Maharashtra

Ahmednagar

CC/15/470

Shreya Rajesh Kasaliwal - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Credit Society Ltd., Founder Chairman,Pramod Bhaichand - Opp.Party(s)

Ghule

04 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/470
( Date of Filing : 04 Nov 2015 )
 
1. Shreya Rajesh Kasaliwal
Newasa Road,Near Radhika Hotel,Shrirampur,Tal Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Credit Society Ltd., Founder Chairman,Pramod Bhaichand Raisoni
E-2/3, 4,5 Raymond Chouraha,MIDC,Ajintha Road,Jalgaon
Jalgaon
Maharashtra
2. Branch Manager,Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op.Society Ltd.
Main Road,Shrirampur,Tal Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Ghule, Advocate
For the Opp. Party:
Dated : 04 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार क्र.1 ते 3 यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदार नं.1 ते 3 यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-    

तक्रारदार हे अज्ञानाचे पालनकर्ते आहेत व तक्रारदार हे श्रीरामपूर येथील रहीवासी असून, त्‍यांचा नेवासा रोड, श्रीरामपूर येथे खाद्यतेल होलसेल व किरकोळ विक्रीचा व्‍यवसाय आहे, व धंद्यातून मिळणा-या रक्‍कम सामनेवाले संस्‍थेत मुदतीने ठेवलेली आहे. अज्ञानाचे भविष्‍याचा विचार करुन तक्रारदाराने तिचे नावावरती सामनेवाले यांच्‍या श्रीरामपूर येथील शाखेत संजीवनी ठेव योजना अंतर्गत 365 दिवसाचे मुदतीसाठी द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे रक्‍कम ठेवलेली आहे.

3.   सामनेवाली संस्‍था ही मल्‍टीस्‍टेट को.ऑप.सोसायटी आहे व तिच्‍या महाराष्‍ट्रभर विविध ठिकाणी शाखा आहेत. सदरच्‍या शाखेमधुन ठेवीदाराकडून विविध मुदतीचे रक्‍कम ठेव म्‍हणुन ठेवून त्‍यावर व्‍याज देवून व ठेवीदाराकडून स्विकारलेल्‍या रकमा कर्जदारांना कर्ज देवून त्‍या कर्जावर व्‍याज घेवून ठेवीदाराला व्‍याज देण्‍याचा व्‍यवसाय आहे.

4.   तक्रारदाराने सामनेवाले संस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेचा तपशिल ः-

अ.नं.   

खातेनंबर  

पावती रक्‍कम

मुदत

व्‍याजदर

मिळणारी रक्‍कम

1.

004513

 

001109 (श्रेया)

10,170

24.8.13 ते 24.8.14

13%

11,492

2.

004513

 

001110 (श्रृती)

7910

29.8.13 ते 29.8.14

13%

8938

3.

004513

 

003194(सुरेंद्र)

9730

6.7.14 ते 6.7.15

14%

11,092

वरील प्रमाणे विविध प्रकारे विविध दिवसांच्‍या संजीवनी ठेव योजना या अंतर्गत 365 दिवस 13 व 14 टक्‍केप्रमाणे बचत रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍या श्रीरामपूर येथील शाखेत ठेव रक्‍कम म्‍हणुन ठेवलेल्‍या होत्‍या. सदर रकमेची मुदत दि.24.08.2014, 29.08.2014 व 06.07.2015 रोजी पुर्ण झाल्‍यानंतर सामनेवालेंनी सदरची रक्‍कम तक्रारदारास दिली नाही. तक्रारदाराची रक्‍कम दिलेल्‍या तारखेस मिळेल अशी बोळवण करुन तक्रारदारास घरी पाठवून दिले.

5.   तथापी तक्रारदार सदरची संस्‍था बंद झाली असे समजल्‍यावरुन तक्रारदाराने वेळोवेळी शाखेत चकरा मारल्‍याअसता, सदरचे शाखेत कुलूप असल्‍याचे निदर्शनास आले व सदरची संस्‍था बंद झाल्‍याचे शेजारचे लोकांनी सांगितले म्‍हणुन प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज व्‍याजासहीत रक्‍कम रु.31,522/- वसुलीसाठी या मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे.

6.   सामनेवाला संस्‍था ही ठेवीदाराकडून ठेवीची रक्‍कम घेवून सदरची रक्‍कम कर्जदारास कर्ज रुपाने ठेवीच्‍या रकमेपेक्षा ज्‍यादा रकमेचे व्‍याज घेण्‍याचा व्‍यवसाय आहे व त्‍या व्‍याजाच्‍या बदल्‍यात ठेवीदारास ठराविक रक्‍कम व्‍याज देते म्‍हणुन ठेवीदार व सामनेवाले यांच्‍या ग्राहक व मालक असे नाते निर्माण झालेले आहे. सामनेवाली संस्‍था ही व्‍याजाचे मोबदल्‍यात सेवा देते म्‍हणुन तक्रारदारास सामनेवाले यांनी पुर्णपणे सेवा देण्‍यास कसुर केलेले आहे. म्‍हणून प्रस्‍तूतचा अर्ज या मे.मंचास चालविण्‍याचा हक्‍क व अधिकार प्राप्‍त झालेला आहे.

7.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा अर्ज मान्‍य करण्‍यात यावा. तक्रार अर्जातील पॅरा क्र.3 मध्‍ये उल्‍लेख केल्‍याप्रमाणे रकमेवर तक्‍त्‍यातील व्‍याजदराप्रमाणे संपुर्ण रक्‍कम देण्‍याचा सामनेवाले यांना तक्रारदारास देवविण्‍याचा हुकूम व्‍हावा. तसेच सदरची रक्‍कम संपुर्ण फिटेपावेतो वरील रकमेवर द.सा.द.शे.13 टक्‍केप्रमाणे दिनांक 24.8.2014 ते 27.10.2015 मध्‍ये मुळ रक्‍कम 11,492/- व त्‍यावरील व्‍याज 1,735/- अशी एकुण रक्‍कम रुपये 13,227/- संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज देण्‍यात यावा. तक्रार अर्जातील पॅरा क्र.3 मध्‍ये उल्‍लेख केल्‍याप्रमाणे रकमेवर तक्‍त्‍यातील व्‍याजदराप्रमाणे संपुर्ण रक्‍कम देण्‍याचा सामनेवाले यांना तक्रारदारास देवविण्‍याचा हुकूम व्‍हावा. तसेच सदरची रक्‍कम संपुर्ण फिटेपावेतो वरील रकमेवर द.सा.द.शे.13 टक्‍केप्रमाणे दिनांक 29.8.2013 ते 29.08.2014 मध्‍ये मुळ रक्‍कम 8,938/- व त्‍यावरील व्‍याज 1,337/- अशी एकुण रक्‍कम रुपये 10,275/- संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज देण्‍यात यावा. तक्रार अर्जातील पॅरा क्र.3 मध्‍ये उल्‍लेख केल्‍याप्रमाणे रकमेवर तक्‍त्‍यातील व्‍याज दराप्रमाणे संपुर्ण रक्‍कम देण्‍याचा सामनेवाले यांना तक्रारदारास देवविण्‍याचा हुकूम व्‍हावा. तसेच सदरची रक्‍कम संपुर्ण फिटेपावेतो वरील रकमेवर द.सा.द.शे.14 टक्‍केप्रमाणे दिनांक 6.7.2014 ते 24.10.2015 मध्‍ये मुळ रक्‍कम 9730/- व त्‍यावरील व्‍याज 435/- अशी एकुण रक्‍कम रुपये 11,528/- संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज देण्‍यात यावा. तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान म्‍हणुन रक्‍कम रुपये 40,000/- सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍याचा हुकूम व्‍हावा. या तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी खर्च 10,000/- सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍याचा हुकूम व्‍हावा.

8.   तक्रारदारांनी तक्रारीसोबत अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले असून निशाणी 6 ला सामनेवाला यांचेकडे तक्रारदार क्र.1 यांची ठेव पावती क्रमांक 004513001109 दिनांक 24.8.2013, तक्रारदार नं.2 यांनी सामनेवाला यांचेकडे मुदत ठेव पावती क्र.004513003194 दिनांक 6.7.2015, व तक्रारदार क्र.2 व 3 यांनी सामनेवाला यांचेकडे मुदत ठेव पावती क्र.004513001110 दिनांक 29.08.2013   इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

9.   तक्रारदार यांची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाला नं.1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाला नं.1 यास निशाणी 8 नुसार नोटीस बजावणी होऊनही ते हजर झाले नाही. म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर दिनांक 11.07.2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. तसेच सामनेवाला नं.2 बाबत स्‍टेप्‍स घेणेबाबत तक्रारदारांना संधी देऊनही त्‍यांनी स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला क्र.2 चे विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याची निशाणी 1 वर दिनांक 16.11.2018 रोजी आदेश पारीत करण्‍यात आला. 

10. तक्रारदार यांना लेखी युक्‍तीवादासाठी संधी देण्‍यात आली होती, परंतू त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही. म्‍हणून सदर प्रकरण अंतिम आदेशासाठी दिनांक 29.01.2019 रोजी ठेवण्‍यात आले.

11.  तक्रारदार यांची तक्रार, दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार क्र.1 ते 3 हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक होतात काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार क्र.1 ते 3 यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे काय.?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

12.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार क्र.1 ते 3 यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोनक केले. तसेच तक्रारदाराचे वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांना लेखी युक्‍तीवादास संधी देऊनही ते वारंवार गैरहजर राहीले. त्‍यामुळे सदरची तक्रार अंतिम आदेशासाठी ठेवण्‍यात आली. सदर तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराचे कथनाप्रमाणे त्‍यांची ठेवलेली ठेवी सामनेवाला क्र.1 च्‍या विविध शाखामधून ठेवीदाराकडून ठेवीवर मुदतीत रक्‍कम देय व्‍याज त्‍यावर देते. प्रस्‍तूत तक्रारीचे अवलोकने केले असता, निशाणी 1 वर सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला असून सामनेवाला क्र.2 विरुध्‍द तक्रारदारानी कुठल्‍याही प्रकारची स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला नं.2 यांचे विरुध्‍द दिनांक 08.10.2015 रोजी निशाणी 1 व मे.मंचाने आदेश करुन सामनेवाला क्र.2 विरुध्‍द तक्रार खारीज केली.

13.  तक्रारदार यांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेवी ठेवल्‍या असल्‍यामुळे व तशी कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली असल्‍यामुळे त्‍याचे अवलोकन मे.मंचाने केले. त्‍यानुसार तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

14.   मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन असे स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला क्र.1 तक्रारदारास सेवा देण्‍यात कमतरता केली आहे. सामनेवाला क्र.2 यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात आली असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द कुठलाही आदेश पारीत करण्‍यात येऊ शकत नाही.

15.  सामनेवालाने नं.1 यांनी सेवा देण्‍यात टाळाटाळ केली असल्‍यामुळे खालील ठेवीच्‍या मॅच्‍युरिटी तारखेस रक्‍कमा परत केले नाहीत.

अ.नं.   

खातेनंबर  

पावती रक्‍कम

मुदत

व्‍याजदर

मिळणारी रक्‍कम

1.

004513

 

001109 (श्रेया)

10,170

24.8.13 ते 24.8.14

13%

11,492

2.

004513

 

001110 (श्रृती)

7910

29.8.13 ते 29.8.14

13%

8938

3.

004513

 

003194(सुरेंद्र)

9730

6.7.14 ते 6.7.15

14%

11,092

16.       तक्रारदाराने दाखल केलेल्‍या सर्व मुदत ठेवीच्‍या झेरॉक्‍स पावत्‍याचे अवलोकन केले त्‍यानुसार खाते नं.004513001109 दिनांक 24.8.2015 रोजी मुळ रक्‍कम रुपये 13,101/- ही रक्‍कम मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो संबंधीत तक्रारदार यास देण्‍यात यावी. खाते नंबर 004513001110 रक्‍कम रुपये 29.08.2015 नुसार 10,189/- ही रक्‍कम मॅच्‍युरीटी झालेली आहे. त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो संबधीत तक्रारदार यास द.सा.दशे.13 टक्‍के प्रमाणे संपुर्ण रक्‍कम अदायकी पावेतो व्‍याजासह तक्रारदारास द्यावे. तसेच खाते नंबर 004513003194 रक्‍कम रुपये 6.7.15 नुसार 11,092/- ही रक्‍कम मॅच्‍युरीटी झालेली आहे त्‍यावरील व्‍याज पुर्ण रक्‍कम अदायकीपावेतो संबंधीत तक्रारदार यास देण्‍यात यावे. या वर द.सा.दशे.13 टक्‍के संपुर्ण रक्‍कम फिटे पावेतो व्‍याजासह तक्रारदारास द्यावे. तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी तक्रारदारांना नुकसान म्‍हणून रक्‍कम रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास द्यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

17.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदार क्र.1 ते 3 यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार क्र.1 यांचे खाते नंबर 004513001109 करीता तक्रारदार क्र.1 चे अ.पा.क. म्‍हणून तक्रारदार नं.3 यांना वरील रक्‍कम रु.13,101/- (रक्‍कम रु.तेरा हजार एकशे एक फक्‍त) द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह दिनांक 24.08.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार क्र.1 करीता तक्रारदार नं.3 ला द्यावे.

3.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांचे खाते नंबर 004513001110 करीता तक्रारदार क्र.2 चे अ.पा.क. म्‍हणून तक्रारदार नं.3 यांना वरील रक्‍कम रु.10,189/- (रक्‍कम रु.दहा हजार एकशे एकोणनव्‍वद फक्‍त) द.सा.द.शे.13 टक्‍के व्‍याजासह दिनांक 29.08.2014 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार क्र.2 करीता तक्रारदार नं.3 ला द्यावे.

4.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार क्र.3 यांचे खाते नंबर 004513003194 वरील रक्‍कम रु.11,092/- (रक्‍कम रु.अकरा हजार बॅन्‍नव फक्‍त) द.सा.द.शे.14 टक्‍के व्‍याजासह दिनांक 6.7.2015 पासून रक्‍कम अदायकीपावेतो तक्रारदार क्र.3 यांना द्यावे.

5.   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार नं.1 ते 3 यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारदार क्र.1 ते 3 यांना द्यावे.

6. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

7.   सामनेवाला नं.2 चे विरुध्‍द सदर तक्रार खारीज करण्‍यात आली असल्‍यामुळे सामनेवाला नं.2 विरुध्‍द काही आदेश नाहीत.

8.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निशुल्‍क देण्‍यात यावी.

9.   तक्रारदारांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.