अर्जदारासाठी वकील श्रीमती किर्ती शेट्टी गैर अर्जदारासाठी वकील श्री.रॉनी सोसेफ. मा.सदस्यानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराचे म्हणणे की, सा.वाला यांच्या सेवेत कमतरता असून त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारदार ही सा.वाला यांची खातेदार आहे. तसेच सा.वाला यांच्याकडून तक्रारदार हिला मिळालेल्या बॉब कार्ड क्र.4029850208361151 हे कार्ड मागील तिन वर्षापासून उपयोगात आणण्यात येत आहे. दिनांक 08.07.2008 रोजी तक्रारदार हिने 19.15 वाजता सा.वाले यांच्या ए.टी.एम.मधून रकम रु.8,500/- काढण्यासाठी गेली. त्यावेळी आवश्यक ती कार्यप्रणाली पूर्ण केल्यानंतर रकम मशीनच्या दर्शनी भागात आल्याचे तक्रारदार हिने पाहिले परंतु क्षणभरात सदर रकम मशिनमध्ये परत गेली. त्यामुळे तक्रारदार हिला ही सदरहू रकम मिळालेली नाही. या घटनेचा वृत्तांत तिने संबंधीत अधिका-याला सांगीतला. तसेच या बाबतचा वृत्तांत ए.टी.एम.अधिकारी श्री.साऊ व मि.एस.सी.गुप्ता यांनाही सांगीतला. त्यांच्याकडून या घटनेबाबत दोन दिवसात संबंधित रकम तक्रारदार हिच्या नांवे जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. या प्रकरणी सा.वाले यांचेकडे सातंत्याने पाठपुरावा करण्यात आला. इ.मेल करण्यात आला. परंतु वर नमुद केलेली रकम तक्रारदार हिच्या खात्यात सा.वाले यांचेकडून जमा करण्यात आली नाही यावरुन त्यांचे सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदार हिचे म्हणणे आहे. म्हणून तक्रारदार हिने दि.22.12.2008 रोजी सा.वाला यांना या प्रकरणी कायदेशीर नोटीस दिली. तरी देखील सा.वाला यांच्याकडून वर नमुद केलेल्या प्रकारामुळे तिच्या खात्यात खर्ची पडलेली रकम रु.8,500/- तक्रारदार हिच्या खात्यात जमा झाली नाही. तक्रार अर्जात नमुद केल्यानुसार अर्ज विनंत्या करुन, व सातंत्याने प्रयत्न करुन देखील सा.वाले यांच्याकडून तक्रारदार हिला प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून दि.26.03.2009 रोजी या मंचासमोर तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे विनंत्या केल्या. 1) सा.वाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे, व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याचे घोषित करण्यात यावे. 2) सा.वाला यांनी रकम रु.8,500/- परत करावी. 3) मानसिक त्रास,छळ यापोटी सा.वाला यांनी रकम रु.50,000/- द्यावी. 4) या अर्जाचा खर्च रु.20,000/- द्यावा. 2. सा.वाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रार अर्जातील सर्व आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, त्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, किंवा त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. 3. सा.वाले यांचे ए.टी.एम.मशिनची देखभाल मे.डायबोल्ड इंडिया लि.कंपनी कडून केली जाते. त्यांच्याकडून सा.वाला यांनी मशिनची पहाणी व तपासणी करुन घेतली त्यानुसार मशिन मधुन होणा-या रकमेच्या उलाढालीनुसार रकम रु.3,500/- अधिक असल्याचे दिसून आले. ही रकम सा.वाला यांनी दिनांक 25.03.2009 रोजी सा.वाला हिच्या खात्यात जमा केली. यापेक्षा अधिक रकम मशीनमध्ये शिल्लक असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे तक्रारदार हिच्या म्हणण्यानुसार रकम रु.8,500/- तिला देता येणार नाही असे सा.वाले यांचे म्हणणे आहे. दि.8.07.2008 रोजी तक्रारदार ए.टी.एम.मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता तिने काहीही रकम स्विकृत केली नाही या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. म्हणून सदरहू तक्रार खोटी, बिनबुडाची, गैर समजुतीवर आधारलेली असल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी असे सा.वाले यांची विनंती आहे. 4. सा.वाला क्र.3 यांना नोटीस देवूनही ते मंचासमोर हजर राहीले नाही व त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. 5. तक्रार अर्ज, त्या सोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, प्रतिनिवेदन, सा.वाला क्र.1 व 2 यांचे म्हणणे, इ. कागदपत्रांचे पहाणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 6. तक्रारदार हिने तक्रार अर्ज शपथपत्रासह दाखल केलेला आहे. तसेच सा.वाला यांनी दिलेल्या म्हणण्याला अनुसरुन सा.वाला यांचे म्हणणे खोडण्यासाठी प्रतिनिवेदन शपथपत्रासह दाखल केलेले आहे. तक्रारदार ही सा.वाला यांची खातेदार असून तिचा खाते क्रमांक 04120100014511 असा असून तक्रारदार ही बॉबकार्ड धारक आहे. त्याचा क्रमांक 4029850208361151 असा आहे. तक्रारदार ही दि.8.07.2008 रोजी 19.15 वाजता तिच्या खात्यातील रकम रु.8,500/- काढण्यासाठी ए.टी.एम. केंद्रामध्ये गेली असता आवश्यक ती कार्यप्रणाली अवलंबविल्यानंतर नोटा मशिनच्या दर्शनीभागात आल्याचे तिने पाहिले परंतु त्या नोटा ताब्यात घेण्यापुर्वीच मशिनमध्ये परत आत गेल्या. ही बाब तिने तातडीने सा.वाला यांच्या निदर्शनास आणली. तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे .ए.टी.एम.अधिकारी श्री.साहु व महाव्यवस्थापक श्री.गुप्ता यांच्याही ही घटना निदर्शनास आणली. त्यानंतर सातंत्याने या प्रकरणी तक्रारदार हिच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. सा.वाला यांना इ मेल केला त्याची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. त्या नंतर शेवटी 22.12.2008 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सा.वाला यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात न येऊन सदरहू रकम तक्रारदार हिच्या खात्यात सा.वाला यांनी जमा केलेली नाही. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे म्हणता येईल. कारण तक्रारदार हिने सा.वाला यांचेशी केलेल्या पत्र व्यवहाराच्या प्रति सोबत जोडलेल्या आहेत. तसेच केलेल्या तक्रारींचे नोंदणी क्रमांकाची नोंद केलेली आहे. 7. तक्रारदार यांनी सा.वाला यांच्याकडे केलेल्या तक्रारी नुसार सा.वाला यांनी त्यांच्या ए.टी.एम. मशिनची पहाणी व तपासणी मे.डायबोल्ड इंडिया कंपनी यांच्याकडून करुन घेतली, कारण सदरहू मशिनची देखभाल दुरुस्ती ही वरील कंपनीकडून करण्यात येते. या कंपनीने दि.25.3.2009 रोजी संबंधित मशिनची पहाणी तपासणी करुन सदरहू मशिनमधून झालेल्या रकमेच्या उलाढालीनुसार रकम रु.3,500/- रकम अदा न झाल्यामुळे अधिकची रकम असल्याचे दिसून आले असा अहवाल कंपनीने सा.वाला यांना दिल्यानंतर येवढी रकम सा.वाला यांनी तक्रारदार हिच्या खात्यात जमा केली. 8. युक्तीवादाच्या वेळी तक्रारदार हिच्या वकीलांनी सांगीतले की, रकम रु.8,500/- पैकी रु.3,500/- दि.25.3.2009 रोजी जमा केले व शिल्लक रकम रु.5000/- या मंचासमोर तक्रार दाखल केल्यानंतर दि.12.5.2009 रोजी खात्यात जमा केली असे सांगीतले. 9. मात्र पैसे न मिळताही रकम रुपये 8,500/- तक्रारदार हिच्या खाती दि.8.7.2008 रोजी खर्ची पडली व त्यानंतर 5 महिन्यांनी रु.3,500/- व साधारणतः 8.5 महिन्यांनी बाकी रकम रु.5000/- तीच्या खात्यात जमा केले. हि सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. म्हणून सा.वाले तक्रारदार हिस वरील रकमेवर व्याज व तिला झालेल्या मानसिक त्रासापोटी नूकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. 10. उक्त विवेचनानुसार मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 103/2011 (जुना क्र.129/2009) अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस रकम रुपये 3500/- वर दि.8.7.2008 ते 25.3.2009 या कालावधीसाठी आणि (रकम रु.5000/- वर दि.8.7.2008 ते 15.5.2009 या कालावधीसाठी) द.सा.द.शे. 6 दराने व्याज द्यावे. 3. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2000/- नूकसान भरपाई द्यावी. 4. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस या तक्रारीचा खर्च रु.1000/- द्यावा व स्वताःचा खर्च सोसावा. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |