(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 27 फेब्रूवारी 2012)
1. अर्जदाराने सदर दरखास्त ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 प्रमाणे दाखल करुन, गै.अ. यांचेकडून रुपये 24,150/- देण्यात यावे, किंवा रक्कम न मिळाल्यास गै.अ.कडून जप्तीची कारवाई करुन, चल व अचल संपती जप्त करुन पैसे वसूल करुन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
2. दरखास्त नोंदणी करुन गैरअर्जदारास शो-कॉज नोटीस पाठविण्यात आले. गै.अ.यास नि.क्र.6 नुसार नोटीस तामील झाल्याची पोच प्राप्त झाली. अर्जदार यांनी दरखास्त परत घेण्याकरीता अर्ज नि.क्र.7 दाखल. अर्जदार व गै.अ. यांच्यात आपसी तडजोड होऊन तक्रार क्र.7/2011 आदेश दि.30 जुलै 2011 मधील आदेशाचे पालन, गै.अ.यांनी केलेले आहे. अर्जदार व गै.अ. यांनी संयुक्त सहीने नि.क्र.8 नुसार पुरसीस दाखल केले. गै.अ. यांनी आपसी तडजोडीने दरखास्तमधील आदेशाचे पालन केले.
.... 2 ... (चौ.अ.क्र.1/2012)
अर्जदार यांनी, दरखास्त परत घेण्याची परवानगी मागण्याचा अर्ज सादर केला. अर्ज मंजूर करण्यात आला. दरखास्तमधील वाद मिटलेला असून, आदेशाची पुर्तता झालेली असल्याचे अर्जदाराने मान्य केले असल्याने, दरखास्त अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
आदेशाची पुर्तता झालेली असल्याने दरखास्त खारीज करण्यात येत आहे.
गडचिरोली.
दिनांक :- 27/02/2012.