Maharashtra

Nanded

CC/09/186

Bhaskar Vittahalrao Tammana - Complainant(s)

Versus

Balaji Krushi Seva Kendra,Mukhed - Opp.Party(s)

10 May 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/186
1. Bhaskar Vittahalrao Tammana R/o Karur Tq.Beloali Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Balaji Krushi Seva Kendra,Mukhed Mukhed.Dist.Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 10 May 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/186.
                          प्रकरण दाखल तारीख - 26/08/2009
                          प्रकरण निकाल तारीख 10/05/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
                 मा.श्रीमती सूवर्णा देशमूख,           -   सदस्‍या
        मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
भास्‍कर विठठलराव तमन्‍ना
वय, 28 वर्षे, धंदा शेती,
रा.केरुर ता.बिलोली जि.नांदेड                           अर्जदार
विरुध्‍द.
1.   मे.बालाजी कृषी सेवा केंद्र,                          गैरअर्जदार   मूखेड ता.मुखेड,जि. नांदेड.
2.   निर्मल सिडस प्रा.लि.
     रजिस्‍ट्ररर्ड व अडमिनिस्‍ट्रेटिव्‍ह कार्यालय,
     पोस्‍ट बॉक्‍स नंबर 63, भाडगोल रोड, पाचोरा
     जि. जळगांव.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.जगदीश जाधव.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे              - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील       - अड.पी.एस.भक्‍कड.
                              निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्‍यक्ष )
 
             गैरअर्जदार यांनी पुरविलेल्‍या बियाणेची उगवण झाली नाही म्‍हणून अर्जदारास नूकसान भरपाईपोटी रु.3,90,000/- 18 टक्‍के व्‍याजाने गैरअर्जदाराकडून मिळावेत म्‍हणून ही तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदार हे केरुर ता. बिलोली येथेदर वर्षी प्रमाणे बटाईने शेती करीत असतात. वर्ष 2009-10 साठी शेत मालक व्‍यकंटराव पाटील केरुर यांचे शेत गट नंबर 1 बटाईने करण्‍यासाठी घेऊन व तसेच गट क्र.32 निळकंठ पाटील या दोन्‍ही शेतात निर्मल सिडस एन.ए.सि.एच.-7 मुक्‍ता या जातीची लागवड दि.9.6.2009 रोजी केली. बालाजी कृषी सेवा केंद्र मूखेड
 
 
गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून बिल नंबर 3622 द्वारे 450 ग्रॅम चे पॉकेट नग 17 खरेदी केले. चांगला पाऊस झाल्‍यानंतर त्‍या बियाण्‍याची लागवड केली पण ते बियाण्‍याची उगवन झालेली नाही तरी लागवड झाल्‍या नंतर पंधरा दिवसापर्यत वाट पाहून गैरअर्जदार क्र.1 यांना या बाबत सांगितले. त्‍यांनी कंपनीस कळवितो असे सांगितले पण काहीही उपयोग झाला नाही. बिलोली येथील कृषी अधिकारी पंचायत समिती बिलोली 2 तालूका कृषी विकास अधिकारी बिलोली 3, कृषी विकास अधिकारी जि.प. नांदेड यांनी अर्जदाराचे शेतात येऊन गट क्र.32 श्री. निळकंठ यांचे शेतात 17 पॉकीट पैकी आठ एकर जमिनी मध्‍ये बारा पॉकेट 33 वर लागवड केली आहे. पंचनाम्‍यात बियाण्‍याची उगवण 3 टक्‍के झाल्‍याचे नमूद आहे. तसेच गट क्र.1 मध्‍ये व्‍यकंटराव यांचे शेतात बाकीचे पाच पॉकीटाची लागवड केली. व्‍यकंटराव पाटील गट क्र.1 व गट क्र.32 या सदरील शेतजमिनी गट नं.32 क्षेञ 4 हेक्‍टर जमिनीस बटाव नामा म्‍हणून वर्षाकाठी रु.20,000/- रक्‍कम दिली व नं.2 व्‍यकंटराव पाटील गट क्र.2 क्षेञफळ 2 हेक्‍टर जमिनीस वर्षाकाठी रु.10,000/- देऊन शेती बटाव केली आहे.  म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द मागणी प्रमाणे आदेश व्‍हावा असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.1 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
              गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.जोपर्यत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्‍ये पाठवून त्‍यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियाण्‍यांचे दोष आहे ही बाब सिध्‍द होत नाही. अर्जदाराने किंवा कृषी अधिका-याने किंवा समितीने सदरचे बियाणे प्रयोगशाळेमध्‍ये तपासणीकरिता पाठविलेले नाही, कृषी अधिका-याने किंवा समितीने कोणतेही शास्‍ञोक्‍त कारण न देता आपला अभिप्राय दिला आहे जे कायदयास अमान्‍य आहे. महाराष्‍ट्र  शासनाने प्रत्‍येक जिल्‍हामध्‍ये तज्ञ व्‍यक्‍तीची सिड समिती स्‍थापन केलेली आहे व सिड कमिटीने पण संपूर्ण कारणे लिहून आपला अभिप्राय देणे गरजेचे आहे. सदर प्रकरणामध्‍ये अर्जदाराने दाखल केलेला अहवाल कायदयाप्रमाणे वाचता येत नाही. त्‍यामध्‍ये बियाण्‍यामध्‍ये दोष आहे असे कूठेही म्‍हटलेले नाही. कृषी विकास अधिकारी व तालूका कृषी अधिकारी यांनी अर्जदार यांचे शेतामध्‍ये जाण्‍याआधी गैरअर्जदार यांना सूचना दिलेली नाही. अर्जदाराने बियाणे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.09.6.2009 रोजी विकत घेतलेले आहे व सदरचे बियाणे त्‍यांनी केव्‍हा लागवन केली यांची नेमकी तारीख दिलेली नाही.
 
 
तसेच पंचनामा दि.27.07.2009 रोजी करण्‍यात आलेला दिसतो. सदरील बियाणे हे 15 मे ते 30 जून पर्यत लागवण करणे जरुरीचे आहे त्‍याबददलची माहीती शेतक-यांनी दिलेली आहे. गैरअर्जदाराने दिलेल्‍या सूचनाचे अर्जदाराने पालन केलेले नाही. त्‍यामूळे उगवणीमध्‍ये फरक पडू शकतो. त्‍यासाठी बियाणे बरोबर नाही असा आरोप करता येणार नाही. कृषी विकास अधिका-याने त्‍या बाबत आपल्‍या अहवालात काहीही म्‍हटलेले नाही, मोघम पंचनामा व अहवाल गैरअर्जदाराच्‍या विरुध्‍द वापरता येऊ शकत नाही.   अर्जदाराने सन 2008-09 चा 7/12 मंचा समोर दाखल केलेला नाही. त्‍यामूळे जमिनीमध्‍ये पेरल्‍याचा पूरावा नाही. तसेच 7/12 मध्‍ये अर्जदाराचे नांव वहितीदाराच्‍या रकान्‍यात दाखविलेले नाही. अर्जदाराचे रु.3,90,000/- चे नूकसान झाले ही बाब खोटी आहे. सदरील बियाणे 3 x 3 फूट साईजच्‍या जागेत लागवड केल्‍यास प्रति एकरी 800 ग्रॅम बियाणे लागते. 13 एकर जमिनीकरिता 10400 ग्रॅम बियाणे लागते. प्रति पाकीटाचे वजन 450 ग्रॅम आहे, 17 पाकीटाचे वजन 7650 ग्रॅम एवढे होते. अर्जदाराने बियाणे कमी लावलेले आहे व कमी बियाणे पेरल्‍यामूळे शेतामध्‍ये उगवण कमी दिसू शकते. पंचनामा गट क्र.1 पुरता केलेला आहे. गट क्रमांक 32 बदल नाही. अर्जदार हा सदरील पंचनाम्‍याचा पूर्ण 13 एकर करिता उपयोग घेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. हे अमान्‍य आहे की, अर्जदाराने व्‍यकंटराव यांचे गट क्र.1 मधील जमीन व निळकंठ यांचे गट क्र.32 मधील जमीन बटाईने घेतली व त्‍या जमिनीमध्‍ये कापसाचे बियाण्‍याची लागवड केली. अर्जदाराने गट क्र.32 मध्‍हये 8 एकर जमिनीत 12 पाकीट लावले, गट क्र.32 बददलचा पंचनामा दाखल केलेला नाही. म्‍हणून अर्जदाराचे गट क्र.32 मधील कथन ग्राहय धरल्‍या जाऊ शकत नाही. सदरच्‍या शेतात फक्‍त 3 टक्‍के उगवण झाली ही बाब गैरअर्जदारास अमान्‍य आहे. अर्जदाराने तक्रारीमध्‍ये कोणत्‍या लॉट क्रमांकचे बियाणे पेरले या बाबीचा उल्‍लेख केलेला नाही तसेच त्‍या बाबतचा उल्‍लेख पंचनाम्‍यामध्‍ये पण करण्‍यात आलेला नाही. बिलामध्‍ये लिहीलेला लॉट क्रमांक टीएफ 79008 हा बरोबर आहे. अर्जदाराने सदरचे बियाणे दि.27.6.2009 रोजी लागवड केल्‍याचे गैरअर्जदारास अमान्‍य आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदरील बियाणे उत्‍पादन केल्‍यानंतर अतिउच्‍च प्रतीच्‍या प्रयोगशाळेत तज्ञ व्‍यक्‍तीकडून तपासून घेतलेले आहे. बियाणे खोलवर गेल्‍यावर बियाण्‍याची उगवण कमी होऊ शकते. विपरीत हवामान व आंतरिक व बाहय कारणासाठी तसेच चूकीच्‍या व्‍यवस्‍थापनामूळे देखील बियाण्‍याची उगवण कमी होऊ शकते.कृषी विकास अधिकारी यांचा अहवाल हा
 
 
 
तज्ञांचा अहवाल म्‍हणता येणार नाही. म्‍हणून तक्रार ही खोटी असल्‍याकारणाने ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपला पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                           उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक आहेत का ?                              होय.
2.   गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेतील ञूटी किंवा व्‍यापारात
    अनूचित पध्‍दतीचा अवलंब असल्‍याचे अर्जदार सिध्‍द
     करतात काय ?                                        नाही.
3.   गैरअर्जदार क्र.2 यांचे सेवेतील ञूटी
     सिध्‍द होते काय ?                                    नाही.       
4. काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
                             अर्जदार यांनी दि.1.4,2009 रोजी शेत मालक निळकंठ पाटील रा. केरुर गट नंबर 32 व व्‍यकंट पाटील गट नंबर 1 यांची शेती अर्जदार यांनी एक वर्षासाठी बटाईने करण्‍यासाठी घेतली आहे व त्‍यापोटी शेत मालकाचा अर्धा माल व ते स्‍वतः अर्धा माल व काही रक्‍कम घेतली आहे.अर्जदाराने दाखल केलेले शेत हे तेच आहे म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. बटाईने घेतलेल्‍या शेतीमध्‍ये बिज लॉट नंबर 79008 दि.9.6.2009 रोजी गैरअज्रदार क्र.1 यांचेकडून  घेतली आहे. पंचनामा हा बटाईनामा कारक यांचे नांवानेच आहे. म्‍हणून अर्जदार हे लाथार्थी ग्राहक ठरतात.
मूददा क्र.2 ः-
                   अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून घेतलेल्‍या बियाण्‍याची उगवण झाली नाही म्‍हणून तक्रार केलेली आहे. त्‍याप्रमाणे  दि.27.7.2009 रोजी तालूका कृषी अधिकारी बिलोली व कृषी अधिकारी पंचायत समिती या दोघांनी मिळून जायमोक्‍यावर जाऊन अर्जदार यांचे तक्रारी प्रमाणे चार साक्षीदारासमोर पंचनामा केला. त्‍यामूळे त्‍यांनी जी पाहणी केली त्‍यात असे म्‍हटले आहे की, निळकंठ पाटील रा. केरुर  बटईने शेती करणार भास्‍कर तमन्‍ना गट नंबर 32 व 1 मध्‍ये मूक्‍ता कापूस बियाणे बिल नंबर 3622 दि.27.7.2009 रोजी लागवड केली. यांची रॅडम पध्‍दतीने पाहणी केली असता अतीशय कमी उगवण म्‍हणजे 3 टक्‍के उगवण दिसून आली. गैरअर्जदार
 
 
 
यांनी यामध्‍ये आक्षेप घेतला आहे की, व असे म्‍हटले आहे की, बियाण्‍यामधील काही सॅम्‍पल हे प्रयोगशाळेत पाठवून यांची तपासणी करणे आवश्‍यक आहे. परंतु याची गरज आम्‍हाला वाटत नाही कारण गैरअर्जदार यांनी Certificate of Seed Analyasis  दि.25.5.2009 रोजीचे दाखल केलेले आहे. त्‍यात लॉट नंबर 79008 यांची उगवण 76 टक्‍के अशी दाखवलेली आहे. हे गैरअर्जदार यांनी आपल्‍या कारखान्‍यात उत्‍पादन झाल्‍यानंतर त्‍यांचीच टेक्‍नीशियनने तपासणी करुन उगवण शक्‍ती ठरवलेली आहे. यात सर्टीफिकेशन एजन्‍सी यांनी शेतीची तपासणी करुन सिड पास केलेले आहे. नंतरच ते बाजारात विक्रीसाठी आणले. त्‍यात गैरअर्जदार यांचा असा आक्षेप आहे की, सिड हे जास्‍त लागत होते व अर्जदाराने कमी सिडची लागवड केली. त्‍यामूळे उगवणा ही कमी झाली.
मूददा क्र.3 ः-
              अर्जदार यांनी दि.09.6.2009 रोजी  गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून एन.ए.सि.एच.-7 मुक्‍ता या कापसाच्‍या बियाण्‍याचे 17 बँग   खरेदी केले. उत्‍पादक कंपनी गैरअर्जदार क्र.2 आहे ते विकत घेतल्‍याबददलची पावती नंबर 3622 दाखल केलेली आहे. दि.24.7.2009 रोजी तहसिलदार बिलोली  यांचेकडे तक्रार केली म्‍हणजे दोनच महिन्‍यामध्‍ये बियाण्‍याच्‍या उगवणी बददल तक्रार केली. यानंतर दि.27.7.2009 रोजी तालूका कृषी विकास अधिकारी यांनी स्‍थळ पाहणी करुन पंचनामा केला. तो पंचनामा या प्रकरणात दाखल आहे. पंचनाम्‍यानुसार अर्जदार यांचे शेतात रॅडंम पध्‍दतीने पाहणी केली असता कापसाच्‍या बियाण्‍याची उगवण 3 टक्‍के झाल्‍याचे दिसून येते एवढेच म्‍हटले आहे. अर्जदाराने आपल्‍या तक्रारीत बियाणे कमी उगवण असल्‍या बददलचे म्‍हटले आहे. परंतु बियाणे दोषयूक्‍त आहे असे म्‍हटले नाही. त्‍यांचा या पंचनाम्‍यात कूठेही उल्‍लेख नाही. तसेच गैरअर्जदार यांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात यावर आक्षेप घेतलेला आहे. पंचनाम्‍यामध्‍ये भेसळ हा शब्‍द कूठेही आलेला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्‍पादित केलेले बियाणे शेतक-यांनी आपल्‍या शेतात लावले व दोन महिन्‍यातच तक्रार केली. पंचनाम्‍याप्रमाणे कापसात भेसळ नाही व असे असले तरी गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये तो लॉट मधील बियाणे यांचे सम्‍पल घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवीणे आवश्‍यक होते असे असताना बियाणे प्रयोगशाळेत पाठविले गेले नाहीत. कापसाच्‍या एन.ए.सी.एच-7 मूक्‍ता या जातीच्‍या बियाण्‍याची उगवण झालेली आहे. ही उगवण कमी जास्‍त होण्‍यास अनेक कारणे असू शकतात. याप्रमाणे बियाण्‍याची  लागवड  ही  करतेवेळेस   पाऊस  पडला असला पाहिजे, यांची
 
 
 
व्‍यवस्थित मशागत होणे, खताचे प्रमाणे योग्‍य प्रमाणात देणे इत्‍यादी बाबी आवश्‍यक आहेत. बियाणे जर जमिनीत खोलवर पेरले तरी ते वर येत नाहीत. अंतर योग्‍य प्रमाणात ठेवणे हे देखील आवश्‍यक आहे. भेसळयूक्‍त बियाणे असल्‍यास दोन प्रकारचे कापसाची उगवण होते. त्‍यांस भेसळ म्‍हणतात. यात तो काही प्रकार दिसून येत नाही. अर्जदारांनी बटाऊ  शेतात कापूस लावल्‍या बददलचा 7/12 दाखल केलेला असला तरी त्‍यांचे तक्रारीप्रमाणे लागवड ही 2009 मध्‍ये केली म्‍हणजे वर्ष 2008-09 चा पेरा केलेला आवश्‍यक आहे. वर्ष 2006-07 चा पेरा दाखवतात. गैरअर्जदार यंाचा आक्षेप आहे की 2009 मध्‍ये बियाणे लावलेच नाही. अर्जदार यांचेकडे बटाऊ शेतात 2009 च्‍या 7/12 वर यांची नोंद नाही. यासाठी दि.27.07.2009 चे कापसाचा पेरा या बददल प्रमाणपञ दाखल केलेले आहे. अर्जदाराने तक्रार केल्‍याबददलचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराने शासनाचे परिपञक दाखल केलेले आहे. याप्रमाणे बियाण्‍याचा लॉट नंबर व रिलीज ऑर्डर हे अतीशय आवश्‍यक आहे. परिपञकाप्रमाणे शेतक-यांची तक्रार आल्‍यानंतर काय काय गोष्‍टी आवश्‍यक आहेत व तक्रारीची तपासणी करीत असताना कोणत्‍या गोष्‍टी बघीतल्‍या पाहिजे या सर्व यात दिलेल्‍या आहेत. या सूचनाचे पालन केल्‍या गेलेले नाही. तसेच तक्रार ही जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेकडे करायला पाहिजे पण अर्जदाराने तक्रार ही तालूका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांचेकडे केलेली आहे. त्‍यांनी त्‍यांची तक्रार जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेकडे न पाठविता स्‍वतःच पंचनामा केलेला आहे, जिल्‍हास्‍तरीय असलेल्‍या सर्व कमिटीच्‍या लोकांनी शेतामध्‍ये जाऊन पंचनामा केला पाहिजे. शेतावर जाण्‍यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस किंवा सूचना देणे आवश्‍यक आहे. वरील सर्व प्रकरणावरुन असे वाटते की, गैरअर्जदार यांनी उत्‍पादित केलेले बियाणे हे भेसळयूक्‍त किंवा दोषयूक्‍त आहेत हे अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत.
 
              2007 CPJ 148 (NC) Indo American Hybrid Seeds & anr. Vs. Vijaykumar Shankarrao & anr.
                             Consumer Protection Act, 1986 -- Sections 2(1) (r ) -- Seeds – Defective – Sale of -- Evidence – Seeds produced by OP – Purchased from M/s Soni Foods, not made party in complaint against OP – Crop growth not upto expectations -- Report of agricultural authorities indicating only 10 % of crop propely developed – No word in report against or about quality of seeds supplied – Variation in yield dependent on external considerations like climate, sticides, etc. – No evidence on record indicatiang seeds to be of non-standard quality – Court to be led by evidence and proof on subject – In absence of evidence, unfair practice not proved.
 
 
 
 
              मा. राज्‍य आयोग दिल्‍ली इंडो अ‍मेरिकन हायब्रीड सिडस व इतर विरुध्‍द विजयकूमार शंकरराव व इतर यात बियाणे बददलची तक्रार होती. बियाणे हे भेसळयूक्‍त नाही ते फक्‍त 10 टक्‍केच उगवले, रिपोर्टमध्‍ये क्‍वॉलिटी किंवा भेसळी बददल काहीही म्‍हटलेले नाही त्‍यामूळे योग्‍य त्‍यापूराव्‍याअभावी अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला हे सिध्‍द होऊ शकले नाही. म्‍हणून तक्रार फेटाळण्‍यात येते.
 
              I (2007) CPJ 258  मा. राज्‍य आयोग महाराष्‍ट्र यात महाराष्‍ट्र स्‍टेट सिडस कार्पो. लि व इतर विरुध्‍द नरेंद्र मोतीरामजी बूरुडे व इतर याही प्रकरणात योग्‍य उगवण झाली नाही म्‍हणून तक्रार दाखल आहे. यात 15 ते 20 टक्‍के ची उगवण झाली होती. पंचनामा पंचायत समितीने केला आहे. उगवण ही समाधानकारक आहे असे म्‍हटले आहे. त्‍यामूळे त्‍यात काही दोष नाही. म्‍हणून अपील अलॉऊ केले आहे.
 
 
              I (2007) CPJ 266 (NC) मा. राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यात महाराष्‍ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि. विरुध्‍द गौरी प्रिदेन्‍ना व इतर यात दोषयूक्‍त बियाणे पूरवले परंतु पूराव्‍याअभावी तसेच प्रयोगशाळेत बियाणे पाठविले असता ते 99 टक्‍के शूध्‍द आहेत, त्‍यामूळे सेवेत ञूटी नाही असे म्‍हणून रिव्‍हीजन पिटीशन अलॉऊ केले आहे.
              2007 NCJ 202 (NC)  मा. राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यात दोषयूक्‍त बियाणे पूरवले या बददल पूरावा नाही. लॅबोरटरी रिपोर्ट 99.6 टक्‍के शूध्‍दता दर्शविते त्‍यामूळे गैरअर्जदार जबाबदार नाहीत असे म्‍हटले आहे.
 
                             अर्जदार यांनी शेती बटाईसाठी म्‍हणून निळंकठ पाटील व व्‍यंकटी पाटील यांचे शेतात बियाण्‍याची लागवण केली व आलेला माल अर्धाअर्धा वाटून घ्‍यायचा असा करार केला. तेव्‍हा हे दोन शेतकरी मालक यांनाही बटाऊदाराचे संबंधीत अर्जदार म्‍हणून तक्रारीत येणे आवश्‍यक होते. तरच खरी परिस्थिती समोर येऊ शकली असती. त्‍यांनाही अर्धा माल मिळणार होता. हे दोघे शेतकरी यांचे काहीच देणेघेणे नाही अशा रितीने गप्‍प आहेत. म्‍हणजे त्‍यांचे काही नूकसान झाले नाही का ? त्‍यांची काही तक्रार नव्‍हती का ? हे संशयास्‍पद वाटते.
 
              वरील सर्व बाबीचे अवलोकन कले असता अर्जदार हे बियाणे निकृष्‍ट असल्‍याबददल सिध्‍द करु शकलेले नाहीत म्‍हणून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
                        आदेश
1.                                          अर्जदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येतो.
 
2.                                          पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                               निकालाच्‍या प्रति पक्षकारांना देण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                श्रीमती सुवर्णा देशमूख                                 श्री.सतीश सामते     
          अध्‍यक्ष                                                             सदस्‍या                                                      सदस्‍य
 
 
 
 
 
जयंत पारवेकर,
लघूलेखक