Maharashtra

Latur

CC/12/119

Haubai urfa Hawalabai Ramlingappa Shivpuje - Complainant(s)

Versus

Baranch Manager, The New India Insurance co. Ltd. - Opp.Party(s)

A.. Jawalkar

14 May 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES RESDRESSAL FORUM LATUR
NEAR Z.P. GATE LATUR
LATUR 413512
 
Complaint Case No. CC/12/119
 
1. Haubai urfa Hawalabai Ramlingappa Shivpuje
R/o.Deulwadi Tq.Udgir
Latur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Baranch Manager, The New India Insurance co. Ltd.
Chandra Nager, Shau college road,Latur
Latur
Maharashtra
2. Branch Manager,The New India Insurance co.ltd.
Mahalaxmi Chambers 2nd floor Near Prabhat talkies Pune 411030
Pune
Maharashtra
3. Rhe New India Insurance co.ltd.
New India Insurance Building 87 M.G.Road,Fort Mumbai 400001
Mumbai
Maharashtra
4. Dist.Agreeclturl Officer, latur
Agreecultural Dept. Z.P. Latur
Latur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt A.G.Satpute PRESIDENT
 HON'BLE MR. Ajay Bhosrekar MEMBER
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच लातूर यांचे समोर

                                        तक्रार दाखल तारीख – 31/07/2012           

                                        निकाल तारीख - 14/05/2015

                                      कालावधी - 02 वर्ष , 09 म. 14 दिवस.

 

1) ग्राहक तक्रार क्रमांक – 119/2012

   हाऊबाई उर्फ हावळाबाई रामलिंगअप्‍पा शिवपुजे,

   वय – 67 वर्षे, धंदा – घरकाम,

   रा. देऊळवाडी, ता. उदगीर,

   जि. लातुर.                                        ....अर्जदार

विरुध्‍द

1) शाखा व्‍यवस्‍थापक,

   दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि.

   चंद्र नगर, शाहु कॉलेज जवळ, लातुर.

2­) शाखा व्‍यवस्‍थापक,

दि न्‍यु इंडिया एश्‍योरनस कंपनी लि.,

महालक्ष्‍मी चेंबर्स, दुसरा मजला,

प्रभात सिनेमा जवळ,पुणे – 411030.

3)  दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि.,

मुख्‍य कार्यालय, न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स बिल्‍डींग,

87, एम.जी.रोड, फोर्ट,

मुंबई – 400001.

4)  जिल्‍हा कृषी अधिकारी,

कृषी विभाग, जिल्‍हा परिषद,

लातुर.                                            ..गैरअर्जदार

                 तक्रारदारातर्फे  :- अॅड. ए.के.जवळकर.

गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे  :-   अॅड.एस.जी.दिवाण.

                  गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- स्‍वत:

2.       ग्राहक तक्रार क्रमांक – 134/2012

                             तक्रार दाखल तारीख – 04/10/2012

                             निकाल तारीख - 14/05/2015

                             कालावधी - 02 वर्ष , 07 म. 10 दिवस.

हाऊबाई उर्फ हावळाबाई रामलिंगअप्‍पा शिवपुजे,

वय – 67 वर्षे, धंदा – घरकाम,

रा. देऊळवाडी, ता. उदगीर,

जि. लातुर.

विरुध्‍द

  1. शाखा व्‍यवस्‍थापक,

दि ओरियंटल इंशुरन्‍स कंपनी लि.,

लोखंडे कॉम्‍प्‍लेक्‍स, पहीला मजला,

सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक,

लातुर.

  1. शाखा व्‍यवस्‍थापक,

ओरियंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

शिवम चेम्‍बर, 2 मजला,

झोपडी कॅन्‍टीन समोर,

नगर मनमाड रोड, सावेडी,

अहमदनगर, 414003.

  1. लाईफलाईन लाईफ केअर लि.,

3, रेनबो हाऊस, दिपक हॉस्पिटल समोर,

सावेडी रोड, अहमदनगर – 414003. ....गैरअर्जदार

 

  1. ग्राहक तक्रार क्र. 135/2012

हाऊबाई उर्फ हावळाबाई रामलिंगअप्‍पा शिवपुजे,

वय – 67 वर्षे, धंदा – घरकाम,

रा. देऊळवाडी, ता. उदगीर,

जि. लातुर.

विरुध्‍द

  1. शाखा व्‍यवस्‍थापक,

      दि ओरियंटल इंशुरन्‍स कंपनी लि.,

लोखंडे कॉम्‍प्‍लेक्‍स, पहीला मजला,

सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक,

लातुर.

  1. शाखा व्‍यवस्‍थापक,

ओरियंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

शिवम चेम्‍बर, 2 मजला,

झोपडी कॅन्‍टीन समोर,

नगर मनमाड रोड, सावेडी,

अहमदनगर, 414003.

  1. लाईफलाईन लाईफ केअर लि.,

3, रेनबो हाऊस, दिपक हॉस्पिटल समोर,

सावेडी रोड, अहमदनगर – 414003. ....गैरअर्जदार

 

को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्‍यक्षा.

            श्री अजय भोसरेकर, सदस्‍य

           श्रीमती रेखा जाधव, सदस्‍या.

            तक्रारदारातर्फे   :- अॅड. ए.के.जवळकर.

        गैरअर्जदार क्र. 1 , 2 तर्फे  :- अॅड.एस.जी.डोईजोडे.

गैरअर्जदार क्र. 3 तर्फे  :- स्‍वत:

निकालपत्र

(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्‍यक्षा )

अर्जदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्‍द दाखल केली आहे.

अर्जदार ही मौजे देऊळवाडी येथील राहणारी असून, तिच्‍या कुटुंबात गट क्र; 392 मध्‍ये 2 हेक्‍टर 55 आर एवढी शेतजमीन आहे. सदरच्‍या जमीनी पैकी 80 आर जमीन अर्जदाराच्‍या नावे होती. 1 हेक्‍टर 75 आर एवढी जमीन अर्जदाराचा मुलगा सिध्‍देश्‍वर शिवपुजे यांचे नावे होती, त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्‍याकडे शेतकरी जनता अपघात विमा, शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा, तसेच नागरी सुरक्षा विमा असे वेगवेगळया पॉलीसी गैरअर्जदारांकडुन घेतल्‍या होत्‍या म्‍हणून तो गैरअर्जदारांचा ग्राहक होता. मयत सिध्‍देश्‍वर रामलिंग शिवपुजे हा अर्जदाराचा वारस असल्‍याने अर्जदाराने सदरच्‍या विम्‍या अंतर्गत अपघाती मृत्‍यू झाल्‍यास मिळणा-या रक्‍कमेबद्दल मागणी केलेली आहे. अर्जदाराने सन – 2010 च्‍या रब्‍बीच्‍या हंगामात तुर या पिकाची लागवड केली होती. डिसेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात शेतात औषध फवारणी चालू होती औषध कमी पडल्‍याने त्‍यांनी सिध्‍देश्‍वर यास औषध आणण्‍यास दि. 01/12/10 रोजी उदगीर येथे पाठविले. उदगीर येथून औषध घेवून गावाकडे येत असताना त्‍यास दुचाकी वाहनावरच वेडाचे झटके येवू लागले. त्‍यामुळे त्‍यांनी दुचाकी वाहन रस्‍त्‍याच्‍या बाजुस लावले व वेडाच्‍या भरात तुरीवर फवारायचे औषध जवळच असलेल्‍या पिंपरी शिवारातील लक्ष्‍मण गायकवाड यांच्‍या शेतात जावून वेडाच्‍या भरात ते औषध प्राशन केले व त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला. दि. 02/12/2010 रोजी पर्यंत औषध घेवून सिध्‍देश्‍वर आला नाही. म्‍हणून भावाने शोधाशोध सुरु केली पिंपरी शिवारातील लक्ष्‍मण गायकवाड यांच्‍या शेताजवळ गाडी दिसली. म्‍हणून त्‍या शेतात सिध्‍देश्‍वराचे शव दिसले त्‍यांनी ग्रामीण पोलीस स्‍टशेन उदगीर यांना सदर घटनेची माहिती दिली. मयत सिध्‍देश्‍वर यास वर्षातुन 3 चार वेळेस वेडाचे झटके येत होते. सदरचा मृत्‍यू हा अपघाती असल्‍यामुळे अर्जदाराने संपुर्ण कागदपत्रांची जुळवाजुळव करुन तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविले. तेव्‍हा गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास पत्र पाठवून दिले. दि. 28/11/11 रोजीच्‍या पत्रान्‍वये अर्जदाराचा विमा दावा मयताने आत्‍महत्‍या केली आहे. सदरची घटना आत्‍महत्‍या असल्‍यामुळे रक्‍कम देता येत नाही. म्‍हणून विमा दावा नाकारला. अर्जदाराच्‍या मुलाचा मृत्‍यू हा अपघाती स्‍वरुपाचा असल्‍यामुळे विमा दावा न देवून त्रुटी केली आहे. म्‍हणून अर्जदारास सर्व गैरअर्जदारानी रक्‍कम रु. 1,00,000/- त्‍यावर 15 टक्‍के व्‍याज अपघाती मृत्‍यू झालेल्‍या तारखेपासून तसेच मानसिक व शारीरीक खर्च रु. 15,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 10,000/- देण्‍यात यावेत.

     गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍या असल्‍यामुळे तो विम्‍यास पात्र नाही. कारण विम्‍याच्‍या अटी व शर्तीमध्‍ये सदरचा मृत्‍यू हा अपघाती नसल्‍याचे सिध्‍द होत असल्‍यामुळे, सदरचा अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव फेटाळण्‍यात यावा. अर्जदाराच्‍या कागदपत्र क्र. 8 मध्‍ये असे लिहिलेले आहे की, माझा पुतण्‍या सिध्‍देश्‍वर शिवपुजे वय - 21 वर्षे रा. देऊळवाडी हा दि. 01/12/10 रोजी त्‍याचा भाऊ उदगीर येथे राहत असल्‍याने त्‍याला भेटण्‍यासाठी उदगीरला आला होता व त्‍यास भेटला नाही. तो काल मेाटारसायकलवर गावाकडे परत येत असताना आवळकोंडा शिवारातील तळयाजवळ गाडी रोडच्‍या बाजुला उभी करुन त्‍याने काही तरी रागा वैतागाने स्‍वत: विषारी औषध पिवून मरण पावला आहे. अर्जदाराच्‍या चुलत्‍याने दिलेल्‍या एफ. आय. आर वरुन निष्‍पन्‍न होत असल्‍यामुळे अर्जदाराचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍या या प्रकारात मोडतो. म्‍हणून त्‍याला सदरची पॉलीसीची रक्‍कम देण्‍यात येवू नये.

     गैरअर्जदाराच्‍या विम्‍याच्‍या पॉलीसी क्रमांकमध्‍ये अट अपवाद क्र. 08 III (I) आत्‍महत्‍या ही या पॉलीसीत मोडत नसल्‍यामुळे त्‍याला सदरची विमा पॉलीसीची रक्‍कम अर्जदारास मिळु शकत नाही असे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे आहे.

ग्राहक तक्रार क्र. 134/2012

     सिध्‍देश्‍वर रामलिंगअप्‍पा शिवपुजे यांचा जनता अपघात विमा रु. 1,00,000/- चा उतरविला होता. गैरअर्जदार क्र; 3 यांनी सदरचा विमा गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍याकडे उतरविला. कारण कार्डावरील एखादया सभासदाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास त्‍यांच्‍या वारसांना झळ बसू नये यासाठी विमा काढण्‍यात आला होता. सदर विम्‍याचा मयत सिध्‍देश्‍वर याच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांची आई या नात्‍याने विमा रक्‍कमेची मागणी केली. गैरअर्जदार क्र. 3 कडे सर्व कागदपत्रे तिने भरुन पाठविले मयताचा गैरअर्जदार क्र. 2 कडे जनता वैयक्‍तिक अपघात विमा व नागरीक सुरक्षा पॉलीसी यांचा क्र. 65722/23 विमा कालावधी दि.09/06/05 ते 08/06/13 व 35991/23 विमा कालावधी दि.09/06/08 ते 08/06/12 अनुक्रमे असा होता. सुरुवातीस कागदपत्रे देताना अर्जदाराने एकच संच दिला होता. परंतु गैरअर्जदार क्र. 3 यांनी काढलेल्‍या त्रुटी दोन विमा पॉलीसी असल्‍यामुळे दोन स्‍वतंत्र संच दयावेत अशी मागणी केली होती. त्‍याप्रमाणे अर्जदाराने दोन पॉलीसीचे दोन संचात कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 3 यांना दिली. यात दोन्‍ही पॉलीसीची मागणी गैरअर्जदाराकडे अर्जदाराकडे केली. मात्र गैरअर्जदाराने विमा रक्‍कम न देवून अर्जदाराच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदारास रु. 1,00,000/- अपघाती झालेल्‍या तारखेपासुन 15 टक्‍के व्‍याज दयावे. गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्‍या मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 15,000/- व दाव्‍याचा खर्च रु. 10,000/- देण्‍यात यावा.

     गैरअर्जदार लाईफलाईन लाईफ केअर लि., यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचा अपघात दि. 01/12/10 रोजी झाला. त्‍या संबंधीची लेखी सुचना आमच्‍या सुचना दि. 09/12/10 रोजी मिळाली व त्‍याच दिवशी दावेदारास क्‍लेम फॉर्म पाठविले ते प्रथम दि. 24/01/12 रोजी मिळाले. त्‍यानंतर काही त्रुटी आढळल्‍या त्‍या पुर्ण करण्‍यासाठी दावेदारास परत केले तो क्‍लेम दि; 23/03/11 रोजी ऑफीसला मिळाला. त्‍याच दिवशी ओरीएंटल इन्‍शुरंन्‍स कंपनीला पाठविण्‍यात आला आहे.

     गैरअर्जदार विमा कंपनी च्‍या मते अर्जदार हा सदर क्‍लेम मिळण्‍यास पात्र नाही. सदरची नागरीक सुरक्षा पॉलीसी ही 80 टक्‍के अपघात विमा म्‍हणून देत व 20 टक्‍के जर मेडीकल एक्‍सपेंसेस देत असते. सदर केसमध्‍ये सिध्‍देश्‍वर शिवपुजे याने फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. त्‍यामुळे सदर केसमध्‍ये अर्जदाराच्‍या मुलाने आत्‍महत्‍या केलेली स्‍पष्‍ट होते. म्‍हणून अर्जदाराचा मुलगा हा सदर पॉलीसीच्‍या रक्‍कमेस पात्र नाही. त्‍याच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही असे नागरीक सुरक्षा पॉलीसीच्‍या क्‍लॉज नं. 1 मध्‍ये लाईन नं 4 मध्‍ये अट क्र. 7 मध्‍ये दिलेले आहे. तसेच शवविच्‍छेदन अहवालात अर्जदाराचा मृत्‍यू हा त्‍याच्‍या श्‍वाच्‍छोश्‍वास बंद झाल्‍यामुळे तो कोमात गेला व त्‍यात तो मरण पावला. अशी दुर्घटना होण्‍यास त्‍याने पिलेले औषध कारणीभुत आहे. सदरचा अपघाती होत नसल्‍यामुळे सदरची रक्‍कम देण्‍यात येवू नये.

ग्राहक तक्रार क्र. 135/2012

     गैरअर्जदार क्र. 3 ने बाजारात लाईफ केअर कार्ड नावाचे सुविधा देणारे निरनिराळया कंपनीचे कार्ड बाजारात आणले होते त्‍या कार्डाच्‍या किंमतीप्रमाणे त्‍या कार्डावर असणा-या लोकांचा गैरअर्जदाराकडे अपघात विमा गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍याकडे काढला होता. सदरच्‍या पॉलीसीत मन्‍मथ रामलिंगअप्‍पा शिवपुजे, सिध्‍देश्‍वर रामलिंगअप्‍पा शिवपुजे, शिवनंदा प्रभाकर शिवपुजे, सुमित प्रभाकर शिवपुजे असे चौघेजन सदरच्‍या पॉलीसी समाविष्‍ट होते. सिध्‍देशवर याचा नागरीक सुरक्षा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रु. 1,00,000/- उतरविला होता. सिध्‍देश्‍वर याच्‍या अपघाती मृत्‍यूनंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन नागरीक सुरक्षा पॉलीसीचे रु. 1,00,000/- दयावेत. म्‍हणून प्रार्थना केली परंतु गैरअर्जदाराने ती रक्‍कम न देवून अर्जदाराच्‍या सेवेत त्रुटी केलेली आहे. अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार यांनी आजपर्यंत निकाली न काढुन त्‍यांच्‍या सेवेत अकार्यक्षम सेवा केली. गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,00,000/- त्‍याच्‍या अपघाती तारखेपासुन दयावेत. मानसिक         व शारिरीक रु. 15,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 10,000/- दयावेत.

     गैरअर्जदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर केसमध्‍ये मयताचा मृत्‍यू हा विषारी औषध प्राशन केल्‍यामुळे झालेला आहे. Cardiorespiratory arrest due to coma due to  insecticide poisioning, However viscera is preserved for CA and final opinion reserved असा असल्‍यामुळे अर्जदार हा जनता अपघात मिळण्‍यास पात्र नाही म्‍हणून सदरची केस ही फेटाळण्‍यात यावी.

          मुद्दे                                          उत्‍तरे

  1. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या सेवेत त्रूटी केली आहे काय ?     होय
  3. अर्जदार अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे काय ?             होय
  4. काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे

    मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होतो सदरील तिन्‍ही विमा पॉलीसीचा ग्राहक होतो. अर्जदारास मौजे देऊळवाडी येथे गट क्र. 392 मध्‍ये 2 हेक्‍टर 55 आर एवढी शेतजमीन आहे.

    मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होय असून अर्जदाराचा मुलगा सिध्‍देश्‍वर रामलिंगअप्‍पा शिवपुजे हा दि. 01/12/10 रोजी दुपारी औषध आणण्‍यासाठी उदगीर येथे गेला    होता. उदगीर येथून औषध घेवून येत असताना दुचाकी वाहनावरच वेडाचे झटके येवू लागले. त्‍यामुळे त्‍याने वेडाच्‍या भरात तुरीवर फवारण्‍याचे विकत घेतलेले औषध प्राशन केले. व त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला. हे म्‍हणणे पटत नाही. कारण सदर केसमध्‍ये अर्जदाराने जी कागदपत्रे दिली आहेत त्‍यानुसार व अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार मयत    हा        सन - 2005 ते 2008 पर्यंत डॉ. दिनेश पाटील यांच्‍याकडे मानसिक रुग्‍ण म्‍हणून ईलाज करत होता. तसेच डॉ. मुळे, डॉ.जावेद अत्‍तार, डॉ खान यांच्‍याकडे वेडाच्‍या बाबत ईलाज घेत होता. अशी जर परिस्थिती सिध्‍देश्‍वर शिवपुजे याची होती तर त्‍यास औषध तुरीवर फवारणीचे आणावयास अर्जदाराने का पाठविले हा प्रश्‍न उपस्थित होतो. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍याला वर्षातुन 3 वेळेस वेडाचे झटके येतात तर त्‍यास कोणीही सोबत न पाठवता एकटाच सदरचे औषध फवारणीसाठी आणण्‍यास पाठवले हा एक प्रश्‍न आहे. मनोरुग्‍ण याच्‍या हातात दोन चाकी वाहन देणे म्‍हणजे स्‍वत:च्‍या मृत्‍यूला ओढवून घेणे असे होईल. सदर केसमध्‍ये सिध्‍देश्‍वर शिवपुजे यास दि. 01/12/10 रोजी वेडाचे झटके येत होते. म्‍हणून त्‍याने त्‍या वेडाच्‍या भरात विषारी औषध प्राशन केले. ही बाब अर्जदाराने स्‍वत: सिध्‍द करावयास पाहिजे जर त्‍याला गाडीवर वेडाचे झटके येत होते तर तो गाडी व्‍यवस्थित चालवणार नाही व त्‍याचे मोटार अपघातात निधन झाले असते त्‍याचा मृत्‍यू तसा न होता तो आपली गाडी व्‍यवस्थित लावून त्‍याने औषध प्राशन केलेले आहे. सदर मृत्‍यूस कोणीही जबाबदार नाही असे स्‍वत: अर्जदाराचे चुलते सांगतात. म्‍हणजेच ती आत्‍महत्‍या होते. तसेच हीही बाब दि. 01/12/10 रोजी त्‍याने रागाच्‍या भरात म्‍हणजेच वैतागाने विषारी औषध प्राशनकेले हेहीम्‍हणणे पटत नाही. वैताग येण्‍याचे कारण सांगितलेले नाही. त्‍यामुळे हा मृत्‍यू अपघात होवू शकत नाही. अर्जदाराचा मुलगा हा जरी मनोरुग्‍ण असलातरी त्‍यास दि. 01/12/10 रोजी नेमके काय झाले होते हे पाहणारे कोणीही व्‍यक्‍ती तिथे उपलब्‍ध नाही. व पोलीसांच्‍या पंचनामे व बयाणानुसार अर्जदाराचा मृत्‍यू हा विषारी औषध प्राशन केल्‍याने झालेलाआहे शवविच्‍छेदन अहवालनात असे नमुद केले आहे की विषारी औषधामुळे त्‍याची श्‍वाच्‍छोश्‍वास क्रिया प्रथमत: बंद पडली व नंतर तो बेशुध्‍द   अवस्‍थेत पडला त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. गैरअर्जदारांच्‍या दिलेल्‍या पॉलीसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये आत्‍महत्‍या ही अपवाद आहे. क्‍लॉजमधील येत असल्‍यामुळे तसेच अर्जदाराच्‍या अट क्र. 8 मध्‍ये अपवाद क्र. 3 मध्‍ये चार pre - existing  physical or mental defects, infections हे येत असल्‍यामुळे सदरचा अर्जदाराच आपला मुलगा पुर्वापार पासुन आजारी असल्‍याचे सांगत आहे. न्‍यायमंचात डॉक्‍टरांनी कागदोपत्री पुरावा दिलेला आहे. परंतु सदरचा मृत्‍यू हा त्‍याची मानसिक अवस्‍था बरोबर नसल्‍यामुळे रागा वैतागाने त्‍याने ते औषध पिले असावे असे त्‍याच्‍या भावाचे म्‍हणणे आहे. यावरुन तो त्‍याच्‍या मानसिक आजाराच्‍या भरात त्‍याने औषध पिलेले नसुन रागाच्‍या भरात पिलेले असल्‍यामुळे हे कृत्‍य अपघाती स्‍वरुपाचे आहे. तसा     अहवाल तहसीदाराने त्‍याचा मृत्‍यू हा कलम 174 crpc प्रमाणे लिहिलेला असल्‍यामुळे अर्जदार ही मयत सिध्‍देश्‍वर रामलिंग शिवपुजे यांची म्‍हातारी आई आहे. दि 02/12/10 चे 7 वाजताचे सुमारास पिंपरी शिवारात लक्ष्‍मण गायकवाड यांचे तुरीचे पिकातील     शेतात विषारी औषध पिल्‍याने मृत पालथ्‍या अवस्‍थेत मिळून आला आहे. गैरअर्जदाराने  स्‍वत: त्‍या दिवशी दि. 1/12/10 रोजी गाडीवर वेडाचे झटके येत होते हे सिध्‍द केले नाही. त्‍यासाठी त्‍याचे डॉक्‍टरांचे कोणतेही कागदपत्र न्‍यायमंचात सर्व्‍हेअर कडून मिळवून ते दाखल केलेले नाहीत. म्‍हणून अर्जदारांच्‍या म्‍हणण्‍यावर अवलंबून गैरअर्जदार सिध्‍देश्‍वर रामलिंग शिवपुजे हा पुर्वापार चालत आलेला आजारी आहे, ही बाब त्‍याने कोणत्‍याही कागदपत्राद्वारे सिध्‍द केलेली नाही किंवा जे अर्जदाराने डॉक्‍टरांचे संदर्भ दिले व  जी औषधे दिली ती औषधे पुर्वापार चालत आलेल्‍या मानसिक रोगावर आहेत. ही बाब सिध्‍द करु शकलेले नाहीत. फक्‍त तक्रारी अर्जात म्‍हणणे म्‍हणजे सिध्‍दता होवू शकत नाही त्‍याला त्‍या वेळेस होत होते त्‍याला काय होते कोणालाही प्रत्‍यक्ष दर्शी पुरावा  देता आले नाही. म्‍हणून सदरच्‍या तिन्‍ही पॉलीसीचा ग्राहक आहे. त्‍याचा मृत्‍यू हा विषारी औषध प्राशन केल्‍यामुळे झालेला आहे व तो अपघाती मृत्‍यू आहे. म्‍हणून अर्जदार ही तिन्‍ही विम्‍याच्‍या रक्‍कमेस पात्र    होवू शकतो. म्‍हणून अर्जदारास सदर तीनही पॉलीसी अंतर्गत मिळणारी रक्‍कम रु. 2,80,000/- मंजुर करत आहे. म्‍हणून हे न्‍यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे.

सबब हे न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.

आदेश

1) अर्जदाराची ग्राहक तक्रार क्र. 119/2012, 134/2012, 135/2012 अंशत: मंजुर

   करण्‍यात येत आहे.

2) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, अर्जदारास रुपये 1,00,000/-

   ग्राहक तक्रार क्र. 119/2012 रक्‍कम आदेशाची प्रत प्राप्‍तीपासुन 30 दिवसाच्‍या    

   आत  देण्‍यात यावेत.

3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, अर्जदारास रुपये 80,000/-

  ग्राहक तक्रार क्र. 134/2012 रक्‍कम आदेशाची प्रत प्राप्‍तीपासुन 30 दिवसाच्‍या आत

  देण्‍यात यावेत.

4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, अर्जदारास रुपये 1,00,000/-

  ग्राहक तक्रार क्र. 135/2012 रक्‍कम आदेशाची प्रत प्राप्‍तीपासुन 30 दिवसाच्‍या आत

  देण्‍यात यावेत.

5) उपरोक्‍त गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात येतो की, आदेश क्र. 2,3,4 चे पालन

  मुदतीत न केल्‍यास तक्रार दाखल तारखेपासुन त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज   

  देण्‍यास जबाबदार राहतील.

6) उपरोक्‍त गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात येतो की, प्रत्‍येकी अर्जदारास मानसीक व

  शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत

  प्राप्‍तीपासुन 30 दिवसाच्‍या आत देण्‍यात यावेत.

 


                 

            (श्री. अजय भोसरेकर)     (श्रीमती ए.जी.सातपुते)

                    सदस्‍य                 अध्‍यक्षा

                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.

 

 
 
[HON'BLE MRS. Smt A.G.Satpute]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Ajay Bhosrekar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.