Maharashtra

Nagpur

CC/12/141

Cchotelal Vishambhar Thorat - Complainant(s)

Versus

Barclaycard, Through Manager - Opp.Party(s)

Adv. A.T.Sawal

28 Feb 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/141
 
1. Cchotelal Vishambhar Thorat
Plot No. 29, Saikrupa Society, Manish Nagar, Near Mohod Builder, Somalwada, Wardha Road,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Barclaycard, Through Manager
Post Box No. 11567, Nariman Point
Mumbai 400021
Maharashtra
2. Barclay Bank P.L.C., Through Manager
Retail Banking Division, 601/603, C.K. House, Shivsagar Estate, Dr. Annie Basent Road, Warli,
Mumbai 400021
Maharashtra
3. Barclaycard Through Manager
Branch Office, Ramdaspeth Road, Wardha Road,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. SATISH DESHMUKH MEMBER
 
PRESENT:Adv. A.T.Sawal, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री. अमोघ कलोती, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 28/02/2013)
 
1.           तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍द पक्षकारांकडे तथाकथितरीत्‍या भरणा केलेली अतिरिक्‍त रक्‍कम रु.25,000/- मिळणेसाठी व इतर अनुषंगिक मागण्‍यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
2.          तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे -
तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षकारांचा ग्राहक असून, त्‍याने वि.प.कडून क्रेडीट कार्डची सेवा घेतली. कार्डामार्फत घेतलेल्‍या कर्जाचा त्‍याने प्रत्‍येक महिन्‍यात ई सी एस व धनादेशाद्वारे भरणा केला. तरीही, वि.प.यांनी बेकायदेशीरपणे तक्रारकर्त्‍यावर व्‍याज व अन्‍य शुल्‍क यांची आकारणी केली.
 
माहे मे 2011 पर्यंत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षकारांकडे एकूण रु.1,58,000/- चा भरणा केला. त्‍यापैकी रु.25,000/- अतिरिक्‍त भरल्‍याचे त्‍याचे लक्षात आले व त्‍याने ही रक्‍कम परत करण्‍याची मागणी केली, तेव्‍हा कार्डामार्फत वस्‍तू खरेदी केल्‍यास ही रक्‍कम वजा करुन देण्‍याचे वि.प.ने सांगितले.
 
दि.21.07.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने रु.50,000/- चे सोने खरेदी केले. परंतू, वि.प. यांनी त्‍यातून रु.25,000/- कमी करुन दिले नाही. वि.प. यांचेकडे याबाबत विचारणा केली असता, त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला नाही. स्‍टेटमेंट दिले नाही. उलट त्‍यांचेकडे रु.1,04,133.50 बाकी असल्‍याचे सांगितले.
 
तक्रारकर्त्‍याने दि.18.02.2012 रोजी वि.प.ला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. त्‍यानंतर वि.प.ने तक्रारकर्ता व त्‍यांच्‍या कुटूंबाला त्रास देणे सुरु केले, म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
3.          तक्रारीची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर ऍड. श्री. म. वा. राऊत यांनी वि.प.क्र.1 ते 3 तर्फे वकीलपत्र सादर केले. मात्र, वि.प. क्र. 1 ते 3 यांनी संधी देऊनही कोणतेही उत्‍तर दाखल केले नाही, त्‍यामुळे प्रकरण त्‍यांचे लेखी उत्‍तराशिवाय पुढे चालविण्‍यात आले.
 
4.          तक्रारकर्त्‍यातर्फे ऍड. श्री. ए. टी. सावल यांनी तक्रारीतील कथन हाच लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस दाखल केली. त्‍यांचे सहाय्याने अभिलेखावरील कागदपत्रांचे अवलोकन केले. प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये मंचाच्‍या विचारार्थ निर्माण होणारे मुद्ये व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
 
मुद्ये                                                   निष्‍कर्ष
1. विरुध्‍द पक्षकारांचे सेवेत कमतरता असल्‍याचे                                होय.
    सिध्‍द होते काय ?
2. आदेश ?                                            अंतिम आदेशानुसार.
 
 
 
-कारणमिमांसा-
5.          तक्रारकर्त्‍याने माहे मे 2011 पर्यंत विरुध्‍द पक्षकारांकडे एकूण रु.1,58,000/- चा भरणा केल्‍याबाबत आणि त्‍यापैकी रु.25,000/- अतिरिक्‍त/जादा भरल्‍याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर अभिलेखावर दाखल केला नाही. तक्रारकर्त्‍याने दि.21.07.2011 रोजी रु.50,000/- चे सोने खरेदी केल्‍याचे कथन केले असले तरी याबाबत कोणतेही कागदपत्र अथवा क्रेडीट कार्डचे स्‍टेटमेंट केले नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत जोडलेल्‍या दस्‍तऐवज क्र. 1 व 2 वरुन केवळ एकच बाब दिसून येते, ती म्‍हणजे, तक्रारकर्त्‍याचे कर्ज रु.61,000/- हे रु.3951.73 च्‍या एकूण 18 दरमहा हप्‍त्‍यांमध्‍ये परावर्तित करण्‍यात आले व त्‍यानुसार दि.22.11.2010 रोजी त्‍याचे खाते निरंक होणार होते. तक्रारकर्त्‍याने, दि.05.06.2010 व दि.05.04.2011 तारखेचे स्‍टेटमेंट (खाते उतारा) दाखल केले आहे. मात्र, त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याने रु.25,000/- अतिरिक्‍त/जादा भरल्‍याबाबत कोणताही बोध होत नाही. त्‍यामुळे रु.25,000/- परत करण्‍याची तक्रारकर्त्‍याची मागणी मान्‍य करता येणार नाही.
 
6.          विरुध्‍द पक्षकारांकडे मागणी करुनही, त्‍यांनी क्रेडीट कार्ड वापराचे स्‍टेटमेंट तक्रारकर्त्‍यास दिले नसल्‍याचे त्‍याचे कथन केले आहे. नोटीस मिळूनही वि.प.यांनी उत्‍तर दाखल करुन याचा प्रतिवाद केला नाही. ग्राहकाने मागणी केल्‍यावर त्‍यांना क्रेडीट कार्डचे स्‍टेटमेंट पुरविणे हे विरुध्‍द पक्षकारांचे कर्तव्‍य होते. मात्र, याबाबत वि.प.ने कसूर केल्‍यामुळे, वि.प.ने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या सेवेत कमतरता असल्‍याचे मंचाचे मत आहे. मागणी करुनही स्‍टेटमेंट न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रास व मनस्‍ताप होणे स्‍वाभाविक आहे.
करिता आदेश पुढिलप्रमाणे –
-आदेश-
1)    तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
2)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍यांचे क्रेडीट कार्ड क्र.    4339489253905789 चे माहे एप्रिल 2011 पासून आदेश पारित झाल्‍याच्‍या      तारखेपर्यंतचे स्‍टेटमेंट (खाते उतारा) कोणतेही शुल्‍क न आकारता पुरवावे.
3)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास मानसिक त्रास व मनस्‍तापाबद्दल       रु.5,000/- द्यावी. तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- द्यावा.
4)    वरील बाबींची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30      दिवसांचे आत करावी.
 
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. SATISH DESHMUKH]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.