Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/11/731

Ushabai Mekulal Jaiwal - Complainant(s)

Versus

Bank of Baroda, Through Manager - Opp.Party(s)

Adv. A.M.Rizwy

29 Sep 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/11/731
 
1. Ushabai Mekulal Jaiwal
Kamal Chowk, Ganesh Bhawan,
Nagpur
Maharashtra
2. Durgaprasad Mekulal Jaiswal
Kamal Chowk, Ganesh Bhawan,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Bank of Baroda, Through Manager
Itwari Branch,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Sep 2016
Final Order / Judgement

-निकालपत्र

           (पारित व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य.)

                  ( पारित दिनांक-29 सप्‍टेंबर, 2016)

 

01.   उभय तक्रारदारांनी ही तक्रार, विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली  दोषपूर्ण सेवे संबधाने दाखल केली आहे.

 

 

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-

       तक्रारकर्ती क्रं-1) उषाबाई मैकुलाल जैस्‍वाल यांचे विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या शाखेत खाते असून त्‍याचा खाते क्रं-070701000375 असा आहे. तर तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद मैकुलाल जैस्‍वाल हा तक्रारकर्ती क्रं-1) यांचा मुलगा आहे.

      उभय तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष बँकेत दिनांक-08/09/2014 रोजी मुदती ठेवी (F.D.R.) मध्‍ये रुपये-1,42,627/- एवढी रक्‍कम जमा केली. त्‍याच बरोबर उभय तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष बँकेत दिनांक-11/12/2004 रोजी आणि दिनांक-16/12/2004 रोजी अनुक्रमे रक्‍कम रुपये-89,983/- आणि रुपये-94,506/- मुदती ठेवी मध्‍ये जमा केली.

      पुढे  तक्रारदारां तर्फे असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्ती क्रं-1) हयांचे पती आणि तक्रारकर्ता क्रं-2) यांचे वडील श्री मैकुलाल जैस्‍वाल यांचे दिनांक-02/06/2006 रोजी निधन झाल्‍याचे कारणाने तक्रारकर्ती क्रं-1) यांची प्रकृती ठीक राहत नव्‍हती, त्‍यांच्‍या मानेवर शस्‍त्रक्रिया झाल्‍याने त्‍या चालण्‍यास असमर्थ होत्‍या. दरम्‍यानचे काळात दिनांक-08/09/2004 रोजी गुंतवणूक केलेली रक्‍कम सन-2007 मध्‍ये परिपक्‍व झाली होती परंतु तक्रारकर्ती क्रं-1) हया प्रकृती अस्‍वास्‍थामुळे मुदतीठेवीच्‍या रकमे कडे लक्ष देण्‍यास त्‍या असमर्थ होत्‍या.

      पुढे तक्रारदारां तर्फे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्ती क्रं-1) यांनी त्‍यांचा मुलगा म्‍हणजे तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद मैकुलाल जैस्‍वाल यास खाते पुस्‍तीका अद्दायावत करण्‍यासाठी दिनांक-24/09/2010 रोजी विरुध्‍दपक्ष बँकेत पाठविले  व ते अद्दायावत  केल्‍या नंतर खाते पुस्‍तीकेचे अवलोकन केले असता दिनांक-08/09/2004 रोजी गुंतवणूक केलेली रुपये-1,42,627/- मुदत ठेवीच्‍या  रक्‍कमेची तिस-याच व्‍यक्‍ती

 

 

 

कडून उचल झालेली आहे तसेच बचतखात्‍यातील रक्‍कम रुपये-42,030/-              तिस-याच व्‍यक्‍तीने धनादेशाव्‍दारे उचल केली असल्‍याचे लक्षात आले. तक्रारकर्ती क्रं-1) यांनी विरुध्‍दपक्ष बँकेला सदर घटना त्‍वरीत दिनांक-27/09/2010 रोजी कळविली व सदर व्‍यवहारात वापरलेल्‍या धनादेशाच्‍या प्रती मागविल्‍यात. बँक व्‍यवहारापोटी वापरलेल्‍या धनादेशांच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता असे दिसून आले की, रुपये-1,46,627/- चे ठेवीवर तसेच धनादेशावर तिस-याच व्‍यक्‍तीने खोटी सही करुन मुदतीठेवीची रक्‍कम उचल केलेली आहे व रुपये-1,42,627/- मुदतठेवीची रक्‍कम दुसरे खाते क्रं-070710001770 वर वळती (Transfer) करण्‍यात आली. सदर रक्‍कम वळती करण्‍या करीता तिस-या व्‍यक्‍ती तर्फे अर्ज करण्‍यात आला होता, त्‍याच प्रमाणे रुपये-1,46,627/- मुदतठेवीची रक्‍कम उचलण्‍या करीता केलेली सही ही खोटी असून तशाप्रकारची सही तक्रारकर्ती क्रं-1) यांनी कधीही विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या अभिलेखावर केलेली नाही.

     थोडक्‍यात तक्रारकर्ती क्रं-1) यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी दिनांक-08/09/2004 रोजी मुदतीठेवी मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये-1,46,627/-       तिस-याच व्‍यक्‍तीने त्‍यांची खोटी सही करुन उचललेली आहे, जेंव्‍हा की विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये त्‍यांचे स्‍वाक्षरीचे नमुने होते. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्ती क्रं-1) यांचे सहीची पडताळणी न करता तिस-याच व्‍यक्‍तीला मुदतठेवीची रक्‍कम दिलेली आहे. विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वस्‍तुतः तक्रारकर्ती क्रं-1) यांच्‍या नमुना स्‍वाक्ष-यांशी आणि           तिस-या व्‍यक्‍तीने तक्रारकर्ती क्रं-1) यांचे खोटे स्‍वाक्षरीने  मुदत ठेवीची रक्‍कम उचलते वेळी, दोन्‍ही स्‍वाक्ष-यांची पडताळणी विरुध्‍दपक्ष बँके तर्फे त्‍याच वेळी करण्‍यात आली असती तर स्‍वाक्ष-यां मध्‍ये तफावत आढळून येताच त्‍याची सुचना तक्रारकर्ती क्रं-1) यांना त्‍वरीत देता आली असती परंतु तसे या प्रकरणात घडलेले नाही.

      तक्रारदारां तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष बँकेनी तिस-या व्‍यक्‍तीच्‍या खोटया सही वर मुदतीठेवीची रक्‍कम स्‍थानांतरण तर केलीच परंतु या व्‍यतिरिक्‍त धनादेश पुस्‍तीकेची दुसरी प्रत देखील दिली. सदर धनादेश पुस्‍तीकेची दुसरी प्रत तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांचे नावावर देण्‍यात आली, यावेळी सुध्‍दा तक्रारकर्ता क्रं-2)  दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांचे स्‍वाक्षरीची पडताळणी विरुध्‍दपक्ष बँके तर्फे करण्‍यात आलेली नाही. सदर अर्ज बँक ऑफ बडोदा ऐवजी बँक ऑफ इंडीयाचे नावे करण्‍यात येऊनही विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍याकडे लक्ष दिले नाही, या सर्व प्रकार विरुध्‍दपक्ष बँकेची दोषपूर्ण सेवा दर्शविते.

 

 

 

 

 

 

      तक्रारदारांनी तक्रारीत मुदतठेवीची रक्‍कम रुपये-1,42,627/- ही तक्रारदारांच्‍या संयुक्‍त खात्‍यातून कशाप्रकारे  विविध दिनांकाना म्‍हणजे दिनांक-19/05/2007 ते दिनांक-06/09/2007 रोजी विविध धनादेशां व्‍दारे उचल करण्‍यात आली याचे विस्‍तृत विवरण परिच्‍छेद क्रं-7) मध्‍ये दिलेले आहे.

       त्‍याच बरोबर अनोळख्‍या व्‍यक्‍तीस धनादेश पुस्‍तीका देण्‍यात येऊन विविध धनादेशांव्‍दारे विविध दिनांकांना म्‍हणजे दिनांक-04/10/2007 ते दिनांक-18/01/2008 रोजी खात्‍यां मधून रक्‍कम रुपये-94,566/- आणि रुपये-47,030/- अशा रकमांची उचल केल्‍याचे विस्‍तृत विवरण परिच्‍छेद क्रं-8 मध्‍ये दिलेले आहे.

      तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे उपरोक्‍त नमुद बाबी या विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा आणि रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍वांचे उल्‍लंघन दर्शवितात. तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष बँकेस दिनांक-20/06/2011 रोजी कायदेशीर सुचनापत्र पाठविले व नुकसान भरपाईची मागणी केली, त्‍यास विरुध्‍दपक्ष बँकेनी दिनांक-23/09/2011 रोजी उत्‍तर देऊन तक्रारकर्त्‍यांची मागणी अमान्‍य केली.

     म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्त्‍यांचे झालेले आर्थिक नुकसान रुपये-3,77,233/- द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारखर्च/नोटीस खर्च म्‍हणून रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष बँकेनी द्दावेत अशा मागण्‍या केल्‍यात.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष  बँकेनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 63 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्ते यांचे जमा खाते त्‍यांचे बँकेत असल्‍याची बाब मान्‍य केली. तसेच तक्रारकर्त्‍यांनी मुदती ठेवी मध्‍ये सन-2004 मध्‍ये रक्‍कम विरुध्‍दपक्ष बँकेत गुंतविली होती व ती रक्‍कम सन-2007 मध्‍ये परिपक्‍व झाली होती ही बाब सुध्‍दा मान्‍य केली. तक्रारदारांच्‍या तक्रारीतील उर्वरीत विपरीत मजकुर नाकबुल केला.  तक्रारकर्ते यांच्‍या मुदती ठेवी व जमा खाते विरुध्‍दपक्ष बँकेत होते. तक्रारकर्त्‍यांच्‍या मुदती ठेवी परिपक्‍व झाल्‍या नंतर तक्रारकर्ती क्रं-1) हयांनी, तक्रारकर्ता क्रं-2 आणि त्‍यांचा मित्र विरेंद्र डोईफोडे यांना या खात्‍यामध्‍ये देवाण-घेवाण (Transaction) करण्‍याची मंजूरी/सम्‍मती दिली होती, त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) श्री दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांनी अर्ज करुन सदर रकमेची उचल करुन ती रक्‍कम जमा खात्‍यामध्‍ये वळती केली. सदर अर्जावर असलेली सही व इतर दस्‍तऐवज जसे एफ.डी.आर.  (मुदती ठेवी प्रमाणपत्र) वर असलेल्‍या सहया तसेच नमुना सहया यांची पडताळणी

 

 

 

केल्‍या नंतर असे निदर्शनास आले की, त्‍या सहया तक्रारकर्त्‍यांच्‍याच आहेत व त्‍यामुळे ती रक्‍कम जमा खात्‍यात वळती करण्‍यात आली. तसेच तक्रारकर्त्‍यांच्‍या सहयांची पडताळणी करुनच धनादेश पुस्‍तीका देण्‍यात आली होती. तसेच धनादेशावर असलेल्‍या सहयांची पडताळणी ही तक्रारकर्त्‍यांच्‍या मुदती ठेवीवर असलेल्‍या सहया व नमुना सहयांशी करुन त्‍या एकच असल्‍याची खात्री पटल्‍या नंतरच धनादेशांव्‍दारे रक्‍कम उचलण्‍यास मंजुरी देण्‍यात आली, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या सेवेमध्‍ये कुठलाही प्रकारचा निष्‍काळजीपणा व त्रृटी नाही. विरुध्‍दपक्ष बँकेनी कुठल्‍याही तिस-या व्‍यक्‍ती बरोबर मिळून सदर रक्‍कम उचलण्‍यास मंजूरी दिलेली नाही. तक्रारकर्त्‍यांनी दिलेला दिनांक-08/10/2010 रोजीचा अर्ज खोटा असून बँकेतून पुन्‍हा रक्‍कम उचलण्‍याचा त्‍यांचा हेतु आहे. सदर अर्जावरील सहया या मुदत ठेव प्रमाणपत्रावरील स्‍वाक्ष-या, नमुना स्‍वाक्ष-या आणि धनादेशांवर असलेल्‍या स्‍वाक्ष-यांशी मिळत्‍या जुळत्‍या असून त्‍यावरुन असे लक्षात येते की, सदर रक्‍कम व ठेवीची तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांनी उचल केलेली आहे व त्‍या करीता तक्रारकर्ती क्रं-1) यांनी आपल्‍या सहया करुन रक्‍कम उचलण्‍यास त्‍यांना मंजुरी व सम्‍मती दिलेली आहे.

     विरुध्‍दपक्ष बँके तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, सन-2007 ते               सन-2010 पर्यंत तक्रारकर्त्‍यांची कुठलीही तक्रार नव्‍हती व सदरचे कालावधीमध्‍ये तक्रारकर्त्‍यांनी खात्‍यामध्‍ये व्‍यवहार केलेले आहेत. तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांनी सदरची रक्‍कम त्‍यांचा मित्र विरेंद्र डोईफोडे यांचे मदतीने उचललेली आहे व आता या बाबी उघडकीस येतील म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी आपसी मिळून विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द खोटी तक्रार करुन गुन्‍हा लपविण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. विरुध्‍दपक्ष बँकेनी सदर घटनेची तक्रार तहसिल पोलीस स्‍टेशन, नागपूर येथे दिनांक-28/12/2010 रोजी केलेली असून त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल  व विरेंद्र डोईफोडे यांनी दिलेले कबुली जबाब जोडलेले आहेत. सदर जबाब वाचल्‍या नंतर लक्षात येईल की, ठेवी रक्‍कम व जमा रक्‍कम ही तक्रारकर्ते यांनीच उचललेली आहे. संपूर्ण दस्‍तऐवजांवरील सहया या तक्रारकर्त्‍यांच्‍या सहयांशी जुळतात. सदर घटना ही तपासाधीन आहे व पोलीस अधिकारी याचा तपास करीत आहेत, त्‍यामुळे या प्रकरणात कोणी व कशी रक्‍कम उचलेली आहे याची शहानिशा झाल्‍या शिवाय विरुध्‍दपक्ष बँकेला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द खोटी तक्रार केलेली असल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी असा उजर विरुध्‍दपक्ष बँके तर्फे घेण्‍यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

04.    तक्रारदारांनी दस्‍तऐवज यादी नुसार अक्रं 1 ते 8 दस्‍तऐवज दाखल केलेत, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने ठेवी प्रमाणपत्रांच्‍या प्रती, तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍दपक्ष बँकशी केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती तसेच पाठविलेली नोटीस व विरुध्‍दपक्ष बँकेनी नोटीसला दिलेले उत्‍तर तसेच  तक्रारकर्ती क्रं-1) उषाबाई जैस्‍वाल यांचे खात्‍यातील रक्‍कम काढते वेळी वापरण्‍यात आलेल्‍या धनादेशाच्‍या प्रती आणि तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांचे खात्‍यातील रक्‍कम काढते वेळी वापरण्‍यात आलेल्‍या धनादेशाच्‍या प्रती दाखल आहेत. तसेच हस्‍ताक्षर तज्ञांचा अहवाल दाखल केला.

 

 

05.     विरुध्‍दपक्ष बँकेनी पोलीस स्‍टेशन गांधीबाग येथे केलेली तक्रार, तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल आणि त्‍यांचा मित्र विरेंद्र डोईफोडे यांनी दिलेला लेखी जबाब,  तक्रारकर्ता क्रं-2) विरुध्‍द विरुध्‍दपक्ष बँकेनी पोलीस स्‍टेशन गांधीबाग येथे दिलेली तक्रार, तक्रारकर्ता क्रं-2) यांचा मित्र विरेंद्र डोईफोड याचा कबुली जबाब,  तक्रारकर्त्‍यांनी  विरुध्‍दपक्ष बँकेशी केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

 

 

06.   तक्रारदारांची तक्रार, विरुध्‍दपक्ष बँकेचे उत्‍तर आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्‍कर्ष देण्‍यात येतो-

::निष्‍कर्ष ::

 

07.   तक्रारदारांची सदरची तक्रार ही विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द असून दोन्‍ही तक्रारदारांच्‍या ठेवी व खात्‍यां मधील रक्‍कम तिस-याच व्‍यक्‍तीने खोटया स्‍वाक्ष-या करुन उचल केल्‍या संबधीची आहे. त्‍यांचा असा आरोप आहे की, विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍यांच्‍या मूळ ठेवी प्रमाणपत्रावरील स्‍वाक्ष-या आणि नमुना स्‍वाक्ष-यांची पडताळणी न करता तिस-या व्‍यक्‍तीचे खात्‍यात रक्‍कम वळती केली व रकमेची उचल करण्‍यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

08.    दोन्‍ही पक्षकारांनी तक्रारी पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या आहेत व त्‍यामध्‍ये  पोलीस तपास चालू आहे. विरुध्‍दपक्ष बँके तर्फे दिनांक-25.09.2010 रोजी तक्रारकर्ता क्रं-2) दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांचा मित्र विरेंद्र प्रभाकर डोईफोडे यांनी दिलेला कबुली जबाब दाखल केलेला आहे, त्‍यात त्‍याने असे कबुल केलेले आहे की, मी            सन-2007 मध्‍ये दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांच्‍या खात्‍यातून मुदत ठेव रक्‍कम                रुपये-1,42,627/- एवढया रकमेचा उपयोग केला असून ती रक्‍कम, मी दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांचे सम्‍मती वरुन वापरलेली आहे व मी लवकरात लवकर ती रक्‍कम दुर्गाप्रसाद जैस्‍वाल यांना परत करीन. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता क्रं-2) यांचा मित्र विरेंद्र डोईफोडे यानेच रक्‍कमेची उचल केलेली आहे. सदरचा प्रकार हा “Conspiracy”  मध्‍ये मोडतो आणि सदर गुन्‍हयाचे स्‍वरुप हे फौजदारी स्‍वरुपाचे आहे

 

 

09.    विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या उत्‍तरा प्रमाणे सदरची घटना ही पोलीस तपासाधीन आहे व पोलीस अधिकारी याचा तपास करीत आहेत, त्‍यामुळे या प्रकरणात कोणी व कशी रक्‍कम उचलेली आहे याची शहानिशा झाल्‍या शिवाय विरुध्‍दपक्ष बँकेला जबाबदार धरता येणार नाही.

 

 

10.   विरुध्‍दपक्ष बँकेचे उपरोक्‍त म्‍हणणे आम्‍हाला रास्‍त वाटते. तक्रारकर्त्‍यांची विरुध्‍दपक्ष बँकेतील रक्‍कम कोणी व कशी उचलली हे ठरविण्‍यासाठी व्‍यापक प्रमाणावर साक्षी पुराव्‍यांची आवश्‍यकता आहे आणि ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात” (“Summary Jurisdiction”) या गोष्‍टी शक्‍य नाहीत. तसेच या प्रकरणात पोलीस तपास अजुनही प्रलंबित आहे त्‍यामुळे प्रत्‍यक्ष्‍य आरोपी कोण आहे या बाबी उघड झालेल्‍या नाहीत, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बँकेस जबाबदार धरता येणार नाही.  अशापरिस्थितीत व्‍यापक प्रमाणावरील साक्षीपुराव्‍यां शिवाय तक्रारकर्त्‍यांची तक्रार ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात मंजूर होण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्त्‍यांना योग्‍य वाटल्‍यास ते आपल्‍या मागणीचे पुष्‍टयर्थ्‍य योग्‍य त्‍या सक्षम न्‍यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतील.

 

 

 

 

 

 

 

11.    नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                         ::आदेश  ::

(01)  तक्रारदार क्रं-1) उषाबाई मेकुलाल जैस्‍वाल आणि क्रं-2) दुर्गाप्रसाद मेकुलाल जैस्‍वाल यांची, विरुध्‍दपक्ष बँक ऑफ बडोदा तर्फे प्रबंधक, ईतवारी शाखा, ईतवारी, नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(02)   खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

(03)  तक्रारकर्त्‍यांना योग्‍य वाटल्‍यास ते त्‍यांच्‍या मागणीच्‍या पुष्‍टयर्थ्‍य योग्‍य त्‍या सक्षम न्‍यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतील.

(04)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 
 
[HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.