Maharashtra

Ahmednagar

CC/15/471

Surendra Bhagchand Kasaliwal - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Credit Society Ltd., Founder Chairman,Pramod Bhaichand - Opp.Party(s)

Ghule

04 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/471
( Date of Filing : 04 Nov 2015 )
 
1. Surendra Bhagchand Kasaliwal
Newasa Road,Near Radhika Hotel,Shrirampur,Tal Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Credit Society Ltd., Founder Chairman,Pramod Bhaichand Raisoni
E-2/3, 4,5 Raymond Chouraha,MIDC,Ajintha Road,Jalgaon
Jalgaon
Maharashtra
2. Branch Manager,Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Society Ltd.
Main Road,Shrirampur,Tal Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Ghule, Advocate
For the Opp. Party:
Dated : 04 Feb 2019
Final Order / Judgement

 

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार हे श्रीरामपूर येथील रहीवासी असून, त्‍यांचा नेवासा रोड, श्रीरामपूर येथे खाद्यतेल होलसेल व किरकोळ विक्रीचा व्‍यवसाय आहे, व धंद्यातून मिळणा-या रक्‍कम सामनेवाले संस्‍थेत मुदतीने ठेवलेली आहे.

3.   सामनेवाली संस्‍था ही मल्‍टीस्‍टेट को.ऑप.सोसायटी आहे व तिच्‍या महाराष्‍ट्रभर विविध ठिकाणी शाखा आहेत. सदरच्‍या शाखेमधुन ठेवीदाराकडून विविध मुदतीचे रक्‍कम ठेव म्‍हणुन ठेवून त्‍यावर व्‍याज देवून व ठेवीदाराकडून स्विकारलेल्‍या रकमा कर्जदारांना कर्ज देवून त्‍या कर्जावर व्‍याज घेवून ठेवीदाराला व्‍याज देण्‍याचा व्‍यवसाय आहे. सदर पतसंस्‍था ही दी मल्‍टीस्‍टेट को.ऑप. सोसायटी अॅक्‍ट 2002 मधील तरतुदीनुसार स्‍थापन झालेली आर्थिक व्‍यवहार करणारी पतसंस्‍था असून तिचा रजिस्‍टर नं.एम.सी.सी.एस./सी.आर./255/2007 दिनांक 31.08.2007 ने स्‍थापना झालेली पतसंस्‍था आहे.

4.   तक्रारदाराने सामनेवाले संस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेचा तपशिल ः-

अ.क्र.   

खाते नं.  

एफ.डी.नं.    

एफ.डी.रु.    

मुदत

व्‍याजदर    

मिळणारे रुपये

1.

004510301090

6107

7000

7.7.11 ते 6.7.14

13 %

9730

2.

004510302868

9905

5323

20.10.13 ते 5.12.13

10 %

5390

3.

004510500095

119

10000

3.11.12 ते 3.2.19

11.75 %

20,000

4.

004510700004

7

11500

13.2.10 ते 13.8.20

10.51 %

34500

5.

004510700005

8

11500

13.2.10 ते 13.8.20

10.51 %

34500

6.

004510700007

14

15750

2.6.11 ते 2.6.21

11.61 %

47250

7.

004513000752

607238

28600

3.7.13 ते 3.7.14

13 %

32318

8.

004513000753

607239

12600

27.6.13 ते 27.6.14

13 %

14238

9.

004513000754

607240

18036

4.6.13 ते 4.6.14

13 %

20381

10.

004513001931

609725

37800

4.11.13 ते 4.11.14

13 %

42714

11.

004513002771

609216

13560

4.3.14 ते 4.3.15

13 %

15323

12.

004513002972

609215

11300

23.11.13 ते 23.11.14

13 %

12769

वरील प्रमाणे विविध प्रकारे विविध दिवसांच्‍या अल्‍पमुदत या अंतर्गत बचत रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍या श्रीरामपूर येथील शाखेत ठेव रक्‍कम म्‍हणुन ठेवलेल्‍या होत्‍या. सदर रकमेची मुदत पुर्ण झाल्‍यानंतर सामनेवालेंनी सदरची रक्‍कम तक्रारदारास दिली नाही. उलटपक्षी दिनांक 6.8.2014 रोजी वरील सर्व रकमा एकत्र करुन दिलेल्‍या तारखेपासुन देय रकमेची अहवाल तक्रारदारास दिले. तक्रारदाराने वरील खाते क्रमांकामधील काही एफ.डी.ची मुदत संपली असता त्‍या एफ.डी.ची व्‍याजासह होणारी रकमेची वेळोवेळी मागणी केली असता तक्रारदाराच्‍या सर्व बचत ठेवीच्‍या पावत्‍या सामनेवाले यांनी जमा करुन घेतल्‍या व सर्वांची मिळून एकच पावती तयार केली. व तक्रारदाराची रक्‍कम दिलेल्‍या तारखेस मिळेल अशी बोळवण करुन तक्रारदारास घरी पाठवून दिले.

5.   तथापी तक्रारदार सदरची संस्‍था बंद झाली असे समजल्‍यावरुन तक्रारदाराने वेळोवेळी शाखेत चकरा मारल्‍याअसता, सदरचे शाखेत कुलूप असल्‍याचे निदर्शनास आले व सदरची संस्‍था बंद झाल्‍याचे शेजारचे लोकांनी सांगितले हे कळल्‍यानंतर तक्रारदारास भयंकर मानसिक त्रास झाला. म्‍हणुन प्रस्‍तुतचा अर्ज वरील सर्व ठेवी पैकी मुदत संपलेल्‍या रकमांचे व्‍याजासहीत रक्‍कम.1,52,863/- वसुलीसाठी व त्‍यापैकी ज्‍या रकमांची मुदत संपण्‍यास काही कालावधी शिल्‍लक असल्‍याकारणाने त्‍या ठेवीची मुद्दल रक्‍कम रु.48,750/- व आज मितीस होणा-या व्‍याजासहीत मिळाव्‍यात म्‍हणून प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे.

6.   सामनेवाला यांनी विश्‍वासाने ठेव म्‍हणून रक्‍कम ठेवणा-या सर्वसामान्‍य सभासदांची दिशाभुल केली, वेगवेगळया प्रकारे जाहिरातबाजी केली. प्रचार पत्रके, दिनदर्शिका, दैनंदिनी छापून वाटलया. यावर विश्‍वास ठेवून ज्‍यादा व्‍याजदराचे आमिष दाखवून रक्‍कम ठेवल्‍यास ठेवीदारांना उध्‍दवस्‍थ केले. अशा प्रकारे जाहिरातींना बळी पडून अर्जदार यांनी त्‍याची स्‍वकष्‍टाने कमविलेली रक्‍कम सामनेवाला यांचे पतसंस्‍थेकडे मुदत ठेव म्‍हणून ठेवली. मुदत संपल्‍यानंतर सामनेवाला यांचेकडून तक्रारदार आपली रक्‍कम घेणेसाठी गेला असता व मागणी केली तेंव्‍हा सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्‍कम आदा केलेली नाही. अशा प्रकारे तक्रारदारास व्‍याजासह रक्‍कम परत करण्‍याचे कबूल करुनही रक्‍कम परत केलेली नसून सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा पुरविण्‍यास कसूर केलेला आहे. म्‍हणून प्रस्‍तुतचा अर्ज या या मे.मंचास चालविण्‍याचा हक्‍क व अधिकार प्राप्‍त झालेला आहे. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या ग्राहक सेवा देणार असा संबंध निर्माण झाला आहे.

7.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा अर्ज मान्‍य करण्‍यात यावा. तक्रार अर्जातील पॅरा क्र.3 मध्‍ये उल्‍लेख केल्‍याप्रमाणे वरील सर्व ठेवी पैकी मुदत संपलेल्‍या रकमांचे व्‍याजासहीत रक्‍कम वसुलीसाठी व त्‍यापैकी ज्‍या रकमांची मुदत संपण्‍यास काही कालावधी शिल्‍लक असल्‍याकारणाने त्‍या ठेवीची मुद्दल रक्‍कम व आज मितीस होणा-या व्‍याजासहीत मिळाव्‍यात तसेच सदरची रक्‍कम संपुर्ण फिटेपावेतो वरील रकमेवर द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे व्‍याजदर देण्‍यात यावा. तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान म्‍हणुन रक्‍कम रुपये 30,000/- सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍याचा हुकूम व्‍हावा. या तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी खर्च 10,000/- सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍याचा हुकूम व्‍हावा.

8.   तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले असून निशाणी 6 ला पुढील प्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत. सामनेवाला यांचेकडे ठेवलेल्‍या एफ.डी. नं.0404022, 0606161, 0473420, 12518, 12519, 13963, 0607238, 0607239, 0607240, 0609725, 0609216, 0609215 इत्‍यादी मुदत ठेव पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत.

9.   तक्रारदार यांची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाला नं.1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाला नं.1 यास निशाणी 8 नुसार नोटीस बजावणी होऊनही ते हजर झाले नाही. म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर दिनांक 11.07.2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. तसेच सामनेवाला नं.2 बाबत स्‍टेप्‍स घेणेबाबत तक्रारदारांना संधी देऊनही त्‍यांनी स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला क्र.2 चे विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याची निशाणी 1 वर दिनांक 16.11.2018 रोजी आदेश पारीत करण्‍यात आला. 

10. तक्रारदार यांना लेखी युक्‍तीवादासाठी संधी देण्‍यात आली होती, परंतू त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही. म्‍हणून सदर प्रकरण अंतिम आदेशासाठी दिनांक 29.01.2019 रोजी ठेवण्‍यात आले.

11.  तक्रारदार यांची तक्रार, दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार क्र.1 ते 3 हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक होतात काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदार क्र.1 ते 3 यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे काय.?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

12.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोनक केले. तसेच तक्रारदाराचे वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी लेखी युक्‍तीवादास संधी देऊनही ते वारंवार गैरहजर राहीले. त्‍यामुळे सदरची तक्रार अंतिम आदेशासाठी ठेवण्‍यात आली. सदर तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराचे कथनाप्रमाणे त्‍यांची ठेवलेली ठेवी सामनेवाला क्र.1 च्‍या विविध शाखामधून ठेवीदाराकडून ठेवीवर मुदतीत रक्‍कम देय व्‍याज त्‍यावर देते. प्रस्‍तूत तक्रारीचे अवलोकने केले असता, निशाणी 1 वर सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला असून सामनेवाला क्र.2 विरुध्‍द तक्रारदारानी कुठल्‍याही प्रकारची स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला नं.2 यांचे विरुध्‍द दिनांक 30.08.2016 रोजी निशाणी 1 व मे.मंचाने आदेश करुन सामनेवाला क्र.2 विरुध्‍द तक्रार खारीज केली.

13.  तक्रारदार यांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेवी ठेवल्‍या असल्‍यामुळे व तशी कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली असल्‍यामुळे त्‍याचे अवलोकन मे.मंचाने केले. त्‍यानुसार तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

14.   मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन असे स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला क्र.1 तक्रारदारास सेवा देण्‍यात कमतरता केली आहे. सामनेवाला क्र.2 यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात आली असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द कुठलाही आदेश पारीत करण्‍यात येऊ शकत नाही.

15.  सामनेवालाने नं.1 यांनी सेवा देण्‍यात टाळाटाळ केली असल्‍यामुळे खालील ठेवीच्‍या मॅच्‍युरिटी तारखेस रक्‍कमा परत केलेल्‍या नाहीत.

अ.क्र.   

पावती क्रमांक    

एफ.डी.नं.    

एफ.डी.रु.    

मुदत

व्‍याजदर    

मिळणारे रुपये

1.

0404022

6107

7000

7.7.11 ते 6.7.14

13 %

9730

2.

0606161

9905

5323

20.10.13 ते 5.12.13

10 %

5390

3.

0473420

119

10000

3.11.12 ते 3.2.19

11.75 %

20,000

4.

12518

7

11500

13.2.10 ते 13.8.20

10.51 %

34500

5.

खाते क्र.8

पावती क्र.12519

11500

13.2.10 ते 13.8.20

10.51 %

34500

6.

खाते क्र.14

पावती क्र.13963

15750

2.6.11 ते 2.6.21

11.61 %

47250

7.

खाते क्र.

004513000752

पावती क्र.

 

0607238

28600

3.7.14 ते 3.7.15

13 %

36543

8.

खाते क्र.

 

004513000753

पावती क्र.

 

0607239

12600

27.6.14 ते 27.6.15

14 %

16231

9.

खाते क्र.

 

004513000754

पावती क्र.

0607240

18036

4.6.13 ते 4.6.14

14 %

23234

10.

खाते क्र.

 

004513001931

पावती क्र.

 

0609725

37800

4.11.14 ते 4.11.15

14 %

48694

11.

खाते क्र.

004513002971

पावती क्र.

 

0609216

13560

4.3.14 ते 4.3.15

13 %

15323

12.

खाते क्र.

004513002972

पावती क्र.

 

0609215

11300

23.11.14 ते 23.11.15

14 %

14557

     तक्रारदाराने दाखल केलेल्‍या सर्व मुदत ठेवी झेरॉक्‍स पावत्‍यांचे अवलोकन केले त्‍यानुसार, खाते नं.004510301090 वरील रक्‍कम दिनांक 6.7.2014 रोजी रक्‍कम रुपये 9730/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम फिटेपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004510302868 वरील रक्‍कम दिनांक 5.12.2013 रोजी रक्‍कम रुपये 5,390/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम फिटेपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004510500095 वरील रक्‍कम दिनांक 3.2.2019 रोजी रक्‍कम रुपये 20,000/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम फिटेपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.11.75 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004510700004 वरील रक्‍कम दिनांक 13.8.2020 रोजी रक्‍कम रुपये 34,500/- मॅच्‍युरीटी होणार आहे. त्‍यावरील आज निकाल तारीख 04.02.2019 पावेतो व्‍याज तक्रारदार यास द.सा.द.शे.10.51 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

पावती क्रमांक 12519 वरील रक्‍कम दिनांक 13.8.2020 रोजी रक्‍कम रुपये 34,500/- मॅच्‍युरीटी होणार आहे. त्‍यावरील आज निकाल तारीख 04.2.2019 पावेतो व्‍याज तक्रारदार यास द.सा.द.शे.10.51 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

पावती क्र.13963 वरील रक्‍कम दिनांक 2.6.2021 रोजी रक्‍कम रुपये 47,250/- मॅच्‍युरीटी होणार आहे. त्‍यावरील आज निकाल तारीख 4.2.2019 पावेतो व्‍याज तक्रारदार यास द.सा.द.शे.11.61 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513000752 वरील रक्‍कम दिनांक 3.7.2015 रोजी रक्‍कम रुपये 36,843/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513000753 वरील रक्‍कम दिनांक 27.6.2015 रोजी रक्‍कम रुपये 16,231/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513000754 वरील रक्‍कम दिनांक 4.6.2015 रोजी रक्‍कम रुपये 23,234/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513001931 वरील रक्‍कम दिनांक 4.11.2015 रोजी रक्‍कम रुपये 48,694/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513002971 वरील रक्‍कम दिनांक 4.3.2015 रोजी रक्‍कम रुपये 15,323/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम फिटेपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

खाते नं.004513002972 वरील रक्‍कम दिनांक 23.11.2015 रोजी रक्‍कम रुपये 14,557/- मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम फिटेपावेतो तक्रारदार यास द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह देण्‍यात यावी.

वर नमुद कोष्‍टकात पावती क्रमांक, एफ.डी.क्र. नमुद केलेले आहेत.

तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी तक्रारदारास नुकसान म्‍हणून रक्‍कम रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास द्यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

16.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004510301090 वरील रक्‍कम रु.9,730/- (रक्‍कम रु.नऊ हजार सातशे तीस फक्‍त) द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह दिनांक 6.7.2014 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

3.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004510302868 वरील रक्‍कम रु.5,390/- (रक्‍कम रु.पाच हजार तीनशे नव्‍वद फक्‍त) द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजासह दिनांक 5.12.2013 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

4.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004510500095 वरील रक्‍कम रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) द.सा.द.शे.11.75 टक्‍के व्‍याजासह आज निकाल तारीख 04.02.2019 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

5.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004510700004 वरील रक्‍कम रु.34,500/- (रक्‍कम रु.चौतीस हजार पाचशे फक्‍त) द.सा.द.शे.10.51 टक्‍के व्‍याजासह आज निकाल तारीख 04.02.2019 पावेतो रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

6.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे पावती नंबर 12519 वरील रक्‍कम रु.34,500/- (रक्‍कम रु.चौतीस हजार पाचशे फक्‍त) द.सा.द.शे.10.51 टक्‍के व्‍याजासह आज निकाल तारीख 04.02.2019 पावेतो रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

7.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे पावती नंबर 13963 वरील रक्‍कम रु.47,250/- (रक्‍कम रु.सत्‍तेचाळीस हजार दोनशे पन्‍नास फक्‍त) द.सा.द.शे.11.61 टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल तारीख 5.11.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

8.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513000752 वरील रक्‍कम रु.36,843/- (रक्‍कम रु.छत्‍तीसहजार आठशे त्रेचाळी फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 3.7.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

9.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513000753 वरील रक्‍कम रु.16,231/- (रक्‍कम रु.सोळा हजार दोनशे एकतीस फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 27.6.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

10. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513000754 वरील रक्‍कम रु.23,234/- (रक्‍कम रु.तेवीस हजार दोनशे चौतीस फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 4.6.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

11. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513001931 वरील रक्‍कम रु.48,694/- (रक्‍कम रु.अठ्ठेचाळीस हजार सहाशे चव-यान्‍नव फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 4.11.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

12. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513002971 वरील रक्‍कम रु.15,323/- (रक्‍कम रु.पंधरा हजार तीनशे तेवीस फक्‍त) द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह दिनांक 4.3.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

13. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांचे खाते नंबर 004513002972 वरील रक्‍कम रु.14,557/- (रक्‍कम रु.चौदा हजार पाचशे सत्‍तावन्‍न फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 23.11.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार यांना द्यावे.

14. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारदार यांना द्यावे.

15. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

16.  सामनेवाला नं.2 चे विरुध्‍द सदर तक्रार खारीज करण्‍यात येते.

17. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निशुल्‍क देण्‍यात यावी.

18. तक्रारदारांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.