निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 16/05/2011 तक्रार नोदणी दिनांकः-27/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 28 /09/2011 कालावधी 04 महिने01दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सुभाष देवराव जोंधळे. अर्जदार वय 43 वर्ष.धंदा.अटो ड्रायव्हर. स्वतः रा.उदय नगर,साखला प्लॉट,लोहगाव रोड परभणी ता.जि.परभणी. विरुध्द बळीराम संतोबा वट्टमवार. गैरअर्जदार. वय 32 वर्षे.धंदा व्यापार. अड.एस.एन.वेलणकर. रा.वैशाली साडी सेंटर,शिवाजी चौक, परभणी.ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) अर्जदाराचीथोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने दिनांक 11/04/2011 गैरअर्जदाराकडून शर्ट व पँटसाठीकपडयाची खरेदी केली परंतु पहिल्याच धुण्यामध्ये कापड एकदम खराब झाले त्याची चकाकी पूर्णपणे निघून गेली.अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावुन खराब झालेले कपडे दाखवले तेव्हा त्याला 3 महिन्यानंतर आल्यानंतर कपडे बदलुन देण्याचे अश्वासन गैरअर्जदाराने दिले,तदनंतर गैरअर्जदाराने कपडे बदलुन देण्यास नकार दिला. रेमंड कंपनीचा कपडा भासवुन हलक्या क्वालीटीचा कपडा अर्जदारास दिला.म्हणून अर्जदाराने हि तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने पँटपीसची किंमत रक्कम रु.572/- त्याचे अटो पॅजो लोडींग भाडे आणि मजुरी सरासरी रक्कम रु.700/- प्रति दिवस प्रमाणे 5 दिवसाचे रक्कम रु.3500/- कागदपत्र रिक्षाभाडे, पोस्टल ऑर्डरखर्च रक्कम रु. 500/- वकिलाचा नोटीस पाठवण्याचा खर्च रक्कम रु.1000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25000/- देण्यात यावे अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.3/1 ते नि.3/5 मंचासमोर दाखल केली आहे. मंचाची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्यावर त्याने लेखी निवेदन नि.10 वर मंचासमोर दाखल केले. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दिनांक 11/04/2011 रोजी कापड पाहून पसंत पडल्यावरच अर्जदाराने रु.477/- मिटर प्रमाणे पॅन्टचे कापड खरेदी केले.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, पावती वरच Goods once sold will not be taken back असे लिहिलेले आहे.त्यामुळे कापड बदलुन देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.त्यामुळे अर्जदारास 3 महिन्यानी याविचार करु असे सांगण्याचा प्रश्नच उदभवत नाही अर्जदाराने खोटी तक्रार मंचात दाखल केलेली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.11 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास दोषपूर्ण पॅन्टपीसची विक्री 1 करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे. ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने दिनांक 11/04/2011 रोजी गैरअर्जदाराकडून पँन्टपीस खरेदी केला,परंतु कपडा खराब निघाला व आश्वासन दिल्याप्रमाणे गैरअर्जदाराने सदर कापड बदलुन ही दिले नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्यांच्या पसंतीनेच कापड खरेदी केल्यामुळे त्याला आता त्या संदर्भात तक्रार करता येणार नाही.तसेच पावतीवर Goods once sold will not be taken back असे नमुद करण्यात आलेले आहे. व सदर कपडयाची कुठलीही गॅरंटी अर्जदारास दिलेली नाही. यावर मंचाचे असे मत आहे की, अर्जदाराने शिवलेली पॅंन्ट मंचासमोर दाखल करुन सत्य परिस्थिती मंचाच्या निदर्शनास आणून दिली.ते पाहता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते.गैरअर्जदाराने वास्तविक पाहता अर्जदाराची तक्रार ऐकुन घेवुन त्याचे समाधान करणे गरजेचे होते व व्यवसाय वृध्दीसाठी ग्राहक – व्यापारी यामध्ये विश्वासाचे वातावरण असण्याची गरज आहे.गैरअर्जदार हा प्रतिष्ठीत व्यापारी आहे.ग्राहक त्याच्याकडून मोठया विश्वासाने कापड खरेदी करतात.त्यामुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता गैरअर्जदाराने घ्यायला पाहिजे असे मंचाचे मत आहे.तसेच अर्जदाराने अवास्तव रक्कमेची मागणी केलेली असल्यामुळे ती मंजूर करणे शक्य नाही.अर्जदाराने रक्कम रु.572.40 देवुन पॅन्टपीस गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले आहे. त्यामुळे ती रक्कम अर्जदारास मंजूर करणे न्यायोचित होईल. म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत रक्कम रु.572.40 अर्जदारास द्यावे. 3 गैरअर्जदाराने मानसिकत्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकुण रक्कम रु.1,000/- अर्जदारास आदेश मुदतीत द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |