ग्राहक तक्रार क्र. 08/2015
दाखल तारीख : 02/01/2015
निकाल तारीख : 08/09/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विजय पि. मधुकर तोडकरी,
वय – 32 वर्षे, धंदा – मजुरी,
रा.मारवाडी गल्ली, उस्मानाबाद,
ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप.
क्रेडिट सोसायटी लि. जळगाव,
व्दारा – चेअरमन / अध्यक्ष
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को. ऑप.
क्रेडीट सोसायटी लि.जळगांव रा. रेयमंड चौफुली,
एम.आय.डी.सी., अंजिठा रोड, जळगांव 425003.
2. कार्यकारी व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेस्ट को. ऑप.
क्रेडीट सोसायटी लि.जळगांव रा. रेयमंड चौफुली,
एम.आय.डी.सी., अंजिठा रोड, जळगांव 425003.
3. शाखा सरव्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को.ऑप.
रा. मारवाड गल्ली, महाराष्ट बँकेशेजारी,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.413501.
4. सौ. वैशाली पाटील,
वय- सज्ञान, धंदा - नौकरी,
सक्षम अधिकारी, भाईचंद हिराचंद रायसोनी लि.
मुख्य शाखा – जळगांव रा. रेयमंड चौफुली,
एम.आय.डी.सी. अंजिठा रोड, जळगाव- 425003
5. प्रल्हाद जिरी माळी,
वय – सज्ञान, धंदा नौकरी,
सक्षम अधिकारी,
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑप.
क्रेडीट सोसायटी लि.
मुख्य शाखा – जळगाव रा. वरीलप्रमाणे. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र.अध्यक्ष.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एन.एम.तोडकरी.
विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 3 तर्फे विधिज्ञ : श्री. आर. एस. कोचेटा.
विरुध्द पक्षकार क्र. 4 व 5 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) अर्जदार हे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे. विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे बचत खातेवरील रक्कम जमा आहे. सदर जमा रक्कम गरज पडल्यामुळे मिळणेची विनंती केली असता विप ने देण्यास टाळाटाळ केल्याने विप ने ती रक्कम परत न देऊन सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
तक यांच्या म्हणण्याप्रमाणे विप यांच्याकडे दैनंदिन बचत जमा योजनेत दि.02/04/2014 रोजी पर्यत बँक खाते क्र.03/223 वर रु.3,800/- मागणी केली असता विप क्र. 4 व 5 यांनी अज््रदार यांना त्यांचे संस्थेचे खाते असलेलया अॅक्सीस बँक शाखा खाते क.914020010907386 वर धनादेश क्र.066953 दिला तो ही दि.02/08/2014रोजी न वटता मिळालात्या प्रमाणे विप क्र. 4 व 5 यांच्य विरुध्द कलम 138 नुसार 2 रे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे कार्यवाही दाखल केली आहे. गरज असल्याने तक यांनासदर रक्कम मिळत नसलयाने मोठी गैरसोय होत असून विप यांनी सेवेत त्रुटी केली महणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून तक स झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- तसेच सदरील प्रकरणाचा खर्च रु.2,000/- व बचत खात्यावर / योजनेत जमा असलेली रक्कम रु.38,000/- देय व्याजासह मिळावी अशी तक ने विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत बचत पासू बुक क्र.03/223, ई. कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
सदर तक्रारीबाबत विप क्र.1, 2 व 3 यांनी हजर होऊनही आपले म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आला. विप क्र.4 यांनी नोटीस मिळूनही आपले म्हणणे दाखल केले नाही तर विप क्र.4 यांनी नोटीस स्विकारण्यास नकार दिला म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र.1 ते 3
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत योजने नुसार ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज ठेव गरज असल्याने मागणी करुनही मुदतपुर्व मिळालेली नाही म्हणून दाखल केली आहे. सदर तक्रारीबाबत तक्रारदार यांनी दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे नाव असलेले पासबुकची सत्यप्रती दाखल केलेल्या असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे आढळून येतो.
सदर ठेवींना व्याजदर दर्शविलेला नाही. तक यांनी गुंतवलेली एकूण रक्कम रु.3,800/- असून सदर पासबूकवर तक यांचे नाव असून त्यांचा फोटाही दिसत आहे तसेच फोटोवर व इतर ठिकाणी विप पतसंस्थेचा शिक्का दिसत आहे. त्याच प्रमाणे सदर पासबूकवर विप संस्थेचे नाव शिक्का तसेच क्लार्क, कॅशियर व मॅनेजर यांच्या सहया आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊन त्यांनी आपले म्हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्हणून दि.09/04/2015 रोजी विप क्र. 1 ते 3 विरुध्द नो से आदेश तर दि.30/04/2015 रोजी विप क्र. 4 व 5 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांना नोटीस व्दारे कळवूनही मंचात उपस्थित न राहण्याचे तसेच नोटीस न स्विकारण्याचे व आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच विप कडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदाराची एकूण रक्कम, नोंदी / पावती नुसार तक यांची रु.3,800/- (रुपये तीन हजार आठशे फक्त) दि.02/01/2015 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
(तक्रारीच्या) खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.