Complaint Case No. CC/22/35 | ( Date of Filing : 21 Feb 2022 ) |
| | 1. Shri.Keshaorao Dadji Bagade | R/o Visapur,Tah-Ballarpur,Dist- Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Ballarpur Nagri Sahakari Pat Sanstha,Ballarpur Through its Chairman Nandkishor N.Kirnapure | R/o.Sabji Market,Shriram ward,Ballarpur | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १०/११/२०२२) - प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक ०३/१०/२०२० रोजी रुपये ३५,०००/- मुदत ठेव मध्ये जमा केले. मुदत ठेव पावतीचा क्रमांक २३३१७ असून कालावधी दिनांक ०३/१०/२०२० ते ३/११/२०२१ असा १३ महिण्याचा असून मुदत ठेवीमधील परिपक्वता रक्कम ही ९ टक्के व्याजासह रुपये ३८,४१२/- मिळणार होती. याशिवाय तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक ३०/१०/२०२० रोजी क्रमांक २१८७७ चे दैनिक बचत खाते उघडले असून त्यामध्ये रुपये ७३,८४०/- जमा केलेले होते. सदर दैनिक बचत खात्याची मुदत दिनांक ३१/१०/२०२१ रोजी पूर्ण झालेली असून तक्रारकर्त्यास ही रक्कम परत करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्ता यांनी उपरोक्त मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्षाकडे मुदत बंद ठेवीची रक्कम रुपये ३८,४१२/- तसेच दैनिक बचत ठेवीची रक्कम रुपये ७३,८४०/- ची विरुध्द पक्षाकडे वारंवार तोंडी मागणी केल्यावरही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रक्कम दिली नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक २१/१२/२०२१ रोजी अधिवक्तामार्फत पंजिबध्द नोटीस पाठवून सदर रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी पूर्तता केली नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास मुदत ठेवीची तसेच दैनिक बचत ठेवीची रक्कम परिपक्वता तिथी नंतरही न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष यांनी त्यांचेकडे जमा असलेली रक्कम रुपये ३८,४१२/- व त्यावर दिनांक ४/११/२०२१ पासून १२ टक्के व्याज तसेच दैनिक बचत खाते मधील रक्कम रुपये ७३,८४०/- व त्यावर १२ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च रक्कम रुपये ५०,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे, अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष आयोगासमक्ष हजर होऊनसुध्दा त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे आयोगाने निशानी क्रमांक १ वर दिनांक १५/०९/२०२२ रोजी विरुध्द पक्ष चे लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याचे तक्रारीलाच त्यांचापुरावा समजण्यात यावा अशी पुर्सिस, तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यात आले व त्यावरील निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहे कायॽ होय २. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली होय आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक ०३/१०/२०२० रोजी रक्कम रुपये ३५,०००/-, दिनांक ०३/१०/२०२० ते दिनांक ३/११/२०२१ या १३ महिण्यांच्या कालावधीकरिता मुदत ठेव पावती क्रमांक २३३१७ अन्वये जमा केले असून ती रक्कम ९ टक्के व्याजासह परिपक्वता दिनांक ०३/११/२०२१ रोजी ३८,४१२/- एवढी रक्कम मिळणार होती. तसेच तक्रारकर्त्याने परत विरुध्द पक्षाकडे दिनांक ३१/१०/२०२० रोजी दैनिक ठेव खाते पासबुक काढले असून त्याचा खाते क्रमांक २१८७७ व त्याची परिपक्वता दिनांक ३१/१०/२०२१ व रक्कम मिळण्याची दिनांक १०/११/२०२१ आहे. याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मुदत ठेव पावती व दैनिक ठेव खाते पासबुक दिले असून प्रकरणात निशानी क्रमांक २ सह दस्त क्रमांक ३ व ४ वर दाखल आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने दिनांक २०/०७/२०२० रोजी विरुध्द पक्षाकडे सभासद फी जमा केल्याचे जमा पावती दस्त क्रमांक ६ वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याची उपरोक्त मुदत ठेव पावतीनुसार परिपक्वता रक्कम रुपये ३८,४१२/- विरुध्द पक्षाकडे जमा आहे तसेच दैनिक ठेव खाते पासबुक चे अवलोकन केले असता त्यावर मुदत पूर्ण होण्याची दिनांक ३१/१०/२०२१ असून पैसे मिळण्याची दिनांक १०/११/२०२१ असून त्यावर व्यवस्थापकाची स्वाक्षरी आहे आणि त्यामध्ये अखेर शिल्लक रक्कम रुपये ७३,८४०/- ची नोंद आहे. विरुध्द पक्ष यांनी परिपक्वता तिथीला मुदत ठेव पावतीची परिपक्वता रक्कम रुपये ३८,४१२/- तसेच दैनिक ठेव खाते पासबुकमधील रक्कम सुध्दा देय तिथीला दिनांक १०/११/२०२१ ला दिली नाही. त्यानंतरही तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षाकडे मागणी केल्यावरही विरुध्द पक्षाने त्यांचे कडे जमा असलेली उपरोक्त रक्कम तक्रारकर्त्यास परत दिली नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक २१/१२/२०२१ रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्तामार्फत नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त झाल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी याची पुर्तता केली नाही. सदर नोटीस, पोचपावती तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केली आहे. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास मुदत ठेव पावती व दैनिक ठेव खाते पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम देणे लागतात परंतु त्यांनी परिपक्वता तिथीला व त्यानंतर तक्रारकर्त्याने मागणी करुनही रक्कम न देऊन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दर्शविली हे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडून मुदत ठेव पावतीची परिपक्वता रक्कम व दैनिक ठेव खाते पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह तसेच तक्रारकर्त्यास रक्कम परत न केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार क्र. ३५/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेव पावती क्रमांक २३३१७ ची परिपक्वता रक्कम रुपये ३८,४१२/- तसेच दैनिक ठेव खाते पासबुक क्रमांक २१८७७ मध्ये जमा असलेली रक्कम रुपये ७३,८४०/- व त्यावर तक्रार दाखल दिनांक पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याज द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक वमानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रार खर्च १०,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |