Maharashtra

Nagpur

CC/374/2019

DEVENDRA MANOHARRAO PATIL - Complainant(s)

Versus

BANK OF BARODA, THROUGH BRANCH MANAGER, GANDHIBAG BRANCH - Opp.Party(s)

ADV. VIKAS J. DHARKAR

13 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/374/2019
( Date of Filing : 05 Jul 2019 )
 
1. DEVENDRA MANOHARRAO PATIL
R/O. CHANAKYYA DRESSES, AT KELIBAG ROAD, OPP. NMC PARKING STAND, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BANK OF BARODA, THROUGH BRANCH MANAGER, GANDHIBAG BRANCH
AT HALDIRAM BUILDING, 1174, C.A. ROAD, BHAOSAR CHOWK, GANDHIBAG, NAGPUR-02
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा - श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याचा चाणक्‍य ड्रेसेस या नावाने रेडीमेड गारमेंट चा व्‍यवसाय आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला भारतातील व्‍यापा-यांकडुन रेडीमेड कपडे विकत घ्‍यावी लागतात. दिनांक ३०/०७/२०१८ रोजी तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी वरुन श्री सेवकभाई प्रेमाणी यांना ३०० लेगिन्‍स रुपये ९० प्रती लेगीन्‍स प्रमाणे एकूण रुपये २७,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचे ठरवुन त्‍याप्रमाणे ऑर्डर दिला व सेवकभाई प्रेमाणी यांनी पुरविलेला खाते क्रमांक ३०९५०१०००१३७५४, बॅंक ऑफ बडोदा मध्‍ये रक्‍कम जमा करण्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला सांगितले.
  3. दिनांक ३१/७/२०१८ रोजी तक्रारकर्त्‍याला जॉन्‍डीस हा विकार झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे दुकानातील कामगार श्री मोरेश्‍वर मोहाडीकर यांना सेवकभाई प्रेमाणी यांचे खात्‍यात रक्‍कम रुपये २७,०००/- जमा करण्‍याबाबत सुचना दिल्‍या. त्‍याप्रमाणे श्री मोरेश्‍वर मोहाडीकर हे बॅंक ऑफ बडोदा, गांधिबाग शाखा, नागपूर येथे गेले व तेथील कर्मचा-यांनी श्री मोरेश्‍वर यांना बॅंकेच्‍या परीसरात असलेल्‍या ए.टी.एम. मशिनव्‍दारे रक्‍कम जमा करण्‍यास सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने ठीक ११.२६ वाजता मध्‍यान्‍नपूर्व ५०० रुपयाच्‍या ५० नोटा सेवकभाई प्रेमाणी यांचे खाते क्रमांक ३०९५०१०००१३७५४, या खात्‍यामध्‍ये ए.टी.एम. मशिनमधुन जमा करावयाची प्रक्रिया सुरु केली. परंतू त्‍यानंतर लगेचच ए.टी.एम. मशिनव्‍दारे (Transaction Failed) चा मेसेज दाखविण्‍यात आला. परंतू ए.टी.एम. मशिनमधुन रुपये २७,०००/- परत प्राप्‍त झाले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने घटनेबाबतची माहिती तेथील ए.टी.एम. मशिनच्‍या सुरक्षा कर्मचा-याला दिली व सुरक्षा कर्मचा-याने बॅंक मॅनेजरला तक्रार करण्‍याबाबत सुचविले. श्री मोरेश्‍वर यांनी विरुध्‍द पक्षाचे बॅंक मॅनेजरशी संपर्क साधला व बॅंक मॅनेजरने एक दिवस थांबावयास सांगितले व सेवकराम प्रेमाणी यांचे खात्‍यात रक्‍कम जमा झाली अथवा नाही याबाबत माहिती घेण्‍यास सांगितली त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याचा नौकर परत आला.
  4. त्‍यानंतर दिनांक १/८/२०१८ रोजी तक्रारकत्‍याने स्‍वतः श्री सेवकभाई प्रेमाणी यांना रुपये २७,०००/- प्राप्‍त झाल्‍याबाबत विचारणा केली तेव्‍हा  त्‍याने त्‍याबाबत नकार दिला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे नौकर श्री मोरेश्‍वर मोहाडीकर यांना बॅंकेमध्‍ये जावुन लेखी तक्रार करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने बॅंकेत जाऊन लेखी तक्रार नोंदविली व त्‍याबाबतची पोच घेतली. विरुध्‍द पक्षाचे बॅंकचे मॅनेजर यांनी सदरचे प्रकरण दोन दिवसात निकाली निघेल असे सांगितले आणि रक्‍कम रुपये २७,०००/- श्री सेवकभाई प्रेमाणी यांचे खात्‍यात जमा होईल असे कळविले. परंतू सेवकभाई प्रेमाणी यांच्‍या खात्‍यात रुपये २७,०००/- जमा न झाल्‍याचे कळविल्‍यावर ३-४ दिवसांनी तक्रारकर्त्‍याने त्‍याचे नोकराला बॅंकेत चौकशी करीता पाठविले त्‍यावेळी बॅंक मॅनेजरने प्रकरणाचा लवकर निपटारा होईल असे सांगितले. दिनांक ९/८/२०१८ रोजी तक्रारकर्ता स्‍वतः त्‍याचे नोकरासोबत विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत गेला त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाचे बॅंक मॅनेजरने उडवाउडवीची उत्‍तर दिले. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने ए.टी.एम. (कॅश मशिन) चे सी.सी.टी.व्‍ही. फुटेज व दिनांक ३१/०७/२०१८ चे बॅलेन्‍स  स्‍टेटमेंटची मागणी केली. त्‍यावेळी बॅंक मॅनेजरने दिल्‍याचे टाळले व ४-५ दिवसानंतर येण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने स्‍वतः नोकरासमवेत दिनांक १६/०८/२०१८ रोजी बॅंक मॅनेजरशी संपर्क साधला व दिनांक ३१/०७/२०१८ च्‍या बॅंक स्‍टेटमेंटची तसेच ए.टी.एम. सी.सी.टी.व्‍ही. ची मागणी केली त्‍यावेळी त्‍यांनी देण्‍यास नकार दिला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याजवळ पोलिस स्‍टेशन तक्रार करण्‍याशिवाय पर्याय नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने तहसिल पोलिस स्‍टेशन नागपूर येथे विरुध्‍द पक्षाविरुध्‍द तक्रार केली.
  5. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ३१/०७/२०१८ चे ११.२६.२० ते ११.२८.२९ या कालावधीचे ए.टी.एम. मशिनचे Transaction Details पुरविले त्‍यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने रुपये २७,०००/- ए.टी.एम. मशिनमध्‍ये जमा केले आणि ते ए.टी.एम. मशिनव्‍दारे स्विकारले गेले. विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला ए.टी.एम. सी.सी.टी.व्‍ही. फुटेज तसेच दिनांक ३१/०७/२०१८ चे बॅलेन्‍स स्‍टेटमेंट पुरविले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/९/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष बॅंकेला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे तक्रारकर्त्‍याने जमा केलेली रक्‍कम रुपये २७,०००/- सेवक भाई प्रेमाणी यांचे खाते क्रमांक ३०९५०१०००१३७५४ या खात्‍यात जमा करण्‍याबाबत सांगितले. सदर नोटीसला विरुध्‍द पक्षाव्‍दारे Evasive उत्‍तर पाठविले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये २७,०००/- अदा करावे व त्‍यावर द.सा.द.शे. १५ टक्‍के दराने व्‍याज दिनांक ३१/०७/२०१८ पासुन अदा करावे व मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- अदा करण्‍याचे निर्देश द्यावे.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत रजिस्‍टर्ड ए.डी व्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचात हजर झाले नाही. करीता यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २५/१०/२०१९ राजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे नमुद आहे.

अ.क्र.                                    मुद्दे                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या गांधीबाग शाखा, नागपूर च्‍या ए.टी.एम. मशिनमधुन रुपये २७,०००/- ( ५००/- च्‍या चौपन नोटा) सेवकभाई प्रेमाणी यांचे खाते क्रमांक ३०९५०१०००१३७५४ खात्‍यात जमा करण्‍याकरीता दिनांक ३१/०७/२०१८ रोजी ११.२६ (म.पू.) वाजता प्रक्रिया सुरु केली परंतू त्‍यानंतर लगेचच ए.टी.एम. मशिनव्‍दारे Transaction Failed चा मेसेज दाखविण्‍यात आला. ए.टी.एम. मशिनमधुन रुपये २७,०००/- परत प्राप्‍त झाले नाही. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाचे बॅंकेला विनंती अर्जाव्‍दारे रक्‍कम रुपये २७,०००/- सेवकभाई प्रेमाणी यांचे खात्‍यात जमा करण्‍याबाबत विनंती केली. तसेच संबंधीत पोलिस स्‍टेशन ला तक्रार नोंदविली परंतू त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेला ए.टी.एम. मशिनचे सी.सी.टी.व्‍ही. फुटेज ची तसेच दिनांक ३१/०७/२०१८ च्‍या बॅंक स्‍टेटमेंट ची मागणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दिनांक ३१/०७/२०१८ चे ११.२६.२० ते ११.२८.२९ या कालावधीचे Transaction Details चे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या नोकराने दिनांक ३१/७/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाच्‍या ए.टी.एम. मशिन मध्‍ये  रुपये २७,०००/- ( ५००/- च्‍या चौपन नोटा) जमा केले आणि ते ए.टी.एम. मशिन ने स्विकारले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विनंती करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याचे ए.टी.एम. मशिनव्‍दारे जमा करण्‍यात आलेली रक्‍कम रुपये २७०००/- प्राप्‍त होऊनही परत केली नाही. तसेच ए.टी.एम. मशिनचे सी.सी.टी.व्‍ही. फुटेज पुरविले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला रुपये २७,०००/- अदा करावे व त्‍यावर दिनांक ३१/०७/२००८ पासुन द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदी करावी.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.