Maharashtra

Akola

CC/15/154

Prakash Bhikusa Wade - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-Op.Credit Society Ltd. - Opp.Party(s)

P N Sharma

19 Jun 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/154
 
1. Prakash Bhikusa Wade
R/o.Shiv Nagar,Old city,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-Op.Credit Society Ltd.
Gandhi Road,Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 19.06.2015 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.

     तक्रारकर्ते सेवा निवृत्त सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर मिळाणरे पैसे विरुध्दपक्षाच्या सोसायटी मध्ये  खालील प्रमाणे ठेव रकमेच्या स्वरुपात ठेवल्या आहेत.

अ.क.

पावती क्र.

खाते क्र.

नांव

ठेव रक्कम रु.

ठेव दिनांक

देय दिनांक

कालावधी

व्याज दर %

देय रक्कम  रु.

1

0785280

018510300319

प्रकाश भिकुसा वडे

10,00,000

29/5/14

13/6/14

15 दिवस

10.00

10,04,110

2

0785280

018510300320

प्रकाश भिकुसा वडे

5,00,000

29/5/14

13/6/14

15 दिवस

10.00

5,20,055

3

0785335

018510300363

प्रकाश भिकुसा वडे

1,00,000

24/7/14

8/8/14

15 दिवस

10.00

1,00,411

4

0785361

01850300386

प्रकाश भिकुसा वडे

1,00,000

27/10/14

11/11/14

15 दिवस

10.00

1,00,411

5

0785347

018510300373

प्रकाश भिकुसा वडे

2,00,000

20/8/14

4/9/14

15 दिवस

10.00

2,00,822

 

     तक्रारकर्त्याने, मुलीचे लग्न ठरल्यामुळे वरील ठेव रकमा परत देण्याची किंवा सदर ठेवीवर 80 टक्के कर्ज देण्याची मागणी विरुध्दपक्षाला केली.  परंतु मुदत संपल्यानंतरही तक्रारकर्त्याला आज पर्यंत रक्कम परत करण्यात आली नाही तसेच तक्रारकर्त्यास कर्ज सुध्दा मंजुर करण्यात आले नाही.  ठेव रक्कम परत मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे पत्र व्यवहार सुध्दा केला, परंतु विरुध्दपक्षाने असमर्थता दर्शविली.  विरुध्दपक्षाने नियमबाह्य कर्ज वितरण केल्यामुळे संस्थेची वसुली होत नाही व ठेवीदाराचे पैसे देण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे.  तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त असून त्याला संस्थेकडून मिळणा-या उत्पन्नाशिवाय इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.  अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली व म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन विरुध्दपक्ष क्र. 1 ते 17 यांना संयुक्त व व्यक्तीगतरित्या ठेवीची रक्कम देण्याचे आदेश द्यावे.  

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

1.   सदर प्रकरणात सर्व विरुध्दपक्षांना नोटीस मंचातर्फे बजावल्यानंतर सर्व नोटीसी शे-यासहीत परत आल्यात.  त्यामुळे सर्व विरुध्दपक्षांविरुध्द  प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 03/06/2015 रोजी मंचाने पारीत केले.  सबब तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त व केलेला युक्तीवाद ऐकून सदर प्रकरणात अंतिम आदेश पारीत करण्यात आला.

2.   तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांतील ठेव पावतीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविल्याचे व त्यावर विरुध्दपक्षाने  व्याज देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते.  विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.

3.   तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे पैसे गुंतविले होते, परंतु सदर ठेवी परिपक्व झाल्यावरही व तक्रारकर्त्याने मागणी केल्यावरही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला त्याची रक्कम परत केली नाही.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सदर ठेव रक्कम परत करा अथवा त्या ठेव रकमेवर 80 टक्के कर्ज द्या, अशी मागणी केल्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कुठल्याच मागणीची पुर्तता  न केल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली.

4.   तक्रारकर्त्याने मंचात गुंतवणुक केलेल्या पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारीत सदर पावत्यातील रक्कम, त्यावर मिळणारे व्याज व ठेव परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम, याचा सविस्तर तक्ता दाखल केला आहे, तो खालील प्रमाणे…

अ.क.

पावती क्र.

खाते क्र.

नांव

ठेव रक्कम रु.

ठेव दिनांक

देय दिनांक

कालावधी

व्याज दर %

देय रक्कम  रु.

1

0785280

018510300319

प्रकाश भिकुसा वडे

10,00,000

29/5/14

13/6/14

15 दिवस

10.00

10,04,110

2

0785280

018510300320

प्रकाश भिकुसा वडे

5,00,000

29/5/14

13/6/14

15 दिवस

10.00

5,20,055

3

0785335

018510300363

प्रकाश भिकुसा वडे

1,00,000

24/7/14

8/8/14

15 दिवस

10.00

1,00,411

4

0785361

01850300386

प्रकाश भिकुसा वडे

1,00,000

27/10/14

11/11/14

15 दिवस

10.00

1,00,411

5

0785347

018510300373

प्रकाश भिकुसा वडे

2,00,000

20/8/14

4/9/14

15 दिवस

10.00

2,00,822

 

  या मंचाने निर्देश दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सर्व ठेव पावत्यांच्या मुळ अस्सल पावत्या मंचासमोर हजर केल्या. त्या पावत्यांवरुन मंचाने तक्त्यातील रकमेचे विवरण व छायांकित प्रतींची पडताळणी करुन, तक्रारकर्त्याने मागणी केलेली रक्कम योग्य आहे, अशी खात्रीकरुन घेतली.  दाखल दस्तांवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रु. 19,00,000/- ( एकोणविस लाख ) गुंतविलेले दिसून येतात व सदर ठेवी परिपक्व झाल्या असून,  तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून रु. 19,25,809/- ( एकोणविस लाख पंचविस हजार आठशे नऊ ) मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे.  तसेच सदर ठेव परिपक्व झाल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याची रक्कम व्याजासह परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक  व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व सदर प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे.

     सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……

 

                                   ::: अं ति म  आ दे श  :::

1)    गैरअर्जदार क्र. 1 व 17 यांनी  वैयक्तीक व संयुक्तपणे  तक्रारकर्त्यास रु. 19,25,809/- ( रुपये एकोणविस लाख पंचविस हजार आठशे नऊ  ) द्यावे.

2)  तक्रारकर्त्याला सहन कराव्या लागलेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी  रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी  रु. 3,000/- ( रुपये  तिन हजार )  विरुध्दपक्ष क्र. 1 ते 17 यांनी  वैयक्तीक व संयुक्तपणे  तक्रारकर्त्याला द्यावे.

3)    सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.

4)    सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या.

 

 

(श्रीमती भारती केतकर )          ( कैलास वानखडे )         (सौ.एस.एम.उंटवाले )

     सदस्‍या                            सदस्य                अध्‍यक्षा    

          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,अकोला

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.