Maharashtra

Nanded

CC/13/98

Govind Ramji Kahalekar - Complainant(s)

Versus

Baliraja Krishi Seva Kendra - Opp.Party(s)

Adv.B.V.Bhure

14 May 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/13/98
 
1. Govind Ramji Kahalekar
Kahal Tal.Naygaon
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Baliraja Krishi Seva Kendra
Naygaon Tal.Naygaon
Nanded
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

               निकालपत्र                                   

(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्ष)

 

1.     अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

      अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.    अर्जदार हा शेती व्‍यवसाय करुन आपला व कुटूंबाचा उदर्निवाह करतो.  अर्जदाराने दिनांक 17.06.2011 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून महामंडळाचे सोयाबीनचे बियाणे जेएस 335 लॉट क्रमांक 2401चे 30 कि.ग्रॅ.ची एक बॅग रु.850/- देऊन खरेदी केले.  तसेच एनएससी चे 30 कि.ग्रॅ.ची एक बॅग रु.850/- देऊन खरेदी केले.  सदर सोयाबीनची बॅग विक्री करतेवेळेस प्रती एकर 20 क्विंटल उत्‍पन्‍न मिळेल असे आश्‍वासन गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून बियाणे खरेदी केल्‍यानंतर दिनांक 07.07.2011 रोजी मौजे कहाळा,तालुका नायगांव येथील गट क्रमांक 264 मध्‍ये 1 एकर स्‍वतःच्‍या शेतीमध्‍ये गैरअर्जदार यांची सुचना व मार्गदर्शनानुसार बियाणाची पेरणी केली. गैरअर्जदार यांनी सांगितलेल्‍या सर्व सुचनांचे पालन करुन योग्‍य ते खतपाणी व औषधे दिली. परंतु बियाणाची उगवण झाली नाही.  अर्जदाराने बियाणे उगवले नसल्‍याबद्दल तालुका कृषि अधिकारी यांचेकडे दिनांक 26.07.2011 रोजी तक्रार केली.  त्‍यानंतर तालुका कृषि अधिकारी यांनी जायमोक्‍यावर येऊन प्रत्‍यक्ष पंचासमक्ष पंचनामा करुन बियाणे 15टक्‍के उगवण झाले असल्‍याबद्दलचा अहवाल दिला.  त्‍यामुळे गैरअर्जदार यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे.

3.          तक्रार दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व  महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ यांनी हजर होऊन आपले म्‍हणणे दाखल केले.  गैरअर्जदार यांनी म्‍हणणे दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 2 व 3 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ  व अर्जदार यांच्‍यामध्‍ये आपसात तडजोड झाली.  त्‍यानुसार  अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेत न्‍यायालयाबाहेर तडजोड झालेली असल्‍याने अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2 व 3 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ यांचेविरुध्‍द तक्रार चालवायची नाही असा अर्ज दिला.  सदरील अर्ज मंचाने मंजूर केला. त्‍यानंतर अर्जदाराने तक्रारीमध्‍ये नॅशनल सीडस कार्पोरेशन यांना पक्षकार केलेले नसल्‍याने नॅशनल सीडस कार्पोरेशन यांना पक्षकार बनवावे असा अर्ज दिला. सदर अर्ज मंजूर केल्‍यानंतर नॅशनल सीडस कार्पोरेशन यांना गैरअर्जदार क्र. 4 म्‍हणून अर्जदाराने तक्रारीमध्‍ये सामाविष्‍ठ केले.  गैरअर्जदार नॅशनल सीडस कार्पोरेशन यांना नोटीस काढण्‍यात आली.  नॅशनल सीडस कार्पोरेशन यांना दिनांक 27.01.2015 रोजी नोटीस पाठविण्‍यात आली होती.  गैरअर्जदार क्र. 4 यांना दिनांक 29.01.2015 रोजी नोटीस प्राप्‍त होऊनही ते तक्रारीमध्‍ये हजर झालेले नाहीत. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडून सोयाबिनचे 1 बॅग बियाणे खरेदी केलेले असल्‍याचे दाखल पावतीवरुन दिसते. परंतु तालुका कृषि अधिकारी यांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता पंचनाम्‍यामध्‍ये तालुका कृषि अधिकारी यांनी अर्जदाराने फक्‍त महामंडळाचे बियाणे पेरलेले असल्‍याचा उल्‍लेख केलेला आहे.  त्‍यामुळे अर्जदाराने नॅशनल सीडस कार्पोरेशन यांचे बियाणे शेतामध्‍ये पेरले असल्‍याबद्दलचा  तसेच बियाणाची उगवण झालेली नसल्‍याचा  पुरावा तक्रारीसोबत दिलेला नसल्‍याने मंच गैरअर्जदार क्र. 4 विरुध्‍द कुठलाही आदेश पारीत करु शकत नाही.  अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 4 चे बियाणे शेतामध्‍ये पेरलेले असल्‍याचा पुरावा न दिल्‍याने अर्जदार स्‍वतःची तक्रार सिद्ध करु शकलेला नाही असे मंचाचे मत आहे.  वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाही.

3.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

 

 

 

                   

 
 
[HON'BLE MRS. S.B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.