Maharashtra

Kolhapur

CC/13/200

Smt. Popatbai Dhanraj Oswal - Complainant(s)

Versus

Bank of Maharashtra Branch Laxmipuri - Opp.Party(s)

05 Dec 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/200
 
1. Smt. Popatbai Dhanraj Oswal
1478, C ward, Laxmipuri,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Bank of Maharashtra Branch Laxmipuri
Kolhapur for Manager,
Kolhapur
2. Bank of Maharashtra, Main Office,
Lokmangal, Shivajinagar, Pune for Main Branch Officer,
Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv.Oswal/ Adv.Shendge
 
For the Opp. Party:
Naik
 
ORDER

 

 

नि का ल प त्र:- (व्‍दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्‍यक्ष) (दि.05-12-2015) 

1)   वि. प. बँक यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.   

2)    तक्रारदार श्रीमती पोपटबाई धनराज ओसवाल यांनी बँक ऑफ महाराष्‍ट्र, लक्ष्‍मीपुरी, कोल्‍हापूर या शाखेत दि. 14-12-2010 रोजी चलन नं. 12 ने रक्‍कम रु. 30,000/- चा अॅडव्‍हान्‍स प्राप्‍तीकर युथ डेव्‍हलपमेंट बँकेचा चेक नं. 013571 ने केलेला आहे. दि. 13-03-2012 रोजी आयकर विभाग, कोल्‍हापूर यांनी तक्रारदार यांना आयकर भरणा न केल्‍याने भरावा लागणारा प्राप्‍तीकर व दंड यासह एकूण रक्‍कम रु. 36,970/- भरण्‍यास सांगितले.  तक्रारदार यांनी वि.प. बॅकेकडे दि. 14-12-2010 रोजी जमा केलेल्‍या चेकची रक्‍कम जमा झाली नाही.          

3)    तक्रारदार यांचे मते, वि.प. बँकेकडे संपर्क साधला असता रेकॉर्ड पाहून कळवले जाईल असे सांगून टाळाटाळ केली.  तक्रारदार यांनी दि.15-03-2013 रोजी लेखी तक्रार दाखल केली त्‍यावेळी चौकशीअंती दिसून आले की,  वि.प. बँकेने त्‍याचे सी.आय. एन. तक्रारदार यांचा चुकीचा पॅन नंबर टाईप झालेने दुस-या पॅन नंबरचे नावे सदर रक्‍कम जमा झाली.  तक्रारदार यांची ब-याचशा विनंती व मागणीनंतर विलंबाने दि. 16-05-2013 रोजी वि.प. यांनी आयकर विभाग, कोल्‍हापूर यांना वस्‍तुस्थिती सांगितली.  आयकर विभागाने रक्‍कम जमा दाखवलेस नकार दिला.

4)  तक्रारदार यांनी दि. 17-06-2013 रोजी वि.प. नं. 1 यांना  नोटीस पाठवून सदर रक्‍कम परत केली नाही.  वि.प. यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला.  तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक असून ग्राहकांना सेवा देण्‍याची वि.प. बँकेची जबाबदारी आहे.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेविरुध्‍द अॅडव्‍हान्‍स रक्‍कम रु. 30,000/- व्‍याज रु. 6,970/- व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 15,000/- मागितलेली आहे.          

5)   वि.प. यांनी दि. 13-06-2014 रोजी म्‍हणणे दाखल करुन तक्रार अमान्‍य केली आहे.  तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक नाहीत. वि.प. यांनी इन्‍कम टॅक्‍स डिपॉर्टमेंटच्‍या सोयीसाठी  तक्रारदाराकडून कोणताही मोबदला न घेता चेक स्विकारलेला आहे.  तक्रारदार यांनी आयकर विभागास या कामी पक्षकार न केल्‍याने, तक्रार चालणार नाही.        

6)    वि.प. बँकेत विविध कर भरण्‍यासाठी सरासरी 8000 ते 8500 अर्ज येतात.  आयकर विभागाला मदत व्‍हावी म्‍हणून अर्ज स्विकारले जातात व नंतर त्‍या विभागाला पाठविले जातात.     केवळ अनावधानाने तक्रारदाराचा पॅन नंबर वेगळा टाईप केला गेला आहे. वि.प. यांनी चेसकसंबंधी चुक झाल्‍याचे निदर्शनाला आणून दिल्‍यानंतर लगेच आयकर विभागाला कळविले आहे. तक्रारदाराला त्रास देणे किंवा त्रुटी ठेवण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही.  वि.प. यांनी  मुद्दाम हेतुपुरस्‍सर चुकीचा पॅन नंबर टाईप केला नाही.  सदर तक्रार अर्जात आयकर विभागास पक्षकार करणे आवश्‍यक होते.  तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा.

7)  मंचाचे मते खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

                 मुद्दे                                                                         उत्‍तरे                 

    1.  तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?                     होय

    2.   वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्‍यात

        येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ?                                 होय

    3.   तक्रारदार‍ नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ?         होय 

    4.   काय आदेश ?                                                                  तक्रार अर्ज अंशत: मंजूर.

 

का र ण मि मां सा

 

8)    तक्रारदार यांनी आयकर भरणा पत्र, आयकर विभागाची नोटीस, बँकेचे आयकर विभागाला पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी वि. प. यांना दि. 17-09-2013 रोजी पाठविलेली नोटीस, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दि. 15-03-2014, सरतपासाचे जादाचे प्रतिज्ञापत्र दि. 5-07-2014 व लेखी युक्‍तीवाद दि. 27-11-2015 रोजी दाखल केला आहे.  तसेच अर्जाव्‍दारे दि. 24-09-2015 रोजी बँक ऑफ महाराष्‍ट्र यांनी अभिषेक ओसवाल यांना माहितीच्‍या अधिकाराखाली दिलेले उत्‍तर दाखल केले आहे.           

9)   वि.प. यांनी आपले म्‍हणणे दि. 13-06-2014 रोजी दाखल केले असून शपथपत्र दि. 22-09-2014 रोजी दाखल केले आहे व लेखी युक्‍तीवाद दि. 27-11-2015 रोजी दाखल   केलाआहे.     

10)  प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदार यांनी वि.प. बँकेत आयकर विभागात भरण्‍यासाठी रु. 30,000/- चेकव्‍दारे दिले हे सिध्‍द होते.  वि. प. बँक यांनी पॅन नंबर चुकीचा टाईप झाल्‍याचे मान्‍य केले आहे. वि.प. यांचे मते, तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेमध्‍ये येत नाही.  वि.प. यांनी सदर रक्‍कम कोणताही मोबदला न घेता स्विकारला असल्‍याने तक्रारदार ग्राहक होत नाहीत.           

11)  तक्रारदार यांचे लेखी युक्‍तीवाद परिच्‍छेद 7 मध्‍ये नमूद केले आहे की, सेवेचा लाभार्थी याचा समावेश ‘ग्राहक ’ या संज्ञेमध्‍ये होतो.  वि.प. यांना रिझर्व्‍ह बँकेच्‍या नियमाप्रमाणे चलन नं. 12 संबंधी कमिशन मिळाले आहे.  सदर ‘सेवा’ ही लाभार्थ्‍याच्‍या सोयीसाठी आहे.  सबब, मंचाच्‍या मते तक्रारदार हे वि.प. यांचे ‘ग्राहक’ आहेत.       

12)  तक्रारदार यांनी अर्जात व प्रतिज्ञापत्रात स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे की, वि.प. यांना आयकर विभागाचे पत्र आल्‍यावर चुक दुरुस्‍त करण्‍याचे सांगितल्‍यावर वि.प. यांनी टाळाटाळ केली व रेकॉर्ड पाहून कळवले जाईल असे मोघम उत्‍तर दिले.  तक्रारदार यांना आयकर विभागाचे पत्र दि. 13-03-2012 रोजी आले.  वि.प. यांना लेखी तक्रार दि. 15-03-2013 रोजी लेखी नोटीस देऊनही दोन महिने म्‍हणजे दि. 16-05-2013 रोजीपर्यंत वि.प. बँकेने आयकर विभागाला कळविले नाही.  वि. प. यांनी अक्षम्‍य निष्‍काळजीपणा  व दिरंगाई करुन, ग्राहकाला अडचणीत आणल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. 

13)  ग्राहकाच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने वि.प. यांना सदर झालेली चुक‍ दुरुस्‍त करण्‍यासाठी आयकर विभागाकडे सतत पाठपुरावा करणे न्‍यायाचे व उचित होते. तथापि, वि. प. बँक यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले.  वि.प. यांनी दि. 7-09-2015 रोजी अभिषेक ओसवाल यांना पाठविलेल्‍या उत्‍तरात मान्‍य केले आहे की, तक्रारदार यांनी चलन नं. 12 ने दि. 14-12-2010 रोजी रक्‍कम रु. 30,000/- पोटी दिले ते जमा झाले नाही. वि.प. यांनी 5 वर्षे तक्रारदाराच्‍या अडचणीचा विचार केला नाही हे स्‍पष्‍ट होते.   वरील सर्व बाबीचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे.  

14)  वि.प. यांनी तक्रारदारांनी तक्रार अर्जात आयकर विभागास पक्षकार करणे आवश्‍यक होते. तथापि त्‍यांनी आयकर विभागास पक्षकार केले नसलेने तक्रार चालणार नाही असे कथन केले.  वि.प. यांनी प्रस्‍तुत कामी पॅन नंबर चुकीचा टाईप केला गेला आहे हे मान्‍य केले आहे.  त्‍यामुळे त्‍यांच्‍या चुकीकरिता आयकर विभागाला जबाबदार धरता येणार नाही.  त्‍यामुळे  केवळ  तक्रारदारांनी सदर विभागास पक्षकार न केलेने सदरची तक्रार चालण्‍यास पात्र नाही हे वि.प. यांचे म्‍हणणे मान्‍य करीत नाही.             

15)  वरील विस्‍तृत विवेचनाचा करता तक्रारदार यांनी चलन नं. 12 ने दि. 14-12-2010 रोजीची रक्‍कम रु. 30,000/- वि.प. बँकेत जमा केली ती सदरची रक्‍कम व तक्रारदारांना व्‍याजापोटी भरावी लागणारी रक्‍कम रु. 6,970/- अशी एकूण रक्‍कम रु. 36,970/- इतकी रक्‍कम वि.प. बँकेकडून तक्रारदार मिळण्‍यास पात्र आहे.  तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/-(रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.            

16)  न्‍यायाचे दृष्‍टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.  सबब, आदेश.

 

                                                        आ दे श

1)   तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2)   वि.प. बँक यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 36,970/- (रुपये छत्‍तीस हजार नऊशे सत्‍तर  हजार नऊशे सत्‍तर फक्‍त) तीस दिवसांत द्यावेत.           

3)   वि.प. बँक यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त)  द्यावेत.

4)   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.