Maharashtra

Ahmednagar

CC/17/184

Rajendra Bhanudas Bhoite - Complainant(s)

Versus

Bhansali Automotive - Opp.Party(s)

Landge

22 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/184
( Date of Filing : 06 Jul 2017 )
 
1. Rajendra Bhanudas Bhoite
Padama Nagar, Dhawan Wasti, Tapowan Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Bhausaheb Rajendra Bhoite
Padama Nagar, Dhawan Wasti, Tapowan Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhansali Automotive
A/P- Sakuri, Nagar-Manmad Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Shree Samarth Motors
Opp. Savedi Bus Stand, Savedi Naka, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 22 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

 (द्वारा मा.अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार क्र.१ हे तक्रारदार क्र.२ चे वडिल आहेत. तक्रारदार क्रमांक २ यांनी नोकरी नसल्‍याने त्‍यांनी रोजगार मिळविण्‍याच्‍या हेतुने तीन चाकी मालवहातुक वाहन खरेदी करण्‍याचे ठरविले.  सामनेवाले क्रमांक १ हे पॅगो कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. सामनेवाले क्रमांक २ हे सामनेवाले क्रमांक १ करीता अहमदनगर येथे वाहनाचा विक्री व्‍यवसाय करतात.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याशी संपर्क साधला असता सामनेवाले क्र.२ यांनी वाहनाची किंमत रूपये १,८२,५००/-, विम्‍याची रक्‍क्‍म रूपये ७,०००/-, वाहनाचा एकरकमी कर व पासिंग करीता रककम रूपये १६,५००/- असे एकुण रक्‍कम रूपये २,१५,०००/- भरण्‍याबाबत तक्रारदारास सांगितले होते. सदर रकमेवर रक्‍कम रूपये ५,०००/- सुट देण्‍याचे आश्‍वासन दिलेले होते.  तक्रारदार क्र.२ यांनी सामनेवाले क्र.२ कडे रूपये ४५,०००/- रोख रक्‍कम भरली व उर्वरीत रक्‍कम तक्रारदार क्र.१ यांच्‍या नावे फॉच्‍युन इंटिग्रेडेट अॅसेट फायनान्‍स लि. यांच्‍याकडुन सामनेवाले क्र.२ यांनी कर्ज काढुन दिलेले होते. तक्रारदार यांनी संपुर्ण रक्‍कम सामनेवाले यांच्‍याकडे भरल्‍यानंतर सामनेवाले यांनी सन २०१५ मध्‍ये तक्रारदारास वाहन दिलेले होते. सामनेवाले यांनी वाहनाचा विमा तसेच पासिंगकरीता रक्‍कम घेऊनसुध्‍दा वारंवार विनंती केल्‍यावर सामनेवाले यांनी वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.१६-एवाय-५९६८ असा दिलेला होता. सामनेवाले यांच्‍याकडे सदर वाहनाची आर.सी. बुकची मागणी केली असतांना सदरील वाहनावार वित्‍तीस संस्‍थेचा बोजा असल्‍याने आर.बी.बुक संस्‍थेकडे असल्‍याबाबत सामनेवालेने सांगितले. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या गरजेनुसार सदर वाहनाची बरीच मोठी रक्‍कम खर्च करुन बॉडी तयार केली व सदरचे वाहन चालवुन हप्‍त्‍याची रक्‍कम भरणा करण्‍यात आली. तक्रारदार यांना आर.सी. बुकची आवश्‍यकता असल्‍याने तक्रारदारने आर.सी. बुकची झेरॉक्‍सची मागणी संस्‍थेकडे केली असता तेथील कर्मचा-याने तक्रारदारास सांगितले की, तुमचे वाहन नोंदणी नसल्‍याने आर.सी. बुक आमच्‍याकडे नाही. तक्रारदाराने त्‍यानंतर सामनेवालेने दिलेल्‍या नोंदणीबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यांच्‍याकडे माहिती घेतली. सदरील माहितमध्‍ये सदर नंबरचे वाहन दुसरे असल्‍याचे आढळुन आले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडे संपर्क केला असतांना सामनेवाले क्र.२ यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली व तुम्‍ही विम्‍याची व एकरकमी कराची रक्‍कम भरलेली नसल्‍याने तुमचे वाहन नोंदणी केले नाही, असे उत्‍तर दिले. सामनेवालेने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली असल्‍याने तक्रारदाराचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. तक्रारदाराने दिनांक ०४-०४-२०१७ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवुन नुकसानीची मागणी केली. सदर नोटीसवर सामनेवालेने कोणतीही दखल घेतली नसल्‍याने तक्रारदाराला सदरील तक्रार सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ यांच्‍याविरूध्‍द दाखल केलेली आहे.

३.   तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या  वाहनाला पासींग क्रमांक न दिल्‍याने तक्रारदाराला झालेले नुकसान किंवा त्‍याची किंमत व्‍याजासह परत करण्‍यात यावी.

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.२ यांनी नोटीस मिळून ते प्रकरणात हजर झाले नाही म्‍हणुन निशाणी क्र.१ वर सामनेवाले क्र.२ यांच्‍याविरूध्‍द प्रकरण ‘एकतर्फा’ चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सामनेवाले क्र.१ यांना नोटीस प्राप्‍त  झाल्‍यावर प्रकरणात हजर झाले व निशाणी क्रमांक १४ वर कैफीयत दाखल केली. सामनेवाले क्रमांक १ यांनी कैफीयतीमध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.१ यांनी पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ चे अहमदनगर येथे वाहन सामनेवाले क्र.१ करीता अहमदनगर शहरासाठी वाहन विकतात व त्‍यामुळे तक्रारदार यांना वादातील वाहन खरेदी केल्‍यावर सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारास टेंम्‍पररी रजिस्‍ट्रेशन पेपर व इन्‍शुरन्‍स हे कागदपत्र दिलेले होते. त्‍यावेळी तक्रारदार श्री भोईटे यांनी मी स्‍वतः गाडी पासिंग करुन घेतो परंतु त्‍याने तसे न करता खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार याचा प्रत्‍यक्ष व्‍यवहार सामनेवाले क्र.२ बरोबर झालेला आहे. सदरचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.१ यांच्‍याविरूध्‍द खोटा दाखल करण्‍यात आला असुन तो खर्चासह खारीज करण्‍यात यावा, अशी विनंती करण्‍यात आलेली आहे.

५.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज, सामनेवाले क्र.१ ने दाखल केलेले शपथपत्र, कैफीयत, लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकुन खालील मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.  

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २  यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले क्र.१ ने तक्रारदाप्रती न्‍युनतम सेवा दिली  आहे काय ?

नाही

(३)

सामनेवाले क्र.२ ने तक्रारदाप्रती न्‍युनतम सेवा दिली  आहे काय ?

होय

(३)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार यांनी सामनेवालेशी व्‍यवहार करून तीन चाकी अॅपे माल वाहतुक टॅम्‍पोची गाडी खरेदी केली व सदर गाडीचे कागदपत्र व टेंम्‍पररी रजिस्‍ट्रेशन पेपर सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला दिले, ही बाब उभयपक्षांना मान्‍य असून, यावरून तक्रारदर हे सामनेवाले क्र.१ व २ चे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होका‍रार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२) :  सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला रजिस्‍ट्रेशनसाठी आवश्‍यक असणारे सर्व दस्‍तऐवज दिले होते हे सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या  दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते आणि सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराकडुन वादातील वाहनाच्‍या पासिंगकरीता कोणतीही रक्‍कम घेतलेली नव्‍हती म्‍हणुन सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्र.२ चे उत्‍तर नका‍रार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (३) :  सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारासोबत वादातील वाहनाचा व्‍यवहार केला होता व त्‍याकरीता सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराकडुन आर.टी.ओ. चे रक्‍कम रूपये १६,४००/- घेतले होते ही बाब तक्रारदाराने दाखल निशाणी क्रमांक ९ वरील दाखल दस्‍तऐवजावरून सिध्‍द होते. सामनेवाले क्रमांक २ यांना नोटीस पाठवुन प्रकरणात हजर झाले नाही व त्‍यांनी त्‍यांची बाजु मांडलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ विरूध्‍द लावलेले आरोप  शपथपत्र व दस्‍तऐवजावरून सिध्‍द होत आहे. सामनेवाले क्र.२ यांनी आर.टी.ओ. टॅक्‍स व हॅन्‍डलींग चार्जेस स्विकारून तक्रारदाराला वाहनाची नोंदणी आर.टी.ओ. मध्‍ये  करून दिली नाही, म्‍हणुन सामनेवाले क्र.२ ने तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दिली आहे, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्र.३ चे उत्‍तर होका‍रार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

९.  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्र.१ ते ३ चे विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

आदेश

     १.  तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

     २.  तक्रारदार यांच्‍या वाहनाची नोंदणी करण्‍याकरीता रक्‍कम स्विकारूनसुध्‍दा  सामनेवाले            क्रमांक २ ने नोंदणी केली नाही, म्‍हणुन तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले म्‍हणुन                  सामनेवाले क्र.२ ने तक्रारदाराला रक्‍कम रूपये ५०,०००/- (रूपये पन्‍नास हजार)                    नुकसान भरपाई, तसेच तक्रारीचा खर्च रूपये २०,०००/- (रूपये वीस हजार) द्यावा.

     ३.  सामनेवाले क्रमांक १ चे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

     ४.   सामनेवाले क्रमांक २ ने वर नमूद आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३०            दिवसाच्‍या आत करावी.

     ५.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

     ६. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.