सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 99/2009
तक्रार दाखल झाल्याचा दि. 21/11/2009
तक्रार निकाल झाल्याचा दि. 15/01/2010
श्री अजित विष्णू कुलकर्णी
वय वर्षे 48, धंदा – व्यापार,
रा.गवळी तिठा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
बांदानगर अर्बन क्रेडीट को.ऑप.सो.लि.बांदा तर्फे
1) श्री सहदेव सुखाजी सातार्डेकर
वय सज्ञान, धंदा – चेअरमन,
रा.बांदा, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
2) श्री हनुमंत शंकर आळवे,
वय सज्ञान, धंदा – व्हाईस चेअरमन,
रा.बांदा बाजारपेठ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
3) श्री सुदन राधाकृष्ण केसरकर,
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.बांदा बाजारपेठ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
4) श्री सतिश अनंत येडवे
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.बांदा, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
5) श्री दिपक कृष्णा सावंत
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.बांदा बाजारपेठ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
6) श्री राजन भिमसेन पेडणेकर
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.बांदा, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
7) श्री आनंद विष्णू गवस
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.गडदेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
8) श्री पुंडलिक गोविंद बांदेकर
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.तलाठी ऑफिसजवळ, बांदा,
ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
9) श्री महादेव शंकर वसकर
वय सज्ञान, धंदा संचालक,
रा. सरमटवाडी, बांदा,
ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
10) श्री जानु विठु बुटे,
वय सज्ञान, धंदा – संचालक,
रा.डोंगरआळी, बांदा,
ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
11) श्रीमती विजया सुर्यकांत शिरोडकर
वय – सज्ञान, धंदा – संचालिका,
रा.बांदा बाजारपेठ, बांदा,
ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
12) श्रीमती उमा महादेव पांगम
वय सज्ञान, धंदा – संचालिका,
रा.आरोस बाजार, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग.
13) श्री राजन विनायक शेटये
वय सज्ञान, धंदा – मॅनेजर,
बांदानगर अर्बन क्रेडीट को.ऑप.सो.लि.
शाखा सावंतवाडी, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग.
14) श्री दशरथ अर्जुन परब
सरव्यवस्थापक, बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑ.
सो.लि.बांदा, प्रधान कार्यालय, गांधी चौक, बांदा ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एस.जी. मळगावकर.
विरुद्धपक्षातर्फे- प्रतिनिधी श्री दशरथ अर्जुन परब
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्रीमती उल्का गावकर, सदस्या)
नि का ल प त्र
(दि.15/01/2010)
1) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या पतसंस्थेत काही रक्कमा वेगवेगळया योजनेअंतर्गत गुंतविलेल्या होत्या. सदरहू रक्कमांची मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी रक्कम अदा केलेली नसलेमुळे, तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 हे बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटीचे चेअरमन असून विरुध्दपक्ष 2 हे व्हाईस चेअरमन आहेत. विरुध्द पक्ष क्र. 3 ते 12 हे को.ऑप.सोसायटीचे संचालक असून, विरुध्द पक्ष क्र.13 हे सावंतवाडी शाखेचे मॅनेजर आहेत. विरुध्द पक्ष क्र.14 हे कॉ.ऑप.सोसायटीचे सरव्यस्थापक आहेत. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्या पतसंस्थेत, सेव्हींग खात्यात, रिकरिंग डिपॉझिट तसेच दामदुप्पट ठेव योजनेत रक्कमा गुंतविल्या होत्या. सदरहू रकमेची मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी रक्कम अदा केलेली नसलेमुळे तक्रारदाराने सदरहू रक्कमेची मागणी व्याजासहीत केलेली आहे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-, तक्रार खर्च रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
2) तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र दिलेले आहे. तसेच तक्रारदाराने नि.2/1 ते 2/5 वर गुंतविलेल्या रक्कमेचे पासबुक, (झेरॉक्स) तसेच ठेव पावत्या (झेरॉक्स) हजर केलेल्या आहेत.
3) सदरहू तक्रारीच्या नोटीसा विरुध्द पक्षाला बजावण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.8 व 2 ची नोटीस Not Claim केलेमुळे परत आलेली आहे. ती नि.15 व 16 वर आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ते 9 व 13 व 14 हे या कामी हजर झाले. विरुध्द पक्ष क.13 ने नि.33 वर आपले म्हणणे दिले. अन्य विरुध्द पक्ष यांचे वतीने विरुध्द पक्ष क्र.14 ने आपले म्हणणे नि.36 वर दिलेले आहे. नि.35 वर तक्रारदारने लेखी व तोंडी जबाब दयावयाचा नाही, याबाबत पूरसिस दिलेली आहे.
4) तक्रारदारची तक्रार, त्यांनी हजर केलेली कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचा युक्तीवाद याचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष यांनी त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय. अंशतः |
-का र ण मि मां सा-
मुद्दा क्रमांक 1 व 2 - i) तक्रारदारांनी विरुध्द पक्ष यांचेकडे ठेवलेल्या रकमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
‘अ’ परिशिष्ट ‘रिकरिंग डिपॉझिट’
अ.क्र. | खाते नंबर | जमा रक्कम | अंतीम जमा रक्कम दिनांक |
1 | 121 | 27,000/- | 01/05/2008 |
‘ब’ परिशिष्ट ‘सेव्हिंग खाते’
अ.क्र. | खाते नंबर | जमा रक्कम | अंतीम जमा रक्कम दिनांक |
1 | 409/6 | 30,685/- | 15/11/2008 |
‘क’ परिशिष्ट ‘दामदुप्पट ठेवी’
अ.क्र. | पावती नंबर | रक्कम ठेवल्याचा दिनांक | ठेवलेली रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | परतीचा दिनांक |
1 | 379 | 04/12/2003 | 7,500/- | 15,000/- | 04/12/2009 |
2 | 380 | 04/12/2003 | 7,500/- | 15,000/- | 04/12/2009 |
3 | 344 | 02/07/2003 | 5,000/- | 10,000/- | 02/01/2009 |
तक्रारदारने वरीलप्रमाणे रक्कमा विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत गुंतविलेल्या होत्या हे नि.2/1 ते नि.2/5 वरील पावत्यांवरुन दिसून येते. विरुध्द पक्ष ही वित्त पुरवठा करणारी पतसंस्था असलेने व तक्रारदारनी विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत रक्कमा गुंतविल्या असल्याने तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे “ग्राहक” होतात.
ii) तक्रारदारने विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेकडे वर नमूद परिशिष्ट ‘अ’, ‘ब’ व ‘क’ मधील रक्कमांची मागणी केली असता सदरहू रकमा तक्रारदार यांना देण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी नि.36 वरील म्हणण्यात रक्कम जमा करणेस तयार असून पतसंस्था आर्थिक अडचणीत असलेमुळे व पतसंस्थेवर निबंधक, सहकारी संस्था यांना देखरेखीसाठी नेमलेले आहे, असे नमूद केलेले आहे, परंतु या संदर्भात कोणतीही कागदपत्रे हजर केलेली नाहीत. विरुध्द पक्ष क्र.13 यांनी नि.33 वर म्हणणे देऊन आपले नाव कमी करणेबाबत नमूद केलेले आहे, परंतु विरुध्द पक्ष क्र.13 हे सद्यस्थितीत पतसंस्थेचे सावंतवाडी शाखेचे मॅनेजर असून विरुध्द पक्ष यांच्या ठेवी या सावंतवाडी शाखेच्या असल्याने तक्रारदाराच्या ठेवी परत करण्यास ते ही विरुध्द पक्ष यांचेएवढेच जबाबदार आहेत. तक्रारदार यांना पैशाची गरज आहे हे दाखविण्याकरीता त्यांनी नि.2/6 वर सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी यांचा दाखला हजर केलेला आहे. त्यानुसार तक्रारदार यांस रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) रुपयांचे कर्ज आहे. एकंदरीत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारने मागणी केल्यानंतर त्यांना रक्कमा देणे आवश्यक होते; परंतु त्यांनी जाणूनबुजून टाळाटाळ केलेली आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत नक्कीच त्रुटी केलेली आहे.
मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारने ‘क’ परिशिष्टात ठेवलेल्या दामदुप्पट ठेव योजनेतील रकमा या आपला मुलगा विश्वेश अजित कुलकर्णी व मुलगी रिचा अजित कुलकर्णी यांचे नावे ठेवलेल्या दिसतात. तक्रारदार यांचा मुलगा व मुलगी अज्ञान असलेबाबतचे दाखले तक्रारदाराने नि.37/1 वर नि.37/2 वर दाखल केलेले आहेत. त्यामुळे यांचेवतीने तक्रारदारास सदरहू रकमा देणे योग्य आहे. ‘अ’ परिशिष्टातील जमा रक्कम रु.27,000/- व ‘ब’ परिशिष्टातील जमा रक्कम रु.30,685/- या रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसार 6 टक्के व्याजदाराने रक्कम तक्रारदारास अदा करणे योग्य आहे असे आमचे मत आहे. तसेच ‘क’ परिशिष्टातील रकमांची ठेव मुदत पूर्ण झालेमुळे त्यांना परत करणे आम्हांस योग्य वाटते. त्याप्रमाणे आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
अं ति म आ दे श
1) तक्रारदारची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2) ‘अ’ परिशिष्टातील रक्कम रु.27,000/-(रुपये सत्तावीस हजार मात्र) ही रक्कम दि.01/05/2008 पासून ते रक्कम पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी बांदा व विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी.
3) ‘ब’ परिशिष्टातील रक्कम रु.30,685/-(रुपये तीस हजार सहाशे पंच्याएंशी मात्र) एवढी रक्कम दि.15/11/2008 पासून ते सदरील रक्कम पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी बांदा व विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी.
4) ‘क’ परिशिष्टातील कॉलम नं.5 मध्ये नमूद केलेल्या रक्कमा, कॉलम नं.6 मध्ये नमूद दिनांकापासून ते सदरील रक्कमा पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी बांदा व विरुध्दपक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी.
5) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी बांदा व विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत कसूर केलेमुळे, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्चाबद्दल तक्रारदारांना रक्कम रु.3,500/- (रुपये तीन हजार पाचशे मात्र) वैयक्तिक व संयुक्तिकरित्या अदा करावी.
6) वरील आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या 45 दिवसांच्या आत करण्यात यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 15/01/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-