जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/251 प्रकरण दाखल तारीख - 06/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 18/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य लिंगुराम पि.नरसिंग भरडे वय वर्षे 70, धंदा शेती, अर्जदार. रा.सगरोळी ता.बिलोली जि.नांदेड. विरुध्द. 1. प्रोप्रायटर,श्री.बालाजी कृषी केंद्र, मेन रोड,सगरोळी ता.बिलोली गैरअर्जदार. जि.नांदेड. 2. प्रशासकीय अधिकारी, निर्मल सिडस प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय- पोस्ट बॉक्स नं.63,भडगोल रोड, पाचोरा जि.जळगांव. अर्जदारा तर्फे वकील - अड.शेख सुलेमान. गैरअर्जदार क्र.1 - नो से. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांनी दोषयुक्त बियाणे पुरविल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईबद्यल रु.91,600/-, 18 टक्के व्याजासह मिळावे म्हणुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली ती खालील प्रमाणे. अर्जदार हे मौजे सगरोळी ता.बिलोली येथे 0.76 आर जमीनेचे मालक असुन ते मुलाच्या मदतीने शेती करतात. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या मार्फत त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांनी निर्मीत मुक्ता एनएसीएच-7 शंकर देशी कापुस बियाणे ज्याचा लॉट क्र. टीएफ- 79008 असे चार बँग बियाणे दि.02/07/2009 रोजी खेरदी केले व त्यांच्या शेतात मशागत करुन योग्य पाऊस पडल्यानंतर बियाणांची लागवड दि.07/07/2009 रोजी केली. यानंतर 15 दिवसांत पिक येणे अपेक्षीत होते परंतु शेतात कापसाची उगवण झालीच नाही. म्हणुन कृषी अधिकारी बिलोली यांचेकडे दि.31/07/2009 रोजी लेखी तक्रार केली त्यांनी घटना स्थळावर येऊन दि.01/08/2009 रोजी पिकाचा पंचनामा केला, त्यांनी दोन टक्के पिकाची उगवण झाली असे प्रमाणीत केले म्हणजे शेतक-याचा एक हंगाम वाया गेला यात गैरअर्जदारांची जबाबदारी आहे. पिक जर आले असते तर प्रती एकर 10-15 क्विंटल कापुस निघाले असते म्हणजे अर्जदारास विस क्विंटल कापुस झाले असते त्याची किंमत रु.60,000/- झाली असती शिवाय लागवडीसाठी रु.10,000/- व खतासाठी रु.10,000/- असे एकुण रु.80,000/- चे नुकसान झाले व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तसेच चार बँगाची किंमत रु.1,600/- असे एकुण रु.91,600/- नुकसान भरपाई मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे हजर होऊन त्यांनी आपले लेखी म्हणणे न दिल्यामुळे प्रकरण त्यांचे विरुध्द नो से आदेश करुन पुढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र. 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांच्याकडुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाले नाही. संबंधीत बियाणे जोपर्यंत प्रयोग शाळेत पाठवुन त्याची तपासणी होत नाही तोपर्यंत बियाणे दोषी आहे हे म्हणता येणार नाही. कृषी अधिका-याने बियाणे प्रयोग शाळेत पाठविलेले नाही त्यामुळे केवळ तर्काच्या आधारावर त्यांना अभिप्राय देता येणार नाही. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्यामध्ये तज्ञ व्यक्ति सिड समिती स्थापन केली आहे. समीतीने संपुर्ण कारणे देऊन आपला अभिप्राय देणे आवश्यक आहे. त्यामुळे हा अहवाल वाचता येणार नाही. कृषी अधिकारी पंचनामापुर्वी गैरअर्जदारांना नोटीस दिलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन दि.02/07/2009 रोजी बियाणे विकत घेतले लगेच दि.07/07/2009 रोजी लागवड केली व दि.01/08/2009 रोजी करण्यात आलेला दिसतो. कापसाचे बियाणे 15 मे ते 30 जुन पर्यंत लागवड करणे जरुरीचे आहे व याबद्यलची माहीती शेतक-यास देण्यात आलेली होती म्हणजेच अर्जदाराने कापसाची लागवड उशिरा केली आहे. अर्जदाराने सन 2008-09 चा 7/12 दाखल केलेला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले बियाणांची लॉट क्र. टीएफ 79008 बरोबर आहे. या बियाणांची हजारो पाकीटे उत्पादित करण्यात आलेली आहेत कोणत्याही कास्तकारांची तक्रार नाही. अर्जदाराने बियाणे पाकीट वरील लेबल, थैली दाखल केली नाही. दि.07/07/2009 रोजी लागवड केल्याचे गैरअर्जदारास अमान्य आहे कारण जुलै महिन्याच्या पहील्या आठवडयात पाऊस पडलाच नाही. अर्जदाराने दाखल केलेला पंचनामामध्ये कुठेही असे लिहीलेले नाही, कापुस उगवले नाही, बियाणे बरोबर नाही व संपुर्ण शेतात कापुस निघालेच नाही ही बाब गैरअर्जदारास अमान्य आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी बियाणे उत्पादीत केल्यावर प्रयोग शाळेच्या तज्ञ व्यक्तीकडुन तपासुन घेतलेले आहे. शेतामध्ये फक्त दोन टक्के उगवण झाली ही बाब गैरअर्जदारास अमान्य आहे. अर्जदाराने वर्षभर शेताची मशागत केले व खाताचा वापर केला ही बाब गैरअर्जदारास अमान्य आहे. पेरणीच्या वेळी प्रती एकर 600 ते 650 ग्रॅम बियाणे वापरावयास पाहीजे व बागायती जमीनीसाठी 3x3 फुट व जिरायती जमीनीसाठी 3x2 फुट असे अंतर ठेवावयास पाहीजे. जुन व जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे सदर बियाणाची उगवण कमी होऊ शकते किंवा बियाणे खोलवर पेरल्यामुळे असेल तरी बियाणाची उगवण कमी होऊ शकते. अर्जदाराने मागीतलेली नुकसान भरपाई रु.60,000/- व पेरणी खर्च व मजुरीचा खर्च व त्रासापोटीचा खर्च मागण्याचा अधिकार नाही. लागवडीचा खर्च व कापसाचा खर्च केल्यावर कापसाची किंमत आली असती त्यामुळे डब्बल पैसे मागता येणार नाही. अर्जदाराने गैरअर्जदारास पाठविलेली नोटीचे उत्तर दिलेले आहे. म्हणुन अर्जदाराचा खोटा असुन तो खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडुन दि.02/07/2009 रोजी निर्मल मुक्ता टीएफ या कापसाचे बियाणे ज्याचा लॉट नंबर 79008 द्वारे खरेदी केले पावती क्र. 505 दाखल केले आहे. अर्जदाराचे नांवे 0.76 आर जमीन असल्याबद्यचा 7/12 दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराने यावर आक्षेप घेऊन यात 2006-07 चा पेरा असल्या कारणाने व तक्रार ही 2009 ची त्यामुळे ते ग्राहय धरु नये असा आक्षेप घेतलेला आहे. 7/12 वर 2009-2010 चा पेरा जरी नसला तरी तलाठी यांनी गट क्र.1199 मध्ये अर्जदाराने 2009-2010 या सालासाठी 0.76 आर मध्ये कापुस पेराल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे तो पेरा अमान्य होणार नाही. यानंतर सदर उगवणीची तक्रार दि.31/07/2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे केलेली आहे व गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दि.03/08/2009 रोजी तक्रार केलेली आहे हे दोन्ही अर्ज अर्जदाराने या प्रकरणांत दाखल केलेले आहे. अर्जदाराने दि.02/07/2009 रोजी बियाणे खरेदी केले व लगेच दि.07/07/2009 रोजी बियाणांची लागवड केली यावर गैरअर्जदाराने आक्षेप घेऊन 15 मे ते 30 जुन पर्यंत लागवड करणे गरजेचे आहे, अशी माहीती शेतक-यास देण्यात आले आहे, असा आक्षेप घेतला आहे व अर्जदाराच्या वकीलाने हा आक्षेप खोडुन काढत असे म्हटले आहे की, या कालावधीमध्ये जर लागवड करणे आवश्यक होते तर मुख्य गैरअर्जदार क्र. 1 यांनी जुलै महिन्यामध्ये बियाणे विकले कसे त्यांचा युक्तीवाद आम्ही ग्राहय धरतो व गैरअर्जदाराचे म्हणणेनुसार एक तर गैरअर्जदार क्र. 1 यांनी हे बियाणे विकावयास नको होते व याबद्यलची सुचना गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दयावयास पाहीजे होते. अर्जदाराच्या तक्रारीनंतर कृषी अधिका-याने दि.01/08/2009 रोजी जाय मोक्यावर जाऊन पंचनामा केला यात कापुस बियाणे लॉट क्र.79008 याची चार पाकीट गट क्र. 1199 मध्ये लागवड केली होती व रेंडम पध्दतीने पाहणी केली असता, बियाणांची उगवण ही दोन टक्के झाल्याचे दिसुन येते, याचा अर्थ जवळपास उगवण ही झालीच नाही. गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, सदरील बियाणे तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवणे आवश्यक होते व जिल्हा स्तरीय समीतीने यासाठी पंचनामा करावयास हवा होता कारण तज्ञ व्यक्तिच याबद्यलचा अभिप्राय देऊ शकतो व जर उगवण काही प्रमाणात झाले असते तर तज्ञ व्यक्तिने जिल्हा स्तरीय समीतीच्या मार्फत पंचनामा करण्याचे जे नियम आहेत, त्यामध्ये पंचनामा करणे आवश्यक होते परंतु जेथे कापसाची उगवण झालीच नाही तेथे तज्ञांची गरज काय? सरळ बियाणांत दोष आहे हे दिसुन येते कारण दोन टक्के अतीशय नगण्य आहे. अर्जदाराने यासंबंधी दि.12/09/2009 ला कायदेशिर नोटीस दोन्ही गैरअर्जदारांना पाठविले होते. गैरअर्जदारांनी यासंबंधात आपले लेखी म्हणण्यात गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या नोटीसचे उत्तर दिले असे म्हटले आहे. बियाणे उगवण्यासाठी शेतीशी उत्तम मशागत त्यापुर्वी पाऊस बियाणासंबंधी खताची परेणी दोन्ही रोपामधील अंतर इ.सर्व गोष्टी उगवण्यासाठी अत्यंत आवश्यक जरी असले तरी प्रस्तुत प्रकरणांत पंचनामाचे अवलोकन केले असता, बियाणांची उगवण ही दोन टक्केच झाली आहे. रोपाची उगवण जरी झाली असेल व त्याचे प्रमाण हे दहा टक्के पेक्षा जास्त असले तरी शेतक-यांनी पेरणीच्या वेळी सर्व नियमांचे पालन केले नाहीत असे म्हणता येईल परंतु येथे दोन टक्के म्हणजे जवळपास बियाणांची उगवण ही झालीच नाही. गैरअर्जदार उत्पादीत कंपनी यांनी या प्रकणांत लॉट नंबर 79008 याची उगवण शक्ती ही 75 टक्के दिलेली आहे तसे त्यांचे क्वॉलिटी कंट्रोलर लॅबचा अहवाल आहे व तेथे काम करीत असलेले विजय चंद्रशेखर यादव गुणवत्ता नियंत्रण विभाग यांचे शपथपत्रही दाखल केलेले आहे, असे असतांना बियाणांची उगवण मुळीच न होणे म्हणजे शेतक-यास पुरवलेल्या बॅगा यात दुसरे दोषयुक्त बियाणे दिले का? हा प्रश्न निर्माण होतो असे असेल तर शेतक-यास नुकसान भरपाई देखील मिळाली पाहीजे. शेतक-याने प्रती एकरी 10-15 क्विंटल कापसाचे अपेक्षीत उत्पन्न धरलेले असून पेराप्रमाणे 20 क्विंटल कापसाचे नुकसान झाले असे म्हटले आहे व एवढे नुकसान शक्य नाही. कारण एकरी 5 क्विंटल कापुस भरले तर 0.76 आर मध्ये दहा क्विंटल कापुस नीघु शकतो व त्या वेळेसचा क्वॉटन फॅडरेशन चा भाव प्रती क्विंटल रु.3,000/- होता. जेंव्हा अर्जदाराचा रान हा त्या पुर्ण सिझनसाठी पिकामध्ये अडकले असेल तर अशा प्रकारचे नुकसान होऊ शकले असते परंतु अर्जदाराने पेरा दि.07/07/2009 ला केली व दि.01/08/2009 ला पिकाचा पंचनामा केला व यात दोन टक्के उगवण दाखवले म्हणजे जवळपास बियाणाची उगवण झालीच नाही तर तेविसच दिवस शेतक-याचे रान अडकले त्यामुळे अपेक्षित उत्पन्नाची किंमत शेतक-यास मागता येणार नाही. परंतु बियाणे न उगवल्यामुळे बियाणाची चार बॅगाची किंमत रु.1,600/- + रु.5,000/- खताबद्यलरु.5,000/- लागवडीचा खर्च असे एकुण रु.11,600/- व मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहेत. कारण तेविस दिवसानंतर ते रान मोडुन अर्जदारास तेथे दुस-या पिकाची लागवड करुन दुसरे पिक घेता आले असते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी बंद पॉकीट विकले म्हणुन त्यांचे विरुध्द आदेश नाही. यात 1986 – 2004 CONSUMER 7618 (NS)] M/s National seeds Corporation Ltd. V/s Nemmipati nagar Reddy, यात दोषयुक्त बियाणे अत्यंत कमी उगवले त्यामुळे शेतक-यास नुकसान झाले असे म्हटले आहे. दुसरे एक केस लॉ Maharashtra Hybrid Seeds Co.Ltd. V/s Annapureddy Vijender Reddy and another यात मिरचीचे बियाणे लावले होते, मिरचीचे रोपे उगवले परंतु त्याला योग्य उत्पन्न आले नाही. प्रस्तुत प्रकरणांत बियाणे उगवलेच नाही, यात बियाणे दोषयुक्त होते असा अभिप्राय दिलेला आहे. या दोन्ही केस लॉचा आधार घेत आम्ही गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी केली म्हणुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांचे आंत अर्जदारास एकुण नुकसानीबद्यल रु.11,600/- द्यावे. असे एकुण रु.11,600/- रक्कमेवर दि.01/08/2009 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा पोटी रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |