Maharashtra

Akola

CC/15/45

Ganesh Narayan Ghavat - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multistata Co-Op.credit Society Ltd. - Opp.Party(s)

Shripad Kulkarni

07 Aug 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/45
 
1. Ganesh Narayan Ghavat
Ramkrushna nagar, Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multistata Co-Op.credit Society Ltd.
through Manager,Poonam Chambers, Navipeth, Jalgaon
Jalgaon
Maharashtra
2. Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-Op.Credit Soc.Ltd.
Branch Manager,Daryav Heights, Gandhi Chowk, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :   07.08.2015 )

आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार

           सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.

     तक्रारकर्ते हे सेवानिवृत्त कर्मचारी असून  त्यांचे विरुध्दपक्ष क्र. 2 कडे बचत खाते क्र. 101/54 आहे. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास गुंतवणुक केलेली रक्कम व्याजासह परत देवू अशी हमी दिल्यामुळे, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या सोसायटी मध्ये  खालील प्रमाणे ठेव रकमेच्या स्वरुपात ठेवल्या आहेत.

 

अ.क्र.

ठेव पावती क्र.

ठेव दिनांक

पुर्णावधी दिनांक

पुर्णावधी रक्कम रुपये

1

0785090

21.04.2014

27.10.2014 ( वेळोवेळी मुदतवाढ केलेली ठेव)

42359/-

2

733130

17.07.2013

17.07.2014

56500/-

3

733161

30.07.2013

30.07.2014

56500/-

4

0733232

05.09.2013

05.09.2014

113000/-

5

0733483

25.11.2013

23.08.2014

110419/-

6

733570

21.12.2013

21.12.2014

56500/-

 

 

 

एकूण रुपये

4,35,278/-

 

     सदरहू सर्व ठेव पावत्या निर्धारित कालावधीनुसार मुदतपुर्ण झाल्याअसून तक्रारकर्त्यास वैद्यकीय उपचाराकरिता तसेच कौटूंबिक जबाबदा-या पुर्ण करण्यासाठी रकमेची तातडीने गरज असल्यामुळे  सदर ठेव रक्कम त्वरीत परत करण्याची मागणी विरुध्दपक्षाला केली.  परंतु मुदत संपल्यानंतरही तक्रारकर्त्याला आज पर्यंत रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना दि. 30/06/2014, 02.08.2014, 02.09.2014, 29.12.2014 रोजी लेखी पत्र देवून रक्कम परत करण्याची मागणी केली,  परंतु विरुध्दपक्ष यांनी रक्कम परत न करुन सेवेत त्रुटी व हयगय केली आहे, तसेच ठेव पावत्यांची मुदत पुर्ण होवून देखील रक्कम परत करण्याचे टाळून विरुध्दपक्ष अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहे.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दि. 12/01/2015 रोजी रजि. पोच पावतीसह नोटीस पाठवून रक्कम देण्याची मागणी केली.  परंतु विरुध्दपक्षाने त्यांचे वकीलामार्फत नोटीसला उत्तर पाठवून चुकीचे आधार घेवून रक्कम देण्याचे टाळले आहे.   म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन विरुध्दपक्ष यांना  ठेवीची रक्कम रु. 4,35,278/- व्याजासह देण्याचे आदेश द्यावे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- व न्यायिक खर्चाचे रु. 5,000/- देण्याचे आदेश द्यावे.

     तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून पुरावा म्हणून तक्रारीसोबत एकुण 18 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

     सदर प्रकरणात सर्व विरुध्दपक्षाला नोटीस मंचातर्फे बजावल्यानंतर  देखील विरुध्दपक्ष प्रकरणात गैरहजर राहीले.  त्यामुळे  विरुध्दपक्षाविरुध्द  प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश  मंचाने पारीत केले.  सबब तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त व केलेला युक्तीवाद ऐकून सदर प्रकरणात अंतिम आदेश पारीत करण्यात आला.

 

     तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या “ठेव पावती” या दस्तावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविल्याचे व त्यावर विरुध्दपक्षाने  व्याज देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.  तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविली होती, परंतु सदर ठेवी परिपक्व झाल्यावरही व तक्रारकर्त्याने मागणी केल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याची रक्कम परत केली नाही.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सदर ठेव रक्कम परत करा, अशी मागणी केल्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कुठल्याच मागणीची पुर्तता  न केल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली.  तक्रारकर्त्याने गुंतवणुक केलेल्या पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारीत सदर पावत्यातील रक्कम, ठेव परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम, याचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो.

अ.क्र.

ठेव पावती क्र.

ठेव दिनांक

पुर्णावधी दिनांक

पुर्णावधी रक्कम रुपये

1

0785090

21.04.2014

27.10.2014 ( वेळोवेळी मुदतवाढ केलेली ठेव)

42359/-

2

733130

17.07.2013

17.07.2014

56500/-

3

733161

30.07.2013

30.07.2014

56500/-

4

0733232

05.09.2013

05.09.2014

113000/-

5

0733483

25.11.2013

23.08.2014

110419/-

6

733570

21.12.2013

21.12.2014

56500/-

 

 

 

एकूण रुपये

4,35,278/-

                                    

  या मंचाने निर्देश दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सर्व ठेव पावत्यांच्या मुळ अस्सल पावत्या मंचासमोर हजर केल्या. त्या पावत्यांवरुन मंचाने तक्त्यातील रकमेचे विवरण व छायांकित प्रतींची पडताळणी करुन, तक्रारकर्त्याने मागणी केलेली रक्कम योग्य आहे, अशी खात्रीकरुन घेतली.     तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून रु. 4,35,278/- ( चार लाख पस्तीस हजार दोनशे अठ्याहत्तर ) मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे.  तसेच सदर ठेव परिपक्व झाल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याची रक्कम व्याजासह परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक  व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व सदर प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे.

     सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……

 

                                   ::: अं ति म  आ दे श  :::

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.

2)    विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास रु. 4,35,278 ( रुपये चार लाख पस्तीस  हजार दोनशे अठ्याहत्तर) ही रक्कम दरसाल दरशेकडा 8 टक्के व्याज दराने दि. 04/02/2015 (प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी  रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी  रु. 3,000/-( रुपये  तिन हजार )  द्यावे.

3)    सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.

4)    सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.