Maharashtra

Kolhapur

CC/10/83

Rakeshkumar Sadgururam Prasad - Complainant(s)

Versus

Bhagyalaxmi Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Ltd., Karnur - Opp.Party(s)

R.R.Wayangankar

31 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/83
1. Rakeshkumar Sadgururam PrasadNerli , Tal. Karveer Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Bhagyalaxmi Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Ltd., KarnurAt Post Karnur Tal. Kagal,Dist.Kolhapur2. Chairman, Mansing Ramchandra PatilAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur3. Shri Ashok Shivram Ghatage, Vice ChairmanAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur4. Shri Krishnat Siddhu Dhanagar, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur5. Shri Tanaji Atmaram Shinde, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur6. Shri Jaysing Surendra Chougule, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur7. Shri Dattatray Shankar Bondre, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur8. Shri Bhupal Masu Kambale, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur9. Shri Vijay Bhauso Chavan, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur10. Shri Balaso Hashim Shaikh, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur11. Shri Raoso Ganpati Jadhav, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur12. Shri Sunil Banda Gudale, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur13. Shri Dilip Dattatray Ghorpade, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur14. Smt.Prabhavati Krishnat Chavan, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur15. Shri Balaso Hindurao Patil, DirectorAt Post Karnur, Tal.Kagal, Dist.Kolhapur16. .. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.R.Wayangankar, Advocate for Complainant

Dated : 31 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 संयुक्‍त निकालपत्र :- (दि.31.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत 83/10 व 84/10 या तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 ते 6, 8, 9, 11 ते 14 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे धनलक्ष्‍मी ठेव 39 या योजनेखाली ठेवली आहे. सदर खात्‍यांचा तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
खाते क्र.
ठेव रक्‍कम
1.
83/2010
511
8,214/-
2.
84/2010
527
5,944/-

 
(4)        सदर खात्‍यांवर महिन्‍याला रुपये 200/- प्रमाणे हप्‍त्‍याने भरणे आहे. सदर खात्‍यांवर अनुक्रमे दि.30.03.2007 व दि.31.03.2007 वर अनुक्रमे रुपये 8,214/- व रुपये 5,944/- इतकी रक्‍कम जमा आहे. सदर रक्‍कम सामनेवाला यांनी तक्रारदारांना होणा-या व्‍याजासह परत करणे आवश्‍यक होते. परंतु, सामनेवाला यांनी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली. सदर रक्‍कमेची तक्रारदारांना अत्‍यंत निकड आहे असे सांगूनही सामनेवाला यांनी कर्ज रक्‍कम वसुल झालेशिवाय रक्‍कम देणार नाही असे स्‍पष्‍ट सांगितले.  त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत धनलक्ष्‍मी ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.2 ते 6, 8, 9, 11 ते 14 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक नव्‍हते. सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या रक्‍कमेवर होणारे व्‍याज वेळोवेळी दिलेले आहे. सामनेवाला यांनी कोणत्‍याही प्रकारच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी केलेल्‍या नाहीत. तक्रार अर्ज मुदत‍बाहय आहे. उपनिबंधक, सहकारी संस्‍था, कागल यांनी सदरची संस्‍था अवसायानात काढलेली आहे. अवसायकास पक्षकार केलेले नाही. तसेच, प्रस्‍तुत तक्रारीस कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये धनलक्ष्‍मी योजनेअंतर्गत रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर खाते पासबुकांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.15 हे संस्‍थेचे सचिव असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर धनलक्ष्‍मी ठेव खाते क्र. 511 व 527 वर दि.30.03.2007 रोजीअखेर अनुक्रमे रुपये 8,214/- व रुपये 5,944/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर धनलक्ष्‍मी ठेव खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकात नमूद त्‍यांच्‍या धनलक्ष्‍मी खात्‍यावरील रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.30.03.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रार क्र.
खाते क्र.
ठेव रक्‍कम
1.
83/2010
511
8,214/-
2.
84/2010
527
5,944/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या प्रत्‍येक तक्रारीकरिता तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
 
(4)   सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवींपोटी यापूर्वी जर काही व्‍याजाच्‍या रक्‍कमा अदा केल्‍या असतील तर सदर व्‍याजाच्‍या रक्‍कमा वळत्‍या करुन घेण्‍याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER