सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 67/2014
तक्रार दाखल दि.17-05-2014.
तक्रार निकाली दि.15-07-2015.
1. अकबर गुलाब शिकलगार,
2. सौ. शमा अकबर शिकलगार,
3. ईशा अकबर शिकलगार,
4. सुहेल अकबर शिकलगार,
सर्व रा. कार्वे नाका, कराड,ता.कराड,जि.सांगली. .... तक्रारदार.
विरुध्द
1. भारतमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लि.,कराड
तर्फे अधिकराव शिवाजी सोमदे
2. संस्थापक, अधिकराव शिवाजी सोमदे,
रा. जुळेवाडी, ता. कराड, जि.सातारा.
3. चेअरमन, कविता अधिकराव सोमदे,
रा. जुळेवाडी, ता. कराड, जि.सातारा
4. संचालक, विद्युलता अशोक पुराणिक,
रा. पुराणिक हॉस्पिटल, शनिवार पेठ, कराड,
ता. कराड जि.सातारा.
5. संचालिका छायादेवी राजाराम पवार,
रा.’लक्ष्मीनिवास’, लक्ष्मीनारायण चौक,
मार्केट यार्ड, बैल बाजार रोड, कराड,
ता.कराड, जि.सातारा
6. संचालिका, भागिरीथी त्र्यंबक थोरात,
रा. कार्वे, ता. कराड, जि.सातारा
7. संचालिका, वैशाली अजय जगताप,
मु.पो. वडगांव हवेली, ता.कराड, जि.सातारा
8. संचालिका, अंजली जयकर कदम,
रा.मु.पो.नेर्ले,ता.वाळवा,जि.सांगली.
9. संचालिका, छाया निवासराव पाटील,
रा. सुयोग नगर, कार्वे नाका,कराड,
ता.कराड, जि.सातारा
10. संचालिका, संगिता सुभाष सोमदे,
रा. जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा
11. संचालिका, मंगलादेवी रामानंद माने
रा. तृप्ती कल्पना प्लाझा, कार्वे नाका, कराड,
ता. कराड, जि.सातारा ... जाबदार.
....तक्रारदारतर्फे (अँड.डी.ए.यवतकर)
....जाबदार क्र.4 तर्फे (अँड.एम.एच.ओक)
....जाबदार क्र.5 तर्फे (अँड.एस.एस.माने)
....जाबदार क्र.1 ते 3 व 6 ते 11- एकतर्फा
-ः न्यायनिर्णय ः-
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कार्वे नाका, कराड येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांनी जाबदार पतसंस्थेत खाली नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव स्वरुपात रक्कम गुंतविली होती व आहे.
अनं | ठेव पावती क्रमांक | नांव | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1. | 1226 | शमा अकबर शिकलगार | 50,000/- | 13/07/2012 | 13/07/2013 |
2 | 1229 | शमा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
3 | 1230 | शमा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
4 | 1223 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
5 | 1224 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
6 | 1225 | ईशा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
7 | 1243 | अकबर गुलाब शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
8 | 1244 | अकबर गुलाब शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
9 | 1245 | ईशा अकबर शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
10 | 1246 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
11 | 1261 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
12 | 1262 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
13 | 1263 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
14 | 1264 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
15 | 1265 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
16 | 1266 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
17 | 1267 | ईशा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
18 | 1268 | सोहेल अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
19 | 1301 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
20 | 1302 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
21 | 1303 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
22 | 1304 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
23 | 1354 | अकबर गुलाब शिकलगार | 50,000/- | 12/12/2012 | 12/12/2013 |
24 | 1355 | अकबर गुलाब शिकलगार | 50,000/- | 12/12/2012 | 12/12/2013 |
| | एकूण रुपये | 7,40,000/- | | |
तसेच तक्रारदार यांनी दि.22/12/2012 रोजी रक्कम रु.80,000/- बँकेचा चेक क्र.778011 ने व रक्कम रु.20,000/- रोख स्वरुपात जाबदार पतसंस्थेत ठेवस्वरुपात ठेवलेले आहेत. तसेच दि.22/2/2013 रोजी रक्कम रु.90,000/- महाराष्ट्र बँकेचा चेक 778014 ने व रक्कम रु.10,000/- रोख स्वरुपात मुदत ठेव स्वरुपात गुंतवलेले आहेत. सदर चेकच्या रकमा संस्थेचे कर्मचारी श्री. शेखर कुंभार यांचे नावे दिलेल्या आहेत. सदर एकूण रक्कम रु.2,00,000/- च्या ठेवपावत्या तक्रारदार यांना अद्यापपर्यंत दिलेल्या नाहीत.
वर नमूद तपशिलाप्रमाणे मुदत ठेव पावत्यांवरील एकूण रक्कम रु.7,40,000/- मुदत ठेव स्वरुपात ठेवलेले होते व आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांना आर्थिक अडचण असलेने ठेवपावतींची रक्कम मुदतीनंतर आजअखेर होणा-या व्याजासह मिळावी म्हणून जाबदार यांना तक्रारदाराने विनंती केली असता, जाबदाराने रक्कम देणेस टाळाटाळ केली व रक्कम परत दिली नाही. तसेच तक्रारदार यांनी दि.22/12/2012 रोजी ठेवलेली ठेव रक्कम रु.1,00,000/- व दि.22/2/2013 रोजी ठेवलेली रक्कम रु.1,00,000/- या रकमेच्या ठेवपावत्या अद्यापपर्यंत जाबदारकडून मिळाल्या नाहीत. सदरची रक्कम जाबदार संस्थेच्या वतीने श्री. शेखर कुंभार या संस्थेच्या क्लार्कने स्वीकारलेली आहे. तसेच बँकेचे स्टेटमेंटमध्ये नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांना ठेव रकमेच्या पावत्या न देवूनदेखील तक्रारदार यांना दिलेल्या सेवेत त्रुटी व कमतरता केलेली आहे. तक्रारदाराने वेळोवेळी मुदत संपले ठेवींची रक्कम व्याजासह मागूनही केवळ आश्वासन देण्याशिवाय जाबदाराने काहीही केले नाही वस्तुतः जाबदार यांनी मुदत संपलेल्या ठेवपावतीवरील व्याजासह रक्कम तक्रारदारांना देणे बंधनकारक होते. तथापी, जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली, शेवटी रक्कम देणेस नकार दिला. तसेच त्यामुळे तक्रारदाराला जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराची ठेवीची रक्कम जाबदारकडून व्याजासह परत मिळणेसाठी व मानसिकत्रास व खर्चाची रक्कम मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदारकडून मुदत ठेवीची रक्कम रु.9,40,000/- (रुपये नऊ लाख चाळीस हजार फक्त) पावतीवरील नमूद व्याजासह वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळावी. तसेच प्रस्तुत रक्कम तक्रारदार यांचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज जाबदार यांनी तक्रारदार यांना अदा करावे, तक्रारदारास झालेल्या मानसीक व शारीरिक त्रासाबाबत रक्कम रु.1,00,,000/- (रुपये एक लाख फक्त) जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) जाबदारकडून तक्रारदाराला मिळावेत अशी विनंती प्रस्तुत कामी मागणी तक्रारदाराने केलेली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्याचे अर्जातील कथनाच्या सिध्दतेसाठी नि.क्र. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.8/1 ते 8/12 कडे एकूण 24 मुदत ठेव पावत्यांच्या सत्य प्रती, नि.29 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 32 कडे पुराव्याचे शपथपत्र हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसीस, नि. 33 कडे व्हेरीफाय केलेली ठेवपावत्या वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांना नोटीस लागू होवूनसुध्दा ते मे. मंचात हजर नाहीत व तक्रार अर्जातील तक्रारदाराचे म्हणणेही खोडून काढलेले नाही सबब प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. तर जाबदार क्र. 4 ने नि.15 कडे म्हणणे व नि.15 अ कडे अँफीडेव्हीट, नि. 16 कडे जाबदार क्र. 5 ने म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र. 4 व 5 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले असून जाबदार क्र. 4 व 5 हे जाबदार संस्थेचे संचालक कधीच नव्हते व नाहीत, त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारांचे ठेवीची रक्कम देणेची जबाबदारी या संचालकांवर येत नाही. त्यामुळे जाबदार क्र. 4 व 5 हे जाबदार संस्थेचे संचालक असलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाचे ठेवीची रक्कम देणेची जबाबदारी या संचालकांवर येत नाही. त्यामुळे जाबदार क्र. 4 व 5 हे या जाबदार पतसंस्थेचे संचालक नाही ही बाब तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. सबब सदर जाबदार क्र. 4 व 5 यांना या जबाबदारीतून मुक्त करावे किंवा जाबदार क्र. 4 व 5 यांचेवर कोणतीही जबाबादारी ठेवू नये अशास्वरुपाचे म्हणणे जाबदार क्र. 4 व 5 यांनी दिलेले आहे. तसेच जाबदार क्र. 4 या कराड येथील प्रसिध्द वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांचेकडून रक्कम वसूल करणे सोपे होईल म्हणून विनाकारणच प्रस्तुत जाबदाराचा काहीएक संबंध नसताना प्रस्तुत जाबदार क्र. 4 यांना याकामी तक्रारदाराने जाबदार म्हणून सामील केले आहे. तसेच सदर जाबदार क्र. 4 या प्रस्तुत जाबदार पतसंस्थेच्या गुंतवणूकदार असून त्यांचीच सदर पतसंस्थेत गुंतवलेली रक्कम रु.2,25,000/-जाबदार पतसंस्थेकडे गुंतविली असून प्रस्तुत रक्कम जाबदार क्र.4 यांना परत मिळालेली नाही त्यामुळे सदर जाबदार क्र. 4 यांनीच सदर रक्कम वसूल होणेसाठी मे. मंचात जाबदार संस्थेविरुध्द तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रस्तुत जाबदार क्र. 4 व 5 हे संचालक नसल्याने तक्रारदार यांची ठेवीची रक्कम देणेची जबाबदारी प्रस्तुत जाबदार यांची नव्हती व नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज या जाबदारांविरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावा. अशा स्वरुपाचे म्हणणे सदर जाबदार यांनी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुतचा तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1- तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहे का?- होय.
2- जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय?- होय.
जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी
3- अंतिम आदेश? खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन -
1. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खाली नमूद परिशिष्टामध्ये नमूद मुदत ठेवपावतींप्रमाणे एकूण रक्कम रु.7,40,000/- (रुपये सात लाख चाळीस हजार फक्त) मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेवले होते व आहेत. तक्रारदाराने प्रस्तुत ठेवपावतींच्या व्हेरीफाईड प्रत नि. 33 कडे मंचात दाखल केल्या आहेत. सबब तक्रारदार व जाबदार हे ग्राहक व सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद सिध्द होते.
अनं | ठेव पावती क्रमांक | नांव | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1. | 1226 | शमा अकबर शिकलगार | 50,000/- | 13/07/2012 | 13/07/2013 |
2 | 1229 | शमा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
3 | 1230 | शमा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
4 | 1223 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
5 | 1224 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
6 | 1225 | ईशा अकबर शिकलगार | 20,000/- | 16/07/2012 | 16/07/2013 |
7 | 1243 | अकबर गुलाब शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
8 | 1244 | अकबर गुलाब शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
9 | 1245 | ईशा अकबर शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
10 | 1246 | डॉ.सोहेल अकबर शिकलगार | 47,500/- | 10/08/2012 | 10/08/2013 |
11 | 1261 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
12 | 1262 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
13 | 1263 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
14 | 1264 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
15 | 1265 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
16 | 1266 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
17 | 1267 | ईशा अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
18 | 1268 | सोहेल अकबर शिकलगार | 25,000/- | 05/09/2012 | 05/09/2013 |
19 | 1301 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
20 | 1302 | शमा अकबर शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
21 | 1303 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
22 | 1304 | अकबर गुलाब शिकलगार | 25,000/- | 10/10/2012 | 10/10/2013 |
23 | 1354 | अकबर गुलाब शिकलगार | 50,000/- | 12/12/2012 | 12/12/2013 |
24 | 1355 | अकबर गुलाब शिकलगार | 50,000/- | 12/12/2012 | 12/12/2013 |
| | एकूण रुपये | 7,40,000/- | | |
याकामी जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांना नोटीस लागू होवूनसुध्दा ते मे. मंचात हजर राहीले नाहीत तसेच त्यांनी याकामी म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब सदर जाबदार यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही त्यामुळे तक्रारदाराचे तक्रार अर्ज नि. 1 वर प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनाप्रमाणे तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. कारण त्यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. परंतु जाबदार क्र. 4 व 5 यांनी प्रस्तुत कामी हजर होवून म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये स्पष्ट कथन केले आहे की, जाबदार क्र. 4 व 5 हे जाबदार संस्थेचे कधीही संचालक नव्हते व नाहीत. त्याचप्रमाणे जाबदार क्र. 4 व 5 हे सदर जाबदार पतसंस्थेचे संचालक होते ही बाब तक्रारदाराने सिध्द केलेली नाही. तक्रारदाराने सदर जाबदार संचालक असलेचा कोणताही कागदोपत्री पुरावा मे मंचात दाखल केलेला नाही. सबब सदर जाबदार क्र. 4 व 5 यांना प्रस्तुत कामी तक्रारदाराचे ठेवीची रक्कम अदा करणेस जबाबदार धरणे न्यायोचीत होणार नाही. तसेच जाबदार क्र. 4 व 5 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे असे म्हणणे न्यायोचित होणार नाही. परंतु जाबदार क्र. 4 व 5 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार नाही. परंतु जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी याकामी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब सदर जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी तक्रारदार यांना त्यांचे ठेवीची रक्कम अदा केली नसलेने व अदा करणेस नकार दिल्याने सदोष सेवा पुरविली आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
तसेच तक्रारदार यांचे तक्रार अर्जातील कथनाप्रमाणे, तक्रारदार यांनी दि.22/12/2012 रोजी ठेवलेली ठेव रक्कम रु.1,00,000/- व दि.22/2/2013 रोजी ठेवलेली रक्कम रु.1,00,000/- या रकमेच्या ठेवपावत्या अद्यापपर्यंत जाबदारकडून मिळाल्या नाहीत. सदरची रक्कम जाबदार संस्थेच्या वतीने श्री. शेखर कुंभार या संस्थेच्या क्लार्कने स्वीकारलेली आहे. तथापी, प्रस्तुत प्रकरणात सदर रकमेच्या ठेवपावत्या दाखल केलेल्या नसतील तर त्या रकमा प्रस्तुत तक्रार अर्जात मागण्याचा हक्क तक्रारदारांना राहणार नाही. सदर रकमांबाबत रकमा संस्थेकडे भरलेबाबतचा कोणाताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदर रकमेची मागणी मान्य करता येणार नाही. परंतु तक्रारदाराचे सदरची रक्कम रु.2,00,000/- मागणीचा हक्क अबाधीत ठेवणेत येतो व उर्वरीत रक्कम रु.7,40,000/- ची रक्कम व्याजासह मिळणेस पात्र असलेबाबत मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
सबब तक्रारदार यांचे वर नमूद परिशिष्टातील मुदत ठेवपावतींवरील ठेवीची एकूण रक्कम रु.7,40,000/- (रुपये सात लाख चाळीस हजार फक्त) मुदतठेव ठेवले तारखेपासून तक्रारअर्ज दाखल तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करणेसाठी तसेच तक्रार अर्ज दाखल केले तारखेपासून रक्कम पदरी पडेपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह तक्रारदारांना अदा करणेसाठी जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या Co-Operative Corporate Veil नुसार जबाबदार धरणे न्यायोचित होणार आहे. सदर कामी आम्ही मे. राज्य आयोग, मुंबई यांचेकडील रिटपिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडत्वाचा आधार घेतला आहे.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 4 व 5 यांना सदर जबाबदारीतून वगळणेत येते.
सबब प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश करणेत येतो.
-ः आदेश ः-
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांची वर नमूद परिशिष्टात नमूद सर्व ठेवपावत्यांवरील एकूण रक्कम रु.7,40,000/- (रुपये सात लाख चाळीस हजार फक्त) तक्रारदार यांना मुदत ठेव ठेवले तारखेपासून तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत पावतीवर नमूद व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करणेसाठी तसेच तक्रार दाखल तारखेपासून रक्कम पदरी पडेपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारे व्याज अदा करणेसाठी जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत येत आहे.
3. जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या परिशिष्ठात नमूद ठेवपावतींची एकूण रक्कम रु.7,40,000/- (रुपये सात लाख चाळीस हजार फक्त) तक्रारदार यांना मुदतठेव ठेवले तारखेपासून तक्रार अर्ज दाखल तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करावी
4. जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या, ठेवींची तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम पदरी पडेपर्यंत ठेवपावतींचे एकूण रक्कम रु.7,40,000/- (रुपये सात लाख चाळीस हजार फक्त) वर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारे व्याज तक्रारदाराला अदा करावे.
5. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम व तक्रार अर्जाचा खर्च
म्हणून रक्कम रु.20,000/-(रुपये वीस हजार फक्त) जाबदार क्र. 1 ते 3 व
6 ते 11 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा
करावी.
6. जाबदार क्र. 4 व 5 यांना सदर जबाबदारीतून वगळणेत येते.
7. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3 व 6 ते 11 यांनी आदेश
पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
8. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
9. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
10. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.15-07-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.