Maharashtra

Kolhapur

CC/17/401

Suvarna Ashok Patil - Complainant(s)

Versus

Bank Of Maharashtra & Others 1 - Opp.Party(s)

Sharad Khasnis

28 Mar 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/401
( Date of Filing : 02 Nov 2017 )
 
1. Suvarna Ashok Patil
Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bank Of Maharashtra & Others 1
Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Mar 2019
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

        

      मयत कै. अशोक रामू पाटील यांचे बँक ऑफ महाराष्‍ट्र, नाळे कॉलनी, कोल्‍हापूर येथे बचत खाते क्र. 60208652658 होते.  सदर बचत खातेतून रु.12/- एवढी रक्‍कम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासाठी घेण्‍यात आली.  त्‍याचा मास्‍टर पॉलिसी नं. 630004215पी999990004 असा असून विमा रक्‍कम रु 2,00,000/- इतकी होती व विम्‍याचा कालावधी दि. 1/7/16 ते 31/5/17 असा होता.  तक्रारदार यांचे पती दि. 16/2/17 रोजी आपल्‍या घराच्‍या गॅलरीतून सकाळी 11.00 वा. खाली पडल्‍यामुळे ते जबर जखमी झाले.  त्‍यांना हॉस्‍पीटलमध्‍ये नेले. परंतु दि. 18/2/17 रोजी त्‍यांचे निधन झाले.  सदर अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाणे, कोल्‍हापूर येथे करण्‍यात आली.  पोलीसांनी मयताचा मरणोत्‍तर पंचनामा केला व पोस्‍टमॉर्टेम केले.  शव विच्‍छेदन अहवालात मृत्‍यूचे कारण डोके व छातीला जबर जखम असे केले.  तक्रारदार यांनी दि. 23/6/17 रोजी वि.प.क्र.1 यांना क्‍लेमची सर्व कागदपत्रे दिली. त्‍यांनी ती वि.प.क्र.2 यांचेकडे पाठविली. परंतु त्‍यांनी दि. 4/9/17 रोजीच्‍या पत्राने सदर अपघात हा चक्‍कर येऊन पडल्‍यामुळे झाला आहे व हा नैसर्गिक मृत्‍यू असल्‍यामुळे हा क्‍लेम देता येत नाही असे कळविले.  अशा प्रकारे तक्रारदारांचा न्‍याय्य क्‍लेम नाकारुन वि.प. यांनी सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, तक्रारदाराने विमा कंपनीकडून रु.2,00,000/- मिळावेत, सदर रकमेवर 18 टक्‍केप्रमाणे व्‍याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचे क्‍ल्‍ेम नाकारलेचे पत्र, बचत खात्‍याचा खातेउतारा, पासबुक उतारा, सी.टी.स्‍कॅन रिपोर्ट, हॉस्‍पीटलचा मृत्‍यू कारण दाखला, हॉस्‍पीटलचे पत्र, शवविच्‍छेदन अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा, मृत्‍यू दाखला इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प.क्र.1 यांनी याकामी दि.03/07/18 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल करुन तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे.  वि.प. क्र.1 यांचे कथनानुसार, कै अशोक रामू पाटील यांचा विमा वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे उतरविला होता.  तक्रारदार यांनी सदर अशोक पाटील यांचे मृत्‍यूनंतर वि.प.क्र.1 यांचे शाखाधिकारी यांची भेट घेवून विमा रक्‍कम मिळणेसाठी क्‍लेम फॉर्म भरुन दिला व सोबत आवश्‍यक कागदपत्रे दिली.  वि.प.क्र.1 यांनी सदरची कागदपत्रे वि.प.क्र.2 यांचेकडे पाठविली होती.  परंतु वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांना ईमेल पाठवून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ फक्‍त विमेधारकाचा अपघाती मृत्‍यू झालेस मिळू शकतो, नैसर्गिक मृत्‍यू झालेस मिळत नाही असे कळविले.  वि.प.क्र.1 यांचेवर विमा रक्‍कम देणेची कोणतीही जबाबदारी नाही.  वि.प.क्र.1 यांचेवर सोपविलेली जबाबदारी त्‍यांनी काळजी व खबरदारी घेवून मुदतीत पार पाडलेली आहे.  सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. क्र.1 यांनी केली आहे.

 

4.    वि.प.क्र.2 यांनी ता. 5/1/18 रोजी म्‍हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  क्‍लेमची कागदपत्रे मिळाल्‍यानंतर सदरचे कागदपत्रांची पाहणी करता, मयताला फिट आल्‍यामुळे खाली पडून नैसर्गिक मृत्‍यू झालेला आहे.  सदरचा मृत्‍यू हा अपघाती मृत्‍यू नाही. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्‍या अटी व शर्ती या अपघाती मृत्‍यूस लागू असून नैसर्गिक मृत्‍यूस नाहीत.  त्‍या कारणाने तक्रारदारांचा क्‍लेम वि.प. विमा कंपनी यांनी योग्‍य त्‍या कारणाने नाकारलेला असलेने वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. 

 

5.    वि.प. क्र.1 यांनी याकामी विमा योजनेचा फॉर्म, वि.प.क्र.1 यांचे पत्र, तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 कडे दिलेला फॉर्म, तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 याचेकडे दिलेले अदायगी पत्र, मयताचा मृत्‍यू दाखला, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, विमा पावती, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.    तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.1 व 2 यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

वि.प. क्र.2 यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

2

तक्रारदार हे पॉलिसीची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    प्रस्‍तुतकामी कै अशोक रामू पाटील यांचे बँक ऑफ महाराष्‍ट्र कॉलनी, कोल्‍हापूर येथे बचत खाते क्र. 60208652658 होते. त्‍यांचे बचत खातेमधून रक्‍कम रु.12/- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) यासाठी घेण्‍यात आले.  त्‍याचा पॉलिसी क्र. 1630004215P999990004 असून विमा रक्‍कम रु. 2,00,000/- आहे. विमा कालावधी ता. 1/7/16 ते 31/5/17 असा होता.  विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाब‍त वाद नाही.  तक्रारदार यांचे पती ता. 16/2/17 रोजी घराच्‍या गॅलरीतून सकाळी 11.00 वाजता खाली पडल्‍यामुळे जबर जखमी झाले.  त्‍यांचेवर सी.पी.आर.हॉस्‍पीटल कोल्‍हापूर व पुढील उपचारासाठी सिटी हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे उपचार केले.  तथापि ता. 18/2/17 रोजी तक्रारदारांचे पतीचे निधन झाले.  तक्रारदार यांनी सर्व क्‍लेमची कागदपत्रे ता. 23/6/11 रोजी वि.प.क्र.1 यांचेमार्फत वि.प.क्र.2 यांना पाठविली असता वि.प.क्र.2 यांनी ता. 4/9/17 रोजी तक्रारदारांचे पतीला चक्‍कर आल्‍यामुळे ते गॅलरीतून खाली पडून नैसर्गिक मृत्‍यू आल्‍यामुळे सदरचा तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला.  सबब, तक्रारदारांनी वि.प. क्र.1 मार्फत वि.प.क्र.2 यांचेकडे विमा हप्‍त्‍याची रक्‍कम अदा करुन देखील सदर कारणाने तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य विमा क्‍लेम वि.प.क्र.2 यांनी नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प.क्र.1 यांचे म्‍हणणेचे अवलोकन केले असता वि.प.क्र.1 ही बँकींग व्‍यवसाय करणारी बँक आहे.  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत वि.प.क्र.1 बँकेला त्‍यांचे खातेदारांचे विनंतीनुसार खातेदारांचा विमा वि.प.क्र.2 यांचेकडे उतरविणेचा होता.  त्‍यानुसार वि.प.क्र.1 यांनी दि. 2 जून 2015 रोजी मयत अशोक पाटील याचा विमा अर्ज व कागदपत्रे वि.प.क्र.2 यांचेकडे पाठविलेली होती व त्‍यानुसार वि.प.क्र.2 यांनी विमा उतरविलेला होता.  तसेच कै. अशोक रामू पाटील यांचे मृत्यूनंतर क्‍लेम फॉर्म व त्‍यासोबतची कागदपत्रे वि.प.क्र.2 यांचेकडे पाठविलेली होती. सदरची बाब तक्रारदार यांना मान्‍य व कबूल आहे. त्‍याबाबत कोणताही वाद नाही.  सबब, सदर वि.प.क्र.1 यांचे कथनावरुन वि.प.क्र.1 यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेमार्फत त्‍यांचेवर सोपविणेत आलेली जबाबदारी योग्‍य ती काळजी व खबरदारी घेवून मुदतीत पार पाडलेली असलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सबब, वि.प.क्र.1 ही बँक असलेने तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्‍कम देणेची वि.प.क्र.1 यांची जबाबदारी नाही असे या मंचाचे मत आहे.  त्‍याकारणाने प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 यांना हे मंच जबाबदार धरीत नाही.

 

8.    तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या शवविच्‍छेदनाचा पोलिस अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा अहवाल यामध्‍ये मयत हे राहते घरात गॅलरीतून चक्‍कर आल्‍याने खाली पहिल्‍या मजल्‍यावरुन पडून जखमी झाले व त्‍यांना औषधोपचारासाठी दाखल केले असता मयत झाले असे नमूद आहे.  तसेच वि.प.क्र.2 यांनी दाखल केले म्‍हणणेचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा फिट/चक्‍कर आल्‍यामुळे खाली पडून नैसर्गिक मृत्‍यू झाला असून सदरचा मृत्‍यू अपघाती नसलेने सदरचा क्‍लेम देय नाही असे नमूद केले आहे.  तथापि, तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता घटनास्‍थळ पंचनामामध्‍ये घरातील गॅलरीतून खाली पडले असे नमूद आहे.  तसेच पोस्‍टमार्टेम रिपोर्ट व मृत्‍यूचा दाखला यांचे अवलोकन केले असता, Opinion as to the cause probable cause of death – Head injury with chest trauma असे नमूद आहे.  दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पती कै अशोक रामू पाटील हे त्‍यांचे डोके व छातीला जबर जखम झालेने उपचारादरम्‍यान मयत झालेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  तसेच तक्रारदारांनी ता.17/1/18 रोजी या मंचात डॉ पद्माकर सरोदे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे. डॉ पद्माकर सरोदे हे तक्रारदार यांचे फॅमिली डॉक्‍टर आहेत असे तक्रारदार यांनी लेखी युक्तिवादामध्‍ये कथन केले आहे.  सदरचे प्रमाणपत्राचे या मंचाचे अवलोकन केले असता, Ashok Ramu Patil is known to me.  He had no HTN, Epilepsy or any Neurological abnormalities असे नमूद असून त्‍यावर सदर डॉक्‍टरांची सही आहे.  सदरचे प्रमाणपत्रावरुन मयत अशोक रामू पाटील यांना कोणताही मेंदुशी निगडीत आजार नव्‍हता हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सदरचे पत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही.  वि.प. यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदारांचे मयत पतीस चक्‍कर आलेने पडल्‍यामुळे नैसर्गिक मृत्‍यू आल्‍याचे कथन केले आहे.  तथापि त्‍या अनुषंगाने वि.प. यांनी कोणताही वैद्यकीय पुरावा या मंचात दाखल केलेला नाही.  वि.प. यांनी त्‍यांची कथने पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाहीत.  त्‍या कारणाने पुराव्‍याअभावी वि.प.क्र.2 यांचे म्‍हणणे हे मंच विचारात घेत नाही.  सबब, दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू हा घरच्‍या गॅलरीतून खाली पडल्‍यामुळे डोके व छातीला जबर जखम झालेने उपचारादरम्‍यान झाला असलेचे सिध्‍द होते. त्‍या कारणाने तक्रारदारांचे पतीचा अपघाती मृत्‍यू असलेने वि.प.क्र.2 यांनी पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता केवळ तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू हा नैसर्गिक असल्‍याचे सांगून तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

 

मुद्दा क्र.2 व 3     

 

9.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  त्‍याकारणाने तक्रारदार हे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) चे पॉलिसी नं. 1630004215P999990004 अंतर्गत विमा क्‍लेमची रक्‍कम रु.2,00,000/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 7/11/2017 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  प्रस्‍तुत कामी वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला.  त्‍याकारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचेकडून मानसिक व शारिरिक  त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4  -  सबब आदेश.

 

- आ दे श -                     

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. क्र.2 यांनी तक्रारदार यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) पॉलिसी क्र.1630004215P999990004 अंतर्गत विमा पॉलिसीची रक्‍कम रु. 2,00,000/- अदा करावी.  तसेच सदर रकमेवर दाखल तारीख 7/11/17 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.2  यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. क्र.2 विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.