Maharashtra

Nagpur

CC/162/2019

SMT VISHAKHA VINOD DHABARDE - Complainant(s)

Versus

BANK OF INDIA - Opp.Party(s)

SELF

12 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/162/2019
( Date of Filing : 28 Feb 2019 )
 
1. SMT VISHAKHA VINOD DHABARDE
VISHVAKARMA NAGAR GALLI NO 3, NEAR ROKDE CHAKKI , FULE NAGAR, POST BHAGWAN NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF INDIA
BRANCH, KAMTHI, KARWA SADAN, KIRANA OLI, KAMTHI
NAGPUR
MAHARASHTRA
2. STATE BANK OF INDIA
OLD SUBHEDAR , SHARDA CHOWK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:SELF, Advocate
For the Opp. Party:
Dated : 12 Feb 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्ती ही दि. 02.11.2018 रोजी दुपारी 3.35 वा. जुना सुभेदार (शारदा चौक) येथील स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या, ए.टी.एम. मधून रक्‍कम रुपये 10,000/- काढण्‍यास गेली असता तिने पैसे काढण्‍याच्‍या पध्‍दतीचा वापर करुन रक्‍कम काढण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु Screen वर Transaction enable असा massage दिसला. त्‍यानंतर लगेच दुपारी 3.50 वाजता त्‍याची ए.टी.एम. मधल्‍या दुस-या मशीन मधून पैसे काढण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍या मशिन मधून ATM ID 00432159 मधून रुपये 10,000/- रक्‍कम निघाली. परंतु लगेच दोन्‍ही मशिनमधून डेबीट झाल्‍याचे Massage मोबाईलवर प्राप्‍त झाले. परंतु तक्रारकर्तीला एकाच मशिनमधून निघालेली रक्‍कम रुपये 10,000/- मिळाली. परंतु तक्रारकर्तीच्‍या खात्‍यातून 2 वेळा रक्‍कम निघाल्‍याचे दर्शविलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 03.11.2018 रोजी बॅंक ऑफ इंडिया शाखा-कामठी येथे याबाबतची  तक्रार केली. व सोबत BIO Pre-arbitration Ref No. 031118 DATA 910  दि. 17.11.2018 ला दाखल केले. त्‍यानंतर तक्रारकर्तीने याबाबत विरुध्‍द पक्ष 1 बॅंक ऑफ इंडिया, कामठी – शाखा यांच्‍याकडे वारंवांर विचारणा केली असता त्‍यांनी योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने Pre-arbitration यांच्‍याकडे तक्रार दाखल केली. त्‍यानंतर पुन्‍हा दि. 03.01.2019 ला विचारणा केली असता रुपये 10,000/- डेबीट झालेले जमा  झाल्‍याचे सांगण्‍यात आले. परंतु सदरची रक्‍कम खात्‍यात जमा झालेली नव्‍हती. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने ए.टी.एम. आय.डी. 00432170, सी.सी.कॅमेराचे फुटेज शहनिशा करण्‍याकरिता मंचात दाखल करावे व तक्रारकर्तीच्‍या खाते क्रं. 871810100017810 मध्‍ये रक्‍कम रुपये 10,000/- जमा करण्‍याचा आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने आपला लेखी जबाब मंचात दाखल केला. परंतु तो मुदत बाहय असल्‍यामुळे त्‍यांना रुपये 500/- चा दंड ठोठावण्‍यात आला होता. परंतु विरुध्‍द पक्ष 1 ने सदरची दंडाची रक्‍कम न भरल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 चा लेखी जबाब विचारार्थ घेण्‍यात आला नसल्‍याचा आदेश दि. 29.07.2019 रोजी पारित करण्‍यात आला.  
  3.      विरुध्‍द पक्ष 2 ला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 29.07.2019 रोजी पारित करण्‍यात आला.
  4.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्‍यात आला असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.                           मुद्दे                                                       उत्‍तर

1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?            होय

2. काय आदेश ?                                                       अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्तीने दि. 02.11.2018 रोजी दुपारी 3.35 वा. जुना सुभेदार (शारदा चौक) येथील स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या, ए.टी.एम. मधून रक्‍कम रुपये 10,000/- काढायला गेली असता, तिला तिथे असलेल्‍या ATMID:00432179 हया पहिल्‍या मशिन मधून रक्‍कम मिळाली नाही परंतु त्‍याच ठिकाणी असलेल्‍या दुस-या ATMID:00432159 हया  मशिन मधून रक्‍कम काढली असता रक्‍कम निघालेली आहे. परंतु उपरोक्‍त दोन्‍ही ए.टी.एम. मशिन मधून केवळ एकदाच रक्‍कम प्राप्‍त झालेली असतांना सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या खात्‍यातून दोन वेळा रक्‍कम निघाले असल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते. याबाबत तक्रारकर्तीने दिनांक 03.11.2018 रोजी बॅंक ऑफ इंडिया शाखा-कामठी येथे सदरच्‍या घटनेबाबतची तक्रार केली व सोबत BIO Pre-arbitration Ref No. 031118 DATA 910  दि. 02.11.2018 ला  तक्रार दाखल केली असल्‍याचे ही  दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते. तसेच ए.टी.एम. मधून न मिळालेली रक्‍कम ही वजा झाल्‍याबाबतचा मॅसेज आल्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 बॅंक ऑफ इंडिया, कामठी – शाखा यांच्‍याकडे तक्रार केली व याबाबत वारंवांर विचारणा केली असता दिला योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने Pre-arbitration यांच्‍याकडे ही तक्रार दाखल केली. परंतु तरी ही तक्रारकर्तीच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा न झाल्‍याचे दिसून येते. यावरुन विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                  अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला ए.टी.एम. द्वारे तिच्‍या खात्‍यातून रक्‍कम न मिळता ही वजा झालेली रक्‍कम रुपये 10,000/- परत करावी व सदरच्‍या रक्‍कमेवर दि. 02.11.2018 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्तीला परत करावी.
  3. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.
  5. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.