तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांची लेखी कैफियत, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. यावरुन खालीलप्रमाणे निष्कर्ष मंचाने काढला आहेः
अ. महात्माफुले महामंडळाने ता.14.07.2009 रोजी तक्रारदारांचा प्रस्ताव मंजुर केला.
ब. महात्माफुले मागासवर्गीय महामंडळाने बँकेकडे ता.04.09.10 रोजी पत्रान्वये रु.30,000/- रकमेचा चेक पाठवला तसेच ता.30.09.10 रोजीच्या पत्रान्वये रु.10,000/- सबसिडीच्या रकमेचा चेक पाठवला.
क. सामनेवाले बँकेने ता.22.01.2011 रोजी तक्रारदारांना रु.1,50,000/- एवढया रकमेचे कर्ज मंजुर केले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ता.20.12.2010 रोजी कर्ज करार (Hypothecation Agreement) झाला.
ड. तक्रारदार यांनी ता.23.02.2007 व ता.18.09.2010 रोजीचे गाळा भाडे करार बँकेने कर्ज मंजुर करण्यापुर्वी केले आहेत. तक्रारदारांनी ता.21.12.2010 रोजी सर्व बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र सामनेवाले बँकेकडे दाखल केल्यानंतर तक्रारदारांना कर्ज मंजुर करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सामनेवाले बँकेचे कर्ज मंजुर होण्यापुर्वी गाळे भाडे करार केला व त्यामध्ये लाकडी फर्निचर स्वखर्चाने बसविले. परंतु तक्रारदारांनी यासर्व बाबी कर्ज मंजुरी पुर्वी केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भातील नुकसानभरपाईची जबाबदारी सामनेवाले बँकेवर येत नाही हे स्पष्ट होते.
इ. तक्रारदारांनी सामनेवाले बँके विरुध्द फौजदारी न्यायालयात भा.द.वि. कलम-420, 323, 504, 506, 34 सह तक्रार दाखल केली आहे.
ई. तक्रारदारांनी ता.10.08.2011 रोजीच्या गाळा भाडे करारानुसार किराणा शॉप सुरु करावयाचे ठरले होते. तक्रारदारांनी मानसी इंटेरियर व फर्निचर यांचे ता.04.01.2011 रोजीचे कोटेशन दाखल केले आहे. सामनेवाले बँकेने सदर कोटेशनमध्ये नमुद केलेले फर्निचर घेण्यासाठी मानसी इंटेरियर व फर्निचर यांचे नाव रु.80,000/- रकमेचा धनाकर्ष तक्रारदारांना दिला. सदर धनाकर्ष मानसी इंटेरियार व फर्निचर यांना ता.17.01.2011 रोजी मिळाल्याची पोच पावती व कोटेशन मंचात दाखल आहे.
ईई. सामनेवाले बँकेने तक्रारदारांच्या किराणा शॉपला भेट दिली असता कोटेशनमध्ये नमुद केल्याप्रमाणे फर्निचर आढळून आले नाही. तक्रारदारांना सदर बाब मान्य आहे. तक्रारदारांनी बँकेच्या कर्ज मंजुरीपुर्वी घेतलेल्या लाकडी फर्निचरची विल्हेवाट लावली असुन तक्रारदारांजवळ पुन्हा लाकडी फर्निचर करणे शक्य न झाल्यामुळे लोखंडी रॅक व टेबल दुकानात ठेवले असल्याचे तक्रारीमध्ये नमुद केले आहे. तसेच सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी व्यवसायाचे ठिकाण बँकेच्या परवानगी शिवाय बदलले आहे. सामनेवाले बँकेचा ता.20.07.2011 रोजीचा व्हीजीट रिपोर्ट मंचात दाखल आहे.
उ. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी मानसी इंटेरिअर व फर्निचर यांना रक्कम रु.80,000/- चा धनाकर्ष दिल्याची पावती मंचात दाखल केली आहे. परंतु कोटेशनमध्ये नमुद केल्याप्रमाणे फर्निचरची खरेदी त्यांचेकडून केली नाही. सामनेवाले बँकेने फर्निचरसाठी दिलेल्या रकमेचा फर्निचर खरेदीसाठी उपयोग केला नसल्याची बाब स्पष्ट होते तसेच सामनेवाले यांचे परवानगी शिवाय व्यवसायाचे ठिकाण बदलल्याची बाब तक्रारीत दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते.
ऊ. तक्रारदारांनी दि. 24/01/2011 रोजीच्या गहाण करार (Hypothecation Agreement) मधील Clause 4 प्रमाणे कर्जदाराने कर्ज रकमेचा वापर ज्या कारणाकरीता कर्ज मंजूर झाले आहे त्याकरीता करण्याचे मान्य केले. Clause 6 प्रमाणे तक्रारदारांनी व्यवसायाकरीता वापरण्यात येणरी मशिन व इतर संबंधीत साहित्य वगैरे सामनेवाले यांचेकडे गहाण ठेवणे आवश्यक आहे. तसेच Clause 14 प्रमाणे तक्रारदार सदर मशिनरी व साहित्य सामनेवाले यांच्या संमतीशिवाय व्यवसायाच्या जागेपासून इतरत्र हलवता येत नाही. तक्रारदारांनी त्याचे
व्यवसायाची जागा सामनेवाले यांचे संमतीशिवाय बदलली तसेच कर्ज रकमेचा वापर कर्ज मंजूर केलेल्या कारणाकरीता न करुन करारातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे कर्जाची रक्क्म परत घेण्यासाठी वसुलीची कार्यवाही सुरु
केली असल्याचे दिसून येते. सबब सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी कर्ज रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेची वसुली तक्रारदारांकडून करण्यास सुरुवात केली आहे. परंतु तक्रारदारांनी या संदर्भातील पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी सदरची बाब पुराव्यानिशी सिध्द केली नसल्यामुळे मान्य करता येत नाही.