Maharashtra

Nagpur

CC/731/2018

SOU. KALYANI SATISH BANTE - Complainant(s)

Versus

BANK OF MAHARASHTRA - Opp.Party(s)

SELF

13 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/731/2018
( Date of Filing : 14 Dec 2018 )
 
1. SOU. KALYANI SATISH BANTE
FUTALA, NEAR SANTOSHI MATA MANDIR, AMRAVATI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF MAHARASHTRA
BHARAT NAGAR, BHATKAR BUILDING AMRAVATI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Feb 2020
Final Order / Judgement

       

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे बचत खाते क्रं. 60233469583 आहे. तक्रारकर्तीला दिनांक 31.08.2018 रोजी सकाळी 9.47 मि. वर मोबाईलवर मॅसेज आला की, रुपये 15,000/- काढण्‍यात आले आहे व त्‍वरित बॅंक मध्‍ये गेल्‍यावर दुपारी 12.00 वा. तपासणी केली असता कळले की, बॅंकेच्‍या बचत खात्‍यातून 2 वेळा रक्‍कम काढण्‍यात आली. परंतु यावेळी ए.टी.एम.कार्ड हा तक्रारकर्तीच्‍या जवळच होते. याचा अर्थ ए.टी.एम.कार्ड न वापरताच तक्रारकर्तीच्‍या खात्‍यामधून रक्‍कम काढण्‍यात आली होती. म्‍हणून तक्रारकर्तीने बॅंकेत याबाबतची तक्रार केली असता वि.प.च्‍या मॅनेजर ने  ATM withdrawa complaint letter भरण्‍यास सांगितले व जवळ असलेल्‍या अंबाझरी पोलिस स्‍टेशनला तक्रार करण्‍यास सांगितले. पोलिसांनी सदरची तक्रार न स्‍वीकारता तक्रारकर्तीला सायबर ब्रान्‍च मध्‍ये जाण्‍यास सांगितले. सायबर क्राईम ब्रान्‍चने तक्रारकर्तीच्‍या कार्डची तपासणी केली असता त्‍यांना तक्रारकर्तीच्‍या ए.टी.एम.कार्डची क्‍लोनिंग (नक्‍कल) झाली असल्‍याचे शंका जाहीर केली आणि तक्रारकर्तीला पुन्‍हा अंबाझरी पोलिस स्‍टेशनला तक्रार करण्‍यास सांगितले. त्‍यानंतर दि. 31.08.2018 ला अंबाझरी पोलिस स्‍टेशनने तक्रारकर्तीकडून लिखित स्‍वरुपाची तक्रार नोंदविली व तिच्‍याकडून सर्व आवश्‍यक दस्‍तऐवज जसे – बॅंक विवरण, आय.डी.प्रुफ इत्‍यादी स्‍वीकारले. त्‍यानंतर दि. 11.09.2018 ला तक्रारकर्ती बॅंकेत विचारणा करण्‍यास गेली असता बॅंक मॅनेजरने त्‍यांना माहिती दिली की, चोरी झालेल्‍या पैशाचे विवरण दिल्‍यानुसार ज्‍या ए.टी.एम. मशिन मधून रक्‍कम काढण्‍यात आली (SBI Chhaoni Branch ATM Nagpur Main Location SINB005999001 )वेळ 9.13.56 आणि दुसरे 09.14.52 ला रक्‍कम काढण्‍यात आले. परंतु तक्रारकर्तीला केवळ रक्‍कम रुपये 10,000/- काढण्‍याचाच मॅसेज प्राप्‍त झाला परंतु रुपये 5,000/- निकासी झाल्‍याचा मॅसेज आला नाही. त्‍यानंतर वि.प. बॅंकेच्‍या व्‍यवस्‍थापकाने सांगितले की,  ATM च्‍या CCTV Footage चे पोलिसांकडून निरीक्षण करावे. परंतु आजतागायत पोलिसांद्वारे सदरच्‍या घटनेची शहनिशा करण्‍यात आली नाही. एवढेच नव्‍हेतर तक्रारकर्तीने पोलिस स्‍टेशनला दि. 31.08.2018 रोजी नोंदविलेली तक्रारी सुध्‍दा हरविली आहे व तेव्‍हापासून तक्रारकर्ती निव्‍वळ पोलिस स्‍टेशन मध्‍ये व बॅंके मध्‍ये जाऊन विचारणा करीत आहे. परंतु यावर ही काहीही निष्‍कर्ष निघाला नाही. तसेच तक्रारकर्तीला रक्‍कम सुध्‍दा परत मिळाली नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाच्‍या चुकिमुळे तक्रारकर्तीच्‍या खात्‍यातून निकासी झालेली रक्‍कम रुपये 15,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी. तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या  शारीरिक, मा‍नसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
  2.      विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ लेखी जबाब दाखल केला नाही. म्‍हणून दि. 16.04.2019 रोजी विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  3.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्‍यात आला असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

               अ.क्रं.        मुद्दे                                    उत्‍तर

1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?   होय
  2.     काय आदेश ?                                     अंतिम आदेशानुसार

 

  •  निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्तीचे विरुध्‍द पक्ष बॅंकेत बचत खाते क्रं. 60233469583 असे आहे. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. दिनांक 31.08.2018 रोजी सकाळी 9.47 वा. तक्रारकर्तीच्‍या मोबाईलवर रक्‍कम काढण्‍यात आल्‍याबाबतचा मॅसेज आला. परंतु त्‍यावेळी सदरचे ए.टी.एम. कार्ड हे तक्रारकर्तीच्‍या जवळ असतांना सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या बचत खात्‍यातून ए.टी.एम. कार्डचा नंबरचा वापर करुन तक्रारकर्तीच्‍या बचत खात्‍यातून रक्‍कम रुपये 15,000/- ही काढण्‍यात आली होती. सदरच्‍या रक्‍कमेबाबत तक्रारकर्तीने बॅंकेत विचारणा केली असता तिला समाधानकारक उत्‍तर प्राप्‍त झाले नाही व वि.प. बॅंकेच्‍या व्‍यवस्‍थापकांनी तिला पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार नोंदविण्‍यास सूचविले. त्‍याप्रमाणे तक्रार नोंदवून सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या तक्रारीची योग्‍य ती दखल घेण्‍यात आली नाही.
  2.        उपरोक्‍त घटनेवरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीचे ए.टी.एम.कार्ड हे तक्रारकर्ती जवळ असतांना सुध्‍दा कुणी अज्ञात इसामानी तक्रारकर्तीच्‍या बचत खात्‍यातून परस्‍पर रक्‍कम काढली. त्‍यावेळी तक्रारकर्तीला निव्‍वळ रुपये 10,000/- काढण्‍यात आल्‍याचा मोबाईलवर मॅसेज आला परंतु त्‍याचवेळी रुपये 5,000/- काढण्‍यात आल्‍याचा मॅसेज आला नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे. भारतीय रिझर्व  बॅंक यांनी काढलेल्‍या सरक्‍युलर नं. DBR.No.Leg.BC.78/09.07.005/2017-18, Dt. 6 July 2017 प्रमाणे अशा प्रकरणात तक्रारकर्ते यांची झिरो लॅबलिटी आहे. म्‍हणून वर्तमान तक्रार मंजूर करणे योग्‍य आणि वाजवी आहे असे आमचे मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                    अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या बचत खात्‍यातून ए.टी.एम. द्वारे काढण्‍यात आलेली रक्‍कम रुपये 15,000/- परत करावी व सदरच्‍या रक्‍कमेवर दि. 31.08.2018 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्तीला परत करावी.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.