नि.नं.३०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १८९५/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – १२/०६/२००९
तक्रार दाखल तारीखः – २४/०६/२००९
निकाल तारीखः - ०५/०१/२०१२
----------------------------------------------
श्री भास्कर प्रकाश जमदाडे
वय वर्षे २५, धंदा – शेती
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली .... तक्रारदार
विरुध्द
अ. भाग्यश्री ग्रामीण बि.शेती सह. पतसंस्था
मर्या. मणेराजुरी, ता.तासगांव
संचालक –
१. श्री शिवाजी शंकर जमदाडे – चेअरमन
रा.रामलिंगनगर, मणेराजुरी ता.तासगांव
२. श्री शशिकांत स्वामी, सचिव
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
३. श्री सदाशिव पांडुरंग कलढोणे, व्हा.चेअरमन
रा.आप्पा गुणेंचा मळा, मणेराजुरी,
ता.तासगांव जि. सांगली
४. श्री उमेश हरीभाऊ जमदाडे,
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
५. श्री प्रकाश शिवाजी पवार
रा.गुजरमळा, मणेराजुरी,
ता.तासगांव जि. सांगली
६. श्री अशोक गजानन पैलवान
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
७. श्री शहाजी श्रीपती चव्हाण
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
८. श्री सुरेश गोविंद करगणे
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
७. श्री नामदेव महादेव शिंदे
रा.शिंदे वस्ती (धुमाळ मळा) मणेराजुरी,
ता.तासगांव जि. सांगली
८. सौ ललीता प्रभाकर कुचकर
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
९. सौ जयश्री सुभाष कांबळे
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
१०. मन्सुर फरदिन अत्तार
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
११. श्री धनाजी संभाजी लांडगे
रा.लांडगे वस्ती, आप्पा गुणेचा मळा,
मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री एस.पी.यादव
जाबदार क्र.अ व २ तर्फे –+ìb÷. श्री व्ही.ए.पाटील
जाबदार क्र. १ व ३ ते ११ – नो से
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार भाग्यश्री ग्रामीण बि. शेती सहकारी पतसंस्था मर्या.मणेराजुरी ता.तासगांव (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे दामदुप्पट ठेवीअन्वये रक्कम गुंतविलेली होती. सदर ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे दाखल केली आहेत.
२. जाबदार यांनी नि.२४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये अर्जदार यांनी त्यांचे ठेवपावतीवर रक्कम रु.१६,०००/- चे ठेवतारण कर्ज दि.६/१/२००४ रोजी घेतलेले आहे. तसेच दि.२१/९/२००५ रोजी रक्कम रु.५,०००/- चे कर्ज घेतले आहे. सदर कर्ज व त्यावरील व्याज अद्याप थकीत आहे. सदर कर्जाची रक्कम भरुन उरलेली देय रक्कम देण्यास जाबदार हे कधीही तयार होते व आहेत. अर्जदारांनी वस्तुस्थिती लपवून सदरचा अर्ज दाखल केला आहे. जाबदार क्र.४ यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे, त्यामुळे त्यांचे नाव कमी करणेत यावे. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.२५ ला शपथपत्र व नि.२६ चे यादीसोबत २ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.२ यांनी नि.२४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. सदर म्हणण्यामध्ये सर्व जाबदारतर्फे म्हणणे असे नमूद केले आहे. परंतु सदर म्हणण्यावर सर्व जाबदारांची सही नाही अथवा जाबदारतर्फे विधिज्ञांची सही नाही त्यामुळे सदरचे म्हणणे जाबदार क्र.२ व अ पतसंस्था यांच्यापुरते ग्राहय धरण्यात येवून इतर जाबदारांविरुध्द सदरचे म्हणणे ग्राहय धरण्यात येत नाही व जाबदार क्र.१ व ३ ते ११ विरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करणेत आला.
४. तक्रारदार व जाबदार दोघेही प्रस्तुत प्रकरण चौकशीस आले असता गैरहजर राहिले. तक्रारदार व जाबदार यांचेकडून कोणताही लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला नाही. सबब प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले. तक्रारदार यांनी याकामी पावतीची मूळ प्रत दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी नि.२८ ला दिलेल्या कागदयादीवर मूळ पावती परत देण्यात आली असे नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.२७ ला दिलेल्या अर्जाच्या पाठीमागील बाजूस मूळ पावती परत मिळाली असे नमूद आहे. जाबदार यांनी नि.२६/१ वर तक्रारदार यांना किती कर्ज दिले याचा तपशील दिला आहे. तक्रारदार यांनी नि.२७ ला दिलेल्या अर्जावर या न्यायमंचाने तक्रारदार यांनी नेमके किती कर्ज फेडले, किती बाकी आहे याबाबत पुरावा दाखल करावा असा आदेश केला आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. नि.५/१ वर तक्रारदार यांनी पावतीची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे त्यावर रु.१६,०००/- कर्ज असे नमूद आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून कर्ज घेतले ही बाब आपल्या तक्रारअर्जामध्ये कोठेही नमूद केलेली नाही. यावरुन तक्रारदार यांनी कर्जाबाबतची वस्तुस्थिती मंचासमोर आणलेली नाही. तसेच मंचाने आदेश करुनही कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. यावरुन तक्रारदार यांनी वस्तुस्थिती लपवून प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी योग्य तो पुरावा मंचासमोर दिला नसल्याने व वस्तुस्थिती लपवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला असल्याने प्रस्तुतच्या तक्रारअर्जातील मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ५/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०१२
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०१२