जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –128/2011 तक्रार दाखल तारीख –11/08/2011
सौ.लिलाबाई भ्र.सुंदरराव गायकवाड
वय 55 वर्षे,धंदा घरकाम व शेती .तक्रारदार
रा.मौज ता.जि. बीड
ह.मु.आदर्श गणेश नगर,नगर रोड,बीड ता.जि.बीड
विरुध्द
कार्यकारी अभिंयता,
भारत दुरसंचार निगम लि ...सामनेवाला
प्लॅनिग सेक्शन एस.बी.एच.औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.पी.लघाने
सामनेवाले तर्फे :- कोणीही हजर नाही
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दि.18.08.2011 रोजी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
सदर तक्रारदाराचा व्यवहार हा ग्राहक विवाद होतो का ? या मुददयावर प्राथमीक सुनावणीसाठी दि.30.08.2011 रोजी नेमण्यात आली.
तक्रारदाराने अँड.लघाने यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराच्या शेतीतून सामनेवाला यांनी खोदकाम केल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले व त्या बाबतची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराची तक्रार आहे.
या संदर्भात तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे कोणतेही म्हणणे नाही. तसेच तक्रारदाराच्या शेतात सामनेवाला यांनी खोदकाम केल्यामुळे तक्रारदाराचे नूकसान झालेले आहे. या संदर्भात तक्रारदाराचा विवाद हा ग्राहक विवाद होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सदरची तक्रार निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अर्ज निकाली.
2. खर्चासाठी कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड