Maharashtra

Nagpur

CC/10/607

Shivcharan Jairam Puriji - Complainant(s)

Versus

Basweshwar Credit Co-operative Society Through Sau. Jayashree Manjarkhede- President - Opp.Party(s)

Adv. A.A. Bhendarkar

17 Aug 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/607
 
1. Shivcharan Jairam Puriji
89, Reshimbagh, Swami Samarth Math, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Basweshwar Credit Co-operative Society Through Sau. Jayashree Manjarkhede- President
622, Jitendra Aparment, Near Baswashwar Putla, New Subhedar Layout, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Bansod, Secretary- Basweshwar Credit Co-Operative Society
622, Jitendra Apartment, Near Basweshwar Putla, New Subhedar Layout, Nagpur 24
Nagpur 440024
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 17/08/2011)
 
 
1.                                          तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत तक्रार अशी आहे की, प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्ते हे ज्‍येष्‍ठ नागरीक असून सेवानिवृत्‍त अधिकारी आहेत. त्‍यांनी वृध्‍दाश्रम, मोफत दवाखाना व अन्‍नछत्र चालविण्‍याच्‍या उद्देशाने गैरअर्जदार यांचेकडे रकमेवर योग्‍य व्‍याज मिळेल या हेतूने गैरअर्जदारांकडे मुदत ठेवीमध्‍ये काही रकमा ठेवलेल्‍या होत्‍या. गैरअर्जदार यांचे विनंतीवरुन तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी सदर मुदत ठेवींचे नुतनीकरण केले. शेवटी रु.82,205/- एवढी रक्‍कम तक्रारकर्त्‍याने दि.12.09.2009 ते 12.01.2010 या कालावधीसाठी मुदत ठेव स्‍वरुपात ठेवली, त्‍याचे परिपक्‍वता मुल्‍य रु.84,815/- एवढे होते. तसेच तक्रारकर्त्‍याने रु.56,229/- मुदत ठेव स्‍वरुपात 91 दिवसांकरीता म्‍हणजेच दि.18.10.2009 ते 17.01.2010 या कालावधीसाठी ठेवले. त्‍याचे परिपक्‍वता मुल्‍य रु.57,561/- एवढे होते. म्‍हणजेच शेवटी दोन्‍ही परिपक्‍वता रकमा मिळून रु.1,49,537/- एवढया देय मुदत ठेव रकमेची मागणी तक्रारकर्त्‍याने वारंवार गैरअर्जदार यांना करुनही गैरअर्जदार यांनी सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यांना परत केली नाही. एवढेच नव्‍हे तर उपनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर यांनीदेखील गैरअर्जदार यांना तक्रारकर्त्‍यांच्‍या देय रकमा देणेविषयी बजावले असता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांच्‍या रकमा देण्‍याचे आश्‍वासन दिले. तरीही गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मुदत ठेव रकमा तक्रारकर्त्‍यास परत केल्‍या नाही ही गैरअर्जदार यांची सेवेतील कमतरता आहे.
 
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांनी पाठविली, त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करुन, तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडे रु.65,000/- दि.12.07.2007 ते 12.08.2008 या कालावधीकरीता ठेव स्‍वरुपात ठैवण्‍याचे तक्रारकर्त्‍यांचे म्‍हणणे मान्‍य केले. परंतू तक्रारकर्त्‍यांचे इतर कथन अमान्‍य केलेले आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍यांची व्‍याजाची मागणी अमान्‍य केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांची देय रक्‍कम हप्‍तेवारीने देण्‍यास ते तयार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.
 
3.          सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदारांना युक्‍तीवादाकरीता संधी देऊनही ते गैरहजर. प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍यात आले.
 
-निष्‍कर्ष-
 
4.          दोन्‍ही पक्षांचे म्‍हणणे दाखल पुरसिस, तसेच दस्‍तऐवज क्र. 1 व 2 वरील मुदत ठेवींचे प्रमाणपत्र पाहता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने पूर्वींच्‍या मुदत ठेवींचे वारंवार नुतनीकरण करुन शेवटी रक्‍कम रु.82,205/- एवढी रक्‍कम दि.12.09.2009 ते 12.01.2010 या कालावधीसाठी 9.5 टक्‍के दराने गैरअर्जदार यांचेकडे मुदत ठेव स्‍वरुपात ठेवलेले होती. तसेच रु.56,229/- एवढी रक्‍कम दि.18.10.2009 ते 07.01.2010 या कालावधीसाठी 9.5 टक्‍के दराने गैरअर्जदार यांचेकडे मुदत ठेव स्‍वरुपात ठेवलेली होती.  नि. क्र. 3 ते 5 वरील दस्‍तऐवज पाहता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने वारंवार लेखी विनंती करुनही गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास सदर देय रकमा परत केल्‍या नाहीत. ही गैरअर्जदार यांची कृती निश्चितच सेवेतील कमतरता आहे असे या मंचाचे मत आहे. वास्‍तविक तक्रारकर्त्‍यांच्‍या वयाचा विचार करुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या ठेवी परत करावयास हव्‍या होत्‍या. ते न करता गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास मानसिक व आर्थिक त्रास दिला. वरील बाबी लक्षात घेता हे मंच खालील निर्णयाप्रत येते.
-आदेश-
1)          गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास रु.84,815/- व रु.57,561/- परत करावे.       सदर रकमेवर दि.12.01.2010 पासून रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 7    टक्‍के दराने व्‍याज द्यावे.
2)          गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.8,000/-      व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
3)          सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे किंवा     वैयक्‍तीकपणे आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.