Maharashtra

Nagpur

CC/394/2017

SHRI. KAMLAKAR RAMAJI NIWAL - Complainant(s)

Versus

BANK OF MAHARASHTRA, THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. SURYAKANT R. GAJBHIYE

12 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/394/2017
( Date of Filing : 20 Sep 2017 )
 
1. SHRI. KAMLAKAR RAMAJI NIWAL
PLOT NO. 10, SAHAKAR NAGAR, KHAMLA, NAGPUR-440022
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF MAHARASHTRA, THROUGH BRANCH MANAGER
BRANCH DEVNAGAR, PLOT NO. 2, WEST SAMARTH NAGAR, AJANI CHOWK, WARDHA ROAD, DEVNAGAR, NAGPUR-440015
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 12 Jul 2021
Final Order / Judgement

           (आदेश पारीत व्‍दार- श्री संजय वा. पाटील, मा. अध्‍यक्ष )

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असुन तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत पेंशन खाते क्रमांक ६०२०९०९२११५ व बचत खाते क्रमांक २००५०६८०२४७ आहे. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत त्‍याचे पेंशन खाते क्रमांक ६०२०९०९२११५ मधुन रुपये ४,०००/- काढण्‍याकरीता दिनांक १९/०७/२०१७ ला गेला व त्‍याने त्‍याच्‍या खात्‍यामधुन रक्‍कम काढण्‍याकरीता आहरण स्‍लीप (Withdrawal Slip) परंतू विरुध्‍द पक्षाने कोणतेही कारण नसतांना आहरण करण्‍यास मनाई केली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम उपलब्‍ध होती. त्‍यानंतर पुनश्‍च दिनांक २१/०७/२०१७ ला तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत त्‍याचे बचत खाता क्रमांक २००५०६८०२४७ मधुन रुपये ५,०००/- काढण्‍याकरीता गेला असता त्‍याने बॅंकेत आहरण स्लीप दिली परंतू यावेळी सुद्धा सदरची रक्‍कम आहरण करण्‍यास खात्‍यात पुरेशी रक्‍कम शिल्‍लक असतांनाही मनाई केली.
  3. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक २६/७/२०१७ ला त्‍याचे बचत खाते मधुन श्री प्रविण पालकर यांचे नावे धनादेश क्रमांक १२१०२४ जारी केले त्‍यावेळी सुद्धा सदरचा धनादेश १२१०२४ अपर्याप्‍त निधी खात्‍यामध्‍ये उपलब्‍ध  नसल्‍याकारणास्‍तव धनादेश न वटवताच परत करण्‍यात आला. ही बाब तक्रारकर्त्‍यास कळताच त्‍याने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत जावून माहिती घेतली त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाचे प्रबंधक यांनी तक्रारकर्त्‍यास सांगितले की, तक्रारकर्त्‍याचे दोन्‍ही ही खाते बॅंकेने दिनांक ११/७/२०१७ रोजी पासून होल्‍ड करुन ठेवले आहे. परंतू खाते होल्‍ड करण्‍याचे कोणतेही कारण प्रबंधकाने सांगितले नाही व याबाबत तुम्‍ही आमच्‍या मुंबई येथील मुख्‍य कार्यालयात संपर्क करा असे निर्देश तक्रारकर्त्‍याला दिले. तक्रारकर्त्‍यास त्‍याचे खाते विरुध्‍द पक्ष/बॅंकेने होल्‍ड करुन ठेवले याची माहिती प्रथम तक्रारकर्त्‍यास धनादेश परत आल्‍यावर कळले. धनादेश अपर्याप्‍त निधी या शिर्षकाखाली परत आल्‍याची माहिती तक्रारकर्त्‍यास श्री प्रविण पालकर यांचे वकीलांमार्फत नोटीस आल्‍यानंतर व रुपये ३००/- धनादेश डिसऑर्नर या शिर्षकाखाली खात्‍यामधुन कपात करण्‍यात आल्‍याचे कळले. तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात पुरेशी रक्‍कम असतांना देखील सदरहु धनादेश अपर्याप्‍त निधी या शिर्षकाखाली परत आला. यावेळी देखील विरुध्‍द पक्षाने तो धनादेश खाते होल्‍ड केले असे नमुद केले नाही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे खाते होल्‍ड करण्‍याआधी कोणतीही पूर्वसूचना तक्रारकर्त्‍याला दिली नाही. व त्‍यानंतर वारंवार विचारणा करुनही त्‍याची माहिती दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ८/८/२०१७ ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व खाते पूर्ववत सुरु करण्‍याचे निर्देश दिले परंतू विरुध्‍द पक्षाने खाते सुरु केले नाही व नोटीस चे उत्‍तर देखील दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्‍यास अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब व त्‍याच्‍या सेवेत ञुटी दिली असे जाहिर करावे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्‍याचे होल्‍ड केलेले दोन्‍हीही खाते सुरु करुन पूर्ववत करावे असे आदेशित करावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्‍याचे जाहिर केलेले धनादेश क्रमांक १२१०२४ खोट्या कारणाने न वटवताच परत केले व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍यास श्री प्रविण पालकर यांनी पाठविलेला नोटीस चा खर्च रुपये १,०००/- भुर्दड पडला ते रुपये १,०००/- विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  4. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक नुकसान करीता तसेच तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशित करावे.
  1. विरुध्‍द पक्ष यांनी वर्तमान प्रकरणात १४ वर जबाब दाखल केला आणि तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्रमांक १ मधील मजकूर नाकारलेला नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांची बचत खाते व पेंशन खाते असल्‍याबाबतची माहिती नाकारलेली नाही. परंतु त्‍यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्ते यांनी धनादेश क्रमांक १२१०२२ हा किेरण टॉवर्स लिमी. च्‍या नावाने दिला होता आणि सदरहू धनादेशाची रक्‍कम त्‍याच्‍या खात्‍यामधून कमी (डेबीट) ला दाखविण्‍यात आली आणि सदरहू धनादेश सारस्‍वत बॅंकेने किरण टॉवर्स च्‍या  अकाऊंट मध्‍ये क्रेडीट दाखवून क्‍लीअर केला होता. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ते यांना त्‍यांचे खाते होल्‍डवर ठेवले असल्‍याचे माहिती झाल्‍यानंतरही त्‍यांनी किरण टॉवर्स च्‍या नावाने सदरहू केस हेतूपुरस्‍सरपणे दिला. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, सीस्‍टीम फेलूअर झाल्‍यामुळे मुंबई च्‍या  सर्व्हिस ब्रॅन्‍चने माहिती दिली नाही आणि म्‍हणून सारस्‍वत बॅंकेने सदरहू धनादेश किरण टॉवर्स च्‍या  बाजुने क्रेडीट केला. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ते यांनी दुष्‍ट हेतुने आणि बॅंकेला फसविण्‍यासाठी किरण टॉवर ने दिलेला धनादेश क्रमांक २४१२३१ हा खात्‍यामध्‍ये जमा केला आणि तो वेगळ्या बॅंकेने क्‍लीअर केला आणि म्‍हणून सर्व्हिस बॅंक यांनी तक्रारकर्ती याचे खाते होल्‍डवर ठेवले आणि सदरहू रक्‍कम रिकव्‍हर करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याचे खाते सर्व्हिस बॅंकेने होल्‍डवर ठेवले. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्ते याला अकाऊंट होल्‍ड ठेवल्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण दिले आणि त्‍याने सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांचेशी संपर्क करावा असे कळविले, परंतु तक्रारकर्ता यांनी सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांचेशी संपर्क केला नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रार परिच्‍छेद क्रमांक ४,५,६,८, १०, ११, १२ मधील मजकूर नाकारला नाही आणि परिच्‍छेद क्रमांक  ७ आणि ९ मधील नाकारला आहे. विरुध्‍द पक्ष बॅंकेने शेवटी असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष बॅंक ही नियमाचे पालन करुन काम करीत असते आणि तक्रारकर्ता हा बॅंकेचा ग्राहक आहे आणि त्‍याचे बरेच खात आहे. विरुध्‍द पक्ष बॅंकेने बरेच वेळा ओव्‍हरड्यु रक्‍कम परत करण्‍यासाठी विनंती केली. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, सारस्‍वत बॅंकेने त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये पुरेसा पैसा नसतांना सदरहू धनादेश क्‍लीअर केला आणि म्‍हणून सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांनी तक्रारकर्ते यांचे खाते होल्‍डवर ठेवले. तक्रारकर्ते यांनी त्‍यांच्‍या विनंतीला प्रतिसाद दिला नाही आणि हेतुपूरस्‍सरपणे धनादेश ईश्‍यु केले. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष यांना ञास देण्‍यासाठी तक्रारकर्ते यांनी वकीलांमार्फत नोटीस पाठविली.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज तसेच प्रतिउत्‍तर, विरुध्‍दपक्षाचा लेखी जबाब आणि उभयपक्षाचे लेखी युक्तिवाद यांचे वाचन केल्‍यावर निकालाकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहेत.

  अ.क्र.                           मुद्दे                                                    निष्‍कर्ष

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

     दिली काय  आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा

                   अवलंब केला काय  ?                                                            होय

III. काय आदेश ?                                                              अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

  1. आम्‍ही तक्रारकर्त यांचे वकील श्री गजभीये आणि विरुध्‍द पक्ष यांचे वकील श्रीमती माहेश्‍वरी यांचे युक्तिवाद ऐकले. तक्रारकर्ते यांचे वकीलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते यांचे विरुध्‍द पक्ष बॅंकेत बचत खाते आणि पेंशन खाते आहे आणि तक्रारकर्ते यांनी विड्रॉल स्‍लीप देऊन पैसे काढण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा तक्रारकर्ते यांना पैसे देण्‍यात  आले नाही आणि पैसे न देण्‍याचे कोणतेही कारण बॅंकेने सांगितले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्ते यांनी दिनांक २६/७/२०१७ रोजी श्री प्रविण पालकर यांना १२१०२४ चा धनादेश दिला परंतु विरुध्‍द पक्ष बॅंकेने अपर्याप्‍त निधी या कारणासाठी सदरहू धनादेश नामंजूर केला आणि त्‍यामुळे तक्रारकर्ते यांना आर्थिक आणि मानसिक ञास झाला आहे आणि त्‍यावेळेस चौकशी केली असता बॅंकेने तक्रारकर्ते यांचे खाते होल्‍डवर ठेवल्‍याचे सांगितले. त्‍यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते  यांना त्‍याचा बॅंकेतील पैसा वापरता येत नसल्‍यामुळे त्‍यांचे शारीरिक आणि मानसिक ञास झालेला आहे म्‍हणून तक्रार मंजूर करण्‍यात यावी.
  2. विरुध्‍द पक्ष यांचे वकील यांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते यांनी किरण टॉवरला दिलेला धनादेश सिस्‍टीम फेलुअरमुळे मंजूर करण्‍यात आला आणि म्‍हणून सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांनी तक्रारकर्ते यांचे खाते होल्‍ड करुन ठेवले आणि तक्रारकर्ते यांनी सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांचेशी कधीही संपर्क केला नाही आणि विरुध्‍द पक्ष बॅंकेला कलम १७१ करार कायदा प्रमाणे  General Lien चा अधिकार आहे आणि विरुध्‍द पक्ष बॅंक सदरहू रक्‍कम मिळेपर्यंत तक्रारकर्त यांचे खाते होल्‍डवर ठेवू शकते यासाठी त्‍यांनी  State Bank of India Vs. Smt. Goutmi Devi Gupta, C.R. No. 884 of 2001, या न्‍यायनिवाड्याचा आधार घेतला आणि तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.
  3. आम्‍ही वर्तमान प्रकरणातील सर्व कागदपञांचे अवलोकन केले आणि उभयपक्षांनी उपस्थित केलेल्‍या निरनिराळ्या मुद्दे विचारात घेतले. विरुध्‍द पक्ष यांच्‍या जबाबाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष बॅंकेचा ग्राहक असल्‍याबाबत आणि तक्रारकर्ते यांची बचत खाते क्रमांक २००५०६८०२४७ आणि पेंशन खाते क्रमांक ६०२०९०९२११५ अशी खाते असल्‍याबाबत नाकारले नाही. सबब तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचेकडून बॅंकेमधील सेवेचा लाभ घेत आहे आणि म्‍हणून तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा प्रमाणे विरुध्‍द पक्ष यांचा ग्राहक आहे.
  4. विरुध्‍द पक्ष यांचे वकील यांनी वर्तमान प्रकरणात कलम १७१ करार कायदा चा आधार घेतलेला आहे. सदरहू तरतुदीप्रमाणे बॅंकेला लोन रक्‍कम, ओव्‍हरड्राफ्ट किंवा क्रेडीट कार्ड यामधील देय रक्‍कम असल्‍यास खातेदाराचे खाते होल्‍डवर ठेवण्‍याचा अधिकार आहे. सदरहू कायदेशीर तरतुदीप्रमाणे बॅंकेला असा अधिकार असला तरी वर्तमान प्रकरणामध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी खाते होल्‍डवर ठेवण्‍यासाठी योग्‍य कारण असल्‍याचे दाखवून दिले नाही. विरुध्‍दपक्ष बॅंकेने वर्तमान प्रकरणात अतिशय मोघम स्‍वरुपाला जबाब दाखल केलेला आहे आणि त्‍याप्रमाणे होल्‍डवर ठेवण्‍याचे योग्‍य आणि वाजवी कारण दाखवून दिलेले नाही. तक्रारकर्ते यांनी त्‍याचे बचत खाते यामधील पासबुकची प्रत दाखल केलेली आहे. सदरहू स्‍टेटमेंटचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, दिनांक २८/२/२०१७ रोजी तक्रारकर्ते याच्‍या खात्‍यामध्‍ये रक्‍कम रुपये ८३,०६९.९३/- बॅलन्‍स असल्‍याचे दिसून येते. त्‍यानंतर दिनांक १/३/२०१७  रोजी कॅश व्‍दारे रक्‍कम रुपये ४०,०००/- जमा केल्‍यानंतर बॅलन्‍स  रक्‍कम रुपये १,२३,०६९.९३/- दिसून येतो आणि दिनांक ६/३/२०१७ रोजी किरण टॉवर यांना दिलेला धनादेश रक्‍कम रुपये ११५५९५ चा मंजूर केल्‍यानंतर बॅलन्‍स रक्‍कम ७,४७४.९३/- एवढा असल्‍याचे दिसून येते. सबब विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या  जबाबात किरण टॉवरला दिलेल्‍या धनादेश बाबत जे मुद्दे उपस्थित केले आहे त्‍याचा योग्‍य खुलासा केला नाही. बॅंकेला जर तक्रारकर्ते यांचेकडून  काही रक्‍कम ओव्‍हरडयु किंवा येणे बाकी असेल तर त्‍याबाबत बॅंकेने योग्‍य प्रकारे खालिलप्रमाणे खुलासा केलेला नाही.
  1. तक्रारकर्ते यांनी कोणत्‍याप्रकारे ओव्‍हरडयु बाबतची जबाबदारी  ( Liability ) केलेली आहे ॽ
  2. तक्रारकर्ते यांचेबाबत सदरहू ओव्‍हरडयु जबाबदारी केव्‍हा अस्‍तीत्‍वात आली ॽ
  3. तक्रारकर्ते यांची सदरहू ओव्‍हरडय़ु जबाबदारी ही किती रकमेची आहे ॽ

      विरुध्‍द पक्ष बॅंकेने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही आणि वर्तमान प्रकरणात अत्‍यंत मोघम स्‍वरुपाला जबाब दाखल केलेला आहे आणि फक्‍तहोल्‍ड ठेवण्‍याबाबत असलेल्‍या कायदेशीर अधिकाराचा उदोउदो केलेला आहे आणि योग्‍य प्रकारे स्‍पष्‍टीकरण दिले नाही.

  1. विरुध्‍द पक्ष यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, तक्रारकर्ते यांना सर्व्हिस ब्रॅन्च, मुंबई यांचेशी संपर्क करण्‍यास सांगितले होते परंतु तक्रारकर्ते यांनी सदरहू बॅंकेशी संपर्क केला नाही आणि तक्रार दाखल केली. विरुध्‍द पक्ष यांच्‍या  कथनाप्रमाणे सिस्‍टीम फेलुअर मुळे किरण टॉवर्स यांचा धनादेश सारस्‍वत बॅंकेने क्‍लीअर केला आहे. सीस्‍टीम फेलुअर च्‍या कारणासाठी तक्रारकर्ते यांनी सर्व्हिस ब्रॅन्‍च, मुंबई यांचेशी संपर्क करण्‍याचा आग्रह हा अवाजवी आहे. सदरहू बाब ही विरुध्‍द पक्ष बॅंक आणि त्‍यांची सर्व्हिस ब्रॅन्‍च यांचेमधील अंतर्गत बाब आहे त्‍यासाठी तक्रारकर्ते यांनी स्‍वतः सर्व्हिस बॅंकेकडे संपर्क करावा असे त्‍याला सांगणे हे अत्‍यंत चुकीचे आणि गैरवाजवी आहे. विरुध्‍द पक्ष बॅंक हीच तक्रारकर्ता हा खातेदार असल्‍यामुळे योग्‍य सेवा देण्‍यास जबाबदार आहे. विरुध्‍द पक्ष बॅंकेनेच तक्रारदाराला होल्‍डबाबतची सविस्‍तर कारणे सांगायला पाहिजे आणि ओव्‍हरडयु रक्‍कम असेल तर त्‍याबाबत तोंडी आणि लेखी सूचना द्यायला हवी, परंतु असे न करता तक्रारदार याचे बचत खाते होल्‍ड केले आणि त्‍याबरोबरच पेंशन खाते सुद्धा होल्‍ड केले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचे पेंशन खाते कोणत्‍या  नियमाप्रमाणे होल्‍ड केले हे सुद्धा दाखवून दिले नाही. पेंशनच्‍या  खात्‍यावर कोणत्‍याही प्रकारे जप्‍ती आणता येत नाही असे असतांनाही तक्रारकर्ते यांना सदरहू खात्‍यातुन व्‍यवहार करण्‍यास प्रतिबंध केले ही बाब तक्रारकर्ते यांचेप्रती अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केल्‍याबाबतची आहे आणि विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना पेंशनचे खाते वापरण्‍याबाबत योग्‍य सेवा दिलेली नाही. तसेच होल्‍डबाबतची योग्‍य माहिती व कारणे तक्रारकर्ते यांना सांगितली नाही आणि तक्रार दाखल केल्‍यानंतर सुद्धा या आयोगासमोर योग्‍य प्रकारे सांगितलेली नाही.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या जबाबात असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष बॅंक ही नियमांचे पालन करुन काम करीत असते परंतु वर्तमान प्रकरणात असे पालन केल्‍याबाबत काहीही दिसून येत नाही. बॅंकेच्‍या कामकाजासाठी बॅंकेने पालन करावयासाठी  Code for Bankers अस्तित्‍वात आहे आणि सदरहू कोड मध्‍ये खालिल प्रमाणे तरतुदी केल्‍या आहेत.

A Code for Bankers- Core Principles

      ‘ A Code is not a substitution for Regulation but works along with it.’ A code for banks should enshrine three core principles:

  1.  Banks must always act in the best interest of their customers.
  2. Banks must put their reputation before profits.
  3. Banks must follow the principle of prudence.

          वरील तरतुदीमधील क्रमांक १ आणि क्रमांक २ चे विरुध्‍द पक्ष बॅंक हिने पालन केलेले नाही. तक्रारकर्ते यांना त्‍यांचे खाते होल्‍डवर का ठेवले याबाबत तोंडी आणि लेखी सूचना दिलेली नाही आणि म्‍हणून बॅंकेने वर्तमान तक्रारकर्ते याचेबाबत Best Interest मध्‍ये काम केलेले दिसून येत नाही. तक्रारकर्ते आणि विरुध्‍द पक्ष यांचेमधील वाद हा दिनांक १९/७/२०१७ पासून सुरु झाल्‍याचे दिसते अशा परिस्थितीमध्‍ये विरुध्‍दपक्ष्‍ा बॅंकेने दिनांक १९/७/२०१७ पासून वर्तमान प्रकरणात जबाब दाखल करेपर्यंत म्‍हणजे दिनांक १०/०१/२०१९ पर्यंत तथाकथीत ओव्‍हरडय़ु रकमेची रिकव्‍हरी करण्‍यासाठी काय कार्यवाही केली हे सुद्धा सदरहू जबाबामध्‍ये नमुद करण्‍याचे शहानपण (principle of prudence) दाखविलेले नाही. केवळ खाते होल्‍डवर ठेवून विरुध्‍द पक्ष यांना योग्‍य कारण सांगितले नाही आणि सदरहू खात्‍याचा वापर करण्‍यासाठी सेवा उप‍लब्‍ध करुन दिले नाही आणि तक्रारकर्त्‍याला देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये ञुटी केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.

  1. विरुध्‍द पक्ष बॅंक ही तक्रारकर्ते यांच्‍या खात्‍यावर अमर्याद कालावधीसाठी होल्‍ड ठेवू शकत नाही. जरी तक्रारकर्ते बॅंकेला कलम १७१ करार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जनरल लिन चा अधिकार असला तरी सदरहू हक्‍काचा वापर विरुध्‍द पक्ष बॅंकेने Limitation Act मधील तरतुदीप्रमाणे तीन वर्षाच्‍या आत करायला हवा आणि वर्तमान प्रकरणात बॅंकेने त्‍याबाबत काय कार्यवाही केली ही बाब सुद्धा आयोगापासून दडवून ठेवली आहे.  सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना त्‍यांची खाते यांचा वापर करण्‍यास मनाई करुन सेवेमध्‍ये ञुटी केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. वरील सर्व कारणास्‍तव आम्‍ही मुद्दा क्रमांक १ व २ वर होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना योग्‍य माहिती न देता आणि त्‍यांच्‍या    खात्‍यात रक्‍कम असतांना श्री प्रविण पालकर यांचा धनादेश नामंजूर केला आणि त्‍यामुळे तक्रारकर्ते यांना मानसिक ञास झालेला आहे आणि आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच त्‍यांच्‍या बचत खात्‍याचा आणि पेंशन खात्‍याचा वापर करता न आल्‍यामुळे मानसिक आणि आर्थिक ञास झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते म्‍हणून तक्रारकर्ते यांना नुकसानीबाबत रक्‍कम रुपये ५०,०००/- आणि तक्रारीच्‍या खर्चाबाबत रक्‍कम रुपये १०,०००/- मंजूर करणे वाजवी आहे असे आमचे मत आहे. सबब आदेश खालिलप्रमाणे..

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये ञुटी केली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला आहे असे जाहीर करण्‍यात येते.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे होल्‍ड केलेले दोन्‍ही खाते म्‍हणजे बचत खाते क्रमांक २००५०६८०२४७ व पेंशन खाते क्रमांक ६०२०९०९२११५ पूर्ववत सुरु करावे.
  4. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावेत.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.