Maharashtra

Nagpur

CC/11/838

Sneha Anil Zanke, Through Shri Anil Narayan Zanke - Complainant(s)

Versus

Bank of Maharashtra, Nagpur, Through Officer/Authorized officer - Opp.Party(s)

Adv. Sawal

03 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/838
 
1. Sneha Anil Zanke, Through Shri Anil Narayan Zanke
Flat No. D-27/2, Ravi Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bank of Maharashtra, Nagpur, Through Officer/Authorized officer
Sitabuldi Branch, Sitabuldi,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री. अमोघ कलोती, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 03/05/2013)
 
1.           तक्रारकर्तीने गमावलेल्‍या श्रवणशक्‍तीच्‍या नुकसान भरपाईपोटी रु.1,50,000/- मिळण्‍याकरीता, ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.
 
2.          तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे -
तक्रारकर्ती ही सी. पी. अँड बेरार हायस्‍कूल, रविनगर या शाळेत 9 व्‍या वर्गात शिकत असून, तिने महासरस्‍वती/आवर्ती जमा खाता योजने अंतर्गत विरुध्‍द पक्षांकडे खाते क्र.60021150488 दि.24.12.2008 रोजी उघडले होते व सदर खाते अद्यापही सुरु आहे. सदर खात्‍यांतर्गत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस शैक्षणिक कर्ज, रु.50,000/- अपघाती विमा, कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास रु.50,000/- इ. सुविधा देण्‍याचे कबुल केले होते.
 
13.05.2009 व 15.05.2009 रोजी तक्रारकर्तीवर ब्रेन ट्युमर या आजाराबद्दल शस्‍त्रक्रिया झाली आणि सदर शस्‍त्रक्रियेत तक्रारकर्तीने उजव्‍या कानाची श्रवणशक्‍ती पूर्णतः गमावली. विरुध्‍द पक्षाच्‍या उपरोक्‍त नमूद योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी तक्रारकर्तीने दि.01.09.2010 व 04.02.2011 च्‍या पत्रांन्‍वये मागणी केली. परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीची मागणी नाकारली. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास दि01.06.2011 रोजी वकिलामार्फत नोटीस देऊन योजनेचा लाभ देण्‍याची मागणी केली. परंतू विरुध्‍द पक्षाने दि.21.06.2011 रोजी उत्‍तर देऊन सदर मागणी नाकारली. करिता सदर योजनेचा लाभ व नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता तक्रारकर्तीने आपले वडिल व पालक यांचेमार्फत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
 
3.          तक्रारीची नोटीस बजावणी झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने मंचामध्‍ये हजर होऊन लेखी उत्‍तर व दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल केले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीची मागणी नाकारली. विरुध्‍द पक्षाचे कथनानुसार महासरस्‍वती/आवर्ती जमा खाता योजना ही युनायटेड इंडिया इंशूरंस कंपनी मर्यादित यांनासोबत घेऊन विरुध्‍द पक्षाने राबविली असून, केवळ बाह्य दृश्‍य माध्‍यमाद्वारे अपघात झाल्‍यास व त्‍याचे परिणामी मृत्‍यु किंवा कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यासच सदर योजनेंतर्गत लाभ देता येतो. तक्रारकर्तीने आपली श्रवणशक्‍ती ब्रेन ट्युमर या रोगासंबंधी झालेल्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये गमावलेली असून कोणत्‍याही अपघातात तक्रारकर्तीस अपंगत्‍व आले नसल्‍याचे विरुध्‍द पक्षाने लेखी उत्‍तरात नमूद केले व तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.
 
4.          तक्रारकर्तीने व विरुध्‍द पक्षाने लेखी युक्‍तीवाद अभिलेखावर दाखल केला. तसेच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवादही ऐकण्‍यात आला. उभय पक्षांचे कथन, अभिलेखावर उपलब्‍ध दस्‍तऐवज विचारात घेतले असता, मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहे.
 
 
मुद्दे                                 निष्‍कर्ष
 
1) विरुध्‍द पक्षांचे सेवेतील कमतरता सिध्‍द होते काय ?      नाही.
2) आदेश ?                                      तक्रार खारिज करण्‍यात येते.
 
 
-कारणमिमांसा-
 
5.          तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार पालक/वडील यांचेमार्फत दाखल केली असून विरुध्‍द पक्षाकडे महासरस्‍वती/आवर्ती जमा खाता उघडल्‍याबद्दल पासबूकची प्रत, वैद्यकीय उपचार घेतल्‍याबाबत कागदपत्रांच्‍या प्रती, विरुध्‍द पक्षाकडे केलेले मागणी अर्ज, विरुध्‍द पक्षाने पाठविलेल्‍या नोटीसची स्‍थळ प्रत, विमा प्रमाणपत्राची प्रत इ. दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल केले आहे. तक्रारकर्तीने ब्रेन ट्युमर या आजाराचे शस्‍त्रक्रियेमध्‍ये आपल्‍या उजव्‍या कानाची श्रवणशक्‍ती पूर्णतः गमावलेली असल्‍याचे व त्‍यामुळे कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचे कथन तक्रारीमध्‍ये केले आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे सदर योजनेंतर्गत खाते उघडल्‍याची बाब विरुध्‍द पक्षाने मान्‍य केली आहे. परंतू सदर योजनेंतर्गत लाभ केवळ अपघाती प्रकरणामध्‍ये देय असल्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे. आपले कथनाचे पुष्‍ट्यर्थ विरुध्‍द पक्षाने महासरस्‍वती आवर्ती जमा योजनेंतर्गत विमा प्रमाणपत्राची व वैयक्‍तीक अपघाती विमा योजनेची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. सदर योजनेंतर्गत लाभ केवळ अपघाताने मृत्‍यु आल्‍यास किंवा कायम स्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास देय राहतील ही बाब सदर विमा प्रमाणपत्रावर स्‍पष्‍टपणे नमूद केली आहे. तक्रारकर्तीने सदर विमा प्रमाणपत्राची प्रत पृष्‍ठ क्र. 24 अन्‍वये, अभिलेखावर दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्षाने योजनेच्‍या अटी व शर्तीबाबत तक्रारकर्तीला कळविले असल्‍याची बाब यावरुन दिसून येते.
6.          तक्रारकर्तीने आपली श्रवणशक्‍ती शस्‍त्रक्रियेमध्‍ये गमावली असल्‍याबाबत कोणताही वाद नाही. विरुध्‍द पक्षाचे महासरस्‍वती आवर्ती जमा योजनेंतर्गत लाभ केवळ अपघात झाल्‍यास देय असल्‍याची बाब अभिलेखावर उपलब्‍ध कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्तीने आपली श्रवणशक्‍ती कोणत्‍याही अपघातात गमावली नसल्‍याने विरुध्‍द पक्षाने तिची मागणी फेटाळून सेवेत कमतरता ठेवली असे म्‍हणता येणार नाही. प्राप्‍त परिस्थितीत विरुध्‍द पक्षाचे सेवेत कमतरता सिध्‍द होत नाही असे मंचाचे मत आहे. करिता खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
 
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.