जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/18 प्रकरण दाखल तारीख - 19/01/2011 प्रकरण निकाल तारीख – 05/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या शेख अहेमद हुसेन पि. इस्माईल साब वय वर्षे 45, धंदा व्यापार रा.लाईन गल्ली, मदिना मस्जीद जवळ,देगलूर ता.देगलूर जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा देगलूर, ता.देगलूर जि. नांदेड. गैरअर्जदार 2. फिल्ड ऑफिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देगलूर, ता.देगलूर जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - एकतर्फा निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) 1. अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हा देगलूर येथील रहीवासी असून तो त्यांचे कूटूंबाचा पालनकर्ता आहे.अर्जदाराला उदरनिर्वाहाचे काही साधन नसल्यामूळे स्वतःचे जागेमध्ये काही तरी व्यवसाय सुरु करायचा होता. त्याकरिता ते गैरअर्जदार यांचे शाखेमध्ये गेले. तेथे गैरअर्जदार यांनी तूम्हाला तूमचे घर गहाण ठेवावे लागेल व त्यावर रु.3,00,000/- पर्यत कर्ज मिळू शकते व त्या व्यवसायाबददल म्हणजे दूकानासाठी व फलोअर मिलसाठी कर्ज उचलावयाचे आहे त्या संदर्भात आवश्यक ती सर्व कागदपञे आपल्याला तयार ठेवावी लागतील व त्यानंतर आपले घर गहाण ठेऊन आपल्याला कर्ज पुरवठा होऊ शकतो असे सांगितले. अर्जदाराने स्वतःचे नांवे देगलूर हद्यी मध्ये रिव्हीजन रजिस्ट्रर मध्ये नोंद असल्याबाबतचे प्रमाणपञ मिळविले. तसेच घराबाबतचा नकाशा, जमानतदार यांचे घराची रजिस्ट्री, तसेच त्यांचे हद्यीत असल्याबाबतचे प्रमाणपञ, व्हॅल्यूऐशन रिपोर्ट तसेच गैरअर्जदार यांनी इतर बँकाचे नाहरकत प्रमाणपञ आणणे बाबतचा फॉर्म यावर सर्व बँकाचे नोडयूज तयार केले, इत्यादी सर्व कागदपञ तयार करुन त्यावर खर्च करुन गैरअर्जदार यांचेकडे कर्जाबाबत प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी सदरचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर आपण आपल्या जागेमध्ये बांधकाम करावे जेणे करुन सदरचे बांधकामाचा आढावा घेऊन व घटनास्थळी भेट देऊन त्यानंतरच आम्ही आपल्याला कर्ज वाटप करु असे सांगितले. त्यामूळे अर्जदाराने आपल्या राहत्या घरी दुकानासाठी व फलोअर मिल साठी एक ते दिड लाखाचे बांधकाम केले. कर्ज मिळण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडे वारंवार चकरा मारल्या परंतु गैरअर्जदार यांनी कर्ज पुरवठा करु या आशेवर प्रत्येक वेळेस माघारी पाठविले. दिड वर्षे झाले तरी गैरअर्जदाराने कर्ज मंजूर केले नाही.शेवटी अर्जदाराने गैरअर्जदार बँकेस पञ पाठवून कर्जासाठी तयार केलेल्या फाईलवर झालेला खर्च दाखविला व लवकरात लवकर कर्ज देण्यात यावे असे पञात लिहीले. परंतु गेरअर्जदार यांचे मार्फत लेखी दिलेल्या पञाचे उत्तर दिले नाही. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, व्यवसायासाठी रु,3,00,000/- कर्ज मंजूर करण्याचे आदेश व्हावेत.तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु.50,000/- देण्याचे आदेश व्हावेत, तसेच दावा खर्च रु.5,000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. 3. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? नाही 2. गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 व 2 ः- 4. अर्जदार यांनी सदर तक्रारीसोबत जे कागदपञ दाखल केले आहेत त्यावरुन त्यांनी कर्जासाठी फाईल तयार केली होती हे दिसून येते. परंतु अर्जदार हे गैरअर्जदार बँकेचे ग्राहक आहेत काय याबददल कूठलाही पूरावा दाखल केलेले नाही, तसेच बँकेत त्यांचे खाते असल्याबददल पासबूक ही दाखल केलेले नाही.प्रथमदर्शनी असे दिसते की, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहकच नाही, कर्जाची फाईल तयार करण्यासाठी प्रथम अर्जदाराचे खाते हे बँकेत असणे गरजेचे आहे म्हणजे अर्जदार हा बँकेचा ग्राहक असणे आवश्यक आहे. जरी गैरअर्जदार यांनी कर्जाबाबत माहीती सांगितली असली तरी ते कूठल्याही व्यक्तीस कर्जासंबंधी मार्गदर्शन करीत असतात. परंतु कागदपञ पूर्ण केल्यानंतर कर्ज देण्यासंबंधी किंवा मंजूर करण्यासंबंधी गैरअर्जदार यांचेवर कोणतेही बंधन नाही की त्यांनी अर्जदाराचे कर्ज मंजूर केले पाहिजे. याबाबत गैरअर्जदार यांना कर्जाबाबत सर्व अधिकार आहेत. कर्ज मंजूर करणे किंवा न करणे हे बँकेचे स्वतःचे अधिकार आहेत.अर्जदाराची कागदपञे व बँकेचे अटी व नियम यांचा मेळ बसवून गैरअर्जदार हे कर्ज प्रकरणे मंजूर करत असतात. या प्रकरणात जरी गैरअर्जदार हजर झालेले नसले तरी मंचाचे मते कर्ज मंजरी बाबत गैरअर्जदार यांचेवर कोणाचेही बंधन नाही, कर्ज मंजूरी बाबत सर्व अधिकार बँकेलाच आहेत. अर्जदाराचे कर्ज मंजूर न करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कूठलीही ञूटी केलेली नाही. म्हणून मूददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. 5. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो.1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. 3. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |