Maharashtra

Nagpur

CC/237/2017

Smt. Sudha Vijay Kumar Jain - Complainant(s)

Versus

Bhaichand Hirachand Raisoni Multi State Co-Op. Credit Soc.Ltd. (M.I.D.C.), Through its Liquidator - Opp.Party(s)

Adv. Amal Rohilla

09 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/237/2017
( Date of Filing : 01 Jun 2017 )
 
1. Smt. Sudha Vijay Kumar Jain
R/o. Flat No. 304, Forest Employees Colony, Near Centre Point School, Katol Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Anuj Vijaykumar Jain
R/o. flat no. 304, Forest Employees Colony, Near Centre Point School, Katol Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhaichand Hirachand Raisoni Multi State Co-Op. Credit Soc.Ltd. (M.I.D.C.), Through its Liquidator
Corporate Office- Poonam Chembers, Bank Street, Navi Peth, Jalgaon 425001 Now at Near Raymond Factory, Jalgaon
Jalgaon
Maharashtra
2. Bhaichand Hirachand Raisoni Multi State Co-Op. Credit Soc.Ltd.
Shraddha House, Shree Mohini Complex, Kingsway, Opp. Kasturchand Park, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. Amal Rohilla, Advocate for the Complainant 1
 
Dated : 09 May 2022
Final Order / Judgement

आदेश

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12  नुसार दाखल केलेली आहे.
  2. वि.प.ही वित्तीय संस्था असुन ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारुन व्याजासह मुदत ठेवतील रक्कमा परत करण्‍याचा व्यवसाय करते. तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 यांनी वि.प.चे संजीवनी ठेव योजना आणि सूवर्णलक्ष्‍मी मासिक प्राप्त योजने अंतर्गत खालीलप्रमाणे रक्कम गूंतविली होती.
  3. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12  नुसार दाखल केलेली आहे.
  4. वि.प.ही वित्तीय संस्था असुन ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारुन व्याजासह मुदत ठेवतील रक्कमा परत करण्‍याचा व्यवसाय करते. तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 यांनी वि.प.चे संजीवनी ठेव योजना आणि सूवर्णलक्ष्‍मी मासिक प्राप्त योजने अंतर्गत खालीलप्रमाणे रक्कम गूंतविली होती.

तक्रारकर्ता क्रं.1 यांनी सूवर्णलक्ष्‍मी मासिक प्राप्त योजनेमध्‍ये गूंतविलेली रक्कम.

अ.क्रं.

पावती क्रं.

खाते क्रं.

मुदत ठेव रक्कम

मुदत ठेव दिनांक

मासिक व्याज प्रतिमाह

परिपक्वता दिनांक

व्याजदर.

1

996780

क्रं0237112500871

508000/-

26.3.2015

4952

26.3.2018

11.65 टक्के

तक्रारकर्ता क्रं.2 यांनी संजिवनी ठेव योजने मध्‍ये गूंतविलेली रक्कम.

 

अ.क्रं.

पावती क्रं.

खाते क्रं.

मुदत ठेव रक्कम

मुदत ठेव दिनांक

परिपक्वता रक्कम

परिपक्वता दिनांक

व्याजदर.

1

0314925

क्रं016513000184

1,80,000/-

15.2.2014

2,03,400/-

15.2.2015

13 टक्के

  1. वि.प.ने तक्रारकर्ता क्रं.1 ला सूवर्णलक्ष्‍मी मासिक योजनेअंतर्गत दरमहा मासिक रक्कम रुपये 4932/-चे तक्रारकर्ता क्रं. 1 च्या  नावाचे एक्सीस बॅंक जळगाव या बॅंकेचे  धनादेश क्रं.344957 ते 344961 असे पाच धनादेश निर्गमित केले. तक्रारदाराने धनादेश क्रं. 344957 दिनांक 20.10.2015 वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅक,लि.नागपूर दिनांक 26.10.2015 वटविण्‍याकरिता सादर केला असता सदर धनादेश खाते ब्लॉक या कारणास्तव अनादरित झाला. तक्रारदाराने वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅक,लि.नागपूर या शाखेत चौकशी केली असता बॅंकेने वि.प.चे खाते बंद करण्‍यात आले असल्याचे सांगीतले व इतर धनादेश बॅंकेत जमा न करण्‍याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता क्रं.2 ने वि.प.बॅंकेचे मुदत ठेवी मधे ठेवलेली रक्कम रुपये 2,03,400/- ची परिपक्वतेनंतर मागणी केली असता वि.प.ने तक्रारदाराला रक्कम दिली नाही. तक्रारदाराने वि.प.चे सोसायटीला अनेकदा भेट देऊन मुदत ठेव रक्कमेची मागणी केली. वि.प. ने फक्त रक्कम परत करण्‍याचे आश्‍वासीत केले परंतु रक्कम परत केली नाही करिता तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 14.5.2016 ला वकीलामार्फत कायेदशिर नोटीस पाठविली परंतु वि.प.ने तक्रारीची दखल घेतली नाही म्हणुन तकारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन  वि.प.ने तक्रारदाराला मुदत ठेवी मध्‍ये ठेवलेली रक्कम रुपये 2,03,400/- मासिक ठेव योजनेअंतर्गत ठेवलेली रक्कम 5,08,000/- व्याजासह प्रत्यक्ष रक्कम अदा होइपर्यत द्यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्च मिळावा अशी विनंती केली.
  1. वि.प.क्रं.1 व 2  यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्त होऊन वि.प. तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. तसेच वि.प.क्रं.3 व 4 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द दिनांक ८.१२.२०२१ रोजी तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  1. वि.प.1 व 2 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की,वि.प.सोसायटी ही मेल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी असुन तिचे मुख्‍यालय जळगाव येथे आहे. सदर सोसायटी अवसायनात काढलेली असल्याने वि.प.सोसायटीच्या सर्व शाखा बंद करुन त्यांचे सर्व रेकॉर्ड जळगाव येथे मुख्‍यालयात जमा करणे सुरु आहे. त्यामूळे सोसायटीचा संपूर्ण कारभार जळगाव येंथील मुख्‍यालयातून होतो.
  2. तक्रारदाराने ठेव रक्कम वि.प. संस्थेच्रया तत्कालीन संचालकाकडे बघुन ठेवलेल्या असुन सदरील संचालकांना या तक्रार अर्जाचे कामी पक्षकार केलेले नाही. तसेच तक्रारदारांनी ठेव रक्कम ठेवतेवेळी वि.प. संस्थेवर अवसायक नियुक्त झालेले नव्हते त्यामूळे सदरील तक्रार प्रथमदर्शनी रद्द होण्‍यास पात्र आहे.
  3. भाईचंद हिराचंद रायसोनी मेल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ही क्रेडीट सोसायटी लि.ही मेल्टीस्टेट सोसायटी आहे. मेल्टीस्टेअ को-आपरेटिव्ह सोसायटीज अॅक्टचे कलम 84 चे तरतुदीनूसार सदरील वाद लवादा मार्फत सोडविण्‍यात येतात. तक्रारदाराच्या ठेव पावतीचे मागे मुदती ठेवी नियम क्रं.4 मध्‍ये स्पष्‍टपणे नमुद करण्‍यात आलेले आहे की मुदत ठेव पावती संबंधीत कोणतेही वाद निर्माण झाल्यास संस्थेच्या लवादाकडे निर्णय होईल. सदरील नियम तक्रारदारांनी मान्य केले आहेत. सदर संस्थेवर अशा व अन्य प्रकारचे वाद सोडविण्‍यासाठी नुकतीच लवादाची नेमणूक शासनाने केलेली आहे. त्यामूळे सदरील तक्रार या आयोगासमक्ष चालू शकत नाही व तक्रारकर्ता हे वि.प.चे ग्राहक नाही.
  4. वि.प.सोसायटी ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी असुन संचालकाच्या कार्यपध्‍दतीमूळे आर्थिक डबघाईस आल्यामूळे भारत सरकार यांचे दिनांक 27.10.2015 चे आदेशानुसार संस्थेवर अवसायकाची नेमणूक करण्‍यात आलेली आहे त्यामूळे सोसायटीज् अॅक्ट 2002 कलम 117(2) नुसार संस्थेविरुध्‍द व अवसायकाविरुध्‍द कोणतीही कायदेशीर कारवाई मा. सेन्ट्रल रजिस्ट्रार यांचे पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही.
  5. सदर संस्था अवसानात काढण्‍यात आलेली आहे त्यामूळे मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट 2002 चे कलम 90 चे तुरतुदीनुसार सदर संस्थेचे धनकोचा प्राधान्य क्रम ठरविणे आवश्‍यक असुन सदरील ठरविण्‍यात आलेल्या प्राधान्य क्रमानुसार रक्कमा देणे आवश्‍यक आहे याबाबत स्पष्‍टपणे कायद्यात तरतुद करण्‍यात आलेली आहे. सदरील प्राधान्य क्रमाप्रमाणे सदर संस्थेचे संपूर्ण लेखा परिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठरविण्‍यात येते. संस्थचे कर्जदाराकडुन कर्ज वसूलिची कार्यवाही सूरु करण्‍यात आलेली आहे. सदर कर्ज वसूली जशी जशी होईल तशी प्राधान्य क्रमानुसार प्रमाणीत विभागणी करुन धनकोचा देणे रक्कमा अदा करण्‍यात येतील. तक्रारदाराची तक्रार रद्द न केल्यास वि.प. संस्थेच्या, संस्थेच्या हजारो ठेवीदाराचे व सभासदांचे कधीही भरुन निघणार नाही असे अपरिमीत नुकसान होईल. तसेच कायद्याने विहीत केलेल्या पध्‍दतीनुसार प्राधान्यक्रम व प्रमाणीत विभागणी होऊ शकणार नाही याउलट तक्रार रद्द केल्यास तक्रारदाराचे काहीही नुकसान होणार नाही. कारण तक्रारदारानी नमुद केलेली ठेव रक्कमेची लेखी परिक्षणानंतर पडताळणी होऊन प्राधान्यक्रमाने व प्रमाणीत विभागणीने तक्रारदारास रक्कम अदा होणार नाही. वि.प. यांनी कधीही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही त्यामूळे तक्रारदाराची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी.  
  6. उभयपक्षाने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्तीवाद बघता, तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

            मुद्दे                                                           उत्तरे

  1. तक्रारकर्ता क्रं.1 व 2 हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?             नाही
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी पध्‍दतीचा

अवलंब केला आहे काय ?                                              नाही

  1. काय आदेश                                                                     अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्ता क्रं.1 व 2 यांनी वि.प.चे सुवर्णलक्ष्‍मी मासिक प्राप्त योजना व संजिवनी ठेव योजने अंतर्गत पावती क्रं.996780 व 0314925 नुसार अनुक्रमे रुपये 5,08,000/- व रुपये 1,80,000/- द.सा.द.शे.11.65टक्के व 13 टक्के व्याजदराने अनुक्रमे दिनांक 26.3.2015 व दिनांक 15.2.2014 ला वि.प.कडे गुतंविल्याचे नि.क्रं.2 वरील दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते यावरुन वि.प.क्रं.1 व 2 चे ग्राहक आहे हे सिध्‍द होते
  1. वि.प.सोसायटी ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी असुन संचालकाच्या कार्यपध्‍दतीमूळे आर्थिक डबघाईस आल्यामूळे भारत सरकार यांचे दिनांक 27.10.2015 चे आदेशानुसार संस्थेवर अवसायकाची नेमणूक करण्‍यात आलेली आहे त्यामूळे सोसायटीज् अॅक्ट 2002 कलम 117(2) नुसार संस्थेविरुध्‍द व अवसायकाविरुध्‍द कोणतीही कायदेशीर कारवाई मा. सेन्ट्रल रजिस्ट्रार यांचे पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. सदर प्रकरणी तक्रारदाराने मा. सेन्ट्रल रजिस्ट्रार यांची परवानगी ग्राहक मंचासमक्ष तक्रार दाखल करण्‍यापूर्वी घेतली असल्याबाबत कोणतेही दस्तऐवज अभिलेखावर दाखल केले नाही त्यामूळे तक्रारदाराने मा. आयोगासमोर दाखल केलेली सदरची तक्रार अपरिपक्व असल्याकारणास्तव खारीज करण्‍यात येत आहे. वि.प.ने सदर प्रकरणात गुजरात शेडयुलकास्ट डेव्हलपमेंट कॉरपोरेशन वि.महिना नागरी को-आ.बॅंक. सीसी-277,1998 या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. तक्रारदाराने सेन्ट्रल रजिस्ट्रार यांचे पूर्वपरवानगीसह तक्रार या आयोगासमक्ष दाखल केल्यास या आयोगास तक्रारदाराची तक्रार विचारात घेता येईल.

 सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते
  2. तक्रारीचा खर्च उभयपक्षकारांनी आपआपला सोसावा.
  3. तकारकर्ते मा. सेन्ट्रल रजिस्ट्रार यांचे पूर्वपरवानगी घेऊन सदर प्रकरण या आयोगासमक्ष परत दाखल करु शकतात.  
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.