमाणे दि.1/2/14 ते 28/2/14 अखेरील थक हा चालू बिल रु.134.83 व थक रक्‍कम रु.307.14 मिळून रु.441.97 दिसून येतो.  तसेच सामनेवालाने तथाकथित रु.398/- च्‍या धनादेशाच्‍या रकमेचा मुद्याचा विचार करता नमूद धनादेश हा दि.3/4/13 चा असून तो दि.4/4/13 रोजी वटलेला नाही.  सदर धनादेश हा त्‍या धनादेशावरील तारखेतील खाडाखोडीमुळे वटलेला नाही ही बाब सिध्‍द झालेली आहे.  नि.4/2 वरील दाखल बिलानुसार सदर बिलाचा कालावधी हा दि.1/4/13 ते 30/4/13 असून देय दिनांक 24/5/13 असून रक्‍कम रु.473/- संपूर्णतया अदा केली असून कोणताही थक नाही.  त्‍यामुळे नमूद दिलेला धनादेश हा कदाचित त्‍याच्‍या मागील बिलापोटी दिला असला तरी त्‍याबाबत सामनेवाला यांनी वाद उत्‍पन्‍न केलेला नाही.  जेथून बिलांचा थक आहे, त्‍याचा सविस्‍तर तपशील सामनेवालाने परिशिष्‍ट अ नुसार दिलेला आहे, त्‍यामुळे नमूद धनादेशाचा येथे अर्थाअर्थी संबंध येत नाही. 

 

17.   तक्रारदार दि.28/2/14 अखेर मागील थक व चालू रकमेसह रु.441.97 देय आहे व सदर तक्रारदाराने भरलेली नाही.  त्‍याचप्रमाणे सदर कालावधीनंतर आलेली बिले ही तक्रारदाराने भरणा केलेली नाहीत व सदर कालावधीनंतर नमूद टेलिफोन बंद केलेला आहे.  ही वस्‍तुस्थिती या मंचाच्‍या निदर्शनास येते.  तक्रारदाराने दि.1/4/14 रोजी सामनेवालांकडे लेखी तक्रार (नि.20)  देवून सुध्‍दा त्‍याची दखल घेतलेली नाही.  तक्रारदाराचा थक वाढविण्‍यास सामनेवालाच जबाबदार आहेत.  नमूद बिलाचे अवलोकन केले असता बिलाचे मागे महत्‍वपूर्ण सूचना दिलेल्‍या असून त्‍यामध्‍ये III - डिसकनेक्‍शनची सूचना पुढीलप्रमाणे दिली आहे – जर बिल पाठविल्‍यापासून 15 दिवसांच्‍या आत बिलाचा भरणा न केल्‍यास टेलिफोनची सेवा खंडीत केली जाऊ शकते.  तरीही इनकमिंग सुविधा 30 दिवसापर्यंत चालू ठेवण्‍यात येईल. वेळेवर न बिल भरल्‍यास कुठलीही कारवाई करण्यापूर्वी सूचनेशिवाय टेलिफोन डिस्‍कनेक्‍ट केला जाईल.   

 

 

18.   तक्रारदाराने त्‍याच्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये त्‍यांना कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता जाबदारांनी त्‍यांचे दूरध्‍वनी कनेक्‍शन खंडीत केल्‍याचे कथन केले आहे.  परंतु सामनेवालांनी वर नमूद केल्‍याप्रमाणे त्‍यांचे बिलाचे पाठीमागे बिलाचा भरणा न केल्‍यास टेलिफोनची सेवा खंडीत केली जावू शकते अशी सूचना दिली आहे.  सदरची सूचना ही वेळेत बिलाचा भरणा न केल्‍यास दूरध्‍वनी सेवा खंडीत करण्‍यास पुरेशी आहे असा बचाव सामनेवाला यांनी घेतला आहे. तर तक्रारदारास स्‍वतंत्र अशी पूर्वनोटीस न देता दूरध्‍वनी सेवा खंडीत करण्‍याची सामनेवालांची कृती ही बेकायदेशीर असून ती सेवात्रुटी आहे असा युक्तिवाद तक्रारदाराचे विधिज्ञ श्री खिलारे यांनी केला आहे.  त्‍यासाठी त्‍यांनी मा. राज्‍य आयोग, पश्चिम बंगाल, मा.राज्‍य आयोग मेघालय यांचे पूर्वाधार दाखल केले आहेत.  सदर पूर्वाधारांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केलेले आहे. 

 

i)  2009(2) CPJ 2009, BSNL Calcutta Telephones Vs. Sri. Buddhadeb Ghosh  या पूर्वाधारामध्‍ये मा.पश्चिम बंगाल राज्‍य आयोगाने खालील निरिक्षण नोंदविले आहे.

The disconnection of the telephone for non-payment of bills cannot be said to be deficiency in service.  But when excessive bills were sent in the month of October and in the month of November the complainant made complaints.  The authorities admittedly failed to make any proper enquiry as regards the reason for issuing such excessive bills which could have been done and communicated to the complainant.  Failure to do the same amounted to deficiency in service particularly, when such inaction was followed by disconnection of the telephone line also.

 

ii) 2014 (3) CPR 7 (Megh.), Bharat Sanchar Nigam Ltd. Shillong & Anr. Vs. Sri Vimal Goenka या प्रकरणामध्‍ये मा. मेघालय राज्‍य आयोगाने खालील निरिक्षण नोंदविले आहे.

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(d) – Indian Telegraph Rules, 1951 – Rule 443 – Mobile connection – Deficiency in service – Rule 443 of I.T. Rules, 1951 would technically empower BSNL to disconnect/debar phones even without notice in case of default in payment, but that does not mean that BSNL either ought to or has to resort to such drastic measures at drop of a hat – Subscriber may forget to pay a Bill or unwittingly miss payment by some days – Justice and fairness require that a warning notice be issued to a subscriber in such cases – Drastic measure of disconnection/debarring is meant to be resorted to only in case of habitual defaulters or for long overdue payment – BSNL not being a ‘Telegraph Authority’, it cannot draw on power and authority conferred by Rule 443 of Indian Telegraph Rules, 1951 to unilaterally debar/disconnect any telephone without giving due notice to a subscriber, even if dues are not paid on time – It is required to act within ambit of canons of natural justice and to give reasonable prior notice before resorting to any such disconnection, whether partial by barring certain facilities or in totality, unless there is any such empowering clause in contract / agreement between BSNL and subscriber – Appeal dismissed with costs.

 

19.   या पूर्वाधारांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला यांनी टेलिफोन कनेक्‍शन खंडीत करण्‍यापूर्वी तक्रारदारास नोटीस दिली होती हे दिसून येत नाही अथवा तसा पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही.   तसेच वरील विस्‍तृत विवेचन व पुराव्‍यावरुन तो habitual defaulter होता हेही निदर्शनास येत नाही कारण रकमांचा भरणा करुनही अवास्‍तव रकमा थकीत म्‍हणून येत असल्‍याने वेळोवेळी तक्रारदाराने बिल दुरुस्‍ती करुन घेवून त्‍याप्रमाणे रकमा भरलेल्‍या आहेत.  ही वस्‍तुस्थिती विचारात घेता तो habitual defaulter नाही, त्‍यामुळे दुरुस्‍तीनंतर सुध्‍दा रक्‍कम रु.297/- देय असताना पुनश्‍चः रु.1,245/- चा थक पुढील बिलात दाखविल्‍याने तक्रारदाराने या मंचाकडे धाव घेतलेली आहे.  तक्रारदाराने नि.25 चे लेखी युक्तिवादातील कलम 6 मध्‍ये बिल दुरुस्‍त करुन जमा केले होते असे नमूद केले असले तरी रक्‍कम रु.297/- ची पावती प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही.  त्‍यामुळे मंचाने कलम 15 नमूद केलेप्रमाणे तक्रारदार अद्यापही रक्‍कम रु.441.97 पैसे देय लागतो.  तर तक्रारदाराने रु.411/- चा थक मान्‍य केला आहे.  याचा विचार करता दुरुस्‍तीनंतर किमान दुरुस्‍त रकमांचे थक भरणे तक्रारदारावर बंधनकारक होते.  ते त्‍याने भरलेले नाही या बाबीकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मात्र यास सामनेवालांची सेवात्रुटीच कारणीभूत असून विनानोटीस तक्रारदाराचे टेलिफोन कनेक्‍शन खंडीत करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

मुद्दा क्र.4 व 5

 

20.   तक्रारदाराने त्‍याचे तक्रारअर्जातील कलम 9 मध्‍ये दूरध्‍वनी कनेक्‍शन पूर्ववत करुन द्यावे अशी मागणी केलेली आहे याचा विचार करता तक्रारदाराने कबूल केलेला थक हा रु.411/- आहे तसेच या मंचाने दुरुस्‍ती बिले व अदा न केलेली बिले विचारांत घेवून दाखल पुराव्‍यांवरुन काढलेला थक हा रु.441.97 आहे.  तक्रारदाराचे युक्तिवादाचे वेळेस तसेच त्‍याचे तक्रारअर्जामध्‍ये सुध्‍दा योग्‍य थक भरण्‍याची त्‍यांनी तयारी तक्राअर्ज कलम 4 मध्‍ये दर्शविली आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने नमूद थक रु.441.97 भरावा व सदर रक्‍कम भरणा केलेनंतर सामनेवाला यांनी त्‍याचे दूरध्‍वनी कनेक्‍शन पूर्ववत करुन द्यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  

 

21.   तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- ची मागणी केली असून सदरची मागणी या मंचास संयुक्‍तीक वाटत नाही.  कारण नमूद टेलिफोन सुविधा ही तक्रारदार स्‍वतः वापरत नव्‍हता तर त्‍याचा वकील भाऊ वापरत होता. सामनेवालांकडून अवास्‍तव थक रकमा दुरुस्‍ती बिलानंतरही नमूद करुन थक रकमेत धरलेल्‍या आहेत.  त्‍या तक्रारदाराने अदा केलेल्‍या आहेत.  अशी वस्‍तुस्थिती असतानाही व सदरच्‍या घटना वारंवार घडत असल्‍याने तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास झाला आहे तसेच त्‍याचा भाऊ हा तक्रारदाराच्‍या कुटुंबाचा घटक असल्‍याने त्‍यास नमूद दूरध्‍वनीच्‍या वापरापासून वंचित व्‍हावे लागले आहे, याचाही विचार करावा लागेल.  मात्र दुरुस्‍तीनंतरची रक्‍कम रु.297/- व तदनंतरचे शेवटचे बिल रु.134.83 भरण्‍यास तक्रारदाराने कसूर केलेला आहे ही बाबही लक्षात घ्‍यावी लागेल.  त्‍यामुळे तक्रारदार रक्‍कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तक्रारदाराने तक्रारअर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- ची केलेली मागणी सुध्‍दा या मंचास संयुक्तिक वाटत नाही त्‍यामुळे तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, तक्रारदाराच्‍या मागण्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येत आहेत. म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

22.   प्रस्‍तुत प्रकरणात बिलांची दुरुस्‍ती करुन दुरुस्‍त रकमा नोंदविण्‍याची पध्‍दत, सदरच्‍या दुरुस्‍त्‍या प्रमाणीत न करणे अशा प्रकारे दुरुस्‍ती करुन दिलेल्‍या रकमांचा भरणा करुनही पुन्‍हा त्‍या थकीत म्‍हणून दाखविणे, वारंवार अशा प्रकारच्‍या घटनांची पुनरावृत्‍ती करणे यासाठी सामनेवालांचे कर्मचारी जबाबदार आहेत.  त्‍यामुळे पुनश्‍च अशा प्रकारच्‍या घटना घडू नयेत म्‍हणून आदेशीत रकमा सामनेवाला यांनी संबंधीत कर्मचा-यांकडून वसूल करुन घ्‍याव्‍यात असा निर्देश हे मंच देत आहे.  सबब, आदेश.

 

आदेश

 

1.  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.

2.  सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्‍कम रु.441.97 पैसे भरुन घेवून सामनेवाला यांनी

    तक्रारदाराचे दूरध्‍वनी कनेक्‍शन पूर्ववत जोडून द्यावे.

3.  सामनेवाला यांनी  तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.

4.  सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारअर्जाचे खर्चापोटी रुपये 1,000/- अदा करावेत.

5.  वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्‍या तारखेपासून 45 दिवसांत

    करणेची आहे.

6.  सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द

    ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.

 

सांगली

दि. 16/06/2015               

    

     

( सौ मनिषा कुलकर्णी )         ( सौ वर्षा नं. शिंदे )           ( ए.व्‍ही.देशपांडे )

        सदस्‍या                     सदस्‍या                    अध्‍यक्ष

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.