Maharashtra

Nagpur

CC/532/2018

SMT. VIJAYSHREE RAMESH MOHOD - Complainant(s)

Versus

BANK OF MAHARASHTRA, THROUGH THE CHAIRMAN - Opp.Party(s)

ADV. RAMESH MOHOD

03 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/532/2018
( Date of Filing : 13 Aug 2018 )
 
1. SMT. VIJAYSHREE RAMESH MOHOD
R/O. PANDHRABODI, NO. 11, AMBAZARI HILTOP, NEAR WATER TANK, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF MAHARASHTRA, THROUGH THE CHAIRMAN
LOK MANGAL 1501, SHIVAJI NAGAR, PUNE-411005
PUNE
MAHARASHTRA
2. BANK OF MAHARASHTRA, THROUGH ZONAL OFFICER/ MANAGER
MUNJE CHOWK, SITABURDI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. BANK OF MAHARASHTRA, THROUGH BRANCH MANAGER
DHARMPETH BRANCH NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Dec 2019
Final Order / Judgement

 

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्ती यांची मय्यत आई श्रीमती रेखा वासुदेवराव निचळ ह्या गैरअर्जदार क्रमांक ३/बॅंक यांची ग्राहक होती व तिची लहाण मुलगी (तक्रारकर्तीची लहान बहिण) श्रीमती सीमा सुनिल चरडे ही संयुक्‍त  खातेदार व नॉमिनी होती. तक्रारकर्तीची आई दवाखान्‍यात भरती असतांना संयुक्‍त खातेदार श्रीमती सिमा चरडे हिने बॅंक विड्रॉल वर सही केली नाही त्‍यामुळे मय्यत आईला जीवंतपणी तिचीच जमा रक्‍कम उपचारासाठी काढता आली नाही. परिणामी ती दिनांक २/९/२०१७ रोजी दवाखान्‍यातच मरण पावली. मय्यत आईने तिचे मृत्‍यु पूर्वी गैरअर्जदार क्रमांक ३ यांना दिनांक १०/०७/२०१७ रोजी पुर्व सुचना देवून सुध्‍दा त्‍यांनी संयुक्‍त खातेदार श्रीमती सीमा सुनिल चरडे हिला वारसांन प्रमाणपञाशिवाय आणि तक्रारकर्ती हिस्‍सेदार हिची सम्‍मती न घेताच पुर्ण पेमेंन्‍ट केले आहे. याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना माहितीच्‍या अधिकारात नॉमिनीला दिलेल्‍या पेमेंट ची माहिती मागितली असता त्‍यांनी माहिती देण्‍यास नकार दिला आहे. म्‍हणून संयुक्‍त खातेदार/नॉमिनीने कोणत्‍या तारखेला किती रक्‍कमा काढल्‍या याची तक्रारकर्तीला माहित होऊ शकली नाही.
  3. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक १ यांना नोटीस पाठवुन नुकसान भरपाई ची रक्‍कम मागितली. परंतू नोटीसचे उत्‍तर नकारार्थी मिळाले.
  4. तक्रारकर्ती ही मय्यत आईची सख्‍खी मुलगी व कायदेशीर वारसदार असल्‍याने तिच्‍या हिश्‍याची येणारी रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडुन वसुल होण्‍यासाठी व तसा आदेश मिळण्‍यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे.
  5. तक्रारकर्तीच्‍या प्रार्थनेप्रमाणे मय्यत बॅक खातेदार श्रीमती रेखा वासुदेवराव निचळ यांनी त्‍यांचे जीवंतपणे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना दिनांक १०/०७/२०१७ रोजी पाठविलेल्‍या महत्‍वपूर्ण लेखी सुचनेची दखल न घेता नॉमिनीला केलेल्‍या रुपये ५,२०,०००/- पेक्षा जास्‍त पेमेंट ची कृती ही विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चे सेवेतील कमतरता व ञुटी ठरते, त्‍यामुळे तक्रारकर्तीला तिच्‍या ५० टक्‍के हिश्‍याच्‍या रकमेचे नुकसान झालेले आहे, असे घोषित करावे.
  6. तक्रारकर्तीला तिच्‍या हिश्‍याची रक्‍कम रुपये २,५०,०००/- व रुपये १०,०००/- (उचलल्‍या पेन्‍शनची अर्धी रक्‍कम) नऊ टक्‍के व्‍याजदराने तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीच्‍या खर्च रुपये १५,०००/- अदा करण्‍यास मंचाने घोषित करावे.
  7. वरील प्रमाणे तक्रारकर्तीने मागितलेली रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडुन वसुल करुन तक्रारकर्त्‍यास देण्‍याची जबाबदारी पार पाडावी असे आदेशीत व्‍हावे.
  8. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ च्‍या म्‍हणण्‍यानुसार ग्राहक संरक्षण कायदाचे कलम १ ते ५ अनुसार तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक नाही. कारण  तक्रारकर्तीचे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ च्‍या बॅंकेत खाते नाही. त्‍याचप्रमाणे तिचे कोणासोबत संयुक्‍त खाते सुद्धा नाही व ती कोणत्‍याही दृष्‍टीने बॅकेच्‍या खात्‍याशी संलग्‍न नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीची ही तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्तीच्‍या आईचे म्‍हणजेच रेखा वासुदेव निचळ यांचे त्‍यांची मुलगी श्रीमती सिमा सुनिल चरडे यांचेसोबत संयुक्‍त खाते होते व हे खाते कोणीही एक चालवू शकत होते.  श्रीमती रेखा वासुदेव निचळ वृद्ध स्‍ञी होती. परंतू विरुध्‍द पक्षास हे माहित नव्‍हते की ते ॠदय रोगाने पिडीत आहे. श्रीमती रेखा निचळ व श्रीमती सिमा चरडे या दोघींनी स्‍वतःच्‍या खुशीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे खाते उघडले होते व त्‍या दोघी मिळुन ते खाते चालवित होत्‍या. जेव्‍हा कधी दोघींपैकी एक जण बॅंकेत खात्‍याच्‍या उपयोग करण्‍याकरीता येत होते तेव्‍हा बॅक त्‍यांना सहकार्य करीत होते. विरुध्‍द पक्षाने त्‍यांचे खाते कधीही गोठविले नाही. या दोघींपैकी कोणीही एकजण बॅंक खाते चालवु शकत असल्‍यामुळे बॅंकेला सक्‍शेसन स‍र्टीफीकेट मागविण्‍याची आवश्‍यकता पडली नाही. श्रीमती सिमा चरडे हीचे सौ रेखा निचड सोबत केवळ संयुक्‍त खातेच नव्‍हते तर ती रेखा निचड ची वारसदार सुद्धा होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीसोबत कधीही उध्‍टट भाषेत बोलली नाही. बॅंक/विरुध्‍द पक्षाचे असे म्‍हणणे आहे की, माहिती अधिकार कायदान्‍वये कोणत्‍याही व्‍यक्‍तीची खाजगी माहिती तिस-या पक्षाला देता येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास माहिती दिली नाही असा आरोप ती बॅंकेवर लावु शकत नाही. त्‍यामुळे सदरच्‍या प्रकरणात विरुध्‍द पक्ष कोणत्‍याही कारणाणे जबाबदार नाही व विरुध्‍द पक्षाने आपल्‍या सेवेत कोणतेही ञुटी केली नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार रुपये २०,०००/- सह खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
  9. तक्रारकर्तीने आपल्‍या लेखी युक्‍तीवादान म्‍हटल्‍याप्रमाणे श्रीमती रेखा निचड यांचे खाते क्रमांक २००५६६२००६१ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३/ बॅंक ऑफ महाराष्‍ट्र यांचेकडे स्‍वेच्‍छेने काढलेले होते. श्रीमती रेखा निचड ही वृद्ध स्‍ञी असुन ती रुदयरोगाने पिडीत होती त्‍यामुळे तिने स्‍वतःची मुलगी श्रीमती रेखा चरडे यांचेसोबत संयुक्‍त खाते उघडले. कारण तक्रारकर्तीच्‍या औषधोपचार किंवा आवश्‍यकतेनुसार त्‍वरीत पैसे काढता यावे.
  10. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल दस्‍ताऐवज, प्रतिउत्‍तर, लेखी युक्‍तीवाद व विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब, लेखी युक्‍तीवाद व उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे नोंदविले आहे.

       अ.क्र.            मुद्दे                                                               उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा                         होय

दिली काय ?                                                                             

  1. काय आदेश ?                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

  1. तक्रारकर्त्‍याची मय्यत आई श्रीमती रेखा वासुदेवराव निचळ ह्या गैरअर्जदार क्रमांक ३ ची बॅंक ग्राहक होती व तिची लहान मुलगी (तक्रारकर्त्‍याची लहान बहीण) श्रीमती सीमा सुनिल चरडे ही संयुक्‍त  खातेदार व नॉमिनी होती.तक्रारकर्त्‍याची आई दवाखान्‍यात भरती असतांना संयुक्‍त खातेदार श्रीमती सिमा चरडे हिने बॅंकेतील पैसे काढण्‍याच्‍या  पावतीवर सही केली नाही.  त्‍यामुळे मय्यत आईला जीवंतपणी तिची स्‍वतःचीच जमा रक्‍कम उपचारासाठी काढता आली नाही. परिणामी ती दिनांक २/९/२०१७ रोजी दवाखान्‍यातच मरण पावली. मय्यत आईने तिचे मृत्‍यु पूर्वी गैरअर्जदार क्रमांक ३ यांना दिनांक १०/०७/२०१७ पुर्व सुचना देवुन सुध्‍दा त्‍यांनी संयुक्‍त खातेदार श्रीमती सीमा सुनिल चरडे हिला वारसान प्रमाणपञाशिवाय आणि तक्रारकर्ती हिस्‍सेदार हिची सम्‍मती न घेताच पुर्ण पेमेंन्‍ट केले आहे. याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना माहितीच्‍या अधिकारात नॉमिनीला दिलेल्‍या पेमेंट ची माहिती मागितली असता त्‍यांनी माहिती देण्‍यास नकार दिला होता. म्‍हणून संयुक्‍त खातेदार/नॉमिनीने कोणत्‍या तारखेला किती रक्‍कमा उचल्‍यात याची तक्रारकर्तीला माहित होऊ शकली नाही.
  2. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्रमांक १ यांना नोटीस पाठवुन नुकसान भरपाई ची रक्‍कम मागितली. परंतू नोटीसचे उत्‍तर नकारार्थी मिळाले.
  3. तक्रारकर्ती ही मय्यत आईची सख्‍खी मुलगी व कायदेशीर वारसदार असल्‍याने तिच्‍या हिश्‍याची येणारी रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडुन वसुल होण्‍यासाठी व तसा आदेश मिळण्‍यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे. व विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्ती ही बॅंकेची ग्राहक नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या प्रती विरुध्‍द पक्षाची कोणतीही जबाबदारी नाही असे त्‍यांनी आपल्‍या लेखी जबाबात स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे परंतू तक्रारकर्तीने दाखल केलेले निशानी क्रमांक ४ वरील दस्‍त क्रमांक २ प्रमाणे श्रीमती रेखा निचळ हिने स्‍वतःच्‍या मृत्‍युपूर्वी म्‍हणजे दिनांक १०/०७/२०१७ रोजी बॅंकेत पञ पाठविले होते की, उपरोक्‍त संयुक्‍त खात्‍यामध्‍ये जमा असलेली रक्‍कम ही केवळ श्रीमती रेखा निचळ यांची आहे व आवश्‍यकतेनूसार रक्‍कम त्‍वरीत काढता यावे  याकरीता श्रीमती सिमा चरडे यांना संयुक्‍त खातेदार म्‍हणून ठेवण्‍यात आले होते. बॅंकेच्‍या रेकॉर्डवर दिनांक १८/०६/२०१७ च्‍या पञाप्रमाणे श्रीमती रेखा निचळ यांच्‍या आजारात सुद्धा श्रीमती सिमा हिने संयुक्‍त खात्‍यातील रकमा काढु दिल्‍या नाही. श्रीमती रेखा निचळ यांचे मृत्‍युनंतर त्‍यांच्‍या खात्‍यातील संयुक्‍त  रकमांमध्‍ये त्‍यांची मोठी मुलगी श्री विजयश्री रमेश मोहोड हीचा सारखा हिस्‍सा असल्‍यामुळे श्रीमती सिमा यांना रकमा काढु देण्‍यात येऊ नये आणि त्‍याकरीता वारसान प्रमाणपञाची अट ठेवण्‍यात यावी अशी पूर्वसुचना असलेले पञ बॅंकेत दिले आहे व त्‍या पञावर बॅंकेचा शिक्‍का देखील लागला आहे. त्‍यानंतर दस्‍ताऐवज क्रमांक ३ व ४  वर माहितीच्‍या  अधिकारात मागविलेली माहिती चा फॉर्म दाखल आहे. दस्‍त क्रमांक ५ वर वकीलामार्फत पाठविलेली नोटीस आहे व त्‍याचे उत्‍तर दस्‍त क्रमांक ६ वर आहे. या सर्व दस्‍तऐवजांवरुन असे दिसुन येते की, मय्यत रेखा निचळ हिने मृत्‍युपूर्वी बॅंकेत सुचना पञ दिले होते व त्‍यात स्‍पष्‍टपणे नमुद केले होते की, संयुक्‍त बॅंकेत उघडलेल्‍या खात्‍यातील संपूर्ण रक्‍कम ही मय्यत रेखा निचळ यांचीच होती. श्रीमती सिमा चरडे यांनी त्‍या संयुक्‍त खात्‍यात स्‍वतःचे वैयक्तिक पैसे गुंतविले नव्‍हते. श्रीमती सिमा चरडे यांना केवळ आवश्‍यकतेनुसार बॅंकेतुन पैसे काढण्‍याकरीता संयुक्‍त खातेदार बनविले होते. मय्यत रेखा निचळ यांची मोठी मुलगी श्रीमती विजयश्री मोहोड हिचा देखील त्‍या रकमेवर अर्धा वाटा होता. बॅंकेला मय्यत रेखा निचळ यांनी बॅंकेला मृत्‍युपूर्वी पूर्वसुचना  दिल्‍यानंतरही बॅंकेने त्‍या सुचनेचे पालन न करता संपूर्ण रक्‍कम श्रीमती सिमा चरडे हिला दिली. ही बॅंकेच्‍या सेवेतील ञुटी दिसुन येते.
  4. तक्रारकर्तीने त्‍यांच्‍या समर्थनार्थ खालिल न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.
    1. I (1992) CPJ 302 (NC), M/s Cosmopolitan Hospitals & Anr. Vs. Vasantha P. Nair

यात म्‍हटलयाप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम २(१) (d) नूसार ग्राहक या व्‍याख्‍येमध्‍ये मय्यताचे वारसदार हे देखील ग्राहक होतात असा या न्‍यायनिवाड्याचा अर्थ निघतो.

  1. Dena Bank Vs. H.V. Patel, IV (2005)CPJ 180 (NC). यात म्‍हटल्‍याप्रमाणे कलम २१ प्रमाणे बॅंकेतर्फे कोणत्‍याही प्रकारची ञुटी झाल्‍यास त्‍यांना व्‍याजासह नुकसान भरपाई देणे आवश्‍यक राहील.
  2. Shanti Devi Vs. Bhojpur Rohtas Gramin Bank, IV (2006)CPJ 83 (NC). यात नमुद केले आहे की, ‘‘ Consumer Protection Act, 1986 Section 2(1)(g) Contract Act, 1872 Section 45 Banking and Financial Services Joint account Devolution of joint rights complainant joint account holder with husband with mandate either or survivor  Such mandate withdrawn State Commission justified in holding that Bank could not allow operation of account by one of account holders alone, without succession certificate. Complainant entitled to release of amount in her favour if other heirs give consent and have no objection.
  1. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या बॅंकेच्‍या संयुक्‍त खात्‍याच्‍या  नियमावलीप्रमाणे ‘ Banking Laws (Amendment) Act 1983 (Act 1 of 1984) has introduced Sec. 45ZA to 45 ZF which provide inter alia that the depositor or all the joint depositors may nominate  any person to whom in the event of the death of the sole depositor or the death of all the depositors, the amount of deposit may be returned by the banking company. Such nominee of the depositor shall become entitled to all the rights of the depositor on his death to the exclusion of all other persons, unless the nomination has been varied or cancelled payment by a Bank to the nominee shall constitute full discharge to the Bank. Similar provisions have also been made in respect of the articles kept in the safe custody with the bank or safe deposit lockers. The details and forms of nomination are governed by the Banking Companies (Nomination) Rules 1985.
  2. वरील सर्व न्‍यायनिवाडे व बॅंकेच्‍या नियमावलीवरुन असे दिसुन येते की, बॅंकेने मय्यत रेखा निचळ हिच्‍या खात्‍यातील संपूर्ण रक्‍कम केवळ सिमा चरडे हिला दिली त्‍याकरीता त्‍यांनी मय्यत रेखा निचळ चे वारसांन प्रमाणपञ (Succession Certificate) मागितले नाही. सबब वरील न्‍यायनिवाड्याप्रमाणे Rights of Survivor चे आदेश मय्यत रेखा निचळ यांनी योग्‍य प्रकारे दिनांक १०/०७/२०१७ रोजी बॅंकेला कळवून मागे घेतले होते व बॅंकेतर्फे त्‍या पञावर बॅंकेचा शिक्‍का व सही आहे. मय्यत व्‍यक्‍तीच्‍या  सर्व वारसानांचे प्रमाणपञ न घेता केवळ संयुक्‍त खाते होते म्‍हणून त्‍या व्‍यक्‍तीला संपूर्ण रक्‍कम देणे ही बॅंकेची ञुटी आहे असे वरील राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यायनिवाड्यांवरून दिसुन येते. करीता अंतिम आदेश खालिलप्रमाणे..

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी संयुक्तिकरीत्‍या किंवा वैयक्तिकरित्‍या तक्रारकर्तीने मागितलेली तिच्‍या हिश्‍याची रक्‍कम रुपये २,५०,०००/- व रुपये १०,०००/- (उचललेल्‍या पेन्‍शची अर्धी रक्‍कम) श्रीमती रेखी निचळ यांचा मृत्‍युचा दिनांक २/९/२०१७ ते  तक्रारकर्तीच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो  ९ टक्‍के व्‍याज दराने देण्‍यात यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासाकरीता रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावी.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.