सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 12/2010
तक्रार दाखल दि.02/02/2010
तक्रार निकाल दि.26/02/2013
श्री. दत्तप्रसाद मनोहर महाजन,
वय वर्षे 40, धंदा व्यापार,
रा. बांदा, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुद्ध
1) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे मुख्य प्रवर्तक,
व चेअरमन श्री. सहदेव सुकाजी सातार्डेकर
वय - सज्ञान, रा.बांदा, मराठी शाळेनजीक,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे सरव्यवस्थापक,
श्री. दशरथ अर्जुन परब
सज्ञान, रा. बांदा देऊलवाडी, ता.सावंतवाडी,
3) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे व्हा. चेअरमन
श्री हनुमंत शंकर आळवे, सज्ञान
रा.बांदा, पोलीस स्टेशननजीक, आळवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
4) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे संचालक
श्री सुदन राधाकृष्ण केसरकर, सज्ञान,
रा.बांदा, उभाबाजार, ता.सावंतवाडी
5) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे संचालक,
श्री सतीश अनंत येडवे, सज्ञान,
रा.बांदा, उभाबाजार, ता.सावंतवाडी
6) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे संचालक,
श्री आनंद विष्णू गवस, सज्ञान,
रा.गडगेवाडी, बांदा, ता.सावंतवाडी
7) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे संचालक,
श्री राजन भिमसेन पेडणेकर, सज्ञान,
रा.आळवाडी, दत्तात्रय सॉ मिल जवळ,
बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
8) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे संचालक,
श्री महादेव शंकर वसकर, सज्ञान,
रा.सटमटवाडी, बांदा, ता.सावंतवाडी
9) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा तर्फे मॅनेजर,
श्रीम.रश्मी रमेश सामंत, सज्ञान,
रा.बांदा, ता. सावंतवाडी
10) बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्धपक्षातर्फे- श्री गव्हाणकर, श्री मराठे
आदेश नि.1 वर
दि.26/02/2013
श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष : - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष बांदानगर अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी व संचालक यांचेविरुध्द बचत खात्यातील रक्कम मिळाली नाही म्हणून प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) आज तक्रारदार यांनी नि.55 वर अर्ज देऊन त्यांना सहकार न्यायालय, कोल्हापूर वर्ग- 2 यांचेकडे दावा दाखल करावयाचा आहे व त्यात अंतरीम आदेश घ्यावयाचे आहेत. त्यामुळे त्यांचा हक्क अबाधित ठेवून सदरचा अर्ज निकाली काढावा, अशी विनंती केली आहे.
3) तक्रारदार यांचा अर्ज पाहता न्यायाच्या दृष्टीने त्यांचा सहकार न्यायालयात लवाद दावा दाखल करण्याचा हक्क कायम ठेवून प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली काढणे योग्य व न्यायाचे होईल असे आम्हांस वाटते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
- आदेश –
1) तक्रारदार यांचा सहकार न्यायालय, कोल्हापूर येथे लवाद दावा दाखल करणेचा हक्क कायम ठेवण्यात येऊन तक्रार अर्ज निकाली काढण्यात येत आहे
2) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रती विनामुल्य पाठवण्यात याव्यात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 26/02/2013
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.