Maharashtra

Satara

CC/14/73

shivlila shshikant wibhute - Complainant(s)

Versus

BHARAT MATA MAHILA SAH PAT SANSTHA - Opp.Party(s)

02 Jul 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                               तक्रार क्र. 73/2014.

                                                                                                                तक्रार दाखल दि.20-5-2014.

                                                                                                                 तक्रार निकाली दि. 2-7-2015. 

 

सौ. शिवलिला शशिकांत विभुते

रा.गणपती मंदिराचे मागे, शनिवार पेठ,

कराड, ता.कराड, जि.सातारा.             ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. भारतमाता महिला ना.सह.प.सं.

   कराड.

2. श्री.अधिकराव शिवाजी सोमदे, संस्‍थापक,

3. कविता अधिकराव सोमदे, संचालिका.

   क्र.2 व 3 रा.जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा.

4. विदयुल्‍लता अशोक पुराणिक, संचालक.  

   रा.पुराणिक हॉस्पिटल, शनिवार पेठ, कराड, जि.सातारा.

5. छायादेवी राजाराम पवार, संचालिका.

   रा.लक्ष्‍मी निवास, लक्ष्‍मीनारायण चौक,

   मार्केटयार्ड, बैलबाजार रोड, ता.कराड, जि.सातारा.

6. अंजली जयकर कदम, संचालिका.

   रा.मु.पो.नेर्ले, ता.वाळवा, जि.सांगली.

7. छाया निवासराव पाटील, संचालिका.

   रा.सुयोगनगर, कार्वे नाका, ता.कराड, जि.सातारा.  

8. संगीता सुभाष सोमदे, संचालिका.

   रा.जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा.      ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे- अँड.दिपाली यवतकर.

                 जाबदार 1 ते 4 व 6 ते 8- एकतर्फा.

                 जाबदार क्र.5 तर्फे- अँड.संतोष माने.         

                        न्‍यायनिर्णय 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला)

                                                    

 1      तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

2       तक्रारदार ही वर नमूद पत्‍त्‍यावर पूर्वीपासून रहाते.   जाबदार भारतमाता महिला ना.स.प.सं. मर्या. कराड ही सहकार कायदयाप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था असून ग्राहकाकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकांनी रक्‍कम मागितलेस सदर रक्‍कम त्‍यांना परत देणे अशा उद्देशाने स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेव स्‍वरुपात रकमा गुंतवल्‍या आहेत.  त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र.

पावती क्र.

ठेव तारीख

मुदत संपलेची तारीख

ठेव रक्‍कम रु.

1

1440

14-3-2013

14-3-2014

 20,000/-

2

1441

14-3-2013

14-3-2014

 20,000/-

3

1442

14-3-2013

14-3-2014

 10,000/-

वर नमूद तपशीलाप्रमाणे तक्रारदारानी एकूण रु.50,000/- जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेव स्‍वरुपात ठेवलेले आहेत.  त्‍यानुसार रक्‍कम रु.50,000/- व त्‍यावरील व्‍याजासह जाबदार हे तक्रारदारांचे देणे लागतात.  दि.14-3-2014 रोजी तीनही मुदतठेवपावत्‍यांची मुदत संपलेमुळे तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेकडे वेळोवेळी रकमांची मागणी केली असता आजपर्यंत जाबदारानी वेळ मारुन नेली आहे.  जाबदारानी जेव्‍हा स्‍पष्‍टपणे रक्‍कम देणेस तक्रारदारास नकार दिला त्‍यावेळी तक्रारदारास सदर मंचात तक्रार करणे भाग पडले.  सदर मंचाशिवाय तक्रारदारानी अन्‍य कोठेही तक्रार दाखल केलेली नाही.  जाबदार पतसंस्‍था ही  प्रस्‍तुत कोर्टाचे स्‍थळसीमेत येत असलेने सदर तक्रार मे.मंचात चालणेस पात्र आहे.  जाबदारानी वेळेत पैसे दिले नाहीत त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागत आहे, तसेच त्‍यांना नुकसानभरपाई मागणेचा हक्‍क प्राप्‍त झाला आहे.  तक्रारदाराचे तक्रारअर्जात त्‍यांची विनंती अशी आहे की, मुदतठेवीपोटी ठेवलेली रक्‍कम रु.50,000/- व त्‍यावर द.सा.द.शे. 18% दराने तक्रारदाराचे पदरी रक्‍कम पडेपर्यंतचे व्‍याज जाबदारानी दयावे तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदारांनी तक्रारदाराना दयावा. 

3       जाबदार क्र.5 यानी नि.10 कडे त्‍यांचे म्‍हणणे खालीलप्रमाणे दाखल केले आहे-

       तक्रारदारानी या जाबदाराविरुध्‍द केलेल्‍या सदरच्‍या तक्रारीतील सर्व कथने व मागण्‍या पूर्णतः बनावट, निखालस खोटया व लबाडीच्‍या असून या जाबदारास त्‍या मान्‍य व कबूल नाहीत.  जाबदार क्र.5 या जाबदार क्र.1 पतसंस्‍थेच्‍या संचालिका असलेबाबतचा सर्व मजकूर खोटा, लबाडीचा आहे.  जाबदार क्र.1 पतसंस्‍थेशी व कारभाराशी या जाबदारांचा काही संबंध नाही.  तक्रारीच्‍या परि.2 मध्‍ये तक्रारदारानी गुंतविलेल्‍या रकमेबाबत या जाबदारांचा काहीही संबंध नाही.  या जाबदारांचा जाबदार क्र.1 पतसंस्‍थेशी केवळ ठेवीदार म्‍हणून संबंध होते.  जाबदार क्र.5 या तक्रारदाराना ओळखतही नसून तक्रारदारांच्‍या ठेवीचे पैसे देणेचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  परि.4 ते 6 मध्‍ये तक्रारदारानी नमूद केलेली सर्व कथने धादांत खोटी असून ती जाबदारास मान्‍य व कबूल नाहीत.  या जाबदारांचा जाबदार क्र.1 पतसंस्‍थेशी केव्‍हाही संचालिका म्‍हणून संबंध नव्‍हता व नाही.  सबब तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे.  जाबदार क्र.5 कधीही जाबदार क्र.1 पतसंस्‍थेच्‍या सभासद वा संचालिका नव्‍हत्‍या.  या संस्‍थेच्‍या संचालक होणेसाठी अर्ज भरलेला नव्‍हता वा निवडणूक लढविली नव्‍हती व नाही किंवा त्‍यांचा केव्‍हाही या पतसंस्‍थेच्‍या व्‍यवस्‍थापनाशी संबंध आलेला नव्‍हता व नाही.  जाबदार क्र.5 यांचे सदर पतसंस्‍थेत निव्‍वळ बचत खाते आहे तसेच अनेक मुदतठेवीही होत्‍या.   तक्रारदारांच्‍या ठेवींचे पैसे देणेची कोणतीही जबाबदारी या जाबदार क्र.5 वर येत नाही.  तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण नसताना केवळ कायदयातील तरतुदींचा अनुचित लाभ उचलून पैशाच्‍या हव्‍यासाने तसेच या जाबदारांना निव्‍वळ त्रास देणेचे दुष्‍ट हेतूनेच तक्रारदारांनी सदरची खोटया कथनाची, बनावट व रचनात्‍मक तक्रार दाखल केलेली आहे.  तरी जाबदाराना तक्रारदारांच्‍या खोटया तक्रारीमुळे झालेल्‍या नाहक त्रासाबाबत कॉंपेंसेटरी कॉस्‍ट रक्‍कम रु.10,000/- देणेचा हुकूम होऊन या जाबदारांविरुध्‍दच्‍या सर्व मागण्‍या व तक्रार फेटाळणेचा हुकूम होणे न्‍यायाचे दृष्‍टीने आवश्‍यक व गरजेचे आहे.  येणेप्रमाणे म्‍हणणे दाखल आहे. 

4       नि.3 कडे तक्रारदाराचा वकीलांतर्फे तक्रार चालवणेसाठी परवानगी अर्ज, अर्ज मंजूर.  नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे तक्रारदारातर्फे अँड.यवतकर यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 कडे जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेवी ठेवलेल्‍या पावत्‍यांच्‍या वकीलांच्‍या सहीने दाखल केलेल्‍या व्‍हेरीफाईड प्रती, नि.6 कडे पत्‍तामेमो, नि.7 कडे मंचाकडून जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसा, नि.7/1 व 7/2 कडे जाबदार क्र.5 व 4 ची पोहोचपावती, नि.7/3 कडे जाबदार क्र.6 व जाबदार क्र.8 यांचे मालक घेत नसल्‍याच्‍या शे-याने परत आलेला लखोटा, नि.7/4 कडे जाबदार क्र.8 यांचे मालक घेत नसल्‍याच्‍या शे-याने परत आलेला लखोटा, नि.7/5 व नि.7/6 व नि.7/7 कडे जाबदार क्र.2,7 व जाबदार क्र.3 यांचा रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.8 कडे जाबदार क्र.5 तर्फे अँड.माने यांचे वकीलपत्र दाखल, नि.9 कडे जाबदार क्र.5 यांचा म्‍हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज मंजूर. नि.10 कडे जाबदार क्र.5 यांचे म्‍हणणे दाखल.  नि.11 कडे जाबदार क्र.5 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसीस दाखल, नि.14 कडे तक्रारदाराची पुरसीस की, तक्रारदारानी पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे तोच लेखी युक्‍तीवाद समजावा.      

5     तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदार क्र.5 यानी दाखल केलेले म्‍हणणे, कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद व उभय विधिज्ञांचा युक्‍तीवाद यांचा विचार करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व

     सेवापुरवठादार असे नाते आहे काय?                             होय.   

 

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 

 4.  अंतिम आदेश काय?                             तक्रार अंशतः मंजूर. 

 

 

विवेचन-

6.         मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  जाबदार पतसंस्‍था ही लोकांचे पैसे विविध खात्‍यांवर ठेवून घेते व त्‍यावर व्‍याज देते.  तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्‍यावर व्‍याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्‍यवहार-व्‍यापार चालतो.  तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेत ठेवपावत्‍या ठेवलेल्‍या होत्‍या.  यावरुन तक्रारदार जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक असून त्‍यांचा व जाबदार पतसंस्‍थेचा व्‍यवहार होता हे सिध्‍द होते. तसेच जाबदार पतसंस्‍था रकमा ठेवून घेते व त्‍यावर व्‍याज देते त्‍यामुळे जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.   तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार रकमांची मागणी करुनही आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही यावरुन जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्‍द होते.  जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांच्‍या रकमा त्‍यांना सव्‍याज परत केल्‍या पाहिजेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.  जाबदार हेच संस्‍थेचे सर्वेसर्वा असतात व सर्व कारभार तेच पहात असतात म्‍हणूनच तक्रारदारांचे पैसे परत करणेस co-operate corporate veil नुसार जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 8 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.  येथे आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

7       सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                             आदेश  

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  तक्रारदार यांना त्‍यांचे पावती क्र.1440 रक्‍कम रु.20,000/- व त्‍यावर दि.14-3-13 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्‍याजाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण रक्‍कम जाबदार क्र.1 ते 8 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

3.   तक्रारदार यांना त्‍यांचे पावती क्र.1441 रक्‍कम रु.20,000/- व त्‍यावर दि.14-3-13 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्‍याजाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण रक्‍कम जाबदार क्र.1 ते 8 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

4.    तक्रारदार यांना त्‍यांचे पावती क्र.1442 रक्‍कम रु.10,000/- व त्‍यावर दि.14-3-13 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्‍याजाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण रक्‍कम जाबदार क्र.1 ते 8 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

5.       तक्रारदाराना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.12,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.4,000/- जाबदार क्र.1 ते 8 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना अदा करावेत.

6.     वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 8  यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे. तसे न केल्‍यास आदेश पारित तारखेपासून तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत एकूण रकमेवर द.सा.द.शे.6 टक्‍केप्रमाणे व्‍याज दयावे लागेल. 

7.  वरील आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्‍यांचेविरुध्‍द कलम 25 व 27 नुसार मंचाकडे दाद मागणेची मुभा राहील.

8   सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

9  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.  27-2015.

 

       (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या            सदस्‍य            अध्‍यक्षा

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.