निकाल
दिनांक- 01.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी पिक विमा योजने अंतर्गत सेवा देण्यास कसूर केला म्हणून सदरील योजने अंतर्गत पिक विमा लाभ मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार क्र.1 ते 15 करिता सदरील तक्रारदार क्र.2 यांचे सहीने दाखल केलेली आहे. सर्व तक्रारदारांची समान तक्रार व मागणी आहे. तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार हे ता.अंबाजोगाई जि.बीड येथील रहिवाशी असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी पिक विमा योजना राबविली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-याच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीनुसार पिक विमा योजना मंजूर केली आहे. शासनाने पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमानुसार व शासनाने दिलेल्या मुदतीत पिक विमा योजनेचा हप्ता जिल्हा बॅकेत अथवा राष्ट्रीयकृत बँकेत भरणे आवश्यक आहे. ज्या शेतक-यांनी पिक विमा रक्कमेचा हप्ता भरला आहे ते शेतकरी योजनेचा लाभ मागण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, सन 2008-09 या वर्षासाठी पिक विम्याची रक्कम ही बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई म्हणजेच सामनेवाले क्र.1 यांचेकडे दि.31.7.2008 रोजी भरले आहेत. त्या बाबत सविस्तर माहीती येणे प्रमाणे,
अ.क्र. | अर्जदाराचे नांव | गट नं. व क्षेत्र | भरलेली रक्कम व दिनांक | मिळणारी रक्क्म व तक्रार खर्च व मानसिक त्रासापोटीची रक्कम |
1 | राजेसाहेब बालासाहेब कापसे | 281/3 4 हे.39 आर | रु.4465/- दि.31.7.08 | रु.1,15,386/- रु.1600/- |
2 | धनंजय बालासाहेब कापसे | 6 हे. 83 आर | रु.7924/- दि.31.7.08 | रु.1,79,519/- रु.1600/- |
3 | भाऊसाहेब बालासाहेब कापसे | 4 हे. 39 आर | रु.5,152/- दि.31.07.08 | रु.1,15,386/- रु.1600/- |
4 | बालासाहेब नरसिंग कापसे | 4 हे. 17 आर | रु.7359/- दि.31.07.08 | रु.1,66,377/- रु.1600/- |
5 | यशोदाबाई बालासाहेब कापसे | 1 हे. 41 आर | रु.889/- दि.31.07.08 | रु.37,060/- रु.1600/- |
6 | गोरुबा लिंबाजी मगर | 1 हे.85 आर | रु.1106/- दि.31.07.08 | रु.48,625/- रु.1600/- |
7 | आत्माराम लिंबाजी मगर | 1 हे. 85 आर | रु.1110/- दि.31.07.08 | रु.48,625/- रु.1600/- |
8 | व्यकंट एकनाथ सुडे | 4 हे. 04 आर | रु.2590/- दि.30.07.08 | रु.1,15,649/- रु.1600/- |
9 | आशालता संभाजी रेडडी | 7 हे. 6 आर | रु.6524/- दि.31.07.08 | रु.2,45,492/- रु.1600/- |
10 | पवन संभाजी रेडडी | 9 हे. 97 आर | रु.4813/- दि.31.07.08 | रु.2,62,051/- रु.1600/- |
11 | संभाजी गोरोबा रेडडी | 6 हे.62 आर | रु.4274/- दि.31.07.08 | रु.1,74,000/- रु.1600/- |
12 | सतिष संभाजी पवार | 3 हे. 68 आर | रु.5358/- दि.31.07.08 | रु.96,725/- रु.1600/- |
13 | संजय शेषराव पाटील | 3 हे. 89 आर | रु.2729/- दि.31.07.08 | रु.1,02,244/- रु.1600/- |
14 | लिंबाजी गणपती मगर | 5 हे. 28 आर | रु.4106/- दि.31.07.08 | रु.1,38,779/- रु.1600/- |
15 | ज्ञानोबा निवृत जाधव | 4 हे. 90 आर | रु.2395/- दि.31.07.08 | रु.1,28,791/- रु.1600/- |
वर दर्शविलेल्याप्रमाणे तक्रारदार यांनी पिक विम्याची रक्कम सामनेवाले क्र.1 यांचेकडे भरलेली आहे. सदर पिक योजनेची रक्कमही सोयाबिन या पिकासाठी भरली आहे.
तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, शासनाने सन 2008-09 या सालाकरिता अंबाजोगाई येथे झालेल्या पिकाचे नुकसानीचे अनुमान काढून सोयाबिन या पिकासाठी प्रति हेक्टरी नुकसानीची टक्केवारी 85.31 एवढी गृहीत धरुन हेक्टरी रु.26,284/- एवढी रक्कम मंजूर केली आहे. तक्रारदार सोडून इतर शेतक-यांनी पिक विमा रक्कमेचा हप्ता भरला आहे. त्या सर्व शेतक-यांना पिक विम्याची रककम अदा करण्यात आली आहे. तक्रारदार यांना सदरील रक्कम देण्यात आली नाही.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे पिक विमा योजनेची रककमेची वेळोवेळी मागणी केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार यांनी दि.17.12.2009 रोजी सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊन पिक विमा योजना रक्क्मेची मागणी केली. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना पिक विमा रक्कम लवकरच अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु अद्यापपावेतो पिक विमा रक्कम अदा केलेली नाही. दि.04.10.2010 रोजी पून्हा तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केली. सामनेवाले यांनी विमा रक्कम देण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी पिक विमा रक्कमेचा हप्ता भरला आहे. सदरील हप्ता सामनेवाले क्र.2 यांचेकडे जमा होऊनही तक्रारदार यांना शासनाने विहीत केलेल्या नियमानुसार पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही. सामनेवाले यांनी पिक विमा योजनेची रक्क्म विमा हप्ता स्विकारला आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पिक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करुन मानसिक व शारीरिक त्रास दिलेला आहे. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांनी यापूर्वी यांच मंचासमोर ग्राहक तक्रार क्र.158/2010 दाखल केली होती. सदरील तक्रार तक्रारदार यांनी काही तांत्रिक कारणामुळे काढून घेऊन पून्हा नवीन तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रार महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई बेंच औरंगाबाद यांनी प्रथम अपिल नंबर 209/2013 निर्देश दि.29.10.2013 निर्देशानुसार दाखल करुन घेतली आहे. सबब, तक्रारदार यांनी अशी मागणी केली आह की, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी पिक विमा योजने अंतर्गत क्लेम मध्ये नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच नुकसान भरपाई वर द.सा.द.शे. 16 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.16 अन्वये लेखी म्हणणे सादर केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीत नमूद केलेल्या बाबीविषयी अनभिज्ञता दर्शवली आहे. सामनेवाले क्र.1 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी रक्कम भरणा केली असल्या बाबत कागदपत्र तपासल्याशिवाय ते काही सांगू शकत नाहीत. सामनेवाले क्र.1 या बँकेचा विमा कंपनीचे व्यवहारा बाबत माहीती नसून सामनेवाले क्र.1 याचेकडे विमा रक्कमेची मागणी करता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा हप्त्याची रक्कम भरली किंवा काय हे बँकेच्या मूळे पावत्या तपासल्याशिवाय सांगता येणार नाही असे कथन केले आहे. पिक विमा देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.2 यांची आहे. सामनेवाले क्र.1 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार क्र.158/2010 दाखल केली होती. सदरील तक्रार तक्रारदार यांनी दि.7.1.2012 रोजी निवारण झाल्यामुळे ती चालविणे नाही अशी पूरशिस दिलेली आहे. सबब, तक्रारदार यांनी नवीन तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.8 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 चे कथन की, तक्रारदार यांना सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कायदेशीर अधिकार नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे विमाधारक नाहीत. सामनेवाले क्र.2 हे तक्रारदार यांना कोणतीही सेवा देणे लागत नाही. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, राष्ट्रीय विमा योजना (एनएआयएस) ही लागू केलेली आहे. सरकार ती विशिष्ट भागामध्ये लागू करतात. जर पिक उत्पादनामध्ये घट झाल्यास शेतक-यांना सदरील विमा योजनेनुसार लाभ देण्यात येतो. सामनेवाले क्र.2 हे फक्त अंमलबजावणी करणारी संस्था आहे. कृषी विमा कंपनी इंडिया लि. हे विम्याची रक्कम नोडल बँकेकडून किंवा इतर आर्थिक संस्था कडून भरुन घेत व विशस्त म्हणून सदरील रक्कम ताब्यात ठेवले. सदरील योजने अंतर्गत हमी अंमजबजावणी एजन्सी व शासन याचेमध्ये विभागून घेतली जाते. सदरील तक्रार चालवण्याचा या मंचास अधिकार नाही.
सामनेवाले क्र.2 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांना भरलेला विमा हप्ता सामनेवाले क्र.1 कडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे नो प्रिमियम नो विमा या कारणास्तव तक्रार रदद होण्यास पात्र आहे. केवळ तक्रारदार यांचे बचत खात्यामध्ये रक्कम जमा केली म्हणजे ते पिक विमा योजने अंतर्गत भरलेले आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही. क्लेम हे एनऐआयएस यांचे तरतुदीनुसार सोडवले जातात. जर शेतक-याने पिक विमा रक्कम खरीप हंगाम 2008-09 मध्ये भरली आहे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांचेकडून सामनेवाले क्र.2 यांनी विमा रक्कम मिळाली नाही. जर शेतक-यांना मिळणा-या लाभापासून वंचित ठेवले गेले असेल व नोडल बँकेच्या चूकीमूळे झाला असेल तर सदरील बँक हे शेतक-याच्या नुकसानीस जबाबदार आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली नाही.सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र नि.18 वर दाखल केले. तक्रारदार यांनी नि.4,नि,21, नि.25, नि.26, नि.44 सोबत कागदपत्र हजर केले. तसेच तक्रारदार यांनी नि.22 वर अर्ज देऊन तक्रारदार यांनी यापूर्वी ग्राहक तक्रार क्र.158/2010 दाखल केली होती. सदरील तक्रारीचा निकाल दि.10.01.2012 रोजी देण्यात आला. ती तक्रार व त्यामध्ये दाखल केलेले कागदपत्र हया तक्रारीसोबत ठेऊन ते पुरावा म्हणून वाचण्यात यावेत असा अर्ज दिला, तो अर्ज मंजूर करण्यात आला. तक्रारदार यांनी नि.43 वर लेखी यूक्तीवाद दाखल केला. लेखी यूक्तीवादाचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नि.15 व नि.17 वर शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र यांचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाले क्र.2 विभागीय व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी यांचे लेखी कैफियती सोबत नि.9 वर कागदपत्र हजर केले. तक्रारदार यांचे वकील श्री.मसकर यांनी यूक्तीवाद केला. सामनेवाले क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्र यांचे वकील श्री.हस्सेगांवकर यूक्तीवादाचे वेळी गैरहजर. सामनेवाले क्र.2 यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व शपथपत्र यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा अंबाजोगाई या शाखेत पिक विमा रककमेचा हप्ता
भरला आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय होय.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पिक विम्याची नुकसान
भरपाईची रक्कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब
तक्रारदार शाबीत करतात काय होय.
3. तक्रारदार हे मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय होय.
4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद नि.43 मध्ये असे नमूद केलेले आहे की, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून सन 2008-09 या वर्षासाठी सोयाबिन या पिकासाठी तक्रारदार यांनी पिक विम्याची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई म्हणजे सामनेवाले क्र.1 यांचेकडे दि.31.7.2008 रोजी जमा केली आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2008-’09 या सालाकरिता अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीन या पिकासाठी नुकसानीचे अनुमान काढून प्रति हेक्टरी नुकसानीची टक्केवारी 85.31 एवढी गृहीत धरुन हेक्टरी रु.26,284/- एवढी नुकसान भरपाई देण्याविषयी आदेश काढलेले आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 या बँकेत सोयाबीन या पिकासाठी विमा उतरविलेला आहे व रक्क्म अदा केलेली आहे. असे असतानाही सामनेवाले यांनी पिक विमा रकक्मेची मागणी करुनही ती देण्यास टाळाटाळ केली आहे. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावर वेधले व तसेच शासन निर्णय यावर वेधले व तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे नमूद केले.
सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री. वाघमारे यांनी या मंचाचे लक्ष सामनेवाले यांनी नि.9 सोबत दाखल केलेल्या एस्तावर वेधले व असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी भरलेली विम्याची रकक्म सामनेवाले क्र.2 यांना प्राप्त झाली नाही. सामनेवाले क्र.1 यांनी सदरील राककम सामनेवाले क्र.2 यांचेकडे यादी करुन पाठविली नाही. सदरील विमा रक्कम प्राप्त न झाल्यामुळे सामनेवाले क्र. 2 हे नुकसान भरपाई देणे लागत नाही. सामनेवाले क्र.1 यांचे चूकीमूळे तक्रारदार यांचे नुकसान झाल्यास सामनेवाले क्र. 1 हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. सबब, सामनेवाले क्र. 2 यांचे विरुध्द तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी दाख केलेल्या संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन सन 2008-09 या सालाकरिता तक्रारदार यांनी त्यांचे शेतात सोयाबिनचे पिक केलेले होते असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विमा भरल्याच्या पावत्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 या बँकेत सोयाबिन या पिकाची विमा रकक्म भरली आहे असे निदर्शनास येते.
सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली कैफियत विचारात घेतली असता त्यांनी त्यांचे कैफियतीमध्ये तक्रारदार यांनी तक्रारीत केलेल्या बाबीविषयी माहीती नसून शासनाचे निर्णय व धोरण या बाबी माहीती नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी विमा रक्कम भरल्या बाबत मूळ कागदपत्र तपासल्याशिवाय उत्तर देऊ शकत नाही असे नमूद केलेले आहे. तसेच पिक विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. 1 यांची आहे असे नमूद केले आहे. वर नमूद केलेल्या बाबीचा विचार केला असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र. 1 यांचे अधिका-यांनी तक्रारदार यांना विम्याची जी रक्कम भरली आहे त्या बाबत कोणत्याही कागदपत्राची शहानिशा केली नाही तसेच ती रक्कम सामनेवाले क्र. 2 यांचेकडे पाठविली नाही.
राष्ट्रीय शेतकरी विमा योजना अंतर्गत काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. त्यामध्ये लोन घेतलेल्या शेतक-याकडून विम्याची रक्कम सक्तीने घेण्या बाबत निर्देश दिलेले आहेत व लोन देत असतानाच त्या लोन रक्कमेतून संबंधीत बँकेने विम्याची रक्कम कपात करुन घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत. सदरील प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी बँकेकडहून लोन घेतलेले आहे किंवा काय व ते लोन घेतलेले शेतकरी आहे किंवा काय ही बाब नमूद केलेली नाही. जर शेतक-याने लोन घेतले नसेल तर ज्या शेतक-यांना विम्याचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी प्रस्ताव बँकेकडे सादर करावा व त्या बँकेत विम्याची रक्कम भरावी व त्याकामी खाते उघडावे असे नमूद केलेले आहे. त्यांनी खाते उघडल्यानंतर संबंधीत बँकेने शेतक-यांना विमा प्रस्ताव पुर्तता करण्याकामी सर्व ती मदत करावी. विमा रक्कम स्विकारल्यानंतर संबंधीत बँकेची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्या बँकेने शहानिशा करुन विमा रक्कम नोडल बॅकेकउे पाठवावी. नोडल बँक ती रक्कम आयए (Implementing Agency)यांचेकडे पाठवते. संबंधीत पिक यांचे उत्पादन या बाबत राज्य सरकार कडून माहीती प्राप्त झाल्यानंतर जर शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असेल तर त्या प्रमाणामध्ये शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाते.
तक्रारदार यांनी त्यांचे शेतामध्ये सोयाबिन हे पिक घेतले होते. भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई यांचेकडहून खरीप हंगाम 2008 मधील पिकाचे झालेले नुकसान भरपाई क्लेम बाबत रककम निश्चित करण्यात आलेली आहे. सदरील रक्कम निश्चित करीत असताना महसूल निहाय पिक विमा नुकसान भरपाई टक्केवारीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. अंबाजोगाई या महसूल विभागामध्ये सोयाबिन या पिकाची टक्केवारी 85.31 अशी नमुद केलेली आहे. सबब, तक्रारदार हे पिक विमा योजनेचे लाभार्थी आहेत.
या मंचाने संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 या राष्ट्रीयकृत बँकेत सोयाबिन या पिकासाठी सन 2008-09 या वर्षाकरिता विम्याची रक्कम भरली आहे व ती रक्कम सामनेवाले क्र. 1 यांनी स्विकारली आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी त्यांचेकडे असलेल्या कोणत्याही कागदपत्राची शहानिशा केलेली नाही. तसेच सामनेवाले क्र. 1 यांनी विमा रक्कम स्विकारली नंतर पुढील कार्यवाही केली नाही. शेतक-यांनी विमा हप्ता बँकेत भरल्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी त्या शेतक-यांची यादी करुन पूढील कार्यवाहीसाठी विमा रक्कम नोडल बँकेला पाठवणे गरजेचे होते. सदरील रककम सामनेवाले क्र. 1 यांनी पाठविली नाही. अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार कृषी मंत्रालय यांनी राष्ट्रीय शेतकरी विमा स्कीम मध्ये मार्गदर्शक तत्वे विशद केलेली आहेत. तसेच विमा स्विकारणा-या संस्थेवर जबाबदारी निश्चित केली आहे. सदरील मार्गदर्शक तत्वामध्ये क्लॉज 5 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की,जर शेतकरी पिक विमा योजने पासून नोडल बँक, शाखा यांचे चूकीमूळे व निष्काळजीपणामुळे वंचित झाला असेल तर संबंधीत बँक शाखा नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहील. सदरील मार्गदर्शक तत्वाच्या आधारे सामनेवाले क्र. 1 यांचेकडे तक्रारदार यांनी सोयाबिन या पिकाकरिता 2008-09 या वर्षाकरिता पिक विम्याची रक्कम भरली आहे व ती सामनेवाले क्र. 1 यांनी स्विकारली आहे. असे असतानाही सामनेवाले क्र. 1 यांनी सदरील रक्कम पूढील कार्यवाहीसाठी पाठविली नाही अगर कोणतीही दखल घेतली नाही. यावरुन सामनेवाले क्र. 1 हे निष्काळजीपणाने वागले व शेतक-यानी भरलेली पिक विम्याची रक्कम पूढील कार्यवाहीसाठी पाठविली नाही. त्यांस सर्वस्वी सामनेवाले क्र. 1 हे जबाबदार आहेत.सबब, सामनेवाले क्र. 1 हे तक्रारदार यांना पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी भरलेली पिक विम्याची रक्कम सामनेवाले क्र. 2 यांचेकडे पाठविण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. 1 यांची होती ती त्यांनी पार पाडली नाही. विम्याची रक्क्म सामनेवाले क्र. 2 यांना प्राप्त झाली नाही त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान निश्चित करुन पिक विमा नुकसान भरपाई तक्रारदार यांना मिळाली नाही. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. त्यामुळे ते तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणे जागत नाही. सामनेवाले क्र. 1 बँक ऑफ महाराष्ट्र यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदार यांनी मागणी केलेली नुकसान भरपाई देण्याची सर्वस्वी जबाबदारी सामनेवाले क्र. 1 बँक ऑफ महाराष्ट्र यांचेवर आहे.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
7) आत्माराम लिंबाजी मगर यांना रक्कम रु.48,625/-, 8) व्यकंट एकनाथ सुडे यांना रक्कम रु.1,15,649/-,9) सौ.आशालता संभाजी रेडडी यांना रक्कम रु.2,45,492/-,10) पवन संभाजी रेडडी यांना रक्कम रु.2,62,051/-, 11) संभाजी गोरोबा रेडडी यांना रक्कम रु.1,74,000/-, 12) सतिष संभाजी पवार यांना रक्कम रु.96,725/-, 13) संजय शेषेराव पाटील यांना रक्कम रु.1,02,244/-,14) लिंबाजी गणपती मगर यांना रक्कम रु.1,38,779/-, 15) ज्ञानोबा निवृत्ती जाधव यांना रक्कम रु.1,28,791/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत., सदर रक्कम वरील तक्रारदारांना वरील मुदतीत न दिल्यास वरील सर्व रक्कमावर तक्रार दाखल दि.15.02.2012 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज संपूर्ण रक्कम मिळेपर्यत दयावे लागेल.
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड