जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 111/2008 ते 116/2008 व 140/2008. प्रकरण दाखल तारीख - 13/03/2008 प्रकरण निकाल तारीख - 23/10/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. तक्रार क्र. 111/2008 रामराव माणिका शिखंदे रा.कल्हाळी पो. रुई ता. कंधार जि.नांदेड 2. तक्रार क्र.112/2008 गंगाराम विठोबा डुबरे रा.बाचोटी ता. कंधार जि. नांदेड 3. तक्रार क्र.213/2008 तूळशीराम विठठल डुबरे रा.बाचोटी ता. कंधार जि. नांदेड 4. तक्रार क्र.114/2008 बाबू माणिका शीखंदे रा.कल्हाळी पो. रुई ता.कंधार जि.नांदेड अर्जदार 5. तक्रार क्र.115/2008 किसन धोडींबा डुबरे रा.बाचोटी ता.कंधार जि. नांदेड 6. तक्रार क्र.116/2008 धोंडीबा विठोबा डुबरे रा.बाचोटी ता. कंधार जि. नांदेड. 7. तक्रार क्र.140/2008 व्यंकटी माणीका शिखंदे रा.कल्हाळी पो. रुई ता. कंधार जि. नांदेड. विरुध्द. 1. बालाजी हायब्रीड सिडस कार्पोरेशन 15, सी इडस्ट्रीयल इस्टेंट, शिवाजी नगर, नांदेड 2. जे.के.अग्रो जेनिटीक्स लि. गैरअर्जदार 1-10-177 चौथा मजला, वरुण टॉवर बेगम पेठ, हैद्राबाद. अर्जदारां तर्फे वकील - अड. ऐ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड. पी.एस. भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार बालाजी सिडस कार्पोरेशन व व जे के. अग्रो जेनिटीक्स लि. यांच्या दोषपूर्ण सेवेबददल वरील सर्व अर्जदारांनी आपली वेगवेगळी तक्रार दाखल केली आहे, परंतु सर्व अर्जदारांची मागणी ही वरील कंपनीच्या दोषयूक्त बियाण्यासंबंधी सारखीच असल्याकारणाने यासर्व प्रकरणांचा एकञित निकाल देत आहोत. सर्व अर्जदार यांची गैरअर्जदार यांचे सदोष बियाण्यातून ञूटीची सेवा व फसवणूक झाल्याबददल खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. सर्व अर्जदार हे कल्हाळी व बाचोटी ता. कंधार या गांवातील असून ते व्यावसायाने शेतकरी आहेत. त्यांचे व कूटूंबियाच्या उदरनिर्वाह शेतीवर चालतो. सर्व अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून संकरीत कापूस जेसेसीएच 22 नरवाण एलएन 3501 62.1 ग्रॅम व मादीवान एलएन 3051 45 ग्रॅम असे रु.220/- देऊन बियाणे खरेदी केले व त्याप्रमाणे त्यांने आपल्या शेतात सिड प्लॉटमध्हये व्यवस्थित आवश्यक तेवढे अंतर ठेऊन कंपनीच्या नियम व शर्ती प्रमाणे ते पेरले. गैरअर्जदार यांचे सांगण्यावरुन नर व मादी एकदाच लावल्यास 4 ते 8 दिवसा झाल्यावर फळ येईल असे सांगितले. परंतु त्यांचे सांगण्यावरुन पेरला फळ आले व दोन महिन्यांनी मादीला त्यामुळे क्रांसीग व्हायला पाहिजे ती झाली नाही म्हणजेच पराचे पावडर मादीला लागले पाहिजे व ते आले नाही व नंतर त्यांनी पराला तोडा म्हणाले व सांगण्यानुसार नराला तोडल्यावर त्यांची उगवण मादीबरोबर झाली नाही व 40 दिवसांत दोन्हीचा चाफा यायला पाहिजे ते आले नाही त्यामूळे योग्य प्रमाणात उगवण झाली नाही त्यामूळे शेतक-याचे रु.50,000/- चे नूकसान झाले. गैरअर्जदार यांचे सांगण्याप्रमाणे सर्व आवश्यक ती काळजी घेतली. खताचा वापर, अंतर यासर्व गोष्टी तंतोतंत अंमलबजावणी करुन त्यांचे उत्पन्न अर्जदारास झाले नाही. उलट त्यासाठी खर्च झाला, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना विनंती केली व पाहणी करुन नूकसान भरपाई दयावी असे सांगितले परंतु त्यांनी सर्व मागणी फेटाळली. त्यामूळे जिल्हा परीषद, कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली. यांची दखल घेऊन दि.29.9.2007 रोजी सर्व अर्जदाराच्या शेताची पाहणी केली. त्यात गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्याने शेतक-याचे 90 टक्के नूकसान झाले असा अहवाल दिला म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, उत्पन्नाच्या नूकसान भरपाई बददल रु.50,000/-, मानसिक व शारीरिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/-मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले म्हणणे संयूक्तीकरित्या एकञित दिले आहे. त्यांचा पहिला आक्षेप आहे की, गैरअर्जदाराने सदरील बियाणे अर्जदारास विक्री केलेले नाहीत. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून रु.220/- या बियाण्याच्या उत्पन्नासाठी लावलेला खर्च म्हणून स्विकारले. त्यामूळे ते ग्राहक होणार नाहीत. गैरअर्जदाराने अर्जदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. अर्जदारांनी गैरअर्जदाराकडून संकरीत कापूस जेकेसीएच 22 नवान एलएन 3501 62ञ1 ग्रॅम व मादीवानर एलएन 3051 45 ग्रॅम दिले होते. गैरअर्जदाराने अर्जदारास 4 ते 8 दिवसांत झाडाला फळ येईल असे कधीही म्हटले नाही. कोणत्याही झाडाला पेरल्यानंतर 8 ते 10 दिवसांत फळ येऊन शकत नाही. अर्जदाराने नर व मादी बियाण्याची पेरणी केल्यानंतर जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतली नाही. त्यामूळे अर्जदाराचे कोणतेही नूकसान झाले नाही. उलट अर्जदाराच्या चूकीमूळे गैरअर्जदार क्र. 2 यांचे नूकसान झाले. अर्जदाराने 5 x 5 फूटावर बियाण्याची पेरणी केली परंतु ही पेरणी एक एकरामध्ये केलेली नसून ती 10 गूंठामध्ये केलेली आहे. सदरील प्रोग्राम हा 10 गूंठा जमिनी बदलचा होता. गैरअर्जदाराने दिलेले मार्गदर्शनाचे अर्जदाराने पालन केलें नाही. कृषी अधिका-याने अर्जदाराच्या शेतामध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तो तथाकथित अहवाल खोटा व चूकीचा आहे. त्यास कोणताही शासकीय आधार नाही.गैरअर्जदाराने दिलेले बियाणे हे रिसर्च वेरायटी आहे व नोटीफाईड वेरायटी नाही. फक्त नोटीफाईड वेरायटीची तपासणी होऊ शकते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराच्या व्यतिरिक्त दूसरे 74 शेतक-याना सदरच्या लॉटचा पूरवठा केला होता पण हे सहा शेतकरी सोडल्यास इतर एकाही शेतक-यांची तक्रार नाही. प्रोग्रामप्रमाणे नर व मादी बियाण्याचे एकाच वेळेस पेरणी करावयाची आहे व ते पण नर व मादी बियाण्यांची वेगवेगळी पेरणी करावयाची आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास व इतर सर्व शेतक-यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की, शेतक-यांनी दोन्ही बियाणे एकाच वेळेस पेरावे व जर नर झाडाला फुल मादी झाडाच फुलापेक्षा लवकर आल्यास नर झाडाचे फुल मादीच्या झाडाला फुल येईपर्यत तोडून फेकून घावे व जर मादी झाडाला फुल नर झाडाच्या फुलापेक्षा लवकर आल्यास मादी झाडाचे फुल नर झाडाला फुल येईपर्यत तोंडून फेकून घावे. ज्या दिवशी नर झाडाला व मादी झाडाला फुले येतील त्या दिवशी नर झाडाचे फुले तोडून मादी झाडाच्या फुलाला क्रॉसींग करावे. गैरअर्जदाराने सर्व शेतक-यांना सांगितले होते की, बगर क्रॉसींग करता झाडाला बोड लागू देऊ नये.शिवाय अर्जदाराने नर झाडाला बोंड लागू दिले, आळी प्रतिबंधक औषधी फवारले नाही. गैरअर्जदाराच्या प्रतिनधिनी ही बाब लेखी निदर्शनास आणून दिली. तरी अर्जदाराने सूचनाची अंमलबजावणी केली नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या सिड प्लॉट अपाञ ठरविला आहे व यांची सूचना अर्जदारास पाठविली आहे. अर्जदाराने परागीकरण योग्य त-हेने केले नाही व लागलेले बियाणे हे सिड प्लॉट होते. सदरच्या सिड प्लॉटला कमर्शियल प्लॉट म्हणून करुन घेतले व आलेला कापूस हा बाजारात विकून टाकला. गैरअर्जदार क्र. 2 हे सिड उत्पादक आहे. अर्जदाराला जो प्लॉट दिला त्यातून येणारे बियाणे हे पूढील वर्षी वापरायचे होते. अर्जदाराच्या निष्काळजीपणामूळे गैरअर्जदारास बियाणे मिळू शकले नाही त्यामूळे त्यांचे नूकसान झाले म्हणून तक्रारदाराची तक्रार खोटी ठरवून ती खर्चासह फेटाळावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केले आहेत. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी दोषपूर्ण बियाणे पूरवून अर्जदाराची फसवणूक केली हे अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात अर्जदारांना सिड प्लॉट दिलेले आहे व अर्जदार यांनी ते रु.220/- घेतलेले आहेत. ते बियाण्याच्या उत्पादनासाठी लागलेला खर्च म्हणून स्विकारलेले आहेत म्हणून ते ग्राहक होणार नाहीत असा आक्षेप घेतला आहे. शिवाय गैरअर्जदार यांचे मार्गदर्शनाखाली अर्जदारांनी सिड प्लॉट घ्यायचा व येणारे उत्पन्न सिड हे गैरअर्जदारांनी ठरलेल्या भावाने विकत घ्यायचे अशी योजना होती म्हणून हे व्यावसायीक कारण असल्याकारणाने अर्जदार ग्राहक होणार नाहीत] असा आक्षेप घेतलेला आहे परंतु अर्जदारांनी जी पावती दाखल केली आहे. त्या पावतीवर फाऊंडेशन सिडस कॉस्ट म्हणून रु.220/- गैरअर्जदारांनी दि.13.8.2007 रोजी स्विकारलेले आहेत. यांचा अर्थ सिड अर्जदारांना विकले आहे. म्हणून ते ग्राहक ठरतात. शिवाय शेतकरी हा व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहासाठीच करतो व अर्जदाराने सूरुवातीलाच आपल्या तक्रारअर्जात त्यांचे व कूटूंबाचा उदरनिर्वाहासाठी त्यांने हे सिड प्लॉट घेतला आहे असे म्हटलेले आहे. म्हणून यांस व्यवसायीक स्वरुप जरी असले तरी शेतक-यांच्या उदरनिर्वाहासाठी आहे व शेती हा व्यवसाय व्यावसायीक स्वरुपात मोडत नाही म्हणून अर्जदार हे ग्राहक आहेत. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- गैरअर्जदारानी आपल्या अर्जात जेकेसीएच 22 नरवान एलएन 3501 वजन 62.5 ग्रॅम व मादी वान एलएन 3051 वजन 125 ग्रॅम बियाणे घेतल्याबददल अर्जदार यांचा आक्षेप नाही. त्यांनी जे तक्रार अर्जात गैरअर्जदार यांचे मार्गदशानाखाली शेतात पेरणी केली व गैरअर्जदार यांचे सांगण्यावरुन नर व मादी एकदारच लावल्याने 4 ते 8 दिवसांत झाडाला फळ येईल परंतु फळ आले नाही. दोन महिन्यांनी मादीला क्रांसीग करायला पाहिजे जे ती झाली नाही. चाफा यायला पाहिजे तो आला नाही, म्हणून योग्य प्रमाणात उगवण झाली नाही असे म्हटले आहे. यावर आक्षेप घेताना गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात मार्गदर्शन केले त्याप्रमाणे शेतक-यांनी त्यांचे पालन केले नाही. घेतलेल्या प्रोग्रामप्रमाणे दिलेले बियाणे हे फक्त 10 गूठांत पेरावयाचे होते ते शेतक-यांनी 1 एकरात पेरले. प्रोग्रामप्रमाणे नर व मादी बियाण्याची एकाच वेळेस पेरणी करावयाची आहे पण नर व मादी बियाण्याची वेगवेगळया पेरणी करावयाची आहे. परंतु शेतक-यांनी दोन्ही बियाण्याची एकाच वेळेस पेरणी केली जे जर झाडाना फुल मादी झाडाच्या फुलापेक्षा लवकर आलयास नर झाडाचे फुल मादीच्या झाडाला फुल येईपर्यत तोडून फेकून द्यावे व जर मादी झाडाला फुल नर झाडाच्या फुलापेक्षा लवकर आलयास मादी झाडाचे फुल नर झाडाला फुल येईपर्यत तोंडून फेकून द्यावे. ज्या दिवशी नर झाडाला व मादी झाडाला फुले येतील त्या दिवशी नर झाडाचे फुले तोडून मादी झाडाच्या फुलाला क्रॉसींग करावे. बगर क्रॉसीग करता झाडाला बोंड लागू देऊ नये. अशी सूचना दिलेली असताना अर्जदाराने त्यांचे पालन केले नाही. शिवाय काही प्रतिबंधक औषधी फवारले नाही. अर्जदाराने तक्रार अर्जात लावणीचा व त्यांनी केलेल्या कामाचा तक्रारीत उल्लेख् केला आहे. व गैरअर्जदारांनी जी पध्दती सांगितलेली आहे ती पध्दती थोडी केली होती. गैरअर्जदाराच्या प्रोग्रामप्रमाणे अर्जदार यांनी नर झाडाला फुल आल्यावर ते तोडले नाही. त्यामूळे मादीला क्रांसीग व्हायला पाहिजे होती ती क्रॉसींग पण केली नाही. म्हणजे अर्जदार हे सांगितल्या सूचनेप्रमाणे क्रॉसींग करण्यास असमर्थ ठरले किंवा त्यात त्यांचा निष्काळजीपणा झाला हे स्पष्ट होते. व क्रॉसींग जर व्यवस्थित झाले नसेल तर सिड प्लॉट मधील सिड हे योग्य प्रमाणात येणार नाही. शेतक-यांने तक्रार अर्ज करुन त्यात जिल्हा कृषी समितीने केलेला पंचनामा व तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. याप्रमाणे बिजोउत्पादन कार्यक्रम संकरित कापूस जे. के. सी.एच. 22 या वाणाचा असून, तो सत्यतादर्शक (टुथफुल) बियाण्याचा आहे, जे.के.सिडस कंपनी हैद्राबाद यांनी सदर कार्यक्रम मारुती सिडस कंपनी लि. नांदेड , बालाजी सिडस कंपनी नांदेड यांच्या मार्फत घेतलेला आहे. यामध्ये देण्यात आलेले नरवाण व मादीवाणाचे वैशिष्टयामध्ये फुलो-यात येण्याच्या कालावधी मध्हये 15 ते 20 दिवसाचे अंतर आढळून आलेले आहे. नरवाण मादीवाणाचे 15 ते 20 दिवसाआधी फुलो-यात येतो. या अंतरामुळे नर व मादीवाण एकाच वेळी लागवड केल्यामुळे फुलावर येण्याच्या कालावधीतील फरकामुळे सदरील बिजोत्पाद कार्यक्रमाचे परागीकरण वेळेवर व यशस्वीपणे बिजोत्पादन शेतक-यांना करता आलेले नाही.म्हणजे अर्जदाराने नर किंवा मादी वाणाचे फुल आधी येईल ते तोडावे व अर्जदाराने 4 ते 8 दिवसांत फळ येईल असे म्हटले आहे. ते त्यांचे म्हणणे चूकीचे ठरते कारण 10 ते 15 दिवसांच्या आधी काहीच निष्पन्न होऊ शकत नाही. परागीकरणात अंतर ठेवणे आवश्यक आहे. शेतक-यांचा जो आरोप आहे तो सदोष व भेसळयूक्त बियाणे हे पंचनाम्यामध्ये नंबर 3 मध्ये नर व मादी वाणांत भेसळ आढळून आली नाही. म्हणजे बियाणे योग्य प्रतीचे होते असे आढळून आले आहे. पंचनामा नंबर 4 वर क्रॉसींगचे काम सुरुवातीला 10 ते 15 दिवस सुरु होते व नंतर ते काम बंद करण्यात आले. बिजोउत्पादक कंपनीने शेतक-याच्या लागवडी बददल मार्गदर्शन केले काय असे विचारले असताना शेतक-यांनी नाही असे उत्तर दिले परंतु पंचनामा व उपलब्ध कागदपञे पाहिले असता व अर्जदाराने जी तक्रार केलेली आहे त्यात सारखे सारखे अर्जदारांनी गैरअर्जदार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे असा उल्लेख केलेला आहे. यावर गैरअर्जदार या कंपनीने त्यांना योग्य मार्गदर्शन केले हे दिसून येते. यांला पूरावा म्हणून गैरअर्जदारांनी सिड प्लॉट पंचनामा रिपोर्ट दाखल केलेला आहे. यात सिड प्लॉट वरील झाडाना मावा,तूडतूडे, हिरवी बोंड आळी भरपूर प्रमाणात लागलेली आहे व त्यावर किटकनाशकाची औषधी फवारण्याचा सल्ला दिलेला आहे व शेतक-याने यांचे पालन केले असे दिसून नाही. शिवाय परत एकदा जेके सिडस यांच्या प्रतिनीधीने घटनास्थळ पंचनामा करुन एफ.आय. आर. दिला त्यात आमच्याकडून गट 22 वाणाचा प्लॉट घेऊन लागवड केली व आम्ही वेळोवेळी दिलेलया सूचनाचे यपालन न केले ( उदा. नरांचे बोंडे न तोडणे, आळी प्रतिबंधक औषधी न फवारणी ) व पालन न केल्याने कंपनीने आपला प्लॉट अपाञ ठरविला आहे असे कळविले आहे. यात दोन्ह तपासणी वरुन असे स्पष्ट दिसते की, गैरअर्जदाराच्या प्रतिनीधीने जाऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले, परंतु त्यांनी त्यांचे पालन केले नाही म्हणून त्यामूळे त्याचे सिड प्लॉट खराब झाले व जे बियाणे गैरअर्जदार विकत घेणार होते ते बियाणे त्यांना न मिळाल्यामूळे अर्जदार यांचे सोबतच गैरअर्जदार यांचे नूकसान झाले हे स्पष्ट होते. शिवाय गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्यात असे म्हटले आहे की, 74 शेतक-यांना गैरअर्जदाराने सिड प्लॉट दिले होते त्यापैकी फक्त सहा शेतक-यांचीच तक्रार आहे व बाकीच्या एकाही शेतक-यांची तक्रार नाही. गैरअर्जदारानी हया शेतक-यांना म्हणजे अर्जदारांना त्यांचे प्लॉट अपाञ घोषित केलेले आहे व नंतर या शेतक-यांनी त्या झाडाला कापूस येऊ दिला व तो कापूस बाजारात विकला. त्यामूळे अर्जदाराच्या उत्पन्नाचा खर्च निघाला आहे असे दिसते. गैरअर्जदारांनी अर्जदाराना मार्गदर्शन केले हे सिध्द होते त्यामूळे कृषी अधिका-यांनी त्यांचे पंचनाम्यावर जो निष्कर्ष काढला आहे तो आम्ही चूक ठरवित आहोत व पंचनाम्यावर परागीकरण वेळेवर झाले नाही त्यामूळे सिड प्लॉटचे उत्पन्न येऊ शकले नाही हे सिध्द झालेले आहे व परागीकरण का झाले नाही यांस शेतक-यांचा निष्काळजीपणा किंवा गैरअर्जदारांनी दिलेल्या सूचनाचे योग्य पालन न करणे हयामूळे त्यांचे सिड प्लॉट गेले हे सिध्द होते. म्हणून गैरअर्जदार यांस त्यासाठी जबाबादार धरता येणार नाही. कृषी अधिका-यांनी दिलेल्या पंचनाम्यामध्ये काढलेला निष्कर्ष हा बरोबर जरी असला तरी यांस जिम्मेदार गैरअर्जदार नसून शेतकरी आहेत हे सिध्द होते. सिड प्लॉट मध्हये सर्वाच्या म्हणण्यावरुन हे अतीशय स्वच्छ व स्पष्ट आहे की, बियाणे लावल्यानंतर बोंडे योग्य आलेले आहेत, झाडाना फुलोरा आलेला आहे व त्यावर रोगही पडलेला आहे व मूख्यतो करुन ज्या अंतराने परागीकरण करणे आवश्यक होते त्यात शेतकरी कमी पडला व अशा मध्ये हे सात शेतकरी मोडतात, बाकी शेतक-याचे सिड प्लॉट योग्य प्रकारचे आलेले आहेत हे गैरअर्जदार यांनी दिलेल्या यादीवरुन दिसून येते. प्रस्तूत सर्व तक्रारीमधील बियाण्याचा सिड प्लॉट मधून येणा-या उत्पन्नासाठी शेतक-यांची चूक असल्याकारणाने आम्ही गैरअर्जदार यांना दोषी धरत नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या समर्थनार्थ सिड प्लॉट घेतलेल्या काही शेतक-यांचे शपथपञ, जवाब दाखल केलेले आहेत. यात श्री.गोविंद जगदेराव भंगरे, श्री. उमाकांत जगदेराव भंगरे, श्री. शिवाजी संभाजी गिते, श्री.प्रभाकर रामराव तुबरुळे, श्री.बालाजी रामराव तुंबरफळे, श्री.दिगंबर कामाजी तुंबरफळे, श्री.नामदेव माधवराव वरताळे, श्री.प्रताप संभाजी वरताळे, श्री.श्रीराम प्रल्हाद तुंबरफळे, सर्व रा.वाडी व आलेगांव ता. कंधार येथील राहणारे शेतकरी आहेत.यात त्यांनी गैरअर्जदारांनी दिलेल्या प्लॉटचे नर व मादी बियाणे चांगल्या प्रतीचे आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता व त्यांना उत्पादन समाधानकारक झालेले आहे असा जवाब दिलेले आहेत. या पूराव्यावरुन ही गैरअर्जदार यांचे बचावाला पूष्ठी मिळत आहे. यात अर्जदारांनी काही शेतक-याचे पूरावे शपथपञाद्वारे दाखल केलेले आहेत. त्यात श्री.माणीका लक्ष्मण शिरवंदे, श्री. शंकर आमृता वडजे, श्री.राजाराम गणपती वडजे, श्री.विठठल गंगाधर वडजे, श्री.हारी मारोती वडजे, श्री.दत्ता माणीका शिरवंदे, श्री.सदाशिव केरबा वडजे, श्री. व्यकंटी गणपती वडजे, सर्व राहणार कल्हाळी ता. कंधार येथील आहेत. यात अर्जदार यांना शेतात क्रॉसींग करावयास जमली नाही म्हणून उत्पन्न आले नाही व नूकसान झाले असे म्हटले आहे. व दाव्यात शेतक-यांना क्रॉसींग करायला जमले नाही किंवा त्यांनी गैरअर्जदार यांच्या सूचनाचे पालन केले नाही हे सिध्द झालेले आहे. म्हणून ही झालेलया नूकसानीस अर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत हे दिसून येते. मा.राष्ट्रीय आयोग, 2008 (2) सीपीआर 59 (एनसी) मे इंडिया सिड हाऊस विरुध्द रामजीलाल शर्मा व इतर यात उत्पादकाचा दोष, बियाण्यातील उत्पादकाचा दोष हे सिध्द झालेले आहे. प्रस्तूत प्रकरणात उत्पादकाचा दोष सिध्द होत नाही. म्हणून हे सायटेशन प्रस्तूत प्रकरणापेक्षा वेगळे आहे म्हणून या प्रकरणात लागू होणार नाही. अजून मा.राष्ट्रीय आयोग, 2008(3) सीपीआर 61 (एनसी) यात श्रीमती प्रेम कांता व इतर विरुध्द हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथोरिटी व इतर यात सदोष बियाणे पूरविणे पर्यत उपलब्ध रेकार्ड पूराव्याअभावी ते नॉन स्टॅडर्ड क्वॉलिटीचे बियाणे आहे हे सिध्द होऊ शकत नाही म्हणून गैरअर्जदार यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे सिध्द होत नाही. प्रस्तूत प्रकरणातही पूरावा समोर येऊन अर्जदाराचा दोष सिध्द झालेला नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. एकञीत मुळ निकालपञ प्रकरण क्र.111/2008 मध्ये ठेवण्यात येते. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |