Maharashtra

Nashik

CC/272/2011

Shri SanjayBhanudas Wable & Other 1 - Complainant(s)

Versus

Bhagwati Construction Partnership Firm Through Partner - Opp.Party(s)

Sau manisha Puranik

31 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/272/2011
 
1. Shri SanjayBhanudas Wable & Other 1
R/o Panchamrut Row House No. 2 Dindori Rd Mhasarule Panchawati Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bhagwati Construction Partnership Firm Through Partner
R/o Sai nager Dindori Rd. Nashik
Nashik
Maharashtra
2. Bhagwati Construction Partnership Firm Through Partner Shri Kishor Trimbak Chopde
R/o Vise mala Colledge Rd Nashik
Nashik
Maharashtra
3. Bhagwati Construction Partnership Firm Through Partner Shri Arun Pandharinath Kapde
R/o DGP nager No. 2 Ambad Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. S.S.Jain MEMBER
 
PRESENT:Sau manisha Puranik, Advocate for the Complainant 1
 
ORDER

     ग्राहक तक्रार अर्ज क्र.272/2011

      ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.16/12/2011

      अंतीम आदेश दि.31/05/2012   

 

नाशिक जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नाशिक  

                                             

1. श्री.संजय भानुदास वाबळे,                             तक्रारदार

2. श्री.भानुदास हरीभाऊ वाबळे,             (अँड.सौ.मनिषा पुराणीक/फुलंब्रीकर)

रा.पंचामृत रो हाऊस नं.2,

दिंडोरी रोड, म्‍हसरुळ, पंचवटी, नाशिक.

           विरुध्‍द         

भगवती कन्‍स्‍ट्रक्‍शन भागिदारी फर्म तर्फे भागिदार       सामनेवाला नं.1 ते 3

1. श्री.दत्‍तात्रय पोपट कोकाटे,                           (एकतर्फा)               

  रा.साईनगर, दिंडोरी रोड, नाशिक.                      

2. श्री.किशोर त्र्यंबक चोपडे,

   रा.विसेमळा, कॉलेजरोड, नाशिक.

3. श्री.अरुण पंढरीनाथ कापडे,

   रा.डी.जी.पी.नगर, क्र.2,

   अंबड, नाशिक.

           (मा.सदस्‍या अॅड.सौ.एस.एस.जैन यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                        नि का ल प त्र

      अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून अर्ज कलम 1 अ मध्‍ये वर्णन केलेल्‍या मिळकतीचा बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला घेवून डिक्‍लेरेशन डिडचा दस्‍त दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदवून देवून अर्जदार यांचे लाभात वर कलम 1 ब मध्‍ये वर्णन केलेल्‍या रो-हाऊस नं.2 या मिळकतीचे डिड ऑफ अपार्टमेंट दस्‍त अर्जदाराचे लाभात लिहून नोंदवून मिळावे, आर्थीक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा, त्रासाच्‍या नुकसान भरपाईवर द.सा.द.शे.18% व्‍याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला क्र.1 ते 3 न्‍यायमंचाची नोटीस लागून गैरहजर राहीले म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द दि.27/2/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले.   

अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.

 

                                                              तक्रार क्र.272/2011

मुद्देः

1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.

2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे काय?– होय

3) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे काय?-होय.

4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला मिळण्‍यास पात्र

   आहेत काय?- होय.

5) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रो हाऊस क्र.2 बाबत डिड ऑफ अपार्टमेंट व

   डिड ऑफ डिक्‍लेरेशनचा दस्‍त अर्जदाराचे लाभात लिहून नोंदवून मिळण्‍यास पात्र

   आहेत काय?- होय.

6) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी

   रक्‍कम वसूल होवून मिळण्यास  पात्र आहेत काय?- होय.

7) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला नं.1 ते 3 यांचेविरुध्‍द

   अंशतः मंजूर करणेत येत आहे.

 

विवेचन

     अर्जदार यांनी नि.1 मध्‍ये लिहीलेल्‍या तक्रारी, प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे व्‍यतिरीक्‍त अन्‍य जादा युक्‍तीवाद करणे नाही अशी पुरसीस पान क्र.26 वर दाखल केलेली आहे.

     अर्जदार यांनी पान क्र.8 लगत रो हाऊस विक्री करारनामा, पान क्र.9 व पान  क्र.10 लगत अनुक्रमे रक्‍कम रु.50,000/-, रक्‍कम रु.55,000/-  दिल्‍याबाबतची पावती  व पान क्र.11 लगत रक्‍कम रु.3,95,000/- चा धनादेश झेरॉक्‍स प्रत अशी कागदपत्रे हजर केलेली आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल करुन नाकारलेली नाहीत. पान क्र.8 ते पान क्र.11 लगतचे कागदपत्रे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

या कामी अर्जदार यांनी पान क्र.1 लगत विलंब माफी अर्ज व पान क्र.2 लगत विलंब माफी अर्जाबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. विलंब माफी अर्ज व प्रतिज्ञापत्र यामधील कारणांचा विचार होवून अर्जदार यांचा विलंब माफी अर्ज दि.02/01/2012 रोजी मंजूर करण्‍यात आलेला आहे याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला मिळावा व अंतीम दस्‍त लिहून मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.16 नुसार अॅड.सौ.मनिषा पुराणीक/फुलंब्रीकर यांचेमार्फत दि.11/7/2011 रोजी

                                                    तक्रार क्र.272/2011

रजिष्‍टर ए डी पोष्‍टाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना पान क्र.17 व 18 चे पोस्‍टाचे पोच पावतीनुसार मिळालेली आहे. या नोटीशीस सामनेवाला यांनी अॅड.शिवराम माधवराव ठाकरे यांचेमार्फत दि.3/8/2011 रोजी पान क्र.19 लगतची उत्‍तरी नोटीस पाठवलेली आहे. परंतु ही उत्‍तरी नोटीस पाठवल्‍यानंतरही आजतारखेपर्यंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला दिलेला नाही व वाद मिळकतीचे डिड ऑफ अपार्टमेंटचा दस्‍त लिहून दिलेला नाही ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेले रो हाऊस विक्रीबाबतचा करारनामा व मुळ तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र व अन्‍य सर्व कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट झालेली आहे.  याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

     तक्रार अर्ज विनंती कलम 1 मधील मागणीनुसार अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रो हाऊस क्र.2 बाबत डिड ऑफ डिक्‍लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट चा दस्‍त अर्जदार यांचे लाभात नोंदवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना डिड ऑफ डिक्‍लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट चा दस्‍त नोंदवून मिळावा तसेच बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्‍द या मंचामध्‍ये दाद मागावी लागली आहे.  यामुळे निश्‍चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागला आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून वैय्यक्‍तीक व संयुक्‍तीरित्‍या मानसिक त्रासापोटी  रक्‍कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच युक्‍तीवादाबाबतची पुरसीस आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

 

  दे 

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैय्यक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अर्जदार यांना रो हाऊस क्र.2 बाबत बांधकाम पुर्णत्‍वाचा दाखला

 

                                                    तक्रार क्र.272/2011

मिळवून द्यावा व  डिड ऑफ डिक्‍लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट चा दस्‍त अर्जदार यांचे लाभात नोंदूवन द्यावा.

3) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैय्यक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- द्यावेत.

4) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैय्यक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अर्जदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.

 

               

 

            (आर.एस.पैलवान)              (अॅड.सौ.एस.एस.जैन)     

          अध्‍यक्ष                                                 सदस्‍या   

                                                                                          

ठिकाणः- नाशिक.   

दिनांकः-31/05/2012

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S.S.Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.