जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/113 प्रकरण दाखल तारीख - 07/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 28/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य आसुदा पि.रेवाचंद हेमराजानी, वय वर्षे 69, व्यवसाय सेवानिवृत्त, अर्जदार. रा.दुसरा माळा, भोरे कॉम्प्लेक्स, महाविर चौक, नांदेड. विरुध्द. 1. बेनेट कोलमॅन अन्ड कंपनी लि, टाईम्स ऑफ इंडिया बिल्डींग डी.एन.रोड, गैरअर्जदार. मुंबई.400001. 2. प्रकाशक, टाईम्स हाऊस, दी ईकॉनॉमिक टाईम्स (टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप) 557, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे 4. 3. मे.प्रमोद न्युज एजन्सी, टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा, मुख्य विक्रेता, कलामंदीर जवळ,नांदेड. 4. मे.सत्यनारायण देवरकोंडा, न्युज पेपज एजन्सी, चौफाळा,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार 1 ते 4 - स्वतः. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार बेनेट कोलमॅन अन्ड कंपनी मुंबई यांच्या सेवेतील अनुचीत प्रकाराबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे दि.ईकॉनॉमिक टाईम्स या वर्तमानपत्राचे नियमित ग्राहक आहेत व सदर वर्तमानपत्र हे टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे आहे. नांदेड येथे वितरीत केले जाणा-या दि ईकॉनॉमिक टाईम्स पुण्याहुन प्रकाशीत केले जाते. मागील अनेक वर्षा पासुन दि ईकॉनॉमि टाईम्स बरोबर छापल्या जाणा-या पुरवण्या व मुख्य वर्तमानपत्रासोबत नांदेड येथे पुरविण्यात येत होत्या पण मागच्या काही महिन्या पासुन दि ईकॉनॉमिक टाईम्स बरोबर छापल्या जाणा-या पुरवण्या नांदेड येथे देण्याचे बंद करण्यात आले. दर सोमवारी दी ईकॉनॉमिक्स टाईम्स बरोबर ईटी इनव्हेस्टर गाईड ही पुरवणी छापण्यात येते पण ही पुरवणी नांदेड येथे वितरीत करण्यात येत नाही. याच प्रमाणे इतरही काही पुरवण्या मुख्य वर्तमानपत्रासोबत प्रसिध्द करण्यात येतात परंतु नांदेड येथे वितरीत करण्यात येत नाहीत. मागच्या काही महीन्याचा आढावा घेता दिलेल्या तारखेप्रमाणे पाने व त्याची किंमत याप्रमाणे पुर्ण रक्कम घेतली असता, देण्यात आलेली पाने ही कमी आहेत ती अशी, दिनांक | दिवस | पाने | किंमत रुपये | देण्यात आलेली पान | 15/12/08 | सोमवार | 20 | 3.00 | 16 | 22/12/08 | सोमवार | 40 | 3.00 | 20 | 29/12/08 | सोमवार | 18 | 3.00 | 14 | 02/1/09 | शुक्रवार | 20 | 3.00 | 16 | 05/1/09 | सोमवार | 28 | 3.00 | 20 | 12/1/09 | सोमवार | 24 | 3.00 | 20 | 2/2/09 | सोमवार | 22 | 3.00 | 18 | 16/2/09 | सोमवार | 18 | 3.00 | 14 | 19/2/09 | गुरुवार | 34 | 3.00 | 16 | 9/3/09 | सोमवार | 18 | 3.00 | 14 | 16/3/09 | सोमवार | 18 | 3.00 | 14 | 23/3/09 | सोमवार | 18 | 3.00 | 14 |
वरील आढाव्यावरुन असे दिसुन येते की, कंपनी माझेकडुन वर्तमान पत्रासाठी छापील किंमत वसुल करते पण मला पण त्यासोबत येणारे छापील पाने पुर्ण देण्यात येत नाहीत. म्हणजे ही कंपनी फासवणुक करते. अर्जदाराची तक्रार अशी ही वर्तमान पत्राची पुर्ण किंमत घेऊन पाने कमी पुरविण्यात येतात व सोबत असलेल्या पुरवण्या देण्यात येत नाहीत. त्याबद्यल प्रकाशक यांना पत्राद्वारे विचारणा केली असता, त्यांच्याकडुन काहीही उत्तर आलेले नाही. मुंबई येथील सदर वर्तमान पत्राची किंमत सोमवार ते शनिवार रु.2.50 असते नांदेड येथे त्या वर्तमान पत्राची किंमत सोमवार ते शुक्रवार पर्यंत रु.3.00 व शनिवारी रु.9 असे असते. त्यामुळे पुर्ण पैसे घेउन देखील पुरवणी व वर्तमान पत्रातील पाने कमी दिल्या कारणांने अर्जदारांनी आपली तक्रार नोंदविली आहे. अर्जदार यांची मागणी आहे की, पुरवल्या जाणा-या दी ईकॉनॉमिक टाईम्स चे मुख्य वर्तमान पत्रासोबत असणा-या पुरवण्या व ईटी इनव्हेस्टर गाईड पुरविण्यात याव्यात. तसेच मागच्या चार महिन्या पासुन पुरवण्या न दिल्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व दावा खर्चापोटी रु.2,000/- देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपले म्हणणे पोष्टाने पाठविले आहे व ते गैरअर्जदार क्र. 1 ते 4 या सर्वां तर्फे त्यांनी आपले लेखी म्हणणे दिलेले आहे. गैरअर्जदार यांचा प्रथम आक्षेप की, त्यांनी अर्जदार हे त्यांचे ग्राहक आहेत या म्हणण्यास नकार दिला आहे. गैरअर्जदार कंपनी तर्फे गैरअर्जदार क्र. 2 हे दी ईकॉनॉमिक टाईम्स ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र पुणे येथुन प्रकाशीत केले जाते व तोच वर्तमानपत्र व मुख्य वर्तमानपत्रासोबत असणा-या पुरवण्या या पुणे येथेच वाटपासाठी आहेत व ही बाब वर्तमानपत्राच्या पहील्या पानावरच अगदी स्पष्टपणे छापण्यात आले आहे. अंतरराष्ट्रीय धरतीवर ही बाब मान्य करण्यात आलेले असुन ज्या मुख्य शहरातुन टाईम्स ऑफ इंडियाचे वर्तमानपत्र छापले जाते त्यासोबत पुरवण्या दिल्या जातात, त्याच जवळच्याय शहरात व गावात पाठवुन विकल्या जातात. मुख्य वर्तमानपत्रासोबत छापलेल्या पुरवण्या हे फक्त शहरातील वाचकासाठीच आहेत व याचे मुख्य कारण जाहीरातीबद्यल असते कारण ज्या शहरातीतुन प्रामुख्याने जाहीराती मिळतात त्याच शहरामध्ये पुरवण्या वाटल्या जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर हेही प्रॅक्टीसमध्ये आहे की, वर्तमानपत्राची किंमत ही सर्व ठिकाणी एकच असते म्हणजेच पुरवण्या असतील नसतील हा प्रश्न नसतो म्हणजे पुरवण्या विना हीच किंमत असते व हीच प्रथा आम्ही अवलंबीलेली आहे ? त्यामुळे अर्जदार यांना पुरवण्यासोबत मुख्य वर्तमानपत्र नांदेड येथे मिळणार नाहीत. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 4 या पैकी कोणीही आपले शपथपत्र दाखल केलेले नाही. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व अर्जदाराने केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार गैरअर्जदार कंपनीचे ग्राहक आहे काय? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनुचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 व 2 – अर्जदार यांचे मुख्य तक्रार या अनुषंगाने त्यांनी कुठल्या तारखेला कुठल्या दिवशी किती पानाबद्यल गैरअर्जदारांनी पुर्ण पैसे घेतले त्या दिवशी किती पाने कमी देण्यात आले, याबद्यल एक स्टेटमेंट दिले व त्याप्रमाणे त्याच दिवसाचे वर्तमानपत्र त्यासोबत आलेले कमी पाने व पुरवण्याबद्यल हे दर्शवुन ते वर्तमान पत्र पुरावा म्हणुन दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप कंपनी असुन गैरअर्जदार क्र. 2 हे पुणे येथील प्रकाशक आहेत. गैरअर्जदार क्र. 3 व 4 हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे नांदेड येथील वितरक आहेत, यांचे बिल अर्जदारांनी या प्रकरणांत दाखल केले आहे. म्हणजेच अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 या वितरकाकडे पैसे देवून त्यांनी पब्लीश केलेले वर्तमानपत्र विकत घेतात, याचा अर्थ मुख्य कंपनी गैरअर्जदार क्र. 1 यांचे ते ग्राहक आहेत. म्हणुन गैरअर्जदारांनी केलेले आक्षेप खोडुन काढण्यात येतात. गैरअर्जदार कंपनी पुणे व मुंबई येथील सोमवार ते शनिवार पर्यंत 2.50 पैसे किंमत असते त्याच वर्तमान पत्राची किंमत सोमवार ते शुक्रवार रु.3.00 नांदेड येथील ग्राहकांकडुन घेतात. म्हणजेच 50 पैसे नांदेड येथील ग्राहकाकडुन जास्तीचे घेतात तसेच शनिवारी त्याची किंमत रु.9/- असते तेही वसुल केली जातात व जास्तीची किंमत घेऊन मुख्य वर्तमानपत्रासोबत पुरवणी व ईटी इनव्हेस्टर गाईड वाचकांना पुरवील्या जात नाही. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी म्हणण्यात हे स्पष्टपणे कबुल केले आहे की, पुणे येथील ईकॉनॉमिक टाईम्स व त्यासोबत ईटी इनव्हेस्टर गाईड हे पुरवणी पुणे येथील वाचकासाठी वितरीत केले जाते, नांदेड येथील ग्राहकासाठी पुरवणी पाठविली जात नाही, याचा उल्लेख देखील ईकॉनॉमिक टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राच्या समोरील पानावर सुचना म्हणुन प्रसिध्दी देण्यात आलेली आहे व गैरअर्जदारांनी ते कबुल केले आहे. गैरअर्जदारांनी असे करण्या मागे आंतरराष्ट्रीय प्रथा आहे व त्याप्रमाणे फक्त शहरामध्ये जाहीरात मिळते म्हणुन शहरामध्ये वर्तमान पत्रासोबत पुरवणी पुरविल्या जातात व इतर शहरातुन जाहीराती मिळत नाही म्हणुन पुरवणी पाठविल्या जात नाही, असे जर असले तर इतर शहरामध्ये पुरविण्यात येणारे मुख्य वर्तमानपत्राची किंमत कमी पाहीजे, किंमत ही गैरअर्जदार पुर्ण वसुल करतात व पुरवण्याची पाने कमी पाठवतात हे शुध्द फसवणुकीचा प्रकारच आहे, असे करणे म्हणजे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे यास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणण्यात येईल जेव्हा गैरअर्जदारांनी वर्तमानपत्राची किंमत शहराला वर्तमानपत्रा पेक्षा जास्त मिळते तेव्हा शहरात देखील पुरवणी त्यासोबत ईकॉनॉमिक इनव्हेस्टर गाईड ग्राहकांना देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, प्रश्न राहीला जाहीरातीचा व जाहीरातही फक्त पुणे शहरातील वाचकाला फायदा होईल त्यामुळे वर्तमानपत्राचा फायदा होईल असे नसुन इतर शहरामध्ये राहणारे लोक देखील हुशार आहेत ते अनाडी नाहीत ही जाहीरात वाचल्यास जाहीरात देणारे कंपनीस व वर्तमान पत्रास देखील फायदा होईल. इतर शहरात पुरवणी न पाठवीणे म्हणजे त्या शहरातील लोकांना त्यांना यातील कळत नाही, असा होईल व गैरअर्जदारांनी अशा प्रकारचा अर्थ लावू नये. पुणे येथील दि.ईकॉनॉमिक टाईम्स हे वर्तमानपत्र पुण्यातच छापले जाते व रक्कम पुर्ण घेतल्यानंतर जेव्हा शहरात पुरवणी देणे परवडते तर बाहेरील शहरात देखील अशा प्रकारची पुरवणी गैरअर्जदारांनी पाठवणे हे बंधनकारक आहे कारण त्यांनी किंमत पुर्ण घेतलेली आहे. गैरअर्जदार यांचे स्वतःच्या लेखी म्हणण्यातील कबुली प्रमाणे त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदाराकडुन पुर्ण रक्कम घेतली असतांना त्यांना कमी पाने पाठवुन वाचकास असुवीधा निर्माण केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना नांदेड येथील त्यांच्या वितरका मार्फत दी ईकॉनॉमिक टाईम्स सोबत छापल्या जाणा-या सर्व पुरवण्या पुरवीण्यात याव्यात तसेच दर सोमवारी प्रसिध्द होणारे ईटी इनव्हेस्टर गाईड देखील मुख्य वर्तमानपत्रासोबत नांदेड येथील सर्व वाचकांना पुरवीण्यात यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्चा पोटी रु.1,000/- देण्यात यावे. 4 आदेशाची अंमलबजावणी पुर्णतः होते, याबाबत गैरअर्जदार यांनी अहवाल मंचात सादर करावा. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |