ग्राहक तक्रार अर्ज क्र.274/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.16/12/2011
अंतीम आदेश दि.12/04/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.राजेंद्र मुलचंद त्रिवेदी, तक्रारदार
रा.बी-1, गोल्डकाईन अपार्टमेंट, (अॅड.सौ.व्ही.के.एखंडे)
मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक.5.
विरुध्द
1. बालाजी ट्रेडींग कंपनी, सामनेवाला
996, मेन रोड, नाशिक. (अॅड.एम.आर.बुंदेले)
2. काठीयावाड,
प्रोप्रा.बिपीनभाई तन्ना,
मेन रोड, नाशिक.
(मा.सदस्या अँड.सौ. व्ही.व्ही दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून पसंत केलेला कापडचा सुट मिळावा किंवा त्याची पुर्ण किंमत रु.11,498/- मिळावेत, अर्जदार व त्यांचे चिरंजीव मयुर यांना सामनेवाला यांचेमुळे जे नवीन सुट खरेदी करावे लागले त्यांची किंमत रु.16,360/- वसूल होवून मिळावेत, आर्थीक मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा व सर्व रकमांवर द.सा.द.शे.18% प्रमाणे व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांनी पान क्र.12 लगत लेखी म्हणणे व पान क्र.13 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
तक्रार क्र.274/2011
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-
होय.
3. अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून कापडाचा सुट किंवा त्याची किंमत वसूल
करुन मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4. अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रास व अर्जाचे खर्चापोटी रक्कम
वसूल होऊन मिळण्यास पात्र आहेत काय? --- होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालाविरुध्द अंशतः मंजूर
करणेत येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांनी पान क्र.33 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.30 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून कपडे घेतल्याची बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी याकामी पान क्र. 5 लगत व पान क्र.7 लगत कपडे घेतल्याचे बिलांची झेरॉक्स व पान क्र.6 लगत कस्टमर ऑर्डर फार्मची झेरॉक्स प्रत सादर केलेली आहे. पान क्र. 5 ते 7 ची कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “विवाहाची तारीख व ऑर्डर दिल्याची तारीख याचा विचार होता अर्जदार हे प्रथमदर्शनी स्वच्छ हाताने आलेले नाहीत हे सिध्द होते. फक्त कोट व पँटची ऑर्डर दिलेली होती. थ्री पीस, सुट असा उल्लेख नाही, जाकेटबाबत उल्लेख नाही. अर्जदारचे मुलाचा कोट दि.29/11/2011 रोजी मुंबई येथून तयार होवून आला होता. पँट ही नाशिक येथे तयार करण्यात आली. अर्जदाराचे मुलाचे सुट दि.30/11/2011 रोजी डिलेव्हरी केलेले आहेत. सुटची पॅट अर्जदारास दिलेली आहे. अर्जदाराचे कोट देखील दि.02/12/2011 रोजी तयार होता, परंतु अर्जदार डिलीव्हरी घेण्यास आले नाहीत. अर्जदार यांना सामनेवाला हे मुंबई येथे सुटची डिलीव्हरी देणार होते परंतु अर्जदार यांनी सांगितल्यानुसार नाशिक येथे डिलीव्हरी दिलेली आहे. अर्जदार यांचा कोट
तक्रार क्र.274/2011
दि.02/12/2011 पासुन तयार असून त्याची डिलीव्हरी आज देखील अर्जदार यांना सामनेवाला करण्यास तयार आहेत. दि.02/12/2011 रोजी स्वतः येवून डिलीव्हरी घेईन असे अर्जदार यांनी सामनेवाला यांना सागितले होते. मुलाच्या सुटची व स्वतचे सुटची डिलीव्हरी मिळाल्याबद्दल सही आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 4 मध्ये “त्यांना सामनेवाला कडून त्यांचा मुलगा चि.मयुर याचा सुट म्हणजे एक पँट व एक कोट असा मिळाला, परंतु कपडयामध्ये फरक होता. सुटमध्ये जाकीट नव्हते. व फक्त पॅंटच दिली. राहीलेले कपडे नंतर न्या असे सांगितले. 2 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट शिवून आलेला नव्हता, त्यामुळे नाईलाजास्तव अर्जदार यांनी दुसरे दुकानातून कापड खरेदी करुन सुरेश टेलर्स यांचेमार्फत सुट शिवून घेतला व हा सुट दि.4/12/2011 रोजी सुरेश टेलर्स यांनी मुंबई येथे पोहोच केला.” असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
सामनेवाला यांनी अर्जदार यांचे तक्रार अर्जामधील हकिकत नाकारलेली आहे. परंतु पान क्र.6 चे सामनेवाला यांचे कस्टमर ऑर्डर र्फार्म नुसार दि.28/11/2011 पर्यंत मुंबई येथे डिलीव्हरी देण्याचे ठरलेले होते असे दिसून येत आहे. अर्जदार यांनी पान क्र.24 लगत लग्न पत्रिका दाखल केलेली आहे. या लग्न पत्रिकेनुसार विवाहाची तारीख दि.4/12/2011 अशी असून विवाहाचे ठिकाण मुंबई हे आहे व विवाहाचे सर्व विधी दि.30/11/2011 पासून मुंबई येथे सुरु होणार आहेत असे दिसून येत आहे. पान क्र.7 व पान क्र.8 चे बिलानुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून दोन सुटचे कापड खरेदी घेतलेले होते व आहे हे स्पष्ट होत आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.21 लगत दि.26/11/2011 रोजीचे कपडे दिल्याचे रजिष्टरची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. या रजिष्टरवरील नोंदीनुसार सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना फक्त एक सुट व एक पँट एवढयाच वस्तु मिळालेल्या आहेत असे स्पष्ट होत आहे. वास्तविक अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून दोन सुटचे कापड घेवून शिलाई करण्यासाठी दिलेले होते व सामनेवाला यांनी त्याची डिलीव्हरी अर्जदार यांना पान क्र.6 चे कस्टमर ऑर्डर फॉर्मनुसार दि.28/11/2011 रोजी मुबई येथे द्यावयाची होती. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 10 मध्ये “अर्जदार यांचा कोट दि.2/12/2011 पासून तयार असून त्याची डिलीव्हरी आजदेखील सामनेवाला हे अर्जदार यांना करण्यास तयार आहेत.” असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाला यांचे या कथनाचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार
तक्रार क्र.274/2011
यांना संपुर्णपणे शिवलेल्या कपडयाची डिलीव्हरी मुंबई येथे दिलेली नाही. पान क्र.21 चे रजिष्टरनुसार फक्त एक सुट व एक पँटची डिलीव्हरी दिलेली आहे राहीलेल्या कपडयाची डिलीव्हरी अद्यापही दिलेली नाही ही बाब स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.5,पान क्र.6 व पान क्र.7 ची कागदपत्रे व सामनेवाला यांचे पान क्र.21 चें रजिष्टर याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या त्यांचा संपुर्ण सुट परत मिळण्यास किंवा त्याची किंमत रु.11,498/- परत मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून शिवलेला सुट मिळावा किंवा त्याची किंमत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सामनेवालेंचे कृत्यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करण्यास खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे कडून वैयक्तीक व संयुक्तीक रित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदार यांना त्यांचा शिवलेला नवीन संपुर्ण सुट परत करावा.
3. वर कलम 2 मध्ये लिहीलेनुसार सामनेवाला क्र.1 व 2 यांनी 30 दिवसाचे आत अर्जदार यांना सुट परत न केल्यास सुटची किंमत म्हणून रक्कम
तक्रार क्र.274/2011
रु.11,498/- इतकी रक्कम सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदार यांना द्यावी.
4. आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3500/- दयावेत.
5. आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु1,000/- दयावेत.
(आर.एस. पैलवान) (अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-12/04/2012