उपस्थिती - अर्जदार व त्यांचे वकिल हजर. आदेश (दि.07.10.2010) (द्वारा श्री.एम.जी.रहाटगांवकर, मा.अध्यक्ष) 01. तक्रारदारांतर्फे दि.06.10.2010 रोजी सदर प्रकरणात अर्ज दाखल करण्यात आला की, अशाच प्रकारच्या या मंचाने निकाली काढलेल्या दुस-या प्रकरणात राज्य आयोगासमोर 1387/09 क्रमांकाचे अपिल दाखल करण्यात आले होते. व त्या अपिल प्रकरणात मा.राज्य आयोगाने तक्रार ही सांताक्रुझ हा भाग ज्या जिल्हा ...3... तक्रार क्र.556/09 व इतर मंचाच्या भौगोलीक परिसिमेत येतो तेथे प्रकरण दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या चार प्रकरणातील विषय देखील त्या प्रकरणासारखाच असल्याने तक्रारदारांना योग्य त्या न्यायालयासमोर तक्रारी दाखल करावयासाठी परवानगी देण्यात यावी व या तक्रारी मागे घेण्याची परवानगी द्यावी. 02. सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो. आदेश
01. तक्रार क्र.556/2009, 557/2009, 566/2009 व 571/2009 या प्रकरणातील तक्रारदारांना मंचासमोरील तक्रारी मागे घेण्याची परवानगी देण्यात येते तसेच योग्य त्या न्याय मंचासमोर तक्रारी नव्याने दाखल करण्यासाठी परवानगी देण्यात येते व सदर तक्रारी निकाली काढण्यात येतात. 02. न्यायीक खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे. दिनांक - 07.10.2010 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगांवकर) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे.
| [ HON'BLE MRS. JYOTI IYER] MEMBER[ HON'BLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |