सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक –16/2010
कु.गायत्री सतिश मोरजकर
वय सु.6 वर्षे, धंदा शिक्षण
रा.दांडेली-आरोस, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग
तर्फे अज्ञान पालनकर्ते वडील
श्री सतिश अंकुश मोरजकर
वय सु.36 वर्षे, धंदा – शेती व व्यापार
रा.दांडेली-आरोस, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लिमिटेड
तर्फे चेअरमन श्री सहदेव सुकाजी सातार्डेकर
रा.बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लिमिटेड
तर्फे व्हाईस चेअरमन श्री हनुमंत शंकर आळवे
रा.बांदा बाजारपेठ, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
3) श्री दशरथ परब, सरव्यवस्थापक
बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लिमिटेड
रा.बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर),
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री सचिन सावंत.
विरुद्ध पक्षातर्फे - विधिज्ञ श्री एस.के. मराठे
(दि.30/12/2013)
श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष/- तक्रारदार यांनी प्रस्तुत अर्ज या मंचाने तक्रार क्रमांक 67/2009 मध्ये दि.30/09/2009 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणेसाठी कलम 25(3) नुसार वसुली दाखला मिळणेसाठी दाखलक केली आहे.
2) तक्रारदार यांनी याम मंचात तक्रार क्र.67/2009 दाखल केली होती. त्याचा निकाल दि.30/09/2009 रोजी देण्यात आला. सदर आदेशानुसार विरुध्द पक्ष यांनी रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे वसुली दाखला पाठवावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
3) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.3/1 वर निकालपत्र व शपथपत्र दाखल केले आहे.
4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपला खुलासा नि.16 वर दाखल करुन तक्रारदार यांनी बांदा अर्बन सोसायटीला पार्टी केलेले नाही. जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. तसेच मा.राज्य आयोग यांनी अपिल क्र.42/2010 मध्ये प्रकरणात संस्थेला पार्टी करणेसाठी दि.07/07/2011 रोजी प्रकरण फेरसुनावणीसाठी परत केले आहे. तक्रारदार यांनी संस्थेस पार्टी केलेले नसल्यामुळे वसुली अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ संचालक मंडळ बरखास्त केल्याचा आदेश, अपिल क्र.42/2010 ची प्रत आणि संस्थेच्या मालमत्तेचा उतारा दाखल केला आहे.
6) तक्रारदार यांचा अर्ज व विरुध्द पक्ष यांचा खुलासा पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार वसुली दाखला मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
2 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
7) तक्रारदार यांनी तक्रार क्र.67/2009 दाखल केला होता. त्याचा निकाल दि.30/09/2009 रोजी देण्यात आला हे नि.3/1 वरील निकालपत्रावरुन स्पष्ट होते. सदर निकाल खालीलप्रमाणे आहे.
- आदेश –
1) बांदा अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. बांदा आणि विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराने गुंतविलेल्या, निकालपत्रातील परिशिट ‘अ’ मध्ये दर्शविलेल्या रक्कमा मुदत पूर्ण झाल्याचे दिनांकापासून रक्कमेची पूर्ण परतफेड होईपर्यंत 9 टक्के व्याजदराने तक्रारदारास देण्याचे आदेश पारीत करणेत येतात.
2) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेतील त्रुटीबद्दल मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाच्या नुकसानीबद्दल आणि प्रकरण खर्च मिळून एकूण रक्कम रु.3,500/- (रुपये तीन हजार पाचशे) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास दयावेत.
3) सदरहू आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
8) आदेश क्र.2 मध्ये नमूद परिशिष्ट ‘अ’ खालीलप्रमाणे आहे.
परिशिष्ट ‘अ’
अ.नं | पावती नं. | ठेवीची मिळणारी रक्कम | मिळण्याचा दिनांक |
1 | 3703 | 8900 | 01/11/2008 |
2 | 3708 | 8900 | 02/11/2008 |
3 | 3994 | 8900 | 28/10/2008 |
| एकूण | 26,700 | |
9) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रक्कम दिली असे म्हटलेले नाही. फक्त संस्थेला पार्टी केलेले नाही असे म्हटले आहे. परंतु तक्रार अर्जात विरुध्द पक्ष क्र.1 ही बांदा अर्बन सोसायटी आहे व सोसायटीचे वतीने चेअरमन व व्हाईस चेअरमन व व्यवस्थापक यांना पार्टी केलेले आहे. त्यामुळे सदर आक्षेप मान्य करता येणार नाही.
10) विरुध्द पक्ष यांनी संस्थेच्या मालमत्तेचा उतारा दिला आहे. त्यावरुन संस्थेकडे रक्कम देण्याची ऐपत आहे असे स्पष्ट होते. तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असले तरी संस्थेचे प्रशासकीय मंडळाने तक्रारदार यांची रक्कम देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
- आदेश -
1) तक्रारदार यांचा ग्राहक संरक्षण कायदा कलम 25(3) नुसार वसुली दाखला मिळणेसाठीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2) प्रबंधक, ग्राहक मंच, सिंधुदुर्ग यांनी वसुली दाखला जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पाठवावा.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक - 30/12/2013
(वफा जमशीद खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग