अर्जदाराने गैरअर्जदाराविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला रेड मी नोट 4 या कंपनीचा मोबाईल न पाठविल्यामुळे अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रु.3,500/- परत करावी तसेच अर्जदारांस शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- तसेच तक्रार खर्चापोटी एकुण रक्कम रु.10,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारांस देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. परंतु गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस नि.क्र.5, दस्त क्र.6 नुसार प्राप्त होऊनदेखील ते प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि. 10.10.2018 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले. 4. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, तसेच तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत. मुद्दे निष्कर्ष 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय 2. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करून त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 3. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 व २ बाबत :- 5. अर्जदार हयांनी तक्रारीत कलेले कथन व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदार हयांना गैरअर्जदार कंपनीने मोबाईलवर फोन करून अर्जदाराला, त्यांचे लकी ड्रॉमध्ये सिलेक्शन झाले असून सदर योजनेअंतर्गत अर्जदाराला, रेड मी नोट-4 चा मोबाईल ज्याची मुळ किंमत रू. 11,000/- आहे, तो केवळ 3500/- रूपयांत देण्यांस तयार आहे असे सांगितल्यामुळे अर्जदाराने मोबाईल घेण्यास तयार झाला. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या फोन संभाषणावरून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या जवळील पोस्ट ऑफीस, नागभीड, तह.नागभीड, जि.चंद्रपूर येथे आयडी BDT 620523 हया आयडीनुसार पार्सल पाठविले. अर्जदाराने रू.3500/- पोस्टामध्ये भरून सदर पार्सल बॉक्स घेवून पोस्ट ऑफीसमध्येच उघडून पाहिले असता त्या बॉक्समध्ये लक्ष्मीयंत्र व चरण पादूका या वस्तू दिसल्या. अर्जदाराने सदर वस्तुंचे छायाचीत्र तक्रारीसोबत जोडलेले आहेत तसेच गैरअर्जदाराने पाठविलेले इन्व्हॉईस जोडलेले आहे. सदर दस्तावेजांवरून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदाराला वरीलप्रमाणे फोन करून सदर मोबाईल लकी ड्रॉमध्ये लागल्याचे सांगून व त्या योजनेअंतर्गत कमी किमतीचे प्रलोभन दाखवून मोबाईल घेण्यांस प्रवृत्त केले, परंतु पार्सल बॉक्समध्ये मोबाईलऐवजी वरील वस्तु पाठवून अर्जदाराकडून रू.3500/- घेतले व त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराशी वारंवार संपर्क साधूनही अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले नाही व मोबाईल पाठविला नाही. गैरअर्जदाराने मंचाचा नोटीस प्राप्त होवूनही मंचासमक्ष उपस्थीत होवून अर्जदाराचे म्हणणे खोडून काढलेले नाही. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे अर्जदाराने शपथेवर दाखल केलेली तक्रार, शपथपत्राबाबत दाखल केलेली पुरसीस व दाखल दस्तावेज यावरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 6. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश |