Maharashtra

Satara

CC/15/29

sou ranjna ratan kumar doshi - Complainant(s)

Versus

bhaicnd hirachnd raysoni mnltistet co off kedit sosayti - Opp.Party(s)

phojdar

14 Jan 2016

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                     तक्रार क्र. 29/2015.

                            तक्रार दाखल दि. 6-2-2015.

                                    तक्रार निकाली दि.14-1-2016. 

 

सौ.रंजना रतनकुमार दोशी.

रा.श्री.1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ,

303 शुक्रवार पेठ, चावडी चौक,

ता.फलटण, जि.सातारा.                 ....  तक्रारदार

 

         विरुध्‍द

 

1.  भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्‍टेट को.ऑ.

    क्रे.सोसायटी लि. जळगाव, शाखा फलटण.

2. संस्‍थापक- श्री.प्रमोदजी रायसोनी.

3. चेअरमन- श्री.दिलीप कां‍तीलाल चोरडिया.

4. व्‍हा.चेअरमन- मोतीलाल ओंकार जिरी.

5. संचालक- श्री.सूरजमल बाभूतमल जैन.

6. संचालक- श्री.दादा रामचंद पाटील.

7. संचालक- श्री.भागवत संपत माळी.

8. संचालक- श्री.राजाराम कृष्‍णनाथ कोळी.

9. संचालक- श्री.भगवान हिरामण वाघ.

10. संचालक- श्री.हितेंद्र यशवंत महाजन.

11. संचालक- श्री.इंद्रकुमार आत्‍माराम ललवाणी.

12. संचालक- श्री.यशवंत ओंकार गिरी.

13. संचालक- श्री.शेख रमजान शेख अब्‍दुल नबी.

    सर्व 2 ते 13 रा. इ 2/3,4,5 रेमंड चौफुली,

    अजिंठा रोड, एम.आय.डी.सी.जळगांव 425001.   ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.पी.जे.फौजदार

                 जाबदार क्र.-1 ते 13- एकतर्फा.  

                                                

                               न्‍यायनिर्णय  

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्‍या यानी पारित केला)

                                                    

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-

2.      तक्रारदार सौ.रंजना दोशी या गृहीणी असून त्‍यांनी रक्‍कम रु.2,29,008/- अडीअडचणीच्‍या काळात व आजारपणात उपयोग होणेसाठी पाच ठेवपावत्‍यांद्वारे स्‍वतःचे नावावर जाबदार पतसंस्‍थेत गुंतवले आहेत, म्‍हणून ते जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक आहेत.  भाईचंद हिराचंद रायसोनी मल्‍टीस्‍टेट को.ऑ.क्रेडिट सोसा. लि. ही सहकार अधिनियम 1960 अंतर्गत स्‍थापन झालेली संस्‍था असून तिचा व्‍यवसाय हा ठेवी गोळा करणे, कर्जवाटप व कर्जवसुली करणे व यातून आपला नफा कमावणे असा आहे.  जाबदार क्र.2  हे संस्‍थापक असून जाबदार क्र.3 हे संस्‍थेचे चेअरमन आहेत, जाबदार क्र.4 हे व्‍हाईस चेअरमन व जाबदार क्र.5 ते 13 हे संस्‍थेचे संचालक आहेत.  म्‍हणूनच आपल्‍या ग्राहकांना योग्‍य ती सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदार क्र.2 ते 13 यांची आहे. 

      तक्रारदारानी आपले बचत केलेले सर्व पैसे ठेवपावत्‍याद्वारे जाबदार संस्‍थेत पुढीलप्रमाणे गुंतवले आहेत-

 

अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

रक्‍कम रु.

व्‍याजदर

देय दिनांक

1

0889575

24-6-2014

16,950/-

11 टक्‍के

9-8-2014

2

0889576

4-6-2014

1,16,278/-

11 टक्‍के

20-7-2014

3

0889584

25-7-2014

12,769/-

11 टक्‍के

9-9-2014

4

0889675

18-9-2014

12,912/-

11 टक्‍के

3-11-2014

5

0889658

31-8-2014

70,099/-

11 टक्‍के

16-10-2014

 

     दरम्‍यानचे काळात तक्रारदाराना रकमेची गरज असलेने ते जाबदार संस्‍थेत रकमा मागणेस गेले असता संस्‍थेच्‍या फलटण शाखेच्‍या व्‍यवस्‍थापकानी संस्‍था आर्थिक अडचणीत असलेचे सांगून रकमा देणेस नकार दिला.    मात्र तक्रारदारानी तगादा लावल्‍यावर जाबदार 2 यांनी संस्‍था आर्थिक अडचणीत असलेचे सांगून पैसे देणेस नकार दिला व वरील ठेवपावत्‍यांच्‍या मुदती देय दिनांकानंतर पुढे वाढवून घ्‍या, आम्‍ही देय रकमेवर 11 टक्‍केप्रमाणे व्‍याज देऊ, तुमचे नुकसान करणार नाही असे सांगितले.    जाबदार क्र.2 चे सांगणेवरुन ठेवपावत्‍यांच्‍या मुदती देय दिनांकानंतर पुढे परत वाढवूनही जाबदारानी तक्रारदाराना वाढीव मुदतीनंतरही पैसे परत केले नाहीत.  म्‍हणून त्‍यांनी दि.2-1-2015 रोजी वकीलांतर्फे कायदेशीर नोटीस पाठवून त्‍यांना आपण चार दिवसात सदर रक्‍कम परत केली नाही तर आपलेवर कोर्ट कारवाई करणेबाबत बजावले, मात्र त्‍याचा काही उपयोग झाला नाही व जाबदार 1 संस्‍थेने सदर नोटीस घेणेचे नाकारलेने ती दि.2-1-15 रोजी परत आली.  जाबदारांच्‍या या वर्तनामुळे तक्रारदाराना काळजी निर्माण झाली असून त्‍यांचे मनःस्‍वास्‍थ बिघडले आहे.    तक्रारदार हे जाबदार क्र.1 ते 13 यांचे ग्राहक असूनही ते तक्रारदाराना ग्राहक म्‍हणून पुरवावयाचे सेवेत त्‍यांची देय असणारी रक्‍कम परत न करता कमतरता व त्रुटी निर्माण करीत आहेत व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करीत आहेत.  तरीह जाबदार क्र.1 ते 13 यांनी तक्रारदाराना देय असणारी रक्‍कम परत न केल्‍यामुळे त्‍यांना चिंता निर्माण झाली आहे.   सध्‍या तक्रारदारांस वरील रकमेची अत्‍यंत गरज आहे.  सदर रक्‍क‍म मिळणेसाठी त्‍यांनी जाबदारांकडे वारंवार हेलपाटे घातले.  तक्रारदारानी वारंवार जाबदारांकडे वरील पैसे मिळणेसाठी लेखी व तोंडी मागणी केली तरीही जाबदारानी अद्याप त्‍यांचे पैसे परत केले नाहीत त्‍यामुळे ततक्रारदारांची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे  म्‍हणून तक्रारदारास ही तक्रार या मंचापुढे दाखल करणे भाग पडत आहे.  या तक्रारीशिवाय तक्रारदारानी इतर कोणत्‍याही कोर्टात जाबदारांविरुध्‍द प्रकरण दाखल केलेले नाही.   दि.2-1-15 रोजी तक्रारदाराने जाबदार संस्‍थेस रक्‍कम मागणीची नोटीस पाठवलेवर त्‍यांनी सदर नोटीस घेणेचे नाकारलेमुळे ती दि.2-1-15 रोजी परत आली तेव्‍हा घडले व नंतर आजपर्यंत घडतच आहे.  सदर जाबदार पतसंस्‍थेची शाखा फलटण येथे असून वरील सर्व घटना फलटणमध्‍ये म्‍हणजेच या मे.मंचाचे स्‍थळसीमेत घडली व तक्रारअर्जास कारणही याच मंचाच्‍या स्‍थळसीमेत घडलेने ही तक्रार चालवणेचे अधिकार या मंचास आहेत.   तक्रारदारानी मंचाला तक्रारअर्जात खालीलप्रमाणे विनंती केली आहे- जाबदारानी तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्‍याबाबत त्‍यांना दोषी धरुन जाबदारांकडून सर्व मुद्दल रक्‍कम रु.2,35,891/- इतकी परत करणेचा आदेश करावा.  मुद्दल रकमेवर द.सा.द.शे.11 टक्‍के व्‍याजदराने देय असलेले व्‍याज माहे जानेवारी ते सदर अर्जाचा निकाल लागेपर्यंतच्‍या काळात जेवढे होईल तेवढे तक्रारदारास परत करणेचा आदेश मंचाने करावा.  मुद्दल व 11 टक्‍के व्‍याजदराने मिळणारे व्‍याज अशी सर्व रक्‍कम हातात मिळेपर्यंत या रकमेवर द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज देणेचा मे.मंचाने आदेश करावा.  शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.2,00,000/- देणेचा तसेच तक्रारअर्जासाठी आलेला खर्च जाबदारानी परत करणेचा आदेश मे.मंचाने करावा.

 

 

3.    नि.7 कडे तक्रारअर्ज दाखल करणेस परवानगी मागणारा अर्ज, नि.3 कडे अँड.फौजदार यांची वकील म्‍हणून नियुक्‍तीसाठी तक्रारदाराचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे अँड.फौजदार यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 ते नि.5/5 कडे व्‍हेरिफाईड केलेल्‍या ठेवपावत्‍यांच्‍या झेरॉक्‍स प्रती, नि.5/7 क‍डे अँड.फौजदार यानी जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसची स्‍थळप्रत, नि.5/8 कडे शाखाधिका-याना पाठवलेले पोस्‍टकार्ड, नि.5/9 कडे पोस्‍टाचा रजि.पोचलेचा अहवाल, नि.5/10 कडे संचालक यादी, नि.9 कडे पत्‍ता पुरसीस, नि.9/ए कडे मंचाची जाबदाराना नोटीस, नि.9/बी कडे जाबदार क्र.13 ची नोटीसची पोहोचपावती, नि.10 ते 22 कडे दिलेल्‍या पत्‍त्‍यावर सदर व्‍यक्‍ती रहात नाही या शे-याने परत आलेल्‍या नोटीसा, नि.23 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.24 कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.2 ते 13 यांना जाहीर नोटीसीसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.25 कडे जाहीर नोटीसीचा मसुदा, मसुदा मंजूर.  नि.26 कडे संपादकास मंचाकडून जाहीर नोटीसीसाठी दिलेले पत्र, नि.27 कडे तक्रारदाराचा कागद दाखल करुन घेणेस  परवानगी अर्ज, अर्ज मंजूर.  नि.28 कडे कागदयादीने जाहीर नोटीस दाखल, नि.29 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.30 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.31 कडे तक्रारदारांचा लेखी युक्‍तीवाद, इ.कागद दाखल आहेत.   

     

4.      तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचा लेखी व तोंडी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-    

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                         होय.                          

 

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?       होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर. 

 

विवेचन-  मुद्दा क्र.1-

 

5.         तक्रारदारांनी त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या नावे जाबदार क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये मुदतठेवी ठेवलेल्‍या आहेत.  जाबदार पतसंस्‍था ही लोकांकडून ठेवी ठेवून घेते, त्‍यावर त्‍यांना व्‍याज देते,  लोकांना कर्ज देते व त्‍यावर व्‍याज घेते तसेच लोकांचे बचत खाते काढते, त्‍यावर त्‍यांना व्‍याज देते अशा प्रकारे जाबदार क्र.1 पतसंस्‍थेचा व्‍यवहार आहे व या स्‍वरुपात ती लोकांना सेवा देते.  त्‍यामुळे लोकांमध्‍ये व जाबदार क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण होते.  तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेवी ठेवलेने व जाबदार पतसंस्‍थेने त्‍या ठेवून घेतलेने व त्‍यावर व्‍याज दयावयाचे ठरविलेने  जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  म्‍हणून मुद्दा क्र.1चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र.2-   तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेतील ठेवींच्‍या मुदती संपलेमुळे रकमेची मागणी केली.  परंतु तक्रारदारास जाबदारांनी रक्‍कम दिली नाही व वेळोवेळी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली.    जाबदारानी रकमा देणेस टाळाटाळ केलेमुळेच सदर अर्ज दाखल करावा लागला आहे.  तक्रारदारांची मुदतठेवीची मुदत संपलेली आहे.   जाबदारांनी पतसंस्‍थेत वारंवार हेलपाटे मारुनही आजपावेतो तक्रारदाराना आपल्‍या रकमा सव्‍याज परत मिळालेल्‍या नाहीत.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा परत केल्‍या नसल्‍यामुळेच जाबदारांच्‍या कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. म्‍हणून मुद्दा क्र.2चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र.3-   जाबदार क्र.1 पतसंस्‍था ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली आहे.   ग्राहकाकडून ठेवीस्‍वरुपात किंवा बचत खात्‍याद्वारे रकमा स्विकारुन ग्राहकानी रक्‍कम मागितलेस त्‍यांच्‍या रकमा त्‍यांना सव्‍याज परत देणे तसेच कर्ज दिले असलेस त्‍यावर व्‍याज आकारणे या हेतूने स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारांनी जाबदार संस्‍थेकडे मुदतठेवी ठेवलेल्‍या आहेत. तक्रारदारांची मुदतठेवीची रक्‍कम जाबदारांनी ठेवून घेतली.  परंतु तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम परत मागितलेवर ती परत करणे ही जाबदारांची जबाबदारी असूनही जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांच्‍या रकमा आजपावेतो परत केलेल्‍या नाहीत व याची जबाबदारी जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांचेवर वैयक्तिक व संयुक्‍तीक आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या  रकमा वेळेत सव्‍याज परत करावयास हव्‍या होत्‍या परंतु आजपावेतो जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा सव्‍याज परत केलेल्‍या नाहीत,  त्‍यामुळेच जाबदारांकडून तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे व तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होऊन त्‍यांना मानसिक त्रासही झालेला आहे.  या सर्वांस जाबदारच जबाबदार आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

       सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.   सदर बाबतीत आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

6.         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                         आदेश

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

 

अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

रक्‍कम रु.

व्‍याजदर

देय दिनांक

1

0889575

24-6-2014

16,950/-

11 टक्‍के

9-8-2014

2

0889576

4-6-2014

1,16,278/-

11 टक्‍के

20-7-2014

3

0889584

25-7-2014

12,769/-

11 टक्‍के

9-9-2014

4

0889675

18-9-2014

12,912/-

11 टक्‍के

3-11-2014

5

0889658

31-8-2014

70,099/-

11 टक्‍के

16-10-2014

 

2.    तक्रारदार हिस कोष्‍टकात दर्शविले अ.क्र.1 वरील पावती क्र.0889575 वरील मुदतठेवीवर पावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

3.     तक्रारदार हिस कोष्‍टकात दर्शविले अ.क्र.2 वरील पावती क्र.0889576 वरील मुदतठेवीवर पावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

4.   तक्रारदार हिस कोष्‍टकात दर्शविले अ.क्र.3 वरील पावती क्र.0889584 वरील मुदतठेवीवर पावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

5.     तक्रारदार हिस कोष्‍टकात दर्शविले अ.क्र.4 वरील पावती क्र.0889657 वरील मुदतठेवीवर पावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

6.     तक्रारदार हिस कोष्‍टकात दर्शविले अ.क्र.5 वरील पावती क्र.0889658 वरील मुदतठेवीवर पावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

7.   वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसांचे आत जाबदारांनी करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपर्यंत होणा-या एकूण सव्‍याज रकमेवर तक्रारदारांचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍केप्रमाणे व्‍याज अदा करावे लागेल. 

 

8.    जाबदार क्र.1 पतसंस्‍था, जाबदार क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.4,000/-अदा करावेत.

 

9.     वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाचे आत जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या करावयाचे आहे.  तसे न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

 

10.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

11.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 14-1-2016.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)  (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.