Maharashtra

Jalgaon

CC/08/834

Baliram Pema Zambre - Complainant(s)

Versus

Bamnod Gramin co.op credit society - Opp.Party(s)

Adv. Patil

05 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/834
 
1. Baliram Pema Zambre
Jalgaon
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Bamnod Gramin co.op credit society
Bamnod
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M.Yeshirao MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 834/2008
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः- 07/07/2008
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 31.07.2008
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 05/10/2009
चि.निखिल बळीराम झांबरे,
अ.पा.क.बळीराम पेमा झांबरे,
वय- 52 वर्षे, धंदा-किराणा व्‍यावसायीक,
रा.प्‍लॉट नं.16, गट नंबर 84,
      श्रीराम नगर, दादावाडी, जळगांव,
     ता.जि.जळगांव.                              ..........      तक्रारदार
      विरुध्‍द
1.     बामणोद ग्रामीण सह.पतसंस्‍था लि.बामणोद,
ता.यावल, जि.जळगांव.
समन्‍स मॅनेजर यांचेवर बजवावेत.
2.    डॉ.जगन्‍नाथ धोंडु भंगाळे, चेअरमन,
रा.बामणोद ग्रामीण सह.पतसंस्‍था लि.बामणोद,
ता.यावल,जि.जळगांव.
3.    श्री.राजेंद्र गोपाळ राणे, व्‍हा.चेअरमन,
4.    श्री.संजय बळीराम राणे, संचालक,
5.    श्री.प्रदीप आनंदा टोके, संचालक,
6.    श्री.प्रल्‍हाद पंडीत वाघुळदे, संचालक,
7.    डॉ.नरेंद्र वामन कोल्‍हे, संचालक,
8.    श्री.मोहन गोपाळ इंगळे, संचालक,
9.    श्री.दिपक देवराम नेहते, संचालक,
10.   श्री.शशिकांत भानुदास झांबरे, संचालक,
11.    श्री.मुरलीधर केदर नाथ, म.वि.जाती-जमाती,
12.   श्री.प्रकाश ठाकुर वाघुळदे, इतर मागासवर्ग,
13.   श्री.प्रकाश सावळू पांडव, अनु.जाती-जमाती,
14.   श्री.दिलीप नथ्‍थू जावळे, आर्थिक दुर्बल घटक,
15.   सौ.भारती जीवन बोरोले, महिला संचालिका,
16.   सौ.सिंधू प्रभाकर सरोदे, महिला संचालीका.       ..........      सामनेवाला
वरील सर्व 3 ते 16 रा.बामणोद, ता.यावल,जि.जळगांव.
 
 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 05/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
                  तक्रारदार तर्फे  श्री.प्रशांत रमेश पाटील वकील हजर
                  सामनेवाला क्रं. 1 ते 16 तर्फे श्री.पी.ई.नेमाडे वकील हजर.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.   तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, मुदत ठेवी तपासल्‍या असता त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
1349
30/08/2007
50,000/-
29/02/2008

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेनंतर तसेच तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार  यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.    
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आल्‍यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या.   सामनेवाला क्रमांक 1 ते 16 हे प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले व लेखी म्‍हणणे सादर केलेले आहे.
           3.    सामनेवाला क्र. 1 ते 16 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   अलिकडच्‍या काळात पतसंस्‍थेबद्यल गैरसमज वाढल्‍याने सर्व ठेवीदारांनी एकाएकी त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा परत मागण्‍यास सुरुवात केली. तसेच हल्‍लीचे संचालक मंडळ कर्जदारांकडे त्‍यांच्‍या कर्जाच्‍या हप्‍त्‍यांच्‍या रक्‍कमा व त्‍यावरील व्‍याज वसुली करण्‍याचे युध्‍दपातळीवर काम करीत आहेत.   जस जश्‍या रक्‍कमा वसुल होत आहेत तस तश्‍या ठेवीदारांना त्‍या दिल्‍या जात आहेत.   तक्रारदाराच्‍या ठेव पावतीच्‍या रक्‍कमा अग्रक्रमाने त्‍यांना देण्‍यात येतील असेही आश्‍वासन संचालक मंडळाने दिलेले आहे मात्र तक्रारदाराने त्‍याकडे दुर्लक्ष करुन प्रस्‍तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे.   सामनेवाला क्र. 1 पतसंस्‍था तक्रारदाराचे पैसे देण्‍यास तयार आहे त्‍यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्‍यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 ते 16 यांनी केली आहे.  
            4.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे  याचे अवलोकन केले असता व  तक्रारदार यांचे वकील यांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1   सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्रा दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते  16 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची उपरोक्‍त आदेश कलम 1 मध्‍ये नमुद मुदत ठेव पावती ही मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेली रक्‍कम त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे . 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 16 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.  
            ( फ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 05/10/2009
 
                              (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )         ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M.Yeshirao]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.