मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र.113/2011 निकाल तारीख –13/09/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) --------------------------------------------------------------------------------------- श्री यशवंत बाळू कदम ...... तक्रारदार पो. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा. विरूध्द 1) शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा –पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा 2) श्री. पंकज यशवंत कदम, रा. पांढरवाडी, पो. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा ....... जाबदार नि.1 खालील आदेश 1) तक्रारदाराच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह तक्रारदारास मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2) सदरची तक्रार आज मंचासमोर अडमीशन हेअरींगसाठी ठेवलेली असून तक्रारदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकूण घेतला या तक्रार प्रकरणातील विरूध्द पक्ष क्र. 2 हा तक्रारदार यांचा मुलगा असून त्याला या तक्रार कामी विरूध्द पक्षकार करण्यात आले आहे. 3) विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी विरूध्द पक्ष क्र. 1 सोबत गैरव्यवहार करून मुदत ठेवीची रक्कम विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली असल्याने त्याला पक्षकार केले असे वकीलांनी म्हणणे मांडले. परंतु प्रकरणाचे अवलोकन करता विरूध्द पक्ष क्र. 2 हा तक्रारदार यांचा सर्व्हीस प्रोव्हाइडर होऊ शकत नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 2 यांचे नाव या प्रकरणातून कमी करण्याची सूचना तक्रारदार व त्यांच्या वकीलांना देण्यात आली त्यामुळे तक्रारदार व त्यांचे वकीलांनी मंचासमोर नि. 6 ला अर्ज दाखल करून तक्रार मागे घेत असल्याचे विषद केले. मंचाने तक्रारदार यांचा अर्ज स्विकृत केला असून त्यानुसार खालील आदेश पारित करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराने नि. 6 वर दाखल केलेल्या अर्जाला अनुसरून सदरचे तक्रार प्रकरण मागे घेण्याची परवानगी देण्यात येते. 2) तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या विरूध्द नव्याने तक्रार दाखल करण्याची सूचना करण्यात येते. व तशी परवानगी देण्यात येते. 3) तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त ऐवज तक्रारदार यांना परत करण्यात यावेत. 4) खर्चाबाबत काही आदेश नाही. सातारा दि. 13/09/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |