न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. मनिषा स. कुलकर्णी, सदस्या)
1) प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने वि.प. बँकेमध्ये असणारी ठेव रक्कम रु. 10,16,514/- मिळणेसाठी दाखल केलेली आहे. सदरची तक्रार स्विकृत होऊन वि.प. यांना नोटीस आदेश होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे-
तक्रारदार व तिचा पती डॉ. शिरीष रामचंद्र सांगले यांनी वि.प. बँकेकडे निरनिराळया परदेशी चलनातील रक्कमा दोघांच्या स्वतंत्र FCNR खात्यामध्ये गेली 15 वर्षापासून ठेवलेल्या आहेत. सदर रक्कमांच्या निरनिराळया ठेव पावत्या वि.प. बँकेने तक्रारदार यांचे नावे व त्यांचे पतीचे नावे दिल्या आहेत. ठेव पावत्यांच्या रक्कमा मुदती संपल्यानंतर वेळोवेळी पावत्यांचे नुतनीकरण करुन पुन्हा वि.प. बॅंकेकडेच ठेवण्यात आल्या आहेत. सन 2003 अखेर पर्यंत तक्रारदार हिचे नावे निरनिराळया परकीय चलनामधील एकूण देय झालेली रक्कम भारतीय चलनानुसार रु. 10,16,514/- इतकी झाली होती. मुदत संपलेनंतर तक्रारदार हिने वि.प. बँकेकडे ठेव रक्कम व्याजासह परत मागितली. दि. 11-03-2012 रोजी तक्रारदार हिने वि.प. बँकेकडे ठेव रक्कमेची लेखी मागणी केली परंतु “तक्रारदार हिचे कुटूंबातील व्यक्ती “सुदर्शन कपॅसिटर्स” या कंपनीचे संचालक आहेत. आणि त्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तक्रारदार हिची ठेव रक्कम जप्त करण्यात आली आहे “ असे खोटे व बेकायदेशीर स्पष्टीकरण दिले. वि.प., तक्रारदार हिची रक्कम जाणीवपूर्वक व बेकायदेशीररित्या नाकारत आहेत. सबब, वि.प. बँकेने तकारदारांना ठेव रक्कम व व्याज असे एकूण रक्कम रु. 10,16,514/- व पुढील व्याज द्यावे व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 12 % प्रमाणे व्याज मिळावे व तक्रारदार हिस मानसिक त्रासापोटी झालेल्या आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार हिने लिहून दिलेले वटमुखत्यार पत्र, वि.प. बँकेने तक्रारदार हिला ई-मेल व्दारे पाठवलेले पत्र व दिलेले उत्तर, व तक्रारदार व वि.प. यांचे मध्ये ई-मेल व्दारे झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) वि.प. यांनी मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले त्यांचे कथनानुसार श्री. शिरीष रामचंद्र सांगले व तक्रारदार या परदेशी रहिवासी आहेत. त्यांनी काही रक्कम फॉरेन करन्सीमध्ये बँक ऑफ बडोदा, पुणे येथे FCNR खाते उघडून ठेव स्वरुपात ठेवली होती. FCNR खाते हे वि.प. बँकेमध्ये नव्हते व तसे खाते उघडणेचा अधिकार वि.प. बँकेला नाही. तक्रारदार यांनी स्वत:चे नावे वि.प. बँकेमध्ये मुदतठेव तारण ठेवून कर्ज घेतले होते(LODOD) कर्जाचा उल्लेख तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेला नाही. सदरचे कर्ज तक्रारदारानी परतफेड केलेले नाही. त्यामुळे त्यांचे हिस्सेची रक्कम त्यांचे कर्ज खातेमध्ये वळती करुन घेतलेली आहे. तक्रारदार यांचे कर्ज थकीत झालेले आहे. तक्रारदार या परदेशी राहत होत्या. त्यांनी कर्जाची परतफेड केलेली नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांचे हिस्सेची रक्कमच तक्रारदार यांचे कर्ज खातेलाच वळती करुन घेतलेली आहे व तशी रक्कम वळती करुन घेणेचा हक्क व अधिकार वि. प. बँकेस आहे.
वि.प. त्यांचे म्हणणेत पुढे नमूद करतात की, तक्रारदाराचे पती श्री. शिरीष रामचंद्र सांगले हे सुदर्शन कपॅसिटर्स या कंपनीचे संचालक होते. बँक ऑफ बडोदा शाखा वाळवा यांचेकडून “सुदर्शन कपॅसिटर्स” यांनी कर्ज घेतलेले होते. सदरचे कर्जास श्री. शिरीष रामचंद्र सांगले हे वैयक्तीक जामीनदार होते. सदरचे कर्ज थकीत झालेले होते. त्यामुळे बँकींग रेग्युलेशन अॅकट व कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट मधील तरतुदीनुसार श्री. शिरीष रामचंद्र सांगले यांचे हिस्सेची रक्कम सदर कर्ज खातेमध्ये वर्ग केलेली आहे याचे संपुर्ण ज्ञान तक्रारदार यांना आहे. सदरची बाब तक्रारदारांनी मे. कोर्टापासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी अर्जामध्ये किती रकमेच्या ठेवी होत्या व त्यांची किती मुदत होती तसेच कोणाच्या नावे ठेवल्या होत्या याबाबत जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नाही. सदरच्या ठेवी हया बँक ऑफ बडोदा शाखा पुणे येथे होत्या त्यामुळे वि.प. बँक तक्रारदार यांना काहीही देणे लागत नाही. तसेच तक्रारदार यांनी स्वत:चे नावेच वि.प. बँकेकडून कर्ज घेतले ते थकीत झालेले होते व त्या कर्ज खातेतच तक्रारदार यांची रक्कम वळती करुन घेतलेली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम कोणतीही व काहीही रक्कम वि.प. बँकेकडे शिल्लक राहिलेली नाही. तक्रारदार यांचे पतीचे हिस्सेची रक्कम ते जामीनदार असलेले कर्ज खातेमध्ये बँक ऑफ बडोदा शाखा वाळवा यांचेकडे वर्ग केलकेली आहे. त्यामुळे सदरचा अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदाराच्या ठेवी हया बँक ऑफ बडोदा शाखा पुणे येथे ठेवल्या होत्या त्यामुळे तक्रार अधिकारक्षेत्रात नाही त्यामुळे चालणेस पात्र आहे. सदरची तक्रार ही पुणे येथे कोर्टात चालणेस पात्र नाही. वि.प. बँकेचा ठेव पावतीशी संबंध नाही. वि.प. बँकेने तक्रारदार यांना कर्ज दिलेले होते. सदरची तक्रार मुदतीत नसलेने तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी स्वत:चे नावे ठेव पावती तारण कर्ज (LABOID) घेतलेले होते व त्याची परतफेड न झालेने ठेवीची रक्कम तक्रारदार यांचे कर्ज खातेला वर्ग केलेली होती. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासहीत नामंजुर करणेत यावा. तक्रारदार यांनी वि.प. यांना त्रास दिलेने अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- तक्रारदार यांचेकडून मिळावा अशी विनंती वि.प. यांनी म्हणणेत केली आहे.
5) वि.प. यांनी अर्जासोबत तक्रारदार यांचे कर्ज खातेच्या कागदपत्रांच्या प्रती, तक्रारदार व त्यांचे पती श्री. शिरीष रामचंद्र सांगले यांचे कर्ज खातेची कागदपत्रांच्या प्रती, तक्रारदार व त्यांचे पती श्री. शिरीष रामचंद्र सांगले हे सुदर्शन कपॉसिटर्स यांचे कर्जास जामीनदार असलेचे जनरल फार्म ऑफ गँरंटीची कागदपत्रांच्या प्रती, बँक ऑफ बडोदा, शाखा वाळवा यांनी वि.प. बँकेस पाठवलेले पत्राची प्रत, तक्रारदार व पती श्री. शिरीष रामचंद्र सांगले यांचे हिस्सेची रक्कम “सुदर्शन कपॅसिटर्स” यांचे कर्जास जामीनदार असलेने वर्ग केलेबाबतचे व्हाऊचरांच्या प्रती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
6) तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तीवाद तसेच वि.प. यांचे म्हणणे दाखल पुरावे व युक्तीवाद यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. बँकेचा ग्राहक होतो का ? | होय |
2 | वि.प.बँकेने तक्रारदार यांना सेवा पुरविण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | नाही |
3 | तक्रारदार हा त्याने केलेल्या मागण्या मिळणेस पात्र आहे काय ? | नाही |
4 | आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न -
मुद्दा क्र. 1 व 2 -
7) तक्रारदाराने व तिचे पतीने डॉ. शिरीष रामचंद्र सांगले यांनी वि.प. बँकेकडे त्यांच्या निरनिराळया परदेशी चलनातील रकमा दोघांच्या स्वतंत्र FCNR खात्यामध्ये गेली पंधरा वर्षापासून ठेवलेल्या होत्या व आहेत. याबद्दल उभय पक्षकामध्ये दुमत नाही. तसेच सदर ठेव पावत्यांच्या मुदती संपलेनंतर वेळोवेळी पावत्यांचे नुतनीकरण करुन पुन्हा वि.प. बँकेकडेच ठेवणेत आलेल्या आहेत व अशी एकूण रक्कम रु. 10,16,514/- इतकी आहे व मुदतीनंतर सदर बँकेकडे सदर ठेवींची व्याजासहीत मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देणेत आली. तसेच तक्रारदाराने E-mail व्दारे तसेच शेवटी दि. 11-03-2012 रोजी लेखी मागणी केली मात्र वि.प. बँकेने तक्रारदार हिचे कुटूंबातील व्यक्ती “सुदर्शन कपॅसिटर्स” या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तक्रारदार यांची ठेव रक्कम वसुल करणेत आली आहे असे खोटे व बेकायदेशीर वक्तव्य केले आहे असे तक्रारदाराचे कथन आहे.
8) वि.प. यांचे कथनानुसार काही कलमाखेरीज संपूर्ण मजकूर परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे त्यांचे कथनानुसार तक्रारदार यांनी ठेव रक्कम बँक ऑफ बडोदामध्ये ठेवली होती हे बरोबर आहे मात्र सदरची रक्कम ही बँक ऑफ बडोदा उदगांव शाखेत न ठेवता ती पुणे कँप या शाखेत ठेवलेली आहे. सदरची ठेव FCNR खाते उघडून ठेवलेली आहे. सदरची फॉरेन करन्सी स्वरुपातील ठेव स्विकारणेचा अधिकार वि.प. बँकेस नव्हता व नाही. सबब, सदरची ठेव ही बँक ऑफ बडोदा, शाखा पुणे येथेच ठेवलेली होती व आहे. सबब, प्रस्तुतचा अर्ज या कोर्टात चालणेस पात्र नाही.
9) सदरची ठेव, शिरीष रामचंद्र सांगले व तक्रारदार यांनी त्यांचे जॉंईंट नावावर ठेवलेली होती व काही रक्कम तक्रारदार यांचे स्वत:चे नावे होती. तक्रारदार यांनी या बँकेत मुदत ठेव रक्कम ठेवून वि.पक्षकार बँकेकडून कर्ज घेतलेले होते व हा उल्लेख तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केलेला नाही. (LABOD ) व सदरचे कर्ज हे फेड केले नसलेने त्यांचे हिस्सेची रक्कम त्यांचे कर्ज खातेमध्ये वळती करुन घेतलेली आहे व तक्रारदार यांचे हिस्सेची रक्कम तक्रारदार यांचे कर्ज खातेलाच जमा करुन घेतलेली आहे तसे वळते करुन घेणेचा हक्क व अधिकार वि.प. यांना आहे.
10) शिरीष सांगले हे “सुदर्शन कपॉसिटर्स” या कंपनीचे संचालक होते. बँक ऑफ बडोदा, शाखा वाळवा यांचेकडून वर नमूद कंपनीने कर्ज घेतलेले होते व सदरचे कर्जास श्री. शिरीष रामचंद्र सांगले हे वैयक्तीक जामीनदार होते व सदरचे कर्ज थकीत झालेले होते. सबब, बँकीग रेग्युलेशन अॅक्ट व कॉन्ट्रक्ट अॅक्टमधील तरतुदीनुसार श्री. शिरीष रामचंद्र सांगले यांचे हिस्सेची रकम सदर कर्ज खातेमध्ये वर्ग केलेली आहे व याचे ज्ञान या तक्रारदारास आहे. तक्रारदाराने किती रक्कमेच्या ठेवी होत्या व त्यांची मुदत किती हाती तसेच त्या कोणाच्या नावे होत्या याचा उल्लेख केलेला नाही.
11) सदरच्या ठेवी या पुणे या शाखेत ठेवलेने वि.प. बँक तक्रारदारांना काहीही देणे लागत नाही. सबब, या बँकेकडे कोणतीच तक्रारदार यांची रक्कम शिल्लक नाही व तक्रारदार यांचे पतीचे हिस्सेची रक्कम ते जामीनवर असलेले कर्ज खातेमध्ये म्हणजेच बँक ऑफ बडोदा शाखा वाळवा यांचेकडे वर्ग केलेली आहे. त्यामुळे त्यांची ही रक्कम शिल्लक राहिलेली नाही. वि. पक्षकार हे तक्रारदार यांचे काहीही देणे लागत नाहीत.
12) तक्रारदार यांनी ठेव पावत्या या बँक ऑफ बडोदा पुणे येथे ठेवलेल्या होत्या व त्या आधारे कर्जखाते होते. तसेच तक्रार अर्जही मुदतीत नाही. सबब, वि.प. यांचा अर्ज खर्चासहीत नामंजूर करावा व रक्कम रु. 5000/- अर्जाचे खर्चाची रक्कम वि.प. यांना मिळावी असे कथन आपले म्हणणेत वि.प. यांनी केलेले आहे.
13) वर नमूद बाबींचा विचार करता सदरचा पत्रव्यवहार हा वि.प. बँक व तक्रारदार यांचेमध्ये झालेला आहे व तसा उदगांव शाखेबरोबर झाल्याचा, कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. सदर वि.प. बँकेची उदगांव शाखा मे. मंचाचे अधिकारक्षेत्रात येते. सबब, वि.प. यांनी घेतलेला सदरचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
14) वि.प. यांनी सदरचा तक्रार अर्ज मुदतीत नाही हाही आक्षेप घेतलेला आहे. तथापि सदर तक्रार अर्जाचा मुळ विषय वाद हा तक्रारदाराचे कर्ज प्रकरणाशी संबंधीत वाद विषय असलेने तो फक्त ठेव पावत्यांची मागणी इतका मर्यादित नसलेने तक्रारदाराने वारंवार आपल्या ठेव रक्कमांची मागणी केलेली आहे मात्र सदरचे तक्रारीस कारण सातत्याने घडत असलेने (continous casue of action) अर्जास मुदतीचा बाध येत नाही.
15) तक्रारदार यांनी कर्ज घेतले आहे हे उभयपक्षी मान्य आहे व सदर कर्जाची परतफेड तक्रारदार यांचे FCNR ठेव खात्यातील रकमेतून केलेली आहे हेही उभयपक्षी मान्य आहे. वादाचा मुद्दा इतकाच आहे की, सदरची कर्जाची रक्कम वजा जाता म्हणजेच सदर कर्जाची पुर्ण फेड झालेनंतरही तक्रारदार यांचे खातेवर रक्कम रु.10,16,514/- इतकी रक्कम शिल्लक राहते या संदर्भात तक्रारदाराने त्याने तक्रार अर्जासोबत अ.क्र. 4 व 5 चे कागदपत्रातील पत्रव्यवहारातून कळून येईल असे कथन केले आहे. तथापि, सदरचे कागदपत्रांवरुन हा पत्रव्यवहार हा नोव्हेंबर 2012 व डिसेंबर 2012 चा दिसून येतो व त्यावरुन फक्त तक्रारदारआपली FCNR Account मधील ठेव रक्कम मागत आहे इतकेच दिसून येते व त्यास बँक ऑफ बडोदा शाखा वाळवा यांनी उत्तरही दिलेले आहे. की,
“FDR received from our Bank of Baroda, Udgaon Branch had already credited to loan account in the name of Sudarshan Capacitors as follows –
Amount Rs. 864653.70 Date of credited 19/09/2007 FDR favouring Dr. Shrish Sangale
Amount Rs. 10,16,514.00 Date of credited 26/09/2007 FDR favouring Dr. Mrs.Ganga Sangale
तसेच तक्रारदार यांनीच त्यांचे तक्रार अर्जासोबत अ.क्र. 2 वर Branch Manager Walva यांचे पत्र दाखल केलेले आहे. व यामध्ये तक्रारदार यांचे पतीनी Bank of Baroda, Walva Branch, “Sudarshan Capacitors Pvt Ltd “ या कंपनीचे नावे तक्रारदार यांचे कुटूंबातीलच व्यक्ती Promotors असलेचे दिसून येते व सदरचे कर्जाची परतफेड करणेस वर नमूद कंपनी असमर्थ असलेने सदरचे account हे DRT कडे handover केलेले नमूद आहे व कोणताही response तक्रारदाराने DRT कडे दिलेला नाही हेही नमूद केलेले आहे व पुढे बँकने हेही नमूद केले आहे की, तकारदाराने आपले FCNR Accounts चे against ही उदगांव बँकमधून कर्ज काढलेले आहे. सदरची सुदर्शन कंपनी ही रिझर्व्ह बँकेने defaulters चे list मध्ये publish केलेने व Regional office कडून तशा सुचना केलेने सदरचे FCNR deposits loan A/C credit केलेचे नमूद केले आहे. व तसा तक्रारदार व त्यांचे पती यांचे नावे असलेला कर्जाखातेची कागदपत्रे, डॉ. शिरीष सांगले हे Sudharshan Capacitors या Company स Gurantor असलेले Genaral form of gurantee व डॉ. शिरीष सांगले यांचे हिस्सेची रक्कम “सुदर्शन कपॉसिटर्स” यांचे कर्जास जामीनदार असलेने वर्ग केलेबाबत व्हाऊचर अशी कागदपत्रे पुराव्यादाखल दाखल केलेली आहेत. तथापि तक्रारदाराने आपले FCNR Account वर असणा-या ठेवी अगर आपण स्वत: काढलेली कर्जे याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही इतकेच नाहीत तर तक्रारदाराने आपले तक्रार अर्जात साधे आपण वि.प. बँकेकडून कर्ज काढले आहे अगर Sudarshan Capacitors चे संदर्भात कोणतीही माहिती या मंचासमोर आणलेली नाही. तसेच ज्या मुद्दयांवर म्हणजेच आपली ठेव रक्कम रु. 10,16,514/- परत मिळणे संदर्भात असणारा कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. ज्या FCNR Account ने ठेव रक्कमेची तक्रारदार मागणी करत आहे त्याबद्दल कोणताही पुरावा या मंचासमोर नाही. सबब, तक्रारदाराचा FCNR Account जर पुणे शाखेत आहे तर सदरची ठेव रक्कम वि.प. बँकेकडून मागणेचा प्रश्नच येत नाही. तक्रारदाराने दि. 23-12-2015 रोजीचे फेरिस्तने दाखल केले कागदपत्रावरुन बँक ऑफ बडोदा, उदगांव ब्रॅच मॅनेजरनी तकारदाराचे FCNR Account ने डिपॉझिटचे टिपण दाखल केले आहे मात्र सदरचे टिपण हे दि. 4-12-1998 रोजी चे आहे. सबब तदरंतर त्या FCNR Account वर काही कर्जाचा व्यवहार झाला किंवा नाही याची कोणतीही माहिती तक्रारदाराने या मंचासमोर आणलेली नाही. सबब, तक्रारदाराची नक्की किती रक्कम वि.प. बँक देणे लागते हेही समजून येत नाही. तक्रारदाराने कोणत्याही ठेव पावतीचा क्रमांक या मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदार आपल्या विनंती कलमामध्ये मोघमातच रक्कमेची मागणी करीत आहे. सबब, या मंचासमोर तक्रारदाराने असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही की ज्याव्दारे हे मंच वि.प. बँकेने तक्रारदारास द्यावयाचे सेवेमध्ये काही त्रुटी केली आहे असे या निष्कर्षाप्रत येईल. सबब, वि.प. बँकेने तक्रारदार यांची रक्कम देणेचा प्रश्नच उदभवत नाही.
16) वि.प. ने या संदर्भात मा. वरिष्ठ न्यायालयाचे काही न्यायनिर्णय दाखल केलेले आहेत.
2002(3)CPR 10(NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Mrs. Anumati - Petitioner
Vs
Punjab National Bank - Respondent
Consumer Protection Act, 1986- Sections 12 and 17 – Banking service – Complaint with her husband had a fixed deposit with Bank – Husband stood as guarantor in a loan and mortgaged the fixed deposit – On default in repayment of loan, bank adjusted the fixed deposit against loan – Dist. Forum allowing complaint directed respondent bank to pay half amount of fixed deposit to complainant with interest - State Commission set aside the order in appeal – Revision – Bank having taken a conscious decision to protect its interest, it could not be faulted with there was no deficiency in service. Result : Revision dismissed.
तसेच
(2) 2001 (2) CPR 30 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
Canara Bank and Another - Appellant
Vs
C.D. Patel - Respondent
Consumer Protection Act, 1986- Section 23 – First Appeal and csross appeal against order of Karnataka State Commission – C.D. Patel and NRI giving Fixed deposit of 15,000 pounds as security for loan to M/s. Sunerush Fruits(P) Ltd in which he was a share holder – Security initially given for 2 years continued for 8 years – When company faced crisis C.D.Patel claimed entire amount with accrued interest – Denied byu Bank of ground of general lien – Complaint to State Commission – Allowed by
State Commission – Relationship between C.D.Patel and company – Shareholder and company – Security and judgement debtor – Can the company withhold the amount to meet not only the loan for which this amount of Fixed deposit was pledged but also for other dues of the Bank? (Yes, because nature of security gave general lien to the Bank) - Result – Bank’s appeal allowed – Cross appal dismissed – Order of State Commission set aside AIR 1981 SC 126 followed.(Cross Ref.Contrat Act, 1872 – Section 171 – General lien of Bankers)
3) IN THE SUPREME COURT OF INDIA
Civil Appeal No. 969 of 1981
Syndicate Bank
Vs
Vijay Kumar and Others
Case Note : Civil – lien – respondent – partner of judgement – debtor firm deposited two Fixed Deposit Receipts (FDR) – appellant – bank contended that it had lienover FDRs deposited by their clientand as Bankers they had right to hold it in respect of overdraft amount and attachment cannot be done by decree-holder – Banker has lien over securities received from customer in ordinary course of banking business and has right to use proceeds in respect of balance that may be due from customer by way of reduction of customer’s debit balance – appellant – bank had lien over FDRs – appeal allowed.
वि.प. बँकेतर्फे चीफ मॅनेजर “चंद्रशेखर नारायण पुरोहित” यांचे शपथपत्र व त्यासोबत तक्रारदार यांचे नावे असणा-या ठेव पावत्या व तारण ठेव पावत्या तसेच तक्रारदार यांचे नांवे व त्यांचे पती श्री. शिरीष सांगले यांचे नावे असणा-या ठेव पावत्या दाखल केलेल्या आहेत व वर नमूद वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णयाचा विचार करता “Financial Institution have every right to protect their interest by taking conscious decisions”. सबब, वि.प. बँकेने, तक्रारदारांना द्यावयाचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे व सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेचे निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदाराच्या बाकी मागण्या मान्य करणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.