Maharashtra

Akola

CC/15/299

Babasaheb Gulabsa Kanhed - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-Op.Credit Society Ltd.Jalgaon - Opp.Party(s)

Self

18 Feb 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/299
 
1. Babasaheb Gulabsa Kanhed
R/o.Jawahar Nagar,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-Op.Credit Society Ltd.Jalgaon
Poonam Chembers, Bank Street,Navipth,Jalgaon through President
Jalgaon
Maharashtra
2. Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co.Op Credit Society Ltd.through Manager,Akola
Infron of Mahanagarpalika
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 18.02.2016 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.

       तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याकडे खालील प्रमाणे विविध कालावधीसाठी  ठेवी ठेवल्या व त्याची देय तारीख ऑगस्ट 2015 होती.    त्याचा तपशिल खालील प्रमाणे

ठेव पावती क्र.

मुद्दल रक्कम

देय दिनांक

व्याजासह देय रक्कम

पुढील व्याजासह

होणारी रक्कम

व्याजासह होणारी

पुढील तारीख

0785121

12000

25.04.2015

13560

14000

25/08/2015

0785177

12000

05.05.2015

13560

14075

20/08/2015

0785176

12000

05.05.2015

13560

14075

20/08/2015

 

     तक्रारकर्त्याने वरील ठेवी ह्या नुतनीकरण करुन परत ठेवल्या आहेत.  तक्रारकर्त्याने उपरोक्त ठेवी रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना परत मागीतली,  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर तिनही ठेवीची रक्कम देण्यास नकार दिला. तक्रारकर्ते यांना उपरोक्त ठेवीबाबत तीनही ठेवीची मिळून एकूण रक्कम रु. 42150/-  विरुध्दपक्षाकडून घेणे आहेत.  तसेच तक्रारकर्त्यास जो मानसिक त्रास सहन करावा लागला त्यापोटी रु. 20,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावे.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना रजिस्टर पोष्टाद्वारे नोटीस पाठविली,  परंतु विरुध्दपक्षाने सदरहू नोटीस घेतली नाही.  तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी ठेवीची रक्कम रु. 42140/-, मानसिक त्रासापोटी रु. 20,000/-, प्रकरणाचा खर्च रु. 10,000/- व नोटीसचा खर्च रु. 1000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून मिळावा.

2.     प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे रजिस्टर पोष्टाने पाठविलेली नोटीस “रिफ्युज” या शेऱ्यासह परत आली.  त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द “एकतर्फी” चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.

3.    त्यानंतर तक्रारकर्ते यांचेतर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.       तक्रारकर्ते यांची तक्रार, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्तऐवज   यांचे आधारे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले. कारण विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना रजिस्टर पोष्टाद्वारे पाठविलेली नोटीस “रिफ्युज” या शे-यासह परत आली,  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे विरुध्द सदर प्रकरण “एकतर्फी” चालविण्यात आले.

 5.  तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांतील ठेव पावतीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविल्याचे व त्यावर विरुध्दपक्षाने  व्याज देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते.  विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.

3.   तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन, तक्रारकर्ते यांनी वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे पैसे गुंतविले होते, परंतु सदर ठेवी परिपक्व झाल्यावरही व तक्रारकर्ते यांनी मागणी केल्यावरही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला त्यांची रक्कम परत केली नाही.  विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कुठल्याच मागणीची पुर्तता न केल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली.

4.   तक्रारकर्त्याने गुंतवणुक केलेल्या पावत्यांच्या छायांकित प्रती मंचासमक्ष दाखल केल्या आहेत व तक्रारीत सदर पावत्यातील रक्कम, पुर्णावधी दिनांक व ठेव परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम, याचा सविस्तर तक्ता दाखल केला आहे, तो खालील प्रमाणे…

ठेव पावती क्र.

मुद्दल रक्कम

देय दिनांक

व्याजासह देय रक्कम

पुढील व्याजासह

होणारी रक्कम

व्याजासह होणारी

पुढील तारीख

0785121

12000

25.04.2015

13560

14000

25/08/2015

0785177

12000

05.05.2015

13560

14075

20/08/2015

0785176

12000

05.05.2015

13560

14075

20/08/2015

 

 

 

 

 

        या मंचाने निर्देश दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सर्व ठेव पावत्यांच्या मुळ अस्सल पावत्या मंचासमोर हजर केल्या. त्या पावत्यांवरुन मंचाने तक्त्यातील रकमेचे विवरण व छायांकित प्रतींची पडताळणी करुन, तक्रारकर्त्याने मागणी केलेली रक्कम योग्य आहे का ?, अशी खात्री करुन घेतली.  दाखल दस्तांवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रु. 36,000/- ( रुपये छत्तीस हजार ) गुंतविलेले दिसून येतात व सदर ठेवी परिपक्व झाल्या असून,  तक्रारकर्ते विरुध्दपक्षाकडून रु.40,680/- ( रुपये चाळीस हजार सहाशे अंशी ) व्याजासह, मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे.  तसेच सदर ठेव परिपक्व झाल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्यांची रक्कम व्याजासह परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  त्यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक  व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व सदर प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे.

     सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……

 

                                   ::: अं ति म  आ दे श  :::

 

1)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी  वैयक्तीक व संयुक्तपणे  तक्रारकर्त्यास रु.                                                                   40,680/- ( रुपये चाळीस हजार सहाशे अंशी फक्त) प्रकरण दाखल तारखेपासून, म्हणजे दि. 29/10/2015 पासून ते देय तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह द्यावे.

2)  तक्रारकर्ते यांना सहन कराव्या लागलेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी  रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी  रु. 3,000/- ( रुपये  तिन हजार )  विरुध्दपक्ष क्र. व 1 व 2  यांनी  वैयक्तीक व संयुक्तपणे  तक्रारकर्ते यांना द्यावे.

3)    सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.

सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.