Complaint Case No. CC/22/36 | ( Date of Filing : 21 Feb 2022 ) |
| | 1. Sau.Vanmala Keshaorao Bagade | R/o.Visapur,Tah-Ballarpur,Dist-Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Ballarpur Nagri Sahakari Pat Sanstha,Ballarpur Through its Chairman Nandkishor N.Kirnapure | R/o Visapur,Tah-Ballarpur,Dist- Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १०/११/२०२२) - प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक २५/०८/२०२० रोजी रुपये २०,०००/- मुदत ठेव मध्ये जमा केले. मुदत ठेव पावतीचा क्रमांक २२९३९ असून कालावधी दिनांक २५/०८/२०२० ते २५/०९/२०२१ असा १३ महिण्याचा असून मुदत ठेवीमधील परिपक्वता रक्कम ही ९ टक्के व्याजासह रुपये २१,९५०/- एवढी मिळणार होती. याशिवाय तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक १७/०६/२०२१ रोजी क्रमांक ११९३ चे दैनिक बचत खाते उघडले असून त्यामध्ये रुपये ६,०००/- जमा केले होते. सदर दैनिक बचत खात्याची मुदत दिनांक १७/०७/२०२२ रोजी पूर्ण झालेली असून तक्रारकर्तीस ही रक्कम परत करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्ती यांनी उपरोक्त मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्षाकडे मुदत बंद ठेवीची रक्कम रुपये २०,०००/- तसेच दैनिक बचत ठेवीची रक्कम रुपये ६,०००/- ची विरुध्द पक्षाकडे वारंवार तोंडी मागणी केल्यावरही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस रक्कम दिली नाही त्यामुळे तक्रारकर्ती यांनी दिनांक २१/१२/२०२१ रोजी अधिवक्तामार्फत पंजिबध्द नोटीस पाठवून सदर रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी पूर्तता केली नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस मुदत ठेवीची तसेच दैनिक बचत ठेवीची रक्कम परिपक्वता तिथी नंतरही न देऊन तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली त्यामुळे तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, तक्रारकर्तीस विरुध्द पक्ष यांनी त्यांचेकडे जमा असलेली रक्कम रुपये २१,९५०/- व त्यावर दिनांक २५/०९/२०२१ पासून १२ टक्के व्याज तसेच दैनिक बचत खाते मधील रक्कम रुपये ६,०००/- व त्यावर १२ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च रक्कम रुपये ५०,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे, अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष आयोगासमक्ष हजर होऊनसुध्दा त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे आयोगाने निशानी क्रमांक १ वर दिनांक १५/०९/२०२२ रोजी विरुध्द पक्ष चे लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
- तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्तीचे तक्रारीलाच त्यांचा पुरावा समजण्यात यावा अशी पुर्सिस, तक्रारकर्तीचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यात आले व त्यावरील निष्कर्षे पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष यांची ग्राहक आहे कायॽ होय २. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली होय आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ती हिने विरुध्द पक्ष संस्थेमध्ये दिनांक २५/०८/२०२० रोजी रक्कम रुपये २०,०००/-, दिनांक २५/०८/२०२० ते दिनांक २५/०९/२०२२ या १३ महिण्यांच्या कालावधीकरिता मुदत ठेव पावती क्रमांक २२९३९ अन्वये जमा केले असून ती रक्कम ९ टक्के व्याजासह परिपक्वता दिनांक २५/०९/२०२१ रोजी २१,९५०/- एवढी रक्कम मिळणार होती. तसेच तक्रारकर्तीने परत विरुध्द पक्षाकडे दिनांक १७/०६/२०२१ रोजी १२ महिण्यांकरिता आवर्त ठेव खाते पासबुक काढले असून त्याचा खाते क्रमांक ११९३ व त्याची परिपक्वता दिनांक १७/०७/२०२२ आहे. याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस मुदत ठेव पावती व आवर्त ठेव खाते पासबुक दिले असून ते प्रकरणात निशानी क्रमांक २ सह दस्त क्रमांक ३ व ४ वर दाखल आहेत. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने दिनांक २०/०७/२०२० रोजी विरुध्द पक्षाकडे सभासद फी जमा केल्याचे जमा पावती दस्त क्रमांक ५ वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्तीची उपरोक्त मुदत ठेव पावतीनुसार परिपक्वता रक्कम रुपये २१,९५०/- विरुध्द पक्षाकडे जमा आहे तसेच आवर्त ठेव खाते पासबुक चे अवलोकन केले असता त्यावर मुदत पूर्ण होऊन पैसे मिळण्याची दिनांक १७/०७/२०२२ असून त्यावर व्यवस्थापकाची स्वाक्षरी आहे तसेच त्यामध्ये रक्कम रुपये ६,०००/- जमा असल्याची नोंद आहे. विरुध्द पक्ष यांनी परिपक्वता तिथीला मुदत ठेव पावतीची परिपक्वता रक्कम रुपये २१,९५०/- तसेच आवर्त ठेव खाते पासबुकमधील रक्कम सुध्दा देय तिथीला दिली नाही. त्यानंतरही तक्रारकर्तीने वारंवार विरुध्दपक्षाकडे मागणी केल्यावरही विरुध्द पक्षाने त्यांचे कडे जमा असलेली उपरोक्त रक्कम तक्रारकर्तीस परत दिली नाही त्यामुळे तक्रारकर्ती हिने दिनांक २१/१२/२०२१ रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्तामार्फत नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त झाल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी त्याची पुर्तता केली नाही. सदर नोटीस पोचपावती तक्रारकर्तीने प्रकरणात दाखल केली आहे. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्तीस मुदत ठेव पावती व आवर्ती ठेव खाते पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम देणे लागतात परंतु त्यांनी परिपक्वता तिथीला व त्यानंतरही तक्रारकर्तीने मागणी करुनही रक्कम न देऊन तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनता दर्शविली हे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाकडून मुदत ठेव पावतीची परिपक्वता रक्कम व आवर्त ठेव खात्यामध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह तसेच तक्रारकर्तीस रक्कम परत न केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्र. ३६/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला मुदत ठेव पावती क्रमांक २२९३९ ची परिपक्वता रक्कम रुपये २१,९५०/- तसेच आवर्त ठेव खाते पासबुक क्रमांक ११९३ मध्ये असलेली जमा रक्कम रुपये ६,०००/- व त्यावर तक्रार दाखल दिनांक पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याज द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रार खर्च ५,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |